【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: २७ जून २०१६
【"समाजातील असो कोणताही वर्ग, सर्वांकरिता 'मानवधर्म' हाच सुखाचा मार्ग"】
माझे नाव 'सोनु मेश्राम' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
आमच्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत. बाबा, आई, माझा लहान भाऊ आणि मी. या मार्गात सगळे दु:खी सेवकच येतात व ८०% सेवक दारूने व्यथित होऊन या मार्गात येतात. आमचे मार्गात येण्याचे कारण सुद्धा, माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन होते. आम्ही मार्गात आलो तेव्हा मी खूप लहान होतो. माझे आजी-आजोबा या मार्गाशी जुळलेले होते.
एके दिवशी माझे वडील मला आणि माझ्या आईला घ्यायला आजोबांकडे आले होते आणि ते दारू पिऊन होते, तर आजोबांनी त्यांना घरात न घेता घराच्या बाहेर काढले व जायला सांगितले. मग काही दिवसानंतर अचानक वडिलांची प्रकृती बिघडली, त्यांना धात/धातू (जवळपास रोज मानवी शरीरातून रक्तस्त्राव लघवीच्या जागेतून होणे) याप्रकारे झालेले होते व खुप प्रयत्न करून सुद्धा काही फायदा होत नव्हता. मग हळुहळू परिवारात सगळ्यांची प्रकृती बिघडायला लागली.
आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची अशी परिस्थिती बघुन, बाबा आजोबांकडे गेले व त्यांना तीर्थ बनवून मागितले. आजोबांनी अगोदर बाबांकडून शब्द मागितले की, ते दारू पिणार नाही व बाबांनी शब्द दिले की, ते कधीही दारू पिणार नाही. मग त्यांना तीर्थ करुन दिले व नंतर त्यांना आराम मिळाला. बाबांची अगोदर पासूनच मार्गात यायची इच्छा होती, पण दारूच्या व्यसनामुळे त्यांनी काही पुढाकार घेतला नाही. कारण मानवी प्रवृत्तीच अशी आहे की, जेव्हा पर्यंत स्वतःवर किंवा स्वतःच्या परिवारावर संकट येत नाही, तोपर्यंत पुढचा पाऊल उचलत नाही. मग बाबा, आमचे मार्गदर्शक, श्री. मारोतरावजी राऊत गुरूजी यांच्याकडे गेले. गुरूजींनी सांगितल्या प्रमाणे घराची साफसफाई करून, देवी देवतांच्या मुर्त्या आणि फोटोंचे विसर्जन केले व ३ दिवसांचे कार्य सुरू केले.
साध्या कार्यात आम्हाला सुख समाधानी मिळाली व नियमीत कार्य सुरु झाले. नंतर आम्हाला त्यागाचे कार्य घ्यायचे होते. वडिलांची ईच्छा होती की, त्याग आपण स्वतःच्या घरी करायचे. कारण, आम्ही किरायाच्या रूम मध्ये राहत होतो. बाबांचे काम बाहेर गावी असल्यामुळे आमच्या कार्यात ग्याप आली व त्यात काही दुःख सुद्धा आले व आम्ही परमेश्वराला माफी मागितली. आता आमच्याकडे त्यागाचे कार्य पार पडले.
आमचे त्यागाचे कार्य सुरू होण्याअगोदर पासुनच आईची प्रकृती बरोबर नव्हती व कार्यात आईच्या व माझ्या हाताने चुक झाली की, मी कार्यात थोडी चिडचिड केली व राग आणला होता. त्यामुळे कार्य संपल्यावर आईची प्रकृति वाढली. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी शरीरात रक्त नाही असे सांगितले. मग मार्गदर्शक काकाजींकडे गेल्यावर त्यांनी कोणाच्या हाताने चुक झाली असेल तर चुक आठवुन भगवंताला माफी मागायला सांगितले. मग आम्ही माफी मागितली. आता आईची प्रकृती ठीक आहे व सर्व सुख, समाधानी आहे.
मी लहान होतो तेव्हापासुन या मार्गात आहे. "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या कृपेत व आशिर्वादात मोठा झालो व या मार्गात मला खुप काही शिकायला मिळाले. बाबांचे आदेश चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियमांचे नियमित पालन केले तर भगवंत आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. यांचे पालन तुम्ही सुद्धा करा व मी सुध्दा करण्याचा प्रयत्न करणार.
लिहिण्यात काही चूक-भूल झाली असल्यास "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- सोनु मेश्राम
पत्ता :- रा. वाठोडा, नागपूर
सेवक नंबर :- ३९४९०
मार्गदर्शक :- श्री. मारोतरावजी राऊत गुरुजी, गट नं. ८, नागपूर
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील :7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ नवीन अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
🙏जी दादा छान अनुभव
ReplyDeleteआपले धन्यवाद कमलेश दादा नान्हे, आपली प्रतिक्रिया नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करण्यास असावी. नमस्कार
Delete