Followers

Sunday, 26 April 2020

प्रकरण क्रमांक (१) "जन्म व जीवन"


 "मानवधर्म परिचय पुस्तक मोहीम (वर्ष २०१७-१८)

 "मानवधर्म परिचय (मराठी) 'सुधारित पाचवी आवृत्ती'

   प्रकरण क्रमांक: (१) "जन्म व जीवन"

         नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सीमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे. हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात गोळीबार चौक नावाचा मागासला समजला जाणारा प्रसिद्ध असा भाग आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू असताना त्यांच्यापासून त्याला स्वतंत्र करण्याकरिता भारतवासीयांनी नानाप्रकारचे सत्याग्रह केले. त्यातलाच एक झेंडा सत्याग्रह १९२१ साली करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरात तो सत्याग्रह झाला. त्यात नागपूरवासियांनी भाग घेतला होता. या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचा नारा दिला होता. तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळो की पळो करण्याकरिता बंदुकीच्या गोळ्या लोकांवर झाडल्या होत्या. या शूरवीरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शाहिद झाले. तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले. आजही या चौकात या शहीदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहिद स्तंभ उभारण्यात आलेला आहे. 

        हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला. या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील हलबा या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या चौकाच्या बाजूलाच एक उदाराम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. या मठाच्या मागे आदिवासी जमातीतील हलबा जातीतील ठुब्रीकर घराण्यातील चार सख्खे भाऊ राहत असत. त्यांची नावे तानबा, महादेव, विठोबा आणि बालाजी अशी होती. त्यांचा मूळ धंदा विणकरी (पातळ विणणे) हा होता. चारही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एकत्रित राहत होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रोज विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर ते घरगृहस्थी चालवीत असत.

अशा या गरीब कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजी ३ एप्रिल १९२१ रोजी श्री.विठोबा राखडू ठुब्रीकर आणि सरस्वताबाई या दांपत्याच्या पोटी जन्माला आले. या दांपत्याचे बाबा चौथे अपत्य होते. बाबांपेक्षा तिन भावंडे बाळकृष्ण, नारायण आणि जागोबाजी ही मोठी होती. तर एक भाऊ मारोती हा सर्वात लहान होता. अशी पाच अपत्ये या दापंत्याला होती. बाबांचे लहानपणाचे नाव जुम्मन होते.

घरची परिस्थिति हलाखीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण मधेच सोडून घरच्या परिस्थितिला हातभार लावण्याचे ठरवून  त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत असलेल्या विणकरी च्या धंद्याला सुरुवात केली.

लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयष्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा आहे. ते लहानपणापासूनच नीतिमत्ता बाळगतात. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांचा बालपणापसुनच विश्वास आहे. त्यांना लहानपणापासूनच हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. ते रोज सायंकाळी हनुमान चालीसा वाचत असत. प्रायमरी शाळेत शिकत असताना शाळेतून आल्यानंतर स्वयंपाक घराचे दार बंद असल्यास ते दाराच्या फटीतून आत बघत असत. तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरखट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे. तसेच त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असलेला त्यांना नेहमी दिसायचा.

जुन्या काळात देहयष्टीला फार महत्व होते. म्हणून ठीकठिकाणी आखाड़े बांधले गेले होते. या आखाड्यांत लहान मोठी मुले मेहनतीसाठी जात असत. त्याप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरातील पहेलवान नावाने प्रसिद्ध झाले. त्यांना कुश्ती खेडण्याचा शौक होता.

बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९३८ साली में महिन्यात नागपुर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठीतीत निवासी श्री.बापूजी बुरडे यांची सुकन्या आणि तड़फदार व अग्रगण्य विणकार नेते श्री.सोमाजी बुरडे यांची धाकटी बहिन वाराणसीबाई हिच्याबरोबर झाले.

बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी विणकरीचा धंदा सोडून दिला व सेठ केसरीमल यांच्या दुकानात वहीखाते लिहिण्याचे काम मासिक तीस रुपये पगारावर करू लागले. दुकानमालक मारवाडी समाजाचे होते. सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदनसेठ पुगलिया हा त्याचा मामा सेठ सरदारमल यांच्या देखरेखीखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता. बाबांनी तेथे पाच सहा वर्षे नोकरी केली. बाबा जेथे नोकरी करीत होते ते दुकान सोन्याचांदीचे होते.

एक दिवस बाबांना दुकान साफ करताना दहा तोळ्यांचा सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला. तो हार उघड्यावर बघून बाबांना धक्काच बसला. बाबांनी तो हार सेठ सरदारमलकडे नेऊन दिला. त्यांनी डागाजीला बोलाविले. तो त्यांचा भाचा होता. त्यांनी हाराबद्दल डागाजीला विचारले आणि त्याला जोरदार थापड लावली. ते त्याला म्हणाले की, तो (बाबा) इमानदार आहे. म्हणून हार आणून दिला, नाहीतर हा हार चोरीला गेला असता किंवा हरवला असता तर त्याला कोण जिम्मेदार राहिले असते? यावरून बाबांचे सत्य आणि इमानदारी हे गुण दिसून आलेत. तेव्हापासून बाबांकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले. मदनसेठचा लहान भाऊ पैसे उधळतो हे बाबांना माहीत होते म्हणून बाबांनी स्वतः विचार केला की आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच स्थिती राहील हे कशावरून? नोकर माणूस इमानदार असून सुद्धा उद्या प्रसंग आल्यास हेच लोक भाच्याचा पक्ष घेऊन त्याला बदनाम करू शकतात. असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांनी जोर धरल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्ववत ते साडी विणण्याचा उद्योग करू लागले.

बाबा दिवसातून एक रेशमाची नऊवार साडी विणत असत. ती साडी इतकी चांगली असायची की, दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती गिऱ्हाइकाला दाखविण्यासाठी वर ठेवत असत परंतु हातमागच्या धंद्याला मिलमुळे उतरती कळा आली. बाबांचे मेहुणे श्री. सोमाजी बुरडे हे विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते. म्हणून त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नोकरी दिली. बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटीतर्फे गड्डीगोदाम, नागपूर येथे पायांनी चालवावयच्या चादर तयार करण्याच्या मशिनीच्या ट्रेनींगकरिता पाठवले. तेथे बाबांनी ट्रेनींग पूर्ण केले. पिवळी मारबतच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता. त्या कारखान्यात बाबा कामाला लागले. बाबा इतके हुशार होते की, स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपूर्ण मशीन उघडून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तशी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत. याच सुमारास बाबांनी दैवी शक्तिही प्राप्त केली होती.

एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वसुदेव नंदनकर नावाच्या, बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांचा मित्र पण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्यात. तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही. म्हणुन त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्यास अकरा वेळ फूक मारून तीर्थ दिले. त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला. तेव्हापासून बाबांजवळ काहीतरी शक्ती आहे हे लोकांना माहीत झाले. पुढे बाबांनी त्या कारखान्याची नोकरी सोडली आणि ते महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले.

ही घटना १९७६ ची आहे. नागपूर येथील दिघोरी या भागात महानगरपालिकेतर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते. ते काम करताना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला. त्यांना त्या ठिकाणी सुद्धा बेइमानी दिसू लागली. त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेइमानीला कंटाळले. त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते. याच सुमारास बाबांचा मुलगा डॉ. मनो ठुब्रीकर यांना व्हर्जिनिया मेडीकल सेंटर, व्हर्जिनिया (अमेरिका) येथे नोकरी लागली होती. त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनी बाबांना सांगितले की, आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे. बाबांनी विचार करून आणि सध्याच्या घडणाऱ्या बेइमानीच्या व्यवहराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद केला. त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक कार्याकडे आपले संपुर्ण जीवन वळविले.

बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्रांबरोबर राहूनही स्वतःचा आणि त्यांचा खर्च स्वतःचं करीत होते. ते खर्च कोणालाही करू देत नव्हते. बाबा सुरुवाती पासुनच भगवत कार्याकरिता स्वतःचा पैशाने खेडोपाडी ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता पायी, सायकल, बैलगाडी, बस, मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने सतत करीत आहेत. त्यांचे नानातऱ्हेचे दुःख निवारण करीत आहेत. ते गुरुपूजा घेत नाहीत. आत्म्याचा अनादर होऊ नये म्हणून पाया पडू देत नाहीत.

आध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब, कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्याची गृहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवुन सहकारी तत्त्वावर बँक, बहु उद्देशीय ग्राहक भांडार, दूध डेअरी, मानव मंदिर इत्यादींची स्वकष्टाने निर्मिती केली. परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःचा गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच घेतला नाही. त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे. म्हणून त्यांनी आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि "आपल्यासारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तया लगी" ही म्हण सिद्ध केली आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी महानत्यागी ही पदवी दिली आहे.

बाबांनी गृहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे. बाबा आजही वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मानव जागृतीच्या कार्याकरिता सतत दौरे करीत आहेत. बाबा आपले आयुष्य आज एश्वर्यात घालवीत आहेत. 'देई तोच घेई' या म्हणीप्रमाणे बाबांनी सुरुवातीला मेहनत केल्यामुळे त्याचे चांगले फळ भगवंत बाबांना चाखायला देत आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर.

🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [ Facebook page link]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [ Blog link]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [ You tube channel link]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

18 comments:

  1. खूपच छान माहिती ... महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचीजन्म व जीवन ..... नमस्कार

    ReplyDelete
  2. खूब छान माहिती।

    ReplyDelete
  3. आपण "मानव धर्म परिचय" पुस्तक प्रत्येक ठिकाणी carry करू शकत नाही, परंतु आपला मोबाईल नेहमी सोबत असतो आणि मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकातील लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.

    ReplyDelete
  4. आपण "मानव धर्म परिचय" पुस्तक प्रत्येक ठिकाणी carry करू शकत नाही, परंतु आपला मोबाईल नेहमी सोबत असतो आणि मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकातील लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.

    ReplyDelete
  5. namskar dada ....khup Chan ahe baba ch aatmcharitvr mahiti


    ReplyDelete
  6. खुप छान माहिती...

    नमस्कार....

    ReplyDelete
  7. खूप छान आणि सुंदर मालिका

    ReplyDelete
  8. बाबांचे जीवन चारित्र्य हीच मानवासाठी फार मोठी शिकवण आहे,सत्य मर्यादा आणि प्रेम या तत्वावर बाबाचे आचरण आपणास प्रेरणादायी आहे,यातच मानवाचे सुखी आणि समाधानी व्हायचे गुढ़ रहस्य लपलेले आहे ।बाबाचे आचरण हीच गुरुकिल्ली आहे।

    ReplyDelete
  9. खूप सुंदर माहिती, धन्यवाद दादा नमस्कार

    ReplyDelete
  10. अतिशय मोलाची माहिती दादा,खूप सुंदर माहिती
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  11. खूप छान माहिती🙏

    ReplyDelete
  12. खुप छान माहिती नमस्कार जी

    ReplyDelete
  13. Very much informative for everyone. Its important we should know everything about baba and this blog gives much additional information. Thank you

    ReplyDelete
  14. नमस्कार जी 🙏🌺🙏

    ReplyDelete
  15. नमस्कार जी ������

    ReplyDelete