Followers

Saturday, 30 January 2021

"मानव धर्मातील सेविका" या विषयावरील लेख नक्की वाचन करा व शेयर करा.


                   【"मानवधर्मातील सेविका"】

"एक सुशिक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे, एखादी स्त्री किंवा मुलगी शिकली तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब' एक चांगली पिढी घडवू शकते, याला मानव धर्मातील सेविका कशाप्रकारे समजतात त्यामुळे आपली नवीन येणारी पिढी चांगली घडवता येईल?"

                         【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय हा स्त्रींयांवर आधारित असून शिक्षणाचे महत्व पटवून देणारा आहे. आई ही आपल्या मुलांची प्रथम गुरू आहे. मुलगा लहान असतांना ती आपल्या मुलांना हवे तसे वळण देऊ शकते. योग्य ते शिक्षण देऊ शकते. त्यासाठी त्या आईला आधी सुशक्षित असणे जरुरी आहे. "ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा." ही एक मन आहे; पण त्यासाठी त्या व्यक्तीला स्वतः त्या गोष्टीचे ज्ञान असायला पाहिजे. प्रत्येक मुले युगपुरुष होऊ शकत नाही; पण चांगला माणूस म्हणून घडविण्याचे आव्हाहन एका स्त्री पुढे आहे, आई पुढे असते. 

एक सुशक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश अनमोल आहे. कारण, ज्या घरातील स्त्री शिकलेली आहे तो घर कधीच अशिक्षित राहणार नाही. पण फक्त शिक्षण घेऊन त्याचे ज्ञान स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात करणे म्हणजे "शिक्षित" होय. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हा स्त्रियांना खूप छान जीवन दिला आहे. आज आमच्या बोलण्यात, चालण्यात व वागण्यात ही शैली निर्माण झाली आहे. ती फक्त महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवर्तन विचारांनी. तिसऱ्या नियमात बाबांनी स्त्रियांना एक वळण दिला आहे, त्या वळणावर आमच्यात खूप बदल झाला. मनाने एकेरी शब्द आमच्या तोंडातून निघून गेले. कुठेतरी आम्ही एकेरी शब्दात बोलत होतो; पण आज अहो, जावो, आम्ही, तुम्ही, आपण असे शब्द वापरू लागलो आहोत. स्त्री काय करू शकते? ती सर्व काही करू शकते. म्हणूनच तर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्त्रियांना सती सावित्रीचा दर्जा दिला आहे.

शिक्षित स्त्री व मुलीला घरातील व्यावहारिक ज्ञान बरोबर, बाहेरील ज्ञानाची सुद्धा जाणीव असते. त्यामुळे अंधश्रद्धा सारख्या गोष्टीला ती बळी पडू शकत नाही. व याचे ज्ञान ती इतरांना देऊ शकते. म्हणजेच समाजातील कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती तिच्या अंगी असते. 'शिक्षणाचे सहस्त्र जिच्या हाती आहे, ती समाजाच्या अरण्यातून आपली वाट जरूर काढते. मार्गातील स्त्री शिक्षित असो किव्हा नसो; पण परमेश्वरा बद्दल जर अटूट विश्वास असेल, तिची श्रद्धा भगवंतावर असेल तर ती कधीच जगाच्या मागे राहत नाही. म्हणून बाबांनी या मार्गातील सेविकाला सती अनुसया यांच्या पेक्षा मोठा स्थान दिला आहे.

बाबांना माहिती होते की, राष्ट्र चालवण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रपतीची, पंतप्रधानाचे व इतर सदस्यांची निवड होते, त्याचप्रमाणे सेविकाताई ह्या ग्रुहमंत्री आहेत. या मार्गातली स्त्री सक्षम विचारवंत, विनयशील झालेली आहे. अशिक्षित का असेना पण मार्गाच्या रुपरेषे प्रमाणे झाली आहे. एखादी स्त्री किंवा मुलगी शिकली तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब एक चांगली पिढी घडवू शकते. ह्या ठिकाणी एका सुशिक्षित आईचे, मुलीचे आणि बहिणीचा उदाहरण दिला आहे; परंतु आम्ही ज्या भारतात राहतो, त्या ठिकाणी आम्हाला जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, रमाईच्या लेकी तर म्हणतातच; परंतु आमची मातोश्री आई वाराणसी जास्त शिकली नसूनही आमच्यासारख्या सेविका त्यांच्या विचारांनी घडवल्या गेल्या आहोत, तर आम्ही वाराणसी आईच्या लेकी संपूर्ण कुटुंबच नव्हे तर चांगली पिढी घडवून देशाला, समाजाला एक चांगला उच्च विचारी मानव देऊ शकतो.

एवढं धाडस मानव धर्मातील सेविका करू शकते व येणारी पिढी व्यसनमुक्ती, अहंकार मुक्त व साक्षर कुटुंब नक्कीच घडवू शकते. मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. एक शाळकरी मुलगा होता. एके दिवशी तो शाळेत गेला. त्याच्या शाळेतील वर्ग शिक्षिकेने त्याला एक चिठ्ठी दिली व सांगितले की, "ही चिठ्ठी तुझ्या आईला देशील." मुलगा घरी आला आणि आईला वर्ग शिक्षकेनी दिलेली चिठ्ठी दिली. मुलगा तिथेच बसून होता. आईने चिठ्ठी उघडली आणि मुलगा आईकडे पाहू लागला. आईने चिठी उघडली आणि वाचू लागली, त्यातील मजकूर असा होता.

"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार आणि बुद्धिमान आहे. त्याची आकलन शक्ती अमाप आहे; परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे यापुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठवू नका, त्याचा अभ्यास घरीच घ्या!" त्यावेळी आई मनाने विचार करु लागली. तिला आपल्या मुलाबद्दल सर्व समजत होते; परंतु तिचे उद्दिष्ट, ध्येय मजबूत होते. तिला कुठेतरी मुलाला समोर काढायचे होते. म्हणून ती आई आपल्या मुलाला घरी शिकवू लागली. जे नाही कळले त्यासाठी ति दुसऱ्यांची मदत घेऊ लागली; पण मुलाचे शिक्षण तिने सुरू ठेवले.

कालांतराने आईचे निधन झाले. मुलगा पण मोठा झाला होता. लहानपणी असणारे काही अवगुण किंवा शारीरिक दोष भरून निघाले होते व त्यामुळे समाजात सुद्धा याची ओळख होती. एके दिवशी घरातील जुने पेपर चाळत असतांना त्याला एक चिठ्ठी दिसली. त्यावेळी त्याला पटकन आठवले तेव्हा तो थोडा गोंधळला. त्याला पटकन आठवू लागले की, ही चिठ्ठी माझ्या वर्ग शिक्षकेनी मला दिलेली होती व माझ्या आईने लहानपणी मला वाचून दाखवली होती. त्याला जिज्ञासा झाली ती चिट्ठी उघडून तो वाचू लागला.

चिठ्ठी वाचता-वाचताच तो ढसाढसा रडू लागला. कारण, त्यातील मजकूर असा होता की, "प्रिय पालक आपला मुलगा मतिमंद आहे. त्यांची आकलन शक्ती कमी आहे, अशा मुलाला आमची शाळा आणि आमच्या शाळेतील शिक्षक शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठवू नका. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या! चिट्ठी वाचताच त्याला कळून चुकले होते की, आईने खोटे पत्र वाचले होते व मला घडवण्यासाठी खूप मोठी धडपड तिने आपल्या जीवनात केली. हा मुलगा म्हणजे दुसरा, कोणी नसून थोर शास्त्रज्ञ 'थॉमस अल्वा एडिसन' होय. ज्याने विजेचा शोध लावला व अख्ख जग प्रकाशमय करून टाकले. या लखलखत्या प्रकाशात एका मातेने मतिमंद मुलाला शास्त्रज्ञ घडवील. कशी ही किमया असते. ही किमया फक्त आईच करू शकते.

स्त्री कुठलीही असो संसारात रंग भरायचे असले तर इंद्रधनुष्याचे रंग ती निवडते. मुलांना सांभाळायचे असले तर निसर्गातुन आभाळ, नदी, चंद्र, सुर्य, पक्षी, स्मारक, थोर विभूती, विचारवंत, विनयशील यांच्यात कुचल्याचा रंग भरते. प्रेयसीची भूमिका करताना चांदण्या, काजवे, गारवा, नक्षत्र, तारे यात ती सजते व सजवते. एका बहिणीची भूमिका करताना भावाला अधीरपणे हक्क प्रेम, आपलेपणाची जाणीव शिकवते. तर पत्नी बनून अर्धांगिनीचे नाते जन्मभर टिकतवते. विनयशील, नम्र सहनशील तेने भरलेली ही त्यागमय आई आपल्या बाळाला लहानपणापासूनच मार्गाची शिकवण तत्व शब्द नियमाचे पालन व आलेल्या अनुभवातून त्याचे अंतर्मन, त्याचे ध्येय मजबूत करते.

जगात असे एकच न्यायालय आहे. ज्यात आई फक्त जज आणि वकील आहे. ती कधीही मुलांना वाईट शिक्षण देत नाही व मुल वाईट निघाली तर त्याला सुधारण्याकरिता शिक्षाही देते. कितीही मुलगा वाईट असला तरी तो सुधारण्यासाठी एक आई जिवापाड प्रेम करते. त्याला सुधारण्याचा प्रयत्न करते; परंतु जर का सर्व प्रयत्न करूनही मुलगा वात्रट, चोर, दारुड्या निघाला तरी त्याचे सर्व दरवाजे बंद होतात; पण आईच्या घराचे दार नेहमी उघडे असते; परंतु आम्ही सेविका बाबांच्या नियमात बांधलेले आहोत .म्हणून आम्ही आपल्या नियमाला जागून परमेश्वरी कार्य करून आत्म्याचा दरवाजा अगोदर उघडून नंतरच मुलाला जवळ घेत असतो.

म्हणून प्रत्येक सेविका आईने आपल्या मुलांना जन्म घुटी पाजता. त्याचप्रमाणे मानव धर्माच्या शिकवणीचे बाल कडू पाजून येणारी पिढी सशक्त, बलशाली, साक्षरता पूर्वक जगणारी, सीमेवर रक्षण करणारी, 

आजार यांची सेवा करणारी, मुलगा असो वा मुलगी असो तो आदर्श युक्त घडवून आणू शकतो.

"शिकलेली आई कुटुंबाला सामोर नेई." आपल्या परिवारातील सदस्यांना सही रस्ता दाखविते. त्यामुळे मुलाच्या अंगी चांगले संस्कार येतात. त्यासाठी आई आणि वडील हे स्वतः चांगल्या गुणांचे अंगीकार करणारे असतील तर त्यांचे मुले सुद्धा त्यांचे अनुकरण करतात. हे केवळ आपल्या आचरणावर अवलंबून असते.

नुसते शिक्षणाची पदवी घेऊन, पुस्तकी ज्ञान मिळाले म्हणजे झाले, असे होत नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवहारात काटेकोरपणे करणे महत्वाचे आहे. एक शिक्षित स्त्री मनात आणेल तर संपूर्ण अशिक्षित कुटुंबाला शिक्षित करू शकते. अज्ञानाच्या अंधारातुन बाहेर काढू शकते आणि ज्ञानाचा बाळकडू पाजून त्यांचे जीवन प्रकाशित करू शकते. एवढी मोठी प्रचंड शक्ती तिच्या अंगी असते. पण तसे कार्य करण्याची शक्ती तिच्या अंगी असणे आवश्यक आहे. या मार्गातील सेविका ने मनात जर ठानले तर अशक्य अशी कोणतीच समस्या नाही की, जीचा हक आपल्या हाती नाही. "मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देईल दोन्ही घरी." एक स्त्री हीच चांगली पिढी घडवू शकते.

या मार्गात जास्तकरून अज्ञानी व अडाणी लोक आलेले आहेत; पण त्यांना मार्गात आल्यावर अनुभवाने मार्गाप्रति खूप ज्ञान मिळाले आहे. त्यांचा परमेश्वरावर अतूट विश्वास आहे. या मार्गातील स्त्री या मार्गाच्या तत्व, शब्द, नियमांद्वारे आपल्या मुलांना चांगली शिकवण देऊ शकते, योग्य वळण देऊ शकते. भल्या, बुऱ्या गोष्टींची जाणीव करून अंधश्रद्धेत त्यांना पळू देणार नाही, त्यांना वाईट गोष्टीकळे वळू देणार नाही, ती आपल्या मुलांना नेहमी चांगले संस्कार देईल, निष्काम कर्म, चांगली संगत, तत्व, शब्द, नियमांचे पालन ह्या सर्व गोष्टी ती आपल्या मुलांना समजावून सांगेल, जेणेकरून ते मोठे झाल्यावर आपले बरे-वाईट कशात आहे हे समजू शकतील व मानव धर्माला चांगल्या प्रकारे समजून इतरांना देखील याकडे प्रवृत्त करतील. "आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार." या कडव्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारे एक स्त्री आपल्या मुलांना योग्य वळण देऊ शकते.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.






Monday, 25 January 2021

"मानवधर्म सेवक मेळावा" हा लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा.


 【"मानवधर्म सेवक मेळावा"】

▶ "मानवधर्म सेवक मेळावा म्हणजे काय? आणि आपण तो कसा साजरा करतो?"

【लेख स्पष्टीकरण】

मेळावा म्हणजेच जास्त प्रमाणात एकत्र येऊन, एकमेकांची ओळख करणे, एकमेकांचा परिचय करणे व जास्त संख्येने उपस्थित होऊन शुभ कार्याची शोभा वाढविणे, इत्यादी. मानवधर्म सेवक मेळावा म्हणजेच  की, मानवा मध्ये फक्त दोनच जाती आहेत ते म्हणजे नर आणि नारी तर, या दोनच जातींना लक्षात घेऊन जो धर्म बनला आहे त्यालाच मानवधर्म म्हणतात व या मानवांचाचं मेळावा म्हणजेच मानवधर्म मेळावा.

आपण या मानवधर्म सेवक मेळाव्याला अगदी आंनदाने साजरा करतो. विविध कलेचा प्रदर्शन करून जसे की, नृत्य कला, चित्रकला, संगीतकला इत्यादी. 

शोभायात्रा काढून मानवधर्माचा प्रसार  करून आपण मानवधर्माची शोभा वाढवितो. छान-छान विचार ऐकून ,आपण मानवधर्माची शोभा वाढवितो व मानवधर्माचा प्रसार करतो. अशा प्रकारे आपण मानवधर्म सेवक मेळावा साजरा करतो.

आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून हा मोलाचा मार्ग आपण सर्वाना मोफत मध्ये वाटून दिला. मार्गाचा प्रसार आणि प्रचार ध्यानात ठेवून प्रत्येक सेवक/सेविकेला स्वावलंबी बनवून प्रपंच साधून परमार्थ करण्यास सांगितले.

दरवर्षी आपल्या मौदा आश्रमात मानवधर्म सेवक मेळाव्याचे आयोजन केले जाते, हे आपण सर्व सेवक जाणतो. हा मेळाव्या मार्फ़त सेवकांची एकदुसऱ्यास भेट होत असून, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन या माध्यमातून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच कालावधी मध्ये हा एक शोभणीय मेळावा, सेवकांना आनंद देऊन जातो.

एक खूप छान म्हण आहे,

              “यशस्वी म्हणून जगायला

                    अंगी मोठी चिकाटी हवी

                        जिथे उभे असू तिथून

                         आभाळ पाह्ण्याची दृष्टी हवी”

आपण सर्व सेवकांना बाबांनी आत्मविश्वासु बनविले आहे, आपल्या आत्म्यात जागृत दैवी शक्ती वास करते याचा अनुभव करून दिला आहे, यामुळे आपले ध्येय एका जागेवर राहून, आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यास बळ प्रदान करते.

या मेळाव्याच्या उद्देशाने लक्षात येते की, आपल्या मार्गाचा प्रचार खुप मोठया प्रमाणात होत आहे, यातून आपल्या मार्गाची पसंती व प्रसिद्धी आपल्याला जाणवते, आणि जेव्हा आपण सर्व एका मंडपात एकत्रित येतो तेव्हा मात्र आपली विशाल एकता पाहून समाजाला मानवधर्माची व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या त्यागाची निस्वार्थ प्रतिमा दिसून येते.

याप्रसंगी, अनेक स्पर्धा, कला कृती, अन्य सांस्कृतिक बाबी दर्शविल्या जातात. मार्गातील जेष्ठ सेवकांचे, मंडळातील अधिकारी गणांच्या सुंदर अश्या मार्गदर्शनाने, परिसर अत्यानंदीत होतो. 

या माध्यमातून सेवक आपल्या सोबत छान असे अनुभव घेऊन जाऊन, पुढल्या वर्षीची तयारी मोठ्या आनंदाने आपल्या हृदयात समाविष्ट करतो, याप्रकारे 

मानवधर्म सेवक मेळावा आपण साजरा करतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.