▶"मार्गात येण्याअगोदर सेवक, अज्ञानी जीवन जगत होते. कुणाला विद्येचे ज्ञान नव्हते, तर कुणाला समाजाचे भान नव्हते! कुणी माणूस असूनही पशु प्रमाणे वागायचे, तर कुणी बुद्धीमान असूनही अंधश्रद्धा मध्ये वाहून जायचे! तर अश्या या भोळ्याभाबड्या लोकांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे नवजीवनदान दिले ?"
【लेख स्पष्टीकरण】
मार्गात येण्याअगोदर सेवक शिकलेला होता शिकून असल्यानंतरही तो अज्ञानी होता विद्येचे ज्ञान होतं पण त्या ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या जीवनात नव्हता. मानव हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो, वावरतो परंतु वाईट व्यसनामुळे व शट विकारामुळे मोहमाया, अहंकार, द्वेष, राग, अंधश्रद्धा यामध्ये ते गुरफटून होते. ते भोळेभाबडे नव्हते तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करणारे दानव वृत्तीचे मानव होते. एकदाच माणसाला दानव बनवणे सोपे आहे, परंतु दानवाला मानव बनवणे सोपी गोष्ट नाही. यासाठी महानत्यागी बाबा जुमदेवजींनी हाडाची काडी केली, खूप कठोर परिश्रम घेतले, स्वतः अगोदर ज्ञानी झाले व हा ज्ञानाचा दीपक त्यांनी आजन्म सेवकांच्या घरोघरी लावला.
भोळेभाबडे म्हणजे अंधश्रद्धा त्यांच्यात भरली होती, खरा रस्ता कोणी दाखवणारे नव्हते देव आहे तो दगडाच्या मूर्तीत अंगात येणाऱ्या देवी-देवतांच्या अवस्थेत, लटा लटा पायावर लोळण घेत बाबा बाबा म्हणत हा माणूस परावलंबी होता. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सर्वप्रथम आमचा विश्वास जिंकला म्हणजे आमचं मन सत्य परिस्थिती कडे वळविण्याचं काम केलं, पहिल्याच दिवशी एकता म्हणजे काय असते हे आम्हाला बाबांनी शिकवलं. नाहीतर तुझ्या घरच्या लोकांनी करणी केली ठोका केला, अशी भूलथापांना माणूस घाबरत, व्यसनाधीन झाला.
घरातली अंधश्रद्धा निघून व्यसनमुक्ती करून सर्व कुटुंबाची एकता दाखवून बाबांनी मानवाला मानव केलं माणुसकी शिकवली. आज जो माणूस गटारात पडला राहायचा त्याच्या अंगावर माशा भनभन करायच्या त्या व्यक्तीला मानव बनून सेवक ही पदवी दिली.
नुसती पदवी दिली नाही तर स्वावलंबी बनवलं जागृत केलं. दुर्जर असाध्य रोगी महारोगी कोडी वंशपरंपरेने चालत आलेले काही विकार बाबांनी दिलेल्या जागृत कृपेने नष्ट झाले. ज्या ठिकाणी पातळाला गाठी बांधून स्त्री स्वतःच शिव झाकत होती, बाहेरबाधे मुळे अनेकांनी कचकुन केस पकडले होते, नाना तर्हेच्या वेदना जीवाला होत होत्या, परंतु या मार्गात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेविका ताईंना अबला नाही सबला बनवलं. सती अनुसया असा दर्जा दिला.
आमच्यामधून कित्येक सेवक दादा व सेविका ताई यांनी कधीच स्टेज पाहिला नव्हता पण आज परमेश्वर कृपेने प्रत्येक सेवक-सेविका परमेश्वरी गुणाचे अनुभव, हजारो लोकांच्या समोर माइक मध्ये सांगतात आजही माइक म्हटलं तर मोठे मोठे घाबरतात पण मानव धर्मात मार्गात आलेला सेवक कधीही घाबरत नाही. कारण जागृत परमेश्वरी कृपा ही २४ तास चैतन्यमय आत्म्यात वास करत असते.
जर सेवकाची वागणूक असत्य असेल तर खरोखरच आपल्याला कष्ट होतीलचं, दुःख येईलचं म्हणून सेवकांनी बाबांची शिकवण, बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियम कधीही विसरू नये. मार्गात येण्याचा पहिला दिवस मी कसा होतो आणि आज मी कुठे आहो हे विसरता कामा नये. बाबांनी आम्हाला नवजीवनदान सोबत सफल समृद्ध जीवन आम्हाला दिलेलं आहे. फरक फक्त एवढा आहे ज्ञानाची तिजोरी सर्वांकडे आहे, एकच कुलूप लागलेला आहे, पण किल्ली कोणती लावायची हे सेवकांनी ठरवायचं आहे. कारण मनमंदिरात आपण कुणाला पाहतो, हे आपल्याला विश्वास, निश्चय, त्याग व समर्पण ही भावना ठेवून कार्य करणे आहे. हे कार्य जर आपण केले तर बाबांनी दिलेलं नवजीवन खरंच सफल, समृद्ध होईल. नमस्कार.!!
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन एस. पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.