Followers

Saturday, 13 February 2021

"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी" हा लेख नक्की वाचन करा, नमस्कार..!


 【"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी"】

"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी" ही म्हण मानवधर्मातील सेवकांवर कशाप्रकारे लागू होते.

                                 【लेख स्पष्टीकरण】

वरील विषय खूप सुंदर असून सेवकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. चराचरात वास करणारी चैतन्यमयशक्ती, सृष्टी निर्माण करणारे आकारात नाही; पण चैतन्यमय शक्तीचे गुण दाखवणारे महान बलशाली, शक्तिशाली परमेश्वर प्रत्येक आत्म्यामध्ये वास करतो. आम्ही अनेकामध्ये होतो तेव्हा मानवाने तयार केलेली कलाकृती देव म्हणून पुजत होतो. अनेक देवी देवतांचे पूजन करीत होतो. त्यांच्या पायावर लोळण घेत होतो; पण कोणीही खरा भगवंत दाखविला नाही. कारण ह्या समाजामध्ये सत्य जर दाखविले तर पोट भरत नाही व लुबाडण्याचा साधन फक्त स्वतःमध्ये बसलेला स्वार्थ आहे.

रामायणात दोन माणसे होती. विभिषन आणि दुसरी कैकयी सगळ्यांनाच माहित आहे. विभिषन रावणाचा भाऊ, आणि कैकई सावत्र असली तरी रामाची आईच, विभिषन रावणाच्या राज्यात राहूनही बिघडला नाही. कैकई रामाच्या राज्यात राहूनही सुधारली नाही. चिखलात राहून कमळ फुलतो आणि दूध पाजूनही साप विषच ओकतो. अमृताचा वेल निंबावर जातो तेव्हा संगत गुण मिळाल्यावर कडू बनतो. म्हणून संगत चांगली तर विचार चांगले आणि चांगल्या विचारांमध्ये विकार येत नाही हे सर्व साधुसंत यांना माहिती होते; परंतु कोणीही समजाला जागवू शकले नाही.

दुःख कुणाच्या वाट्याला येत नाही, तर सगळ्यांच्याच वाट्याला येते. गरीब-श्रीमंत, साधुसंत यांच्याही जीवनात दुःख येते. सर्वांनाच दुःखाचा सामना करावा लागतो. फरक फक्त एवढाच आहे. काही लोक सामना करतात आणि काही जणांना दुःख कवेत घेते; पण आम्हाला आमच्या दुःखा विषयी चैतन्यमय जागृती शक्तीचे अनुभव आमच्या "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांनी आम्हाला जागृत करून सांगितले आहे. इतकेच नव्हे तर भगवंत शक्ती जागृत आहे; म्हणून दुःखाला घाबरू नका आणि सुख आले तरी मार्गात यायचा पहिला दिवस विसरू नका. जसा सुखाचा आदर करतो तसेच दुःखाचे स्वागत करून सुख आणि दुःख जीवनामध्ये आपण परमेश्वराला कधीही विसरायचे नसते.

"महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" आम्हाला जागृत केले. सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीवांमध्ये आत्मा आहे. अनेक आत्मा मिळून एक परमात्मा तयार झाला आहे. हे बाबांनी आम्हाला अनुभवाने परमेश्वरी गुण दाखवून अनुभवायला सांगितले आहे. आम्ही ते अनुभवतो. "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" आम्हाला स्वावलंबी बनविले आहे. तत्व, शब्द, नियमाची शिकवण आम्हाला दिलेली आहे. शब्दावर जागृत परमेश्वरी कृपा आम्हाला सोपवून दिलेली आहे. बाबांनी निष्काम सत्य कार्य केले. वचनामध्ये परमेश्वराला बांधले आहे म्हणूनही परमेश्वरी कृपा आजही ही शब्दावर कार्य करत आहे; पण मानव हा अति हुशार आणि बुद्धिवान आहे. म्हणून आज सुखी झाल्यावर सेवक ज्यामुळे सुखी झाला त्याच तत्व, शब्द, नियमांना विसरत चालला आहे. 

"तुझं आहे तुझंपाशी, तरी तु भुललाशी" खरं आहे. बाबांनी आम्हाला सर्व शिकविले तरीपण आम्ही आजही थोडेफार दुःख आले तर मार्गदर्शकाकडे धाव घेतो किंवा एखाद्या त्यागी सेवकाला तीर्थ बनवून मागतो. कारण आमचा आत्मविश्वास आमच्यावरचं नाही. बाबांनी आम्हाला विश्वासाची भक्ती दिली आहे. बाबांनी ध्येय मजबूत केले तेव्हा बाबांना परमेश्वर भेटला. आम्हालाही विश्वासाची भक्ती करून ध्येय मजबूत करून आपल्या दुःखाचे निवारण करतांना आपले आत्मबळ, आपला आत्मविश्वास, आपले ध्येय मजबूत करून परमेश्वराजवळ योग मागणे आहे. 

आपल्याच विश्वासाची, ध्येयाची भक्ती आहे. आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वर वास करतो. आपला आत्मा परमेश्वराचा निवासस्थान आहे. तरीपण आपण इकडे तिकडे भटकतो. आपले मन विचलित करतो, सुखाच्या शोधात वणवण भटकतो.

आपला मार्ग कर्मप्रधान आहे. आपले कर्म चांगले करू तर आपल्याला नक्कीच यश येईल. जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण हा विचार करत होतो की, आपण दुखामधून केव्हा दूर होणार आणि सुखाची लाट केव्हा येणार! म्हणून सेवकांचे ध्येय मजबूत असले तर मन विचलित होणार नाही. ज्या वेळेस मन विचलित होते त्यावेळेस मानवाला स्वतःजवळ असलेली परमेश्वरी कृपा आठवत नाही. कुठेतरी त्याचे कर्म चुकलेले असतात म्हणून सेवकांनी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाला जागून परमेश्वराचा कधीही विसर पडू नये. बाबांनी परमेश्वराला आकारात नाही दाखविले; पण दैवी शक्तीच्या गुणात आपण सर्व सेवक अनुभवले आहे. बाबांचे शब्द आहेत, "दैवी शक्तीला समोर ठेवून सेवकांनी कर्म करावे." या मार्गदर्शनाला आपण कधीही विसरू नये. आपला परमेश्वर आपल्या आत्म्यात आहे. चैतन्य जागृत आत्मा निर्मळ मनाने, पवित्र विचारांनी, शुद्ध शरीराने आपल्याजवळ कार्यरत राहतो, म्हणून परमेश्वरी कृपा सदैव टिकवण्यासाठी आपण कुठल्याही अहंकाराला बळी न पडता, बाबांच्या आदेशानुसार कर्म करावे. हाच अर्थ आजचा विषय सर्व सेवकांना सांगून जातो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.









Sunday, 7 February 2021

"भगवंत कृपेचा योग" हा लेख आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर आवर्जून वाचन करा .

 


【"भगवंत कृपेचा योग"】

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्याला जातात, तरी त्या सेवकांना योग मिळण्यात खूप अडचणी येत असतात. या उलट काही सेवक कमी प्रमाणात भगवत कार्याचा लाभ घेतात, तर त्यांना खूप लवकर चांगला योग मिळतो? असे सेवकांसोबत का घडत असेल?

   【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय खूप छान असून सेवकांसाठी खूप महत्वाचा सुद्धा आहे. जेव्हा सेवक चर्चाबैठक मध्ये जातात तेव्हा सेवकांनी  आपले पूर्ण लक्ष परमेश्वराच्या चर्चा बैठक मध्ये असणे आवश्यक आहे. कारण कधी कधी आपल्या हातानी एखादी चुक झाली, तर आपण त्या चुकीची सोडवणूक करु शकताे. कारण बाबाने आपल्याला एक चित्त, एक लक्ष आणि एक भगवान मानायला सांगितले आहे. तेव्हाच आपल्याला योग मिळत असताे. कारण परमेश्वराला माहीत असते की, कुणाला काय पाहिजे आहे.

परमेश्वर आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. आपल्याला पाहिजे ते परमेश्वर देतात म्हणून जेव्हाही आपण हवनकार्यात असलो तेव्हा आपण विनाकारण गप्पा गाेष्टीत वेळ घालविणे चुकीचे आहे. जेव्हा चर्चा बैठक सुरु असते तेव्हा, काही सेवक विनाकारण बाहेर जाणे, विनाकारण बडबड करणे आणि मोबाईल वर गप्पा करणे, चॅटींग करणे हे अतिशय चुकीचे आहे. हे सर्व परमेश्वराला दिसत असते. त्यामुळे परमेश्वर त्यांना याेग देत नाही. सेवक म्हणतात की, "आम्ही चर्चा बैठकीत जाऊन सुध्दा आम्हाला याेग मिळत नाही, दुःख दुर हाेत नाही". त्यामुळे नाराज हाेतात.

आपण जेव्हा आपला वेळ परमेश्वराला देऊ तर, परमेश्वर सुध्दा आपल्या मनाेकामना पूर्ण करतात. म्हणून आपण  परमेश्वराला आपला वेळ देने आवश्यक आहे. जेव्हा इतर सेवक आपले अनुभव सांगतात तर, ते मनापासुन ऐकणे आवश्यक आहे. कारण आपण मनापासून ऐकले तर ते, आपण आपल्या परिवारात सांगून आपल्या चूका दुरुस्त करू शकतो. त्यासाठी भगवत कार्याच्या वेळी एक चित्त, एक लक्ष व एक भगवान असणे आवश्यक आहे. बाबांनी आपल्याला सांगितले आहे की, "हा मार्ग कर्मावर आधारित आहे, जसे आपण कर्म करू त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल." त्यासाठी बाबांनी सेवकांना मार्गदर्शन तर केलेच, त्यासोबत बाबांची शिकवण तत्व, शब्द, नियम हे प्रत्येक सेवकाला दिलेले आहे.

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्यात उपस्थित असतो. त्यावेळी स्वयम् भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात. आपले सदगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित असतात व आपण सर्व सेवकांची आत्मा मिळून एक परमेश्वर त्याठिकाणी निर्गुण निराकार असतात. चैतन्यमय कृपा जागृत शक्ती उपस्थित असते. त्या ठिकाणी आपण अनुभवाचे बोल भगवंताचे गुण कमी ऐकतो व एकमेकांची भेट व गोष्टी जास्त प्रमाणात करतो. कुणी सेवक कंटाळा आला म्हणून कुठे पानटपरीवर, हॉटेलमध्ये बसलेले असतात. जे अनुभव ते ऐकत असतात त्यावर ते टिंगल बाजी करत असतात. हवन कार्यात, भगवत कार्यात, चर्चा बैठकीत फक्त देहाने उपस्थित असतात. त्यांचे मन कुठेतरी भटकत असते; परंतु असे चुकीचे आहे.

ज्याप्रमाणे एक म्हण आहे, "देव देवळात, चित्त खेटरात" त्याप्रमाणे नश्वर देह घेऊन चर्चा बैठकीत बसून अंतरात्मा मध्ये अनेक द्वंद विचार मनात आलेले असतात, ते चुकीचे आहे.  आपल्यावर असलेले दुःख दूर केव्हा होतील, होतील की नाही? परमेश्वराला आपली काळजी लागेल की नाही? हा विचार मनात लागलेला असतो; पण सेवकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळसा हातात धरला तर हात काळा होतो जर, निखारा हातात धरला तर हात जळतो. त्याचप्रमाणे कलुषित विचाराने आत्म्याचे शुद्धता न होता अशुद्ध विचाराची त्या ठिकाणी भावना निर्माण होते.

भावना निर्माण झाली की, शब्द निघतात शब्दावर परमेश्वर उभा आहे म्हणून आपल्याला योग प्राप्त होत नाही. काही सेवक प्रपंच चालवत असताना काही अडचणीमुळे खूप कमी कार्यक्रमात सहभाग घेतात. एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी मनाची एकाग्रता साधून परमेश्वरावर आपला पूर्ण भार सोपवून देतात. म्हणजेच आपले ध्येय मजबूत करून ते त्या चर्चा बैठकीत भगवंत कार्यात बसले असतात. त्यांच्यामध्ये ध्येयपूर्तीसाठी तत्व, शब्द, नियमाची तिजोरी ही फार मोठी देन असते व ती जमवण्यासाठी , अनुभवाचे गाठोडे बांधण्यासाठी, परमेश्वरी गुणाने आत्मशुद्धी करण्यासाठी चर्चा बैठक, भगवत कार्यात ते बसलेले असतात.

आपल्यावर दुःख येते, त्यावेळी परमेश्वराला आपण म्हणतो की, "परमेश्वरा माझे दुःख दूर कर"; पण आपण आपल्या कर्माने चुकलो असतो. ती चूक आपल्याला शोधावी लागते. त्या चुकीची आपल्याला क्षमा मागावी लागते. जेव्हा आपले शब्द परमेश्वराजवळ सुटतात तेव्हाच आपल्याला योग्य तो योग मिळतो. उदाहरणार्थ:- पेपर देताना विद्यार्थी प्रश्न सोडवित असतो. प्रश्नाचे उत्तर लिहित असतो; पण शिक्षक मात्र शांत व कर्तव्यनिष्ठ असतो. त्याचप्रमाणे, आपण जे कर्म करत असतो त्याची तपासणी भगवंत करीत असतो. 

आपल्या कर्माचे शब्द आपण सोडावीत नाही तोपर्यंत आपल्याला योग मिळणार नाही.

असे खूप वेळा होते. प्रत्येक वेळी माणसाच्या गर्दीत शिकायला मिळते असे नाही. आयुष्यातले काही क्षण आवर्जून एकांतात एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी एकाग्रता साधून जर आपण एकांत घालविला तर आवर्जून आयुष्यातले काही क्षण आपला संवाद फक्त स्वतःशिच करणे योग्य आहे. इथूनच आपल्या चूका दुरुस्त करण्याची संधी आपल्यात येते व आपले आत्मबळ वाढते. भूतकाळाकडे शिकण्याची आणि भविष्य निर्माण करण्याची खरी शक्ती म्हणजे आपले कर्म आहे. हे कर्म साध्य करण्यासाठी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाचा वापर आपण आपल्या जीवनात करायलाच पाहिजे. आपण जसे कार्य करू तसे आपल्याला फळ मिळेल आपल्याला जर दुर्धर आजाराविषयी योग साधायचा आहे. त्यासाठी आपल्याला  कठिण कार्य करावे लागते.

 लोभ, अहंकार, राग, द्वेष, मोह या सर्वांचा त्याग करून आपल्याला शुद्ध विचाराने परमेश्वराचे कार्य करावे लागतात. तरच आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतो. असे सेवकांसोबत का घडत असेल? तर ह्या साठी बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियमाचे पालन केले तर, कुठलेही दुःख राहणार नाही. हे बाबांचे शब्द आहेत. जो सेवक तत्व, शब्द, नियमाने वागेल त्याच्या पायाला काटा हि रूतणार नाही आणि हे शब्द मानव धर्मात खरे झालेले आहेत. सत्य, मर्यादा, प्रेमाने घराची आखणी केली, तत्वाचे पालन केले व नियमांचे अनुसरणानुसार वर्तवणुक ठेवली तर आपल्याला परमेश्वर कुठेही कमी पडू देणार नाही.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.