"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२८)
"महानत्यागी"
समर्थ बाबा जुमदेवजी यांनी १९४६ साली बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतर ते मानवाचे दुःख दूर करु लागले. परंतु त्या कृपेने मानवाचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले नाही त्यांनी अशा शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली की जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख हरण करु शकेल. शेवटी त्यांनी १९४८ साली एका भगवंताची प्राप्ती केली. तेव्हापासून परमेश्वराप्रती मानवाला जागविण्याचे कार्य निष्काम भावनने ते सतत करीत आहेत. याकरिता बाबा मानवाला रोज मार्गदर्शन करतात.
मानवाला त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दुःखातुन मोकळे केल्यावर त्याच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणीचे निवारण करण्याकरिता बाबा आध्यात्मिक
विषयाबरोबरच सामाजिक क्रांतीकडे वळले. त्यांनी त्याकरिता आपल्या सेवकांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमाद्वारे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, गोळीबार चौक, नागपूर येथे स्थापन केली. जागनाथ बुधवारी, नागपूर येथे "परमात्मा एक सेवक ग्राहक भांडार' उघडले. सालईमेटा आणि धोप या खेड्यांत तेथील सेवकांना शेतीबरोबर जोडधंदा मिळावा म्हणून दुध उत्पादक संस्था स्थापन केल्यात.
हे सर्व कार्य करीत असतांना आध्यात्मिक विषयांवर जास्त भर देऊन त्यांनी सतत १९४७ ते १९८४ म्हणजे जवळ जवळ ३७ वर्षे निष्काम भावनेने मानव जागृतीचे कार्य केले. याकरिता त्यांनी खेडोपाडी, गावोगावी, उन्हाळा, पावसाळा किंवा थंडीच्या
दिवसांची पर्वा न करता पायी, खाचर, बैलगाडी, बस इत्यादी साधनांनी प्रवास केला. याकरिता येणारा खर्च ते स्वतः करीत असत. खेड्यापाड्यात जे काही मिळेल ते खात-पित असत. परंतु मी भगवंत प्राप्ती केली आहे म्हणून लोकांनी फुकटात खाऊ घालावे असा कधीही मोह होऊ दिला नाही. ते कधीही गुरुपुजा घेत नाहीत. आत्मा हाच परमात्मा आहे आणि तो प्रत्येकात आहे हे ते समजतात. म्हणून कोणालाही स्वतःच्या पाया पडू देत नाहीत. कोणाचेही व्यक्तीगत हार स्वीकारत नाहीत. परमेश्वरी कार्य करतांना ते आंधोळीची किंवा जेवणाची पर्वा करीत नाहीत.
बाबांनी वरील संस्था स्थापन करुन सेवकांना त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता या संस्थाचा लाभ मिळवून दिला. या संस्था बाबांनी आपल्या मार्गदर्शनाने तयार केल्या आहेत. या संस्था वृध्दिंगत व्हाव्यात यांकरिता त्यांनी स्वतः अंगमेहनत केलेली आहे. स्वतःच्या देह झिजविला आहे. या योजना राबविण्याकरिता स्वतःच्या रक्ताचे पाणी केले आहे आणि या संस्था तयार होऊन नावारुपाला आल्यावर स्वतःच्या कष्टाचे फलित म्हणून त्यांनी त्याचा मोबदला मात्र घेतला नाही. या संस्थेत होणाऱ्या लाभाचा कधी स्वतःकरिता उपयोग केला नाही. किंबहूना कधी साधा चहासुध्दा या संस्थाकडून त्यांनी घेतला नाही. बँकेची आणि मंडळाची वास्तु तयार करतांना स्वतः जातीने बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची पराकाष्ठा केली. यावरून त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना येते.
इतकेच नव्हे तर "आपल्यासारखे करिता तात्काळ, नाही काळवेळ तया लागी" या म्हणीप्रमाणे समर्थ बाबा जुमदेवजींनी आपल्या सर्व सेवकांना स्वावलंबी
जीवन जगण्यास शिकविले आहे. त्यांच्या आचरणात स्वतःसारखा त्याग निर्माण केला आहे. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमांच्या आचरणाने सेवकांच्या जीवनात त्यागच निर्माण झालेला आहे आणि म्हणून मंडळामार्फत अस्तित्वात आलेल्या सर्व संस्था प्रगतीपथावर आहेत. त्यांनी आपल्या जीवनात सतत त्याग केल्यामुळे त्यांच्यावर परमेश्वरी कृपा आहे.
या परमेश्वरी कार्याकरिता बाबा सतत त्याग करीत आलेले आहेत. बाबांचे हे वरील सर्व प्रकारचे कार्य लक्षात घेऊन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या दि. ५/८/१९८४ च्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत "महानत्यागी बाबा जुमदेवजी" असे संबोधण्यात यावे असे ठरले आणि त्याप्रमाणे सर्व सेवकांतर्फे मंडळाच्या कार्यकारिणीने बाबांना नम्र विनंती केल्यावर सेवकांच्या विनंतीला मान देऊन वरील पदवी स्वीकारण्यास बाबांनी परवानगी दिली. त्याप्रमाणे दि. १६ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या वार्षिक प्रगट दिनाच्या दिवशी बाबांना "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ही पदवी सर्व सेवकांतर्फे बहाल करण्यात आली. आणि ती बाबांनी हसतमुखाने स्वीकारली. त्या दिवसापासून बाबा सद्गुरु समर्थ या नावाऐवजी "महानत्यागी" बनले.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823
सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.