【"मार्गाच्या शिकवणीची अस्मिता जोपासणे"】
▶ "आजच्या धोखाधाड़ी, छळ, कपट करून स्वार्थ साधनार्या समाजातील लोकांशी वागताना परमात्मा एक मानव धर्माचा सेवक म्हणून आपली वागणूक कशी असावी ज्यामुळे मार्गाच्या शिकवणीची अस्मिता जोपासली जाईल ?"
【लेख स्पष्टीकरण】
वरील विषय खऱ्या अर्थाने मानवाला माणुसकी शिकवीणारा आहे. आज कलियुगामध्ये मानवाला मानवाची ओळखच नाही. मानव हा स्वतःला सर्वेसर्वा समजून आपले जीवन जगत आहे. "ज्याचं करावं भल, तो म्हणतो माझंच खर" अशी आजची स्थिती आहे. म्हणून जगाच्या पाठीवर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, छळ, कपट, धोखाधड़ी चे प्रमाण वाढले आहेत. जन्म देणाऱ्या आई-वडिलांना त्याची कदर नाही. तसेच क्षणभर सुखासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब केला जात आहे. या कलियुगात देवाच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. आपापसात भांडण शिवी-गाळी करणे, वेळ पडल्यास जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यास मागे पुढे पाहत नाही.
आपण मानव धर्माचे सेवक आहोत, त्यामुळे बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन आपल्या जीवनात करने गरजेचे आहे. आज आपण पाहतो समाजाची दिशा उलट्या प्रवाहाने वाहत आहे; पण आपण सत्य, मर्यादा, प्रेम भगवंत गुणांच्या शब्दामध्ये बंधनात आहोत. म्हणून जशास तसे आपण होऊ शकत नाही. जागृत परमेश्वरी कृपा आपल्या सोबत सतत चोवीस तास असते. तेव्हा समाजातून सुद्धा कधी-कधी आपल्याला मानसिकता ढासळली जावी अशी वागणूक मिळते. त्यावर परमेश्वराजवळ आपण शब्द ठेवले तर परमेश्वर घडविणारा आहे. कारण, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने माणवासारखे आचरण दिले त्यांना परमेश्वर कुठेही कमी पडू देत नाही.
आवश्यक नाही की, समाजातील लोकांसोबत आपण सुद्धा तसेच वागू. आपण जर असे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? याचा विचार आपण करावा. मुर्खा बरोबर मुर्ख होण्यात काहीच उपयोग नाही. त्याच्या सोबत वाईट व्यवहार केल्यास, उलट त्याचा परीणाम स्वतःलाच भोगावा लागतो.
आपला "मानव धर्म" हा केवळ एक आहे आणि आपल्या बाबांनी सर्व सेवकांना समान शिकवन दिली आहे. या शिकवणीचा भान ठेवुन आपण वागावे. बाबा जीवनात नेहमी इमानदारीने वागले, बाबांनी म्हटले आहे की, "इमान भगवान है" तसेच बाबांनी सेवकांना इमानदारी शिकवली आहे. म्हणून मानवधर्माचा सेवक इमान सोडू शकत नाही व सोडल्यास दुःख भोगावे लागते. आपण जर सत्याने चालत आहोत, तर इतरांना सफाई देत बसत राहण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवुन आपले कार्य करावे. समाजातील लोकं चांगल्या लोकांना नाव ठेवतात आणि वाईट लोकांना सुद्धा नावे ठेवतात; परंतु या मार्गात सदैव दैवी शक्ति जागरूक आहे, त्यामुळे आपण कोणते काम करत आहोत, जागृत दैवी शक्तीचे लक्ष आहे. आपण केलेल्या कार्याचा लेखा - जोखा हा परमेश्वरा जवळ आहे. मग याची चिंता कशाला? चांगल्या कार्याचं फळ हा योग्य मिळतो.
सर्वांना माहित आहे, हा मार्ग "कर्म प्रधान" आहे. जसे कर्म तसे फळ मिळते. जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करावे आणि आपले कर्म सुधारण्याचा प्रयत्न करत राहावे. यातच मानव धर्मातील सेवकांचा फायदा आहे. या मार्गातील सेवकांनी निस्वार्थी भावनेने सेवा करावी आणि जीवन सुखी जगावे. बाकी देणारा परमेश्वर आहे. याची अपेक्षा करू नये. "सत्याचा विजय" निश्चितच आहे.
भगवान के घर मे देर है, मगर अंधेर नहीं! म्हणुन समाजातील वाईट गोष्टीला बळी न पडता आपली वागणुक योग्य ठेवावे. प्रेमाच्या शब्दाने दुश्मन सुद्धा सुधारतो. त्यामुळे आपली वागणूक ही नेहमीच ईमानदारीची ठेवावी. त्यामुळे आपल्या मानव धर्माची अस्मिता जोपासली जावू शकतो.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.