Followers

Thursday, 5 November 2020

प्रकरण क्रमांक : (२६) (असाध्य रोग)



                  "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'

      प्रकरण क्रमांक (२६):  असाध्य रोग

 मानवधर्म हा मार्ग मानवाने आत्मसात केल्यास त्याला झालेले असाध्य रोग नष्ट होतात. उदाहरणार्थ- ह्रदयविकार, कोड, महारोग, कॅन्सर, टी.बी. मुळव्याध, कावीळ मधमेह इत्यादी. यांची अनेक उदाहरणे म्हणून या मार्गातील सेवकांचे अनुभव सांगता येतील. या असाध्य रोगांत वंश परंपरागत आणि संसर्गजन्य असे अनेक रोग आहेत. या मार्गात हे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात.

जेव्हा वरीलपैकी कोणताही रोग उदा. टी.बी., महारोग कोड, मधुमेह, मुळव्याध, हृदयविकार मानवाला झाल्यानंतर जेव्हा तो डॉक्टरांकडे जातो तेव्हा प्रथमच डॉक्टर चौकशी करतात की त्यांच्या घराण्यात हा रोग यापूर्वी कधी झालेला आहे काय? त्यामागील कारण हेच की, हे रोग वंशपरंपरागत आहेत. म्हणून हे रोग होतात आणि यावर औषधोपचार केला तरी तो रोग त्या घराण्यात पुढे कोणालाही होणार नाही याची शाश्वती

डॉक्टरांकडून मिळत नाही. याला कारण "रक्ताचे नाते" म्हणून ते सांगतात. महाननत्यागी बाबा जुमदेवजी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे आणि या असाध्य रोगांवर मात करुन या मार्गात ते साध्य केलेले आहेत. त्यांचे संशोधनपुढीलप्रमाणे आहे.

 डॉक्टरांच्या निदानाप्रमाणे वंशपरंपरागत रोग होण्याचे कारण, "रक्ताचे नाते" असेल तर तो त्या कुटुंबात प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात असला पाहिजे. परंतु तसे होत नाही. तो एखाद्यालाच असतो. काही वेळेस दोन-तीन पिढ्यानंतर येतो. त्या कुटुंबात तो रोग ज्या व्यक्तीला झाला असेल ती व्यक्ती मरण पावल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि मोक्ष न मिळाल्यामुळे तो भटकत असतो. तो आत्मा ज्या कुटुंबातून बाहेर पडतो त्या कुटुंबात तो पुनः जाण्याचा प्रयत्न करतो आणि शक्यतोवर तो तेथेच जातो. तेव्हा त्या कुटुंबात तो आत्मा गेल्यावर ज्याला तो स्पर्श करतो त्याला हा रोग जडतो. आणि जोपर्यंत त्या आत्म्याला शांती किंवा मोक्ष मिळत नाही तोपर्यंत रोग त्या कुटुंबातील वंशजात होत असतो.


 ज्या व्यक्तीला असा रोग झाला आहे ती व्यक्ती या मार्गात आल्यावर त्यावर ही दैवीशक्ती कार्य करते आणि ज्या आत्म्याचा त्याला स्पर्श झाला असेल त्यावर मात करते आणि त्या आत्म्याला या लक्ष चौर्यांशी भोगातुन मुक्त करते. ती भटकती आत्मा मुक्त झाल्यावर त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तो पुन्हा भटकत नाही आणि त्यापुढे तो आत्मा कोणालाही स्पर्श करीत नाही. म्हणून त्या कुटुंबात ते दुःख पुन्हा कोणालाही होत नाही. अशा प्रकारे वंशपरंपरागत रोग नष्ट होतात आणि त्या कुटुंबाची त्या रोगापासून मुक्तता होते.

हाच सिध्दांत संसर्गजन्य रोगांकरिता लागू होतो. काही संसर्गजन्य रोग उदा. कावीळ हे धुळीच्या कणांमुळे होतात . वातावरण बदल झाल्यास अनेक रोग उद्भवतात. वातावरण बदलविणे हे सुद्धा त्या सृष्टीनिर्मात्या परमेश्वराचे कार्य आहे. तीच दैवीशक्ती यावर मात करू शकते. म्हणून हेही रोग या मार्गात त्या दैवीशक्तीमुळे बरे होतात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.