Followers

Friday, 8 May 2020

प्रकरण क्रमांक :१३ "मानवधर्म" हे प्रकरण सर्व सेवकांनी आपल्या कुटूंबातील सर्वाना उपस्थित करून वाचन करावे.


                     "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (१३) 
                                       "मानवधर्म"


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना १९४९ साली फेब्रुवारी महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यात महाशिवरात्री च्या पर्वावर केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश मानवाने मानवासारखे वागावे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवंत प्राप्तिसाठी, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता, त्यांच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम दिले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

【चार तत्व】

१) परमात्मा एक
२) मरे या जिये भगवत नामपर
३) दुखदारी दूर करते हुये उद्धार
४) इच्छा अनुसार भोजन

【तीन शब्द】

१) सत्य बोलणे
२) मर्यादा पाळणे
३) प्रेमाने वागणे

【पाच नियम】

१) ध्येयाने एक परमेश्वर मानणे.
२) सत्य, मर्यादा, प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे.
३) अनेक वाईट व्यसने बंद करणे.
(दारू, टॉनिक, सट्टा, जुव्वा, लॉटरी, पटाची होड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दांत बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.)
४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे.
५) मानव मंदिर सजवण्याकरिता दान देणे. (आपले कुटुंब मर्यादित ठेवणे)

मानवाने भगवंताच्या चरणावर मरून त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो.

बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरु आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करुन दिली परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर हे व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही, तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास, आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात.

वंशपरंपरेनुसार रूढिवादाप्रमाणे या मार्गाची दीशा घ्यायच्या आगोदर सर्व देव-देवतांचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मूर्तिपूजा बंद करावी लागते. श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की, "पत्थर पूजे भगवान मिले तो, मै पुँजू पहार" या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमधे वास करीत नाही तर तो सजीव वस्तूमधे वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करुण दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीसतास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःच्या आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत कारण, एका आत्म्यापुढे दूसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्माचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याच अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला (सेवकाला) दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या मांत्रिक मांत्रिकाला इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते.

मानवाने सर्वांबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमाने वागले पाहिजे. त्याने त्याच्यातील मोह, माया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे. त्याने निष्काम भावनेने काम करावे. आपल्या स्वार्थाकारिता दुसर्‍याचे नुकसान करू नये. "अपनी अपनी करणी उतरो पार, बाप बेटे का कौन विचार" या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडिल मुलाकरिता किंवा मुलगा वडिलां करिता केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार केला पाहिजे. प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फळ मिळते. प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा करावयास हवी.

"असेल माझा हरी तर देईल पलंगावरी" ही म्हण या मार्गात खोटी ठरली आहे. येथे नुसता देव देव करून चालत नाही. देव मानवाला साहाय्य करीत असतो परंतु आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करू नये. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते. म्हणुन देव देव म्हणुन नुसते भजन करू नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही.

या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच्या परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसर्‍या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवलेल्या आहेत. सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होतात. मानव हा त्यागी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देव देवतांपेक्षा कमी नाही. तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे. 

"आपल्यासारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तया न लागे" या म्हणी प्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निःस्वार्थ, आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्याचे धडे शिकविले आहेत. त्यामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो. 

मानव धर्म या मार्गात मध्ये फक्त दोन जाती आहेत. नर आणि नारी. याशिवाय या मार्गात कुठलीही जात पात नाही. यापूर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जातींना येथे स्थान नाही. इथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवधर्म. कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक या साठी मानवाला कार्य करायचे आहे. मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वछ शरीर, शुद्ध वागणूक, स्वछ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे

तत्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो. तत्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो. निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धर्य वाढते. या मार्गात भावनेला मुळीच स्थान नाही. 

या मार्गाचे निशाण देशाचे निशाण आहेत. प्रत्येक मानवाचे कर्त्यव्य आहे की त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्म भूमी मानली पाहिजे आणि त्या बद्दल त्याला अभिमान असला पाहिजे. त्याकरिता तिचे रक्षण करणे त्याचे आद्य कर्तव्य आहे. 

"आपली सोडवणूक आपणच करावी" या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुखापासून स्वतःला सोडवतो. मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करतांना चुकतो आणि त्या चूकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरीत त्याला पुन्हा भगवंता जवळ आपली चूक कबुल करावी लागते. पुन्हा चूक करणार नाही असे वचन द्यावे लागते. कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणी प्रमाणे भगवंत त्याला क्षमा करून दुःखातून मुक्त करतो.

या मार्गात असाध्य रोग, उदा. टी. बी., कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात . जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झाले आहेत . तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटूंबात ते रोग होत नाहीत . याची उदाहरणे या मार्गातील सेवकांना आलेल्या अनुभवावरून आहेत .

      【बाबा हनुमानजी पूर्व मुखीच का ?】___

या मार्गातील सेवक हवन करतांना बाबा हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखी ठेवतात आणि हवन करणाऱ्या सेवकांचे तोंड पश्चिमेकडे असते. सूर्य पूर्वेला निघत असल्यामुळे पूर्वदिशा नेहमी प्रकाशमय असते. परमेश्वर हा प्रकाशमय आहे. पश्चिमेला सूर्य मावळत असल्याने अंधार पडतो. त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही करणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारमय बनते. दुःखी मानवाचे जीवन बुडू नये, त्याचा जीवनात अंधकारमय वातावरण ऐवजी प्रकाशमय वातावरण निर्माण झाले पाहिजे . या दृष्टीकोनातून त्याचे लक्ष नेहमी समोर असलेल्या म्हणजेच भगवंताकडे असले पाहिजे. आणि भगवंताकडे पाहिल्यास त्याचा मनाची एकाग्रता तयार होऊन एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानल्यास तो त्याचे जीवन प्रकाशमय बनवू शकतो.

मानवाने मानवासारखे वागावे हाच खरा या धर्माचा हेतू आहे. मानवाचे जीवन त्यागमय असून दया, क्षमा, शांती, हे गुण त्याच्यात निर्माण होऊन सत्य, मर्यादा, प्रेम याचे आचरण त्याने सर्वांबरोबर केले पाहिजे, हीच या धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानवधर्म आहे. या मार्गाचा सेवक हा, प्रकरण आठमध्ये सांगितल्याप्रमाणे महानत्यागी बाबांना ज्या ज्या देवदेवतांनी दर्शन दिले. त्यापेक्षा कमी नाही किंबहुना तो श्रेष्ठच आहे हे सिद्ध केले आहे. त्या सर्व देवदेवतांही मानव होत्या, परमेश्वर नव्हत्या असे बाबांनी सांगितले आहे .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




6 comments:

  1. अतिशय महत्वपूर्ण माहिती दादा
    नमस्कार जी

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. लिखित स्वरूपातील माहिती खूप छान प्रकारे प्रसिद्ध होत आहे खूप छान मानव धर्माची माहिती.... सर्वांना नमस्कार

    ReplyDelete