【"माझा अनुभव"】
【"अंधश्रद्धा सोडुनी मार्गात आलो, सर्व दुःखाचे निवारण होऊनी सुखी झालो"】
माझे पुर्ण नाव 'राहुल यादवरावजी पराते' आहे. आज मी "माझा अनुभव" या मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे.
माझे जन्म भगवंताच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आशिर्वादाने आपल्या मार्गातच झाले. माझे आई वडील प्रथम या मार्गात आले होते. तरी माझ्या आई वडिलांतर्फे आमचे मार्गात येण्याचे कारण मी माझ्या शब्दात आपल्या समोर ठेवत आहे.
माझे वडील श्री. यादव उरकुडाजी पराते रा. मुल, जि. चंद्रपुर, मार्गात येण्याचे कारण असे आहे की, माझे वडील एम.एस.ई.बी. मध्ये उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून राजुरा, जि. चंद्रपुर येथे कार्यरत होते. त्यांचे जन्म गाव चंद्रपुर. माझे आजी व आजोबा चंद्रपुरला राहत होते. माझ्या वडीलांची तब्येत बरी राहत नव्हती. त्यांना कावीळ झालं होतं. त्यांनी डॉक्टर कडे जाऊन औषधोपचार केला व त्यांना तात्पुरते आराम पडले. तेव्हा आमचे काही नातेवाईक तंत्र मंत्र जानकार होते. ते म्हणायचे की, तुझ्या मागे जिन (काळी बाधा किंवा साडेसाती) लागलेली आहे. माझ्या वडीलांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही.
त्यानंतर माझ्या आई सौ. ममता यादवराव पराते आणि वडीलांचे लग्न एप्रिल १९८३ मध्ये जोडण्यात आले व २२ मे १९८३ ला त्यांचे लग्न होऊन वरात चंद्रपुरच्या घरी आली व वडीलांची तब्येत अचानक पुन्हा खराब झाली. त्यांना पुन्हा तोच कावीळचा त्रास व्हायला लागला. जेवतांना अन्नाचा एक घास सुद्धा पोटात जात नव्हता. त्यांना जेवतांना उलट्याच व्हायच्या. घरी सर्व वह्राडी मंडळी जमली होती. माझ्या वडीलांचे चुलत भाऊ, माझे काका श्री अशोक पराते नागपुर वरून त्यांच्या लग्नाला आले होते. काका त्यांचा प्रकृतीकडे पाहून फार व्यथीत होत होते. ते या मार्गाचे सेवक होते. त्यांचे वडील स्व. श्री रामभाऊ पराते हे मार्गदर्शक होते. त्यांनी माझ्या वडीलांना जवळ घेऊन सांगीतले की, 'यादव मी तुला एका भगवंताचे तिर्थ करून देतो तु ते तिर्थ घे'. त्यावर माझ्या वडील काहीच बोलले नाही.
आमच्या घरी त्यावेळेस मधल्या खोली मध्ये मोठया आकारात ओम काढला होता. त्यामध्ये साईबाबा, गजानन महाराज, व दत्ताची मुर्ती काढलेली होती. त्याच्यासमोर ते रोज नतमस्तक होऊन प्रकृतीची सुधारण्याची व जेवण करू देण्याची आराधना करीत होते. परंतु त्यांना याचा काही फायदा होत नव्हता. नंतर माझ्या काकांनी त्यांना एका भगवंताचे तिर्थ करून दिले. त्यादिवशी त्यांनी एक पोळी जेवण केलं. परत दुसर्या दिवशी पुन्हा तिर्थ बनवून दिलं तर दोन पोळी जेवण केलं आणि तिसर्या दिवशी पुन्हा तिर्थ बनवुन दिलं तर त्या दिवसापासुन पुर्ण पोटभर जेवण सुरू झाले व कोणत्याही प्रकारची बाधा न राहता त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली.
त्यांनी माझ्या वडीलांना एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती रोज सकाळी व सायंकाळी लावण्यास सांगितले. कोणत्याही देवळात हात जोडायचे नाही. कोणतीही आरती घ्यायची नाही व एकाच भगवंताच्या नावावर मरायचे, सर्व देवांचे विसर्जन करायचे, कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही. माझ्या वडीलांना दारूचे खुप व्यसन होते परंतू त्यांची प्रकृती तीन तिर्थात पुर्ण पणे बरी झाली. त्यांचा एका भगवंतावर विश्वास बसला व त्यांनी एका झटक्यात दारू सोडुन दिली व एका भगवंताची अगरबत्ती माझे वडील व माझी आई यांनी दोघेच मार्गदर्शकानी सांगितल्याप्रमाणे जवळपास एक वर्ष साधे कार्य केले. व नंतर ते दोघेही जानेवारी १९८४ ला सावनेर खापा येथे माझे काका व त्यांचे वडील मार्गदर्शक यांच्या घरी गेले. ते दोघांनाही महानत्यागी बाबा जुमदेवजी कडे टिमकी येथील निवास्थानी घेऊन गेले व बाबांची भेट करवून दिली. बाबांनी माझ्या आई वडिलांना परी पूर्ण मार्गदर्शन केले व त्यागाचे कार्य करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मार्गदर्शकांनी त्यांना त्यागाचे कार्य दिले व सांगितले की, काहीही झालं तरी दवाखान्यात जायचं नाही. भगवंताचे तिर्थ घ्यायचे, आपले दुःख भगवंता समोर ठेवायचे व "मरे या जिये भगवत नामपर" याप्रमाणे राहायचे.
परंतू माझी आई त्यावेळेस दोन महीन्याची गरोदर होती व तिला डॉक्टरांनी बाळासाठी व तिच्या प्रकृतीसाठी औषधी दिल्या होत्या. ते दोघेही नागपूर वरून त्यागाचे कार्य घेवून आल्यावर त्यांनी विचार केला की "मरे या जिये भगवत नामपर" याप्रमाणे राहायचे. औषध, गोळ्या घ्यायच्या नाही असे त्यांनी ठरविले. नंतर माझ्या आजी, आजोबा, काका, आत्या यांना सांगितले व राजुरा येथे किरायाच्या घरात त्यागाचे कार्य सुरू केले. परंतु माझ्या आईला त्यागाच्या कार्यामध्ये उलट्यांचा फार त्रास व्हायचा. ती अन्नाचा एक घास सुद्धा खाऊ शकत नव्हती. तरी तिला माझे वडील नेहमी सफरचंद खायला द्यायचे. ती जेवण करत नव्हती तरी तिला भगवंत सर्व काम करायची शक्ती देत होते. ४१ दिवसापर्यंत ती थोडं फार जेवली असेल वा नसेल पण तिने एका भगवंताच्या नावावर त्यागाचे कार्य परी पूर्ण केले आणि ४२ व्या दिवशी त्यागाच्या कार्याची समाप्ती करून त्याच दिवशी ते नागपूरला गेले. भगवंताची फोटो आणली. सोबत माझ्या वडीलांचे काका (मार्गदर्शक) आले त्यांनी हवन कार्याची विधी सांगितली. त्याप्रमाणे त्यागाचे हवन घडविले व सुखी समाधानी झाले.
त्यागाच्या कार्यात माझा मोठा भाऊ गौरव याचा त्याग आईच्या गर्भातच पूर्ण झाला व तो २५ ऑक्टोबर १९८४ ला जन्माला आला. त्यानंतर मी व त्यानंतर माझा लहान भाऊ शैलेश जन्माला आला. भगवंताच्या कृपेने आतापर्यंत आम्ही सुखी समाधानी आहो.
या मार्गामध्ये सुखी समाधानी राहायचे असेल तर बाबांनी दिलेल्या ४ तत्व, ३ शब्द, ५ नियमांचे काटेकोर पणे पालन केले पाहीजे व ते आपल्या जिवनात आचरणामध्ये आणायला पाहीजे. तरच सुख समाधान मिळते अन्यथा नाही.
समाधान म्हणजे एक प्रकारचे "वैभव" असुन ते अंतःकरणाची "संपत्ती" आहे. ज्याला ही संपत्ती मिळते तो खरा "सुखी" होतो आणि हे सुख मिळवण्यासाठी आपल्या कुटूंबात एकता असायला पाहीजे, बाबांच्या आदेशांचे व तत्व, शब्द , नियमांचे पालन करायला पाहीजे, तरच खरे सुख आपल्याला मिळते. माझ्या वडीलांचे व आमच्या कुटूंबाचे जीवनमान सुखी,समृद्धी करण्यात एका भगवंताची कृपा तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले. तसेच माझ्या वडीलांचे काका स्व. रामभाऊ पराते (मार्गदर्शक) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. मी व माझे आईवडील व माझे दोन्ही भाऊ मनःपुर्वक खूप आभारी आहोत. आम्ही जिवनात ह्या कृपेला कधीच विसरणार नाही.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!
सेवक: राहुल यादवरावजी पराते
रा. मुल, जि. चंद्रपुर.
सेवक नंबर:- १७७०
मार्गदर्शक:- स्व.श्री रामभाऊजी पराते
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

No comments:
Post a Comment