【"माझा अनुभव"】अनुभव क्रमांक (१६३) प्रकाशित दिनांक: ०४ मार्च २०१६
【"अज्ञानी सेवक, कुव्यसनांच्या आहारी जाऊनी होत्याचे नव्हते करी"】
माझे नाव 'कुंडलिक उमेशजी मोहबे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात एकूण ५ सदस्य होते. माझे आई-वडील, मोठी ताई, लहान ताई आणि मी. सर्व सेवकांना माहिती आहे की, या मार्गात येणारा सेवक हा दुखीच येतो. सुखी मानव आपल्या मार्गात येत नाही. याच प्रकारे आमच्या परिवारात सुद्धा फार दुःख होते. ते असे की, आमच्या गावातील एका व्यक्ती आमच्यावर जादू चालवित असे. त्यामुळे आमच्या परिवारात माझ्या आईला खुप त्रास होत होता. माझी आई लघवी करायला बसू शकत नव्हती, एखाद्या भिंतीवर किवा कुंपावर एक पाय ठेवून लघवी करावी लागत असे.
आम्ही आईच्या उपचाराकरिता खूप दवाखाने, पंडा, पुजारी यांच्याकडे जाऊन-जाऊन त्रासुन गेलो पण, काही आराम झाला नाही, त्यामुळे आर्थिक व मानसिक दृष्टीने बेजार झालो. माझे वडील पण खुप दारू पित होते व लोकांशी भांडण करत असायचे. आई कधी वडिलांना समजवायला गेली तर आईला माझे वडील मारत असे. एकप्रकारे कुटुंबातील अशांतीने आम्ही ग्रासून गेलेले होतो.
आमच्या कडे मनेरीचे दुकान होते. मनेरीचे दुकान घेऊन आई-वडील दुर्गाबाईच्या डोहावर दुकान लावण्याकरीता गेले व दुकान लावले असता, तिथे आमच्या दुकानाच्या बाजूला एक हॉटेल परमात्मा एक सेवकांचे होते व ते सेवक भाऊ व सेविका बाई दुकान चालवित होते. माझ्या आईने सेविका बाईला आमच्या परिवारातील सर्वांचे दुःख सांगितले.
तेव्हा ती सेविका म्हणाली की, आमच्या परमात्मा एक मार्गात जगातील सर्व दुःख दूर होतात. ते म्हणाले की जर तुम्ही या मार्गात आले तर तुमचे सर्व दुःख दूर होणार, तुमचा पाय पण बरा होणार. सेवक भाऊ व सेवकीन बाई ने परमात्मा एक मार्गाबद्दल संपूर्ण माहिती आई-बाबांना दिली.
दुर्गाबाईच्या डोहावरुन येई पर्यंत अंधार झाला होता म्हणून आई-वडिलांनी त्या सेवक भाऊ व सेवकीन बाईच्या घरी खोडशिवनी येथे मुक्काम केला. त्या सेवकांच्या घरुन परत आल्यावर आम्ही आपल्या परीवारातील पाचही सदस्य साकोली या गावी कार्य घेण्याकरीता श्री. बाबुजी मार्गदर्शक यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी आमचे सर्व दुःख विचारून मार्गाविषयी माहीती दिली.
त्यांनी सांगितले की, जुने विचार बंद करुन व घरातील सर्व देवी-देवतांच्या मूर्ती व प्रतिमेचे विसर्जन करुन मार्गात यावे लागते. मग आम्ही घरी परत आलो व घरातील संपूर्ण देवी-देवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन केले. घरातील देवी-देवतांचे वृंदावन, लिंबु, धागे-दोरे यांचे सुध्दा विसर्जन केले आणि दुसऱ्या दिवशी मार्गात प्रवेश करण्याकरिता पुन्हा साकोलीला मार्गदर्शकांकडे गेलो.
मग आम्ही मार्ग स्वीकारला व मार्गदर्शकांनी दिलेल्या ३ दिवसांच्या कार्यात माझ्या आईच्या पायाला थोडा आराम झाला. नंतर सात दिवसांच्या व अकरा दिवसाच्या कार्यात माझ्या आईचा पाय पुर्ण पणे दुरुस्त झाला. भिंतीवर, कुंपनावर वगैरे पाय ठेऊन लघवी करायची गरज राहिली नाही. नंतर एक ते दिड वर्ष झाले सर्व छान राहिले आणि माझ्या वडीलांनी पुन्हा दारु पिने सुरू केले व तत्व शब्द आणि नियमांना तोडायला सुरुवात केली.
मग आमची परिस्थिती पुन्हा जशी मार्गात येण्याआधी होती तशीच झाली. आम्हाला पोटभर अन्न सुध्दा मिळत नव्हते. माझे वडील दारु प्यायचे आणि आईने वडीलांना काही म्हटले की, माझे वडील आईलाच मारायचे. मार्गी येऊन अशी आमची स्वकर्माने दुर्गती झाली. नंतर मला घेऊन माझी आई मामाच्या गावी गेली. मग माझे वडील मामाच्या गावी मला व आईला नेण्याकरीता येत असायचे परंतु, माझी आई वडिलांना म्हणत असे की तुम्ही दारु सोडाल व परमात्मा एक मार्गात जाऊन वचन द्याल तरच मी येते नाहीतर मी येत नाही.
तीन ते चार महीने मी व माझी आई मामाच्याच गावी होतो. नंतर माझे वडील पुन्हा आम्हाला नेण्याकरीता मामाच्या घरी आले व आपण मार्गात जाऊ चला, म्हणुन आम्हाला घरी घेऊन आले. नंतर आम्ही चिचगड या गावावरुन कार्य घेतले. आता आमचे मार्गदर्शक श्री. इंद्रपालसिंहजी कश्यप यांच्या कडुन कार्य सुरू आहेत. आता बारा वर्ष झालेत आम्हाला पूर्णपणे सुख-समाधानी आहे व समाधान मिळाले आहेत. म्हणुन मी सर्वांना सांगू इच्छितो की या मार्गातील दैवी शक्तीची परीक्षा घेऊ नये, केव्हा आपले कुकर्म आपणास संपवतील ते या पृथ्वीवरील अज्ञानी मानवास कळणार पण नाही. आज आमचे भाग्य कि आम्ही सावरलो म्हणून आज परमेश्वरी कृपेचा साथ आमच्यासोबत आहे व आम्ही सुखी जीवन जगत आहोत.
लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- कुंडलिक उमेशजी मोहबे
पत्ता :- मु. बोरगाव (बा.),पो. फुटाना, ता. देवरी, जि. गोंदिया
मार्गदर्शक : श्री. इंद्रपालसिंहजी कश्यप, चिचगढ
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
खूप सुंदर अनुभव सादर केलं दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई
छान अनुभव दादा नमस्कार
ReplyDeleteअशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ या मार्गातील जागृत दैवी शक्तित च आहे । आज जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही नाही। सर्वाना माझा नमस्कार जी
ReplyDeleteनमस्कार
ReplyDeleteखूप खूप छान अनुभव
खरच आहे काही सेवकांना गैरसमज होतो की, मी मार्गात आलो आणि दुःख दूर झाल्यावर कसेही वागता येते परन्तु असे नाही. जर आपण मार्गात आल्यावर, सुखी झाल्यावर तत्व, शब्द,नियमात चुकलो तर आपल्यावर दुःख नक्कीच येतात.
म्हणून बाबांच्या आदेशाचे सदैव पालन करणे गरजेचे आहे.