Followers

Sunday, 3 May 2020

प्रकरण क्रमांक (८) "विदेहावस्था" हे प्रकरण नक्की वाचन करा व शेयर करा.


"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
   'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (८)
 "विदेहावस्था"


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य षष्टी दि २५/०८/१९४८ रोज बुधवारला केली. तेव्हापासून ते निराकार अवस्थेतच होते. त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती. ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते. बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडली होती. त्यांनी आपसात विचार केला की, या स्थितीबद्दल परमेश्वराजवळ विनंती करून बाबांना मुक्त करावे. त्याप्रमाणे ती सर्व मंडळी एका भगवतप्राप्तीच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे आली. तेव्हा बाबा निराकार अवस्थेतच होते व परमेश्वरात विलीन झालेले होते.

घरच्या मंडळींनी बाबांना विनंती केली की, हे भगवंत सेवककी यह स्थिति कबतक रहेगी ? आप सेवक को इस स्थिति से मुक्त कीजीये। तेव्हा परमेश्वररुपी बाबाने उत्तर दिले की, अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी तो आपने उसे भगवान की सेवा करने क्यों लगाई उस समय आपने उसे रोकना था। अब सेवक भगवानका हो गया, न की किसीका रहा और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड और सेवक का सर मेरा धड ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनोकी आत्मा एक हो गई है।

भगवंताने बाबांच्या मुखकमलातून पुन्हा घरच्या लोकांना उद्देशून शब्द काढले की, सेवक भगवान बन गया। इसीलिये सेवक एक ही समय थोडासा साधा भोजन करेंगे। जिसमें दाल, चावल, सब्जी और घी होगा। और कोई भी औरत, घरकी हो या बाहर की, उसकी छाव  सेवक पर न पडे। नही तो सेवक कहींका नहीं रहेगा। जिंदा नहीं रहेगा। अशा प्रकारे भगवंताने सेवकाला (बाबांना) दैवी शक्तीची जागृती दिली. जी ला आज समाजात बरेच लोक मानतात. 

याच दिवसापासून बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात प्रत्येक शनिवारी जी पार्वती येत होती ती त्यांच्या अगांत येण्याची क्रिया बंद झाली. बाबांच्या कुटुंबात परमेश्वराची (हनुमानजी) प्राप्ती केल्यानंतरही दु:ख येत होते. तेही याच दिवसापासून नाहीसे झाले. बाबांच्या कुटुंबात जी अनेक दैवते मानल्या जात होती ती मानणे बंद झाले. याशिवाय त्यांच्या घरातील भुतबाधा पण नष्ट झाली. 

           परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रध्देमुळे काही सण मानत नव्हते. त्यातील पोळा हा एक सण होता. बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच आठ दिवसांनी पोळ्याचा सण आला. त्याच्या दोन दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले. आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की, यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा. त्याप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले. 

श्रावण अमावस्या आली पोळ्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारुन दाराच्या आड लपून बसला होता. तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता. परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. तो साप कोणालाही दिसला नाही. परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो डोके वर काढुन शांत होता. कुठलीही हालचाल करीत नव्हता. हे बाबांनी पाहीले. याही वेळेस बाबा विदेही स्थितीतच होते. त्यानंतर बाबांनी स्वत:च छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले. त्या साध्या मारानेच साप मरन पावला. एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो. हे पाहून बाबा आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खुब विचार केला. तेव्हा ते म्हणाले, कित्येक काळापासुन या घरात जे दु:ख होते त्याला खरा कारणीभुत हा साप होता. कोणीतरी मरन पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून तो सापाच्या रुपात भूत होता. एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात चोवीस तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रुपात खेळत आहे. त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तिच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता. त्याचप्रमाणे त्याला परेश्वररुपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला. अशा प्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भुतबाधेचे संकट नाहीसे झाले तेव्हापासून आजतागायत त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही. बाबा आज ज्या घरात वास्तव्य करीत आहेत त्या घरात चोहोबाजुंनी प्रसन्नता आहे. तेथे आल्हाददायक वातावरण आहे. कारण तेथे चोवीस तास जागृत शक्ती चैतन्यरुपात खेळत आहे. तेव्हापासून त्यांच्या घरात सुखशांती लाभली आहे. 

कोणताही सण मानू नये. कोणताही देवाला मानू नये. एकाच परमेश्वराची आराधना करावी. हे जरी ठरवले होते, तरी विधिलिखित काही असते या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते म्हणून त्यांनी पोळ्याच्या सणाचे निमित्य करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले.

बाबा विदेह अवस्थेत असतांना त्यांना रात्रदिवस विश्वात खूप मोठा एकच डोळा दिसत होता. यामुळे ते घाबरले होते. तो एकच डोळा बघण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे जेष्ठ बंधू श्री.बाळकृष्ण यांना सांगितले कि, भैया, मैं तेरे घर आकर तेरे पास सौऊंगा। मुझे इस घरपर विश्वमे एकही आंख दिखाई देती हैं। यह देखकर मुझे डर लगता हैं। इसलिये वह मैं देख नहीं सकता। एवढा मोठा एकच डोळा बाबांना एक सव्वा महिनापर्यंत एकसारखा दिसत होता.

बाबा आपल्या जेष्ठ बंधूंना सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या घरी जाऊन झोपू लागले. श्री बाळकृष्णांजींचे घर बाबांच्या घरासमोरच होते. बाबांना तेथेपण झोपेतून जाग येत होती आणि त्यांना बाबा हनुमानजींची भली मोठी आकृती दिसत होती. तेव्हा बाबा बंधूंना झोपेतून उठवायचे आणि सांगायचे कि, तू बाबा हनुमानजीला सांग तू माझ्या भावाच्या मागे लागू नकोस. तू देवळात जाऊन रहा. त्याप्रमाणे बाळकृष्णाजी तेवढ्या रात्रीच हातपाय धुऊन भगवंताच्या नावाने कपूर लावायचे आणि विंनती करायचे कि, हे भगवंता मी आपणांस विंनती करतो कि, तुम्ही माझ्या भावाच्या मागे लागू नका. त्याला कुटुंब आहे. त्याला प्रपंच आहे. म्हणून त्यास मोकळे करावे. अशी विनंती करून परत झोपायचे.

बाबांना एक डोळा दिसणे, बाबा हनुमानजीची प्रतिमा दिसणे या लक्षणांवरून सिद्ध होते की, बाबा परमेश्वरात विलीन झाले आहेत. कारण भगवंतप्राप्तीकरिता सुरवातीला बाबांनी जी प्रतिज्ञा केली होती की एकतर मरीन किंवा भगवंताला प्राप्त करीन पण मागे फिरणार नाही. त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परमेश्वराला प्राप्त करून ते त्यांच्यात विलीन झाले होते. 

बाबांची ही विदेहावस्था जवळजवळ तीन महिने होती. या विदेह अवस्थेत एके दिवशी बाबानी आपल्या कुटुंबातील लोकांना निराकार बैठकीत मार्गदर्शन केले की, घरवलो सुनो, आप सब लोग तीन महिनेतक भगवानसे विनंती करो की, हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे उसे गृहस्थी मे रखो। त्याप्रमाणे घरातील सर्व मंडळींनी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी तीन महिन्यांपर्यत एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती व कापूर लावून वरील प्रमाणे विनंती केली. तीन महिने पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी हवंन करून त्याची समाप्ती केली आणि त्यानंतर बाबा त्याच दिवशी शुद्धीवर आले. त्यांची विदेहीवस्था संपली. त्यांना सर्वसाधारण गृहस्थिप्रमाणे सर्व समजू लागले आणि त्याच बरोबर त्यांचा अज्ञातवासही संपला. ते अज्ञातवासात परमेश्वराची(हनुमानजीची) प्राप्ति केल्या पासून म्हणाले जानेवारी १९४६ पासून जवळजवळ तीन वर्षे होते. कारण कारण हा १९४८ सालच्या नोव्हेंबर महिन्याचा दिवस होता. बाबा दुसऱ्या दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करिता उद्योग करू लागले. अशा प्रकारे बाबांच्या कुटुंबाला शांती मिळाली. बाबांनी आपल्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. बाबांबद्दल लोकांना जसजसे हळूहळू माहीत होऊ लागले तसतसे लोक या मार्गात येऊ लागले. सेवक बनू लागले. याप्रमाणे सद्गुरू समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांना पाच ऑगस्ट एकोणविसशे चौऱ्यांशी रोजी या मार्गातील सेवकांनी महानत्यागी ही पदवी बहाल केली आणि त्यांना सद्गुरू समर्थच्याऐवजी महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा.

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


4 comments:

  1. खूपच सुंदर माहिती दिली दादा
    खूप काही शिकायला मिडला.
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  2. नमस्कार
    खूप खूप छान माहिती दिली. धन्यवाद।
    सेवकांना जागवण्यासाठी तुम्ही जी निष्काम भावनेने धडपड करत आहे ती खरच कौतुकास्पद आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले मनःपूर्वक धन्यवाद, आमचा उद्देश नेहमी निष्काम व निस्वार्थ भावनेचा चं राहील, आपण आम्हाला नेहमी या प्रतिक्रिये च्या माध्यमातून प्रोत्साहित कराल अशी अपेक्षा आहे. तसेच आमच्याकडून काही चुकीचे होत दिसल्यास ते आमच्या लक्षात आणून देण्यास आपण तत्पर रहाल अशी विनंती आहे. नमस्कार

      Delete