Followers

Thursday, 7 May 2020

प्रकरण क्रमांक : (१२) "मानव धर्माचा उगम"



                      "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
             'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (१२) 
                              "मानव धर्माचा उगम"



मध्यप्रदेशातील हुशंगाबाद जिल्ह्यात पचमढी तालुका आहे. हे गाव थंड हवेच्या ठिकाणाकरिता प्रसिध्द आहे. या तालुक्याचा संपूर्ण भाग सातपुडा पर्वताच्या टेकड्यांनी घेरलेला आहे. यापैकी एका टेकडीवर महादेवाचे पवित्र देवस्थान आहे. हिंदुधर्मातील काही लोकांचे ते दैवत म्हणुन प्रसिध्द आहे. या टेकडीवर दरवर्षी दोनदा यात्रा भरते. त्यापैकी महाशिवरात्रीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असते. येथे आलेल्या यात्रेकरूंच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात असा समज आहे. या यात्रेला आलेल्यांपैकी काही जण नवस करतात, काही नवस फेडतात तर काहीजण कुलदैवत म्हणुन प्रत्तेक वर्षी भेट देऊन पुजा करतात. या यात्रेला जाणारे लोक शंकराचे भक्त असतात. यात्रेला जातांना ते नवीन वस्त्र परिधान करतात. पायात पादत्राणे घालत नाहीत. दाढी, जटा वाढवतात. काही लोक मोठमोठे त्रिशूल घेऊन जातात. एकंदरीत भक्तांचे वेष धारण करतात.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावर १९४९ साली या यात्रेला जाण्याचे ठरविले. जाताना नवीन कपडे न घालता, साध्या माणसाप्रमाणे यात्रा करावी, जाताना कोणत्याही देवाला नमस्कार करू नये, फक्त एका परमेश्वराचीच पूजा करावी आणि टेकड्यांवरचे फक्त नैसर्गिक दृश्य बघावे असे ठरवून बाबा, त्यांचे दोन बंधू श्री. नारायणराव आणि मारोतराव, त्यांचे पुतणे केशवराव आणि पहीला सेवक गंगारामजी रंभाड असे पाच जण यात्रेला जावयास निघाले. त्यांनी आपल्याबरोबर फराळाचे सामान घेतले होते. जाताना त्यांना पुढील चमत्कार अनुभवास आले.

यात्रेकरिता घरून निघाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि गंगारामजी रंभाड यांच्या चैतन्य आत्म्यातून सारखा फूं-फूं आवाज निघत होता. त्यांना रस्त्याने जात असतांना पाहून वाटत होते की, मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांची जोडी चालली आहे. ते गोळीबार चौक येथे आले असता बाबांच्या समोर एक बाई कावराबावरा चेहरा करून नाचत नाचत, आं आं करीत आली आणि तिने त्यांचा रस्ता अडवला. तेव्हा बाबांनी गंगारामजींना आदेश दिला की, 'फूंक मारो'. त्याप्रमाणे त्यांनी एका भगवंताच्या नावाच्या मंत्राने (बाबा हनुमानजी) फूंक मारली. त्याबरोबर ती बाई खाली पडली आणि रस्ता मोकळा झाला. त्यानंतर बाबा इतवारी रेल्वे स्टेशनवर गेले आणि तेथून ते आगगाडीने जुन्नारदेवला जाण्यासाठी निघाले.

गाडीत यात्रेला जाणाऱ्या लोकांची खुप गर्दी होती. त्यात बाया, माणसे आणि लहान मुलेही होती. बाबांचे बंधू गाडीमध्ये या डब्यातून त्या डब्यात सारखे फिरत होते. तेव्हा त्यांना काही डब्यात काही यात्रेकरू तापाने फणफणत असल्याचे दिसले. ते त्यांना हात लावून त्यांचा ताप पाहत होते आणि बाबांजवळ येऊन त्यांना त्या लोकांच्या करून अवस्थेबद्दल सांगत होते. त्याप्रमाणे गंगारामजींना आदेश देत होते की, "जे तापाने फणफणत आहेत त्यांना थापड मारा." गंगारामजी बाबांच्या आदेशाचे पालन करीत होते. ताप असलेल्या लोकांना थापड मारताच त्यांचा ताप नाहीसा होत होता आणि आश्चर्य असे की, संपुर्ण प्रवासात त्यांना पुन्हा ताप चढला नाही. त्या सर्वांचा प्रवास सुखाचा झाला. जुन्नारदेवाला पोहचल्यावर बाबासह सर्वांनी त्या दिवशी आराम केला.

दुसऱ्या दिवशी सर्वजण गडावर जाण्यास निघाले. सामानाकरिता एक हमाल केला होता. त्या पाच जणांचे सामानाचे ओझे खुप जड होते. त्यामुळे तो एकटा ते डोक्यावर वाहून नेऊ शकत नव्हता. तेव्हा बाबांनी गंगारामजींना आदेश दिला की, "सामानपर फूक मारो" तेव्हा बाबांच्या आदेशाप्रमाणे गंगारामजींनी फूक मारताच त्याच्या डोक्यावरचा भार एकदम हलका झाला. त्या हमालाने बाबांना सामानाचे ओझे हलके झाल्याचे सांगितले. तो धावत धावत गडावरच्या पायऱ्या चढू लागला आणि त्याने गडावर सामान पोहचवून दिले.

वाटेत एक बाई आपल्या चार चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्याच्या कडेला घेऊन बसली होती. ती खूप रडत होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती मदतीकरिता आवाज देत होती. परंतु गडावर येणारे जाणारे लोक तिच्याकडे लक्ष न देता आपल्या धुंदीतच जात होते. ते तिच्याकडे लक्ष देत नव्हते. हे दृश्य बाबांना रात्री बाराच्या सुमारास गड चढतांना दिसले. बाबा तेथेच थांबले आणि त्यांनी गंगारामजींना आदेश दिला की, ती बाई का रडते ते विचारा. बाबांच्या आदेशाचे पालन करून ते त्या बाईजवळ गेले आणि त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता ती बाई त्यांना म्हणाली, मी खूप वेळेपासून सर्वांना आवाज देते, पण मला कोणीच मदत करीत नाही. माझी चारही मुले तापाने फणफणत आहेत. माझी परिस्थिती खूप खराब आहे. तेव्हा आपण मदत करा अशी तिने त्यांना विनवणी केली. गंगारामजींनी परत येऊन त्या बाईचे रडण्याचे कारण बाबांना सांगितले, तेव्हा त्यांना बाबांनी सांगितले की, त्या सर्व मुलांच्या गालावर थापड मारा. त्याप्रमाणे त्यांनी त्या सर्वांना थापड मारताच ते सर्व उठून उभे झालेत. त्या सर्वांचा ताप नाहीसा झाला. वरील सर्व कार्य बाबांनी गंगरामजींना एका भगवंताच्या नावाने म्हणजे, बाबा हनुमानजींच्या नावाने करण्यास सांगितले. परंतु शंकरजींच्या (महादेवाच्या) नावाने कोणतेही कार्य करू नये असे स्पष्ट बजावले. त्यानंतर बाबा गडावर पोहचले. तेथे त्यांनी देवळात न जाता बाजुलाच एका परमेश्वराची ज्योत लावली. अश्या प्रकारे बाबांना एका भगवंताची प्रचीती आली. त्यांनी परमेश्वर पाहीला नाही, परंतु त्यांच्या चैतन्य आत्म्यातून जे शब्द निघाले, ते त्यांनी अनुभवले आणि गडावर फिरून नैसर्गिक दृश्य पाहिले.

बाबा गडावरून खाली यायला निघाले तेव्हा त्यांना रस्त्यावर देवाज्ञा झालेल्या लोकांचे ढेर दिसत होते. ते पुढे न जाता त्या ढेरांसमोर उभे राहून त्यांच्या पार्थिव देहांवर बाबा हनुमानजींच्या नावाने फूक मारीत आणि त्यांना मुक्त करीत होते. ते पार्थिव देह फूक मारताच आकाशात विजेप्रमाणे लखलखत उडत जात असतांना दृश्य सर्वजण पाहत होते. अशाप्रकारे बाबांनी सर्वांना मुक्त केले. ही खरी भगवंताची लीला होती, पण बाबा मात्र निमित्त होते आणि हाच खरा या देशात परमेश्वराने बाबांच्या (मानवाच्या) हातून घडवलेला मानवधर्म आहे आणि तोच या मार्गाचा 'उगम' आहे.

गडावरून खाली उतरताना बाबा एका भगवंताचे गाणे गात होते. तेव्हा इतर लोकांनी त्यांना 'गाणे का गात आहात ?' असे विचारले असता ते त्यांना उत्तर देत होते की, परत जातांना आम्ही आपल्याबरोबर भगवंत घेऊन जात आहोत. तुम्ही भगवंताला गडावरच ठेवले आणि रिकाम्या हाताने जात आहात. म्हणुन तुम्ही गाणे गात नाही. यात्रेला जाणारे लोक नवीन कपडे घालणे, कपडे न धुणे, दाढी, जटा वाढविणे अशा अनेक भावना बाळगत होते. परंतु बाबांनी वरील प्रकारच्या कोणत्याही भावना बाळगल्या नाहीत आणि त्यांनी त्या सर्व गोष्टी पाळल्या नाहीत. तेव्हा इतर लोक त्यांना सांगत होते की, यात्रेकरूंना हे सर्व वर्ज्य आहे. तुम्ही या गोष्टींचा स्वीकार कसा केला! तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत होते की, आमचे मन शुद्ध आहे. भगवंत आमच्याजवळ आहे. शुध्द मन, स्वच्छ शरीर, शुध्द वागणूक आणि स्वच्छ कपडे हे भगवंताला प्रिय आहेत. भगवंत आमच्याजवळ असल्यामुळे ते आम्ही करीत आहोत. तुमच्याजवळ भगवंत आहे काय ? ते पाहा. तुमच्याजवळ वरील गोष्टींचा अभाव आहे, म्हणुन भगवंत जवळ ठेवण्याकरिता त्या गोष्टींचा स्विकार करा आणि त्या वर्ज्य समजु नका. त्यानंतर बाबा गडावरून खाली उतरले आणि सरळ नागपुरला आले. 

'मानवधर्माचा उगम' या सातपुडा पर्वतावर महाशिवरात्रीच्या पर्वावर झाला आणि बाबा नागपुरला आल्यावर त्यांनी रितसरपणे या मानवधर्माची स्थापना केली. अशा प्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजी हे या देशातील "मानवधर्माचे" संस्थापक आहेत.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.



3 comments:

  1. मानव धर्माचा उगम या बद्दल अगदी सविस्तर माहिती
    खूप सुंदर माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  2. नमस्कार जी सर्वांना. मानव धर्माच्या उगमस्थान बद्दल अगदी सविस्तरपणे माहिती दिली आहे. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी वापस आल्या नंतर या "मानव धर्माची" स्थापना केली आहे. आणि त्याचे फायदा आज आपल्या सर्व सेवकांना होत आहे. असे आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी होवून गेले ज्यांनी "आत्मा मध्ये परमात्मा दाखविले आहे." नमस्कार जी.

    ReplyDelete