Followers

Tuesday, 5 May 2020

"मार्गाची विसरूनिया शिकवण, केले जवळ मित्र वाईट व्यसन', 'आहे जागृत शक्ती मार्गात, क्षणात दिली अद्दल चट्कन"

【"माझा अनुभव"】

【"मार्गाची विसरूनिया शिकवण, केले जवळ मित्र वाईट व्यसन, आहे जागृत शक्ती मार्गात, क्षणात दिली अद्दल चट्कन"】


माझे नाव 'बाळा नंदनकर' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव "चुकीच्या मित्रांसोबत संगत केल्याने परिवारावर किती मोठे संकट निर्माण झाले यावर आलेला अनुभव" सादर करीत आहे.

ही गोष्ट वर्ष १९८९ ची आहे. आपल्या मार्गात दारू पिण्यास मनाई आहे, हे माझ्या सर्व मित्रांना माहित होते. तरीपण ते मला न सांगता गोळीबार चौक मध्ये एका बियर बार मध्ये घेऊन गेले. मला माहीत नव्हते की, दारू म्हणजे काय होते? आणि बियर बार कशाला म्हणतात? मी ३ मित्रांसोबत बियर बार मध्ये गेलो, तर तिथे प्रकाश फारच कमी होता. मग त्यांनी स्वतःकरीता बियर आणि नाश्ता बोलवला आणि माझ्या करीता थंडी पेप्सी मागवली. मी चुप चाप बसून पेप्सी पित होतो. मग सर्व मित्र मला म्हणाले की, काय तु पेप्सी पित आहे, ही बियर पी, ही दारू नाही आहे, पेप्सी सारखी आहे. मी सर्व मित्रांना मनाई केली, परंतु त्यांनी मला जबरदस्तीने बियर दिली आणि मी एक ग्लास ती बियर घेतली.

मग मी घरी आलो आणि जेवण करून झोपलो. ही गोष्ट मी घरी आपल्या आई आणि वडिलांना सांगितली नाही. अशाप्रकारे मी मार्गाच्या शिकवणूकीचे उल्लंघन केले व बाबांनी दिलेल्या मर्यादेचे पालन केले नाही. नंतर काही दिवस ठीक गेले आणि मी पण ही गोष्ट विसरून गेलो.

माझ्या घरी तेव्हा गायी, म्हशींचा धंदा होता आणि घरी आटा चक्की सुद्धा होती. मग हळुहळु चक्कीचा धंदा कमी होऊ लागला आणि गायी, म्हशी पण दुध कमी देऊ लागल्या. यामुळे माझे वडील विचार करू लागले की, असे का होत आहे! वडील माझ्या आईला म्हणाले, काय चुक झाली की धंदा एकदम कमी झाला. मग माझ्या वडिलांनी कार्य पण केले, परंतु योग आला नाही. त्यानंतर माझे वडील विचार करू लागले की, काय चुक झाली!

मग एके दिवशी माझ्या वडिलांनी मला विचारले की, तुझ्या हातून काही चुक झाली काय? मी खोटे बोललो व म्हटले, नाही. माझ्या वडिलांना माझ्यावर पुर्ण शंका आली, कारण कार्य करून पण योग मिळत नव्हता. त्यामुळे माझे वडील पुन्हा म्हणाले की, मी पुन्हा विचारतो की, तु काही चुक केली काय? परंतु, मी चुप. 

माझ्या खोटे बोलण्यामुळे वडिलांना फारच राग आला आणि ते मला म्हणाले की, तु बाबांच्या समोर कापुर, अगरबत्ती लावुन सांग की, माझ्या हातून काहीच चुक झाली नाही. तेव्हा मला फारच भीती वाटली आणि कापूर, अगरबत्ती लावून बाबांच्या समोर बसलो आणि माझ्या तोंडातुन आपोआपच शब्द बाहेर आले आणि मी बाबांना सांगितले की, "बाबा मी मित्रांसोबत दारू पिली, त्याकरिता मला माफी द्यावी". हे शब्द ऐकुन माझे वडील माझ्यावर रागावले. त्यानंतर मी आपल्या वडिलांना झालेला पुर्ण प्रकार सांगितला.

मग दुसर्या दिवशी आम्ही सर्व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या निवास स्थानी गेलो आणि माझ्या चुकीची पुर्ण माहिती बाबांना सांगितली. त्यावर बाबा म्हणाले की, नीलकंठराव, उद्या पासून तुम्ही ११ दिवसांचे त्यागाचे कार्य करा. मग आम्ही ११ दिवसांचे त्यागाचे कार्य केले व आमचे कार्य पण छान झाले आणि धंदा पण अगोदरसारखा सुरू झाला व गाय, म्हैस पण व्यवस्थित दुध देऊ लागले.

आपण जर बाबांनी दिलेल्या शिकवणूकीच्या बाहेर गेलो, तर आपल्या परिवारावर किती मोठे संकट निर्माण होते हे या अनुभवातून जाणवते. त्यामुळे व्यसनी मित्रांची संगत न केलेलीच बरी. 

या मार्गात बाबांनी दिलेल्या ४ तत्व, ३ शब्द आणि ५ नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, यामुळे आपला परिवार सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक :- बाळा नंदनकर
पत्ता :- बाळाभाऊ पेठ, नागपुर.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 70200000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.



2 comments:

  1. खूप छान अनुभव बाळा दादा,
    आपण अनेकवाल्याच्या सोबत राहतो तेव्हा आपणमंव धर्माचे सेवक आहोत हे भान ठेवणे गरजेचे आहे,
    एक चुकी मुले किती मोठा संकट येतो हे या अनुभवातून लक्षात येतो, पण परमेश्वर किती दयाळू आहे हे शुद्धा या अनुभवातून लक्षात येतो, ही दैवी शक्ती 24 तास जागृत आहे व चैतन्यमय आहे म्हणून प्रत्येक सेवकावर लक्ष ठेवीत असतो..
    म्हणून सेवकांनी तत्व, शब्द, नियमाचा पालन केलं तर सेवकांवर कोणतेही संकट येणार नाही..
    नमस्कार......

    ReplyDelete
  2. 🙏जी बाळा दादा धन्यवाद

    ReplyDelete