【"माझा अनुभव"】[अनुभव क्रमांक:१६७] प्रकाशित दिनांक: ०८ नोव्हेंबर २०१६
【"संपला कर्मभोगाचा सारीपाठ, पडताच कर्मयोगाशी गाठ"】
माझे नाव राकेश देवरावजी मोटघरे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
आपला पहिला अनुभव देत आहे. आम्ही लहान असताना सोमवारी क्वार्टरला राहत होतो. कुटुंबात एकुण ७ सदस्य होते. माझ्या वडिलांना दारुचे खुप व्यसन होते, त्यामुळे ते आईला मारहाण करत होते. ते सकाळ पासून रात्रपर्यन्त दारू मधे डूबुन राहत होते, कोणासोबतही भांडण करायचे,आम्हाला खुप भीती वाटत होती.
बाबांच्या व्यसनामुळे आणि वागण्यामुळे माझ्या आईचे खुप हाल होत होते, तिला खुप त्रास होत होता. बाबांचे लक्ष फक्त दारू कड़े होते घरात काय सुरु आहे तिकडे लक्षच नव्हते. रोज भांडण, मारहाण सुरु असताना आईला गंभीर रोग (छातीवर फोडा) झाला. यामुळे आईला खुप त्रास होत होता. रोगासाठी आई डॉक्टर, वैद्य-वाणी,बाहेरचं सगळे करून झाले, पण आराम काही मिळाला नाही म्हणून, आम्ही लहान असतानाच मार्गामध्ये प्रवेश केला. काहीच महीने लोटले असतील तर बाबांनी पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली. आईला रोगापासून मुक्ति मिळाली, पण मारहाण-भांडण हा त्रास पुन्हा सुरु झाला. माझ्या वडिलांनी पुजेचा पाटाला लाथ मारून फेकून दिले होते. त्यांच्या अंगात जणु शैतान आला आहे अशा अविर्भावात ते वागत होते. मग आम्ही मार्ग सोडून दिला.
आम्ही बाबांची दारू सोडविण्याचे खुप प्रयत्न केले सगळं व्यर्थ गेलं. महीने, वर्ष उलटत गेले आम्ही खरबी या ठिकाणी प्लाट घेऊन झोपडी बांधून राहु लागलो. पण परिस्थिती खुप ख़राब होती. भाजीचा धंदा बंद झाला होता. प्लॉटची किश्त भरायला पैसे नव्हते म्हणुन माझी आई आणि आजी शेतात काम करायला जात होते. आम्हा भाऊ-बहिनीला बाबांचा खुप राग येत होता, पण काही उपाय नव्हता. असे करता-करता वर्ष, महीने उलटत गेले. परिस्थिती थोड़ी सुधारली आणि मामाच्या मदतीने आम्ही टीना चे पत्रे टाकून पक्के घर बांधले. भाजीपाल्याच्या धंद्याला पुन्हा सुरुवात झाली. काका आणि माझे वडील असे दोघेही वेगळी दुकान लावत होते. तेव्हा वडील कमी दारू प्यायचे पण पुर्णपणे बंद केली नाही.त्या काळातच मी १२वी पास झालो. माझा लहान भाऊ १०वी पास झाला. आम्ही दोघांनी २००४ साली पॉलीटेक्निक ला एडमिशन घेतली. पहिल्या वर्षाला पैसे कमी लागले, पण दुसऱ्या वर्षाला जास्त पैसे लागत असल्यामुळे माझ्या भावाने शिक्षण सोडून दिले व मिळेल ते काम करू लागला. वर्ष पुन्हा निघत गेले माझ्या काकांचे लग्न झाले. आम्ही स्लॅबचे घर बांधले. माझी काकु घरी आली आणि पुन्हा घरी भांडण सुरु झाले. रोज कोणत्याही कारणावरून आई आणि काकूंमध्ये भांडण होऊ लागले म्हणुन काका वेगळे राहु लागले. आता आम्ही चार सदस्य राहिलो आणि पुन्हा शून्यामध्ये आलोत. मी पॉलीचे पहिले आणि तिसरे वर्ष क्लियर होतो पण माझा दुसऱ्या वर्षाचा १ विषय बॅक असल्यामुळे मी बाबाला दुकानात मदत करू लागलो. रोज कमवणे आणि रोज खाणे असे दिवस जात होते.
तेव्हा मग माझ्या आईला मार्गात यायचा विचार आला. तिला वाटत होते की, जर का माझ्या बाबाचे दारू चे व्यसन वाढले तर या मुलांचे भविष्य काय असेल ???
आईने बाबांना समजावले व बाबांनी मार्गात येण्यास होकार दिला. आम्ही घरातील चारही लोकांनी विचार विमर्श केला आणि २०१० मध्ये मार्गात यायचे ठरविले. मग आईने जुमड़े काकाजीला मार्गाबद्दल विचारपुस केली. तशी आम्हाला मार्गाची जाणीव होतीच, कारण माझ्या वडिलांचे मामा श्री. वासुदेवजी वाडीभस्मे रा. साकोली,आणि भाटवे श्री केवलरामजी धर्मसहारे रा. निहारवाणी (लाखनी) मोहाड़ी शाखा हे मार्गात होते. जुमड़े काकाजी आम्हाला मोहनजी जिभकाटे काकाजी (वाठोड़ा) यांच्याकड़े घेऊन गेले. जीभकाटे काकाजीनी आम्हा सर्वांना विचारपुस करुन ३ दिवसाचे कार्य दिले आणि चांगल्या दिवसाची सुरुवात झाली. कार्य सुरु होताच माझा पॉलीचा बॅक असलेला विषय निघाला व मला महिंद्रा कंपनी मध्ये नोकरी पण मिळाली. माझा भाऊ प्लॉटचा धंदा (प्रॉपर्टी डिलिंग) करायला लागला पण काही वर्षानी आम्ही आमच्या कर्माला चुकलो आणि जीभकाटे काकाजीनी आम्हाला चिठ्ठी देऊन कार्य देण्यास नकार दिला. कारण आमचे कार्य बरेच दिवस बंद राहायचे व चुका व्हायच्या म्हणुन काकाजीनी आमचे कार्य बंद केले. मग आम्ही मारोतरावजी राउत गुरूजी यांच्याकडून कार्य घेतले. त्यानंतर माझ्या बहिणीचे लग्न झाले. ती खुप सुखी आहे याचा मला खुप आनंद आहे. माझा भाऊ प्लाटच्या धंद्या वरुन स्वतःचे ले-आउट टाकून विकु लागला आणि घराचे पण बांधकाम आता सुरु आहे. आता सर्व व्यवस्थित आहे. इतके वर्ष झाले पण आताही आम्ही साध्या कार्यातच आहोत. आम्हाला लवकरच त्यागाचे कार्य करण्याचा योग येईल अशी आशा बाळगतो आणि आपला अनुभव संपवतो.
लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- राकेश देवरावजी मोटघरे
पत्ता :- मु. खरबी, जि. नागपुर
मार्गदर्शक :- श्री. मारोतरावजी राऊत गुरुजी, नागपुर
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे :- 7057624579
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
छान अनुभव
ReplyDeleteसुंदर अनुभव दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई