"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (१४)
"तीन शब्द"
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी भगवतकृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती. प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत असत. या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत. प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत. याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता, त्यांच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिलेले आहेत.
१) सत्य बोलणे
२) मर्यादा पाळणे आणि
३) प्रेमाने वागणे
शब्द भगवान आहे. शब्द हेच भूत (सैतान) आहे. सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत. फोटो देतांना ते सेवकांना सांगत असत की, कुटुंबात व सेवकांत सत्य, मर्यादा व प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांचेकडुन तसेच वचन घेत असत. याबरोबर वाईटाचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत.
१) सत्य बोलणे
सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द. समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमा न बाळगता निघणारे शब्द. नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात. ते सत्य शब्द नव्हेत. हे सर्रास खोटे बोलणे आहे. अशा शब्दामुळे मानवाची फसवणुक होते. मानवाच्यामानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे. सत्य कटु असते. पण ते परमेश्वराला प्रिय असते. भगवान के घरमें देर है अंधेर नही या म्हणीप्रमाणे सत्य सुद्धा फार उशिरा कळते. या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे. या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे. व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार करायला पाहिजे. सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये. कारण त्याच्याकरिता भगवतकृपा नेहमी जवळ असते. सत्य परमेश्वर आहे. सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमधे मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.
२. मर्यादा पाळणे
बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की, त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे. स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेन बोलले पाहिजे. प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागतांना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकांशी वागतांना मर्यादेने वागावे. इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे. तो भेदभाव आहे. सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत. बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे. ही खरी मर्यादा आहे. ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्यामुळे घरात, आपआपसांत प्रेम निर्माण होते. त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख, समाधान मिळते. एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. त्यामुळे सत्य व्यवहार होतात.
३. प्रेमाने वागणे
सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे. कोणावरही रागावू नये. कुणी चुकले तर त्याला समजावून सांगावे. लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावाले तर त्यांचे आत्मबल कमी होते. जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादा भंग होते. प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे. प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकांविषयी प्रेम असावयास पाहिजे. म्हणून म्हटले आहे, "ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय"।
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
"परमात्मा एक मानवधर्म परिवार"
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
खूप छान माहितीचे प्रसारण 🤗🙏💐💐💐💐💐💐.... सर्वांना नमस्कार
ReplyDeleteतीन शब्दाचे खूप सुंदर स्पष्टीकरण दादा
ReplyDeleteखूप सुंदर माहिती नमस्कार जी 🙏