Followers

Wednesday, 6 May 2020

प्रकरण क्रमांक: (११) "प्रथम सेवक"


      "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
        'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (११) 
   
  "प्रथम सेवक"

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर तिचा लाभ अनेक गोरगरीब आणि दु:खी कष्टी लोकांना मिळू लागला. बाबांनी भगवंताला शब्द दिल्याप्रमाणे ते निष्काम भावनेने इमाने इतबारे भगवंत प्राप्ती मानवाला जागविण्याचे कार्य करु लागले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात जे काही शारीरिक आर्थिक किंवा मानसिक दु:ख असेल त्यातुन त्यांना मुक्त करून त्यांना सुखी समाधानी केले. याप्रमाणे अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला. त्यातील काही लोक या मार्गाचे उपासकही (सेवक) बनले. त्यापैकी यामार्गाचे प्रथम सेवक बनण्याचे श्रेय श्री. गंगारामजी रंभाड यांनी घेतली.

श्री. गंगारामजी रंभाड हे टिमकी येथे बाबांच्या मोहल्यात राहणारे. बाबांच्या घराशेजारी गडीकर यांचा क्लब होता. तेथे कॅरम वैगरे करमणुकीची साधने होती. त्या मोहल्यातील लोक सायंकाळच्या सुमारास फावल्या वेळात तेथे करमणुक करण्याकरिता जमा होत असत. बाबा देखील फावल्या वेळी तेथे जाऊन बसत असत. तेथे ते परमेश्वराप्रती मानवला जागविण्यासाठी नेहमी चर्चा करीत असत. बाबांची ही चर्चा ऐकुन तेथील लोक त्यावर विचार करीत असत. त्यातील काही जण याचा लाभही घेत असत. याच क्लबमध्ये गंगारामजी रंभाड हे सुध्दा नेहमी येत असत आणि बाबांच्या चर्चेत सहभागी होत असत.

गंगारामजी रंभाड हे हिंदु संस्कृतीत वाढलेले त्यांचे घराने गुरूमार्गी होते त्यांचे गुरूजी सोनारबाबा नावाचे होते. तरी सुध्दा ते भूतबाधेने पीडित होते. त्यांच्या अंगात भूत पलित येत होते. त्यामुळे खुब  त्रस्त झाले होते. गुरूमार्गी असूनही त्यांचे गुरू त्यांना या दु:खातून मुक्त करू शकले नाहीत. तेव्हा त्यांचा देवावरचा विश्वास उडला होता. त्यांना वाटत होते की जगात देव नाही. सर्व गुरू सारखेच आहेत. नुसते देवाच्या नावावर लोकांना लुबाडून आपले पोट भरतात. ते देवाचे उपासक आहेत असे दाखवितात. ते थोंडात आहेत. जे लोकांचे दु:ख दुर करू शकत नाहीत, ते गुरू कसले आणि त्यांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली आहे, तो जर या गुरूंना मदत करीत नसेल तर तो परमेश्वर कसला ? या अनेक विचारामुळे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडाला होता. त्यांनी गुरूच्या प्रयत्नाव्यतिरिक्त आपले दु:ख दुर करण्याकरिता समाजात सुरू असलेल्या जुण्या रूढीप्रमाणे अंधश्रध्देचा उपचार केला. डॉक्टरांचे औषधोपचार केले. पण काहीही उपयोग झाला नाही. त्यांची प्रकृती ती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे मन उव्दिग्न झाले होते. 
    
एक दिवस महानत्यागी बाबा जुमदेवजी क्लबमध्ये परमेश्वराबद्दल चर्चा करीत असतांना गंगारामजी रंभाड यांनी बाबांना प्रश्न केला की जगात परमेश्वर नाही काय ? तेव्हा बाबांनी उत्तर दिले, "परमेश्वर नक्की आहे" परमेश्वर ही वस्तु दिसत नाही आणि ती कोणी पाहू शकत नाही. ती आत्मजोत आहे. ती चोवीस तास जागृत असून चैतन्य आहे. गंगारामजींनी पुन्हा प्रश्न केला की, मी गुरूमार्गी आहे. माझ्या अंगात सैतान, भूतपलित येतात. ते काही केल्या निघत नाहीत. गुरू हा परमेश्वराचा उपासक असतो. तो परमेश्वराच्या साहाय्याने लोकांची भूत पलिते नष्ट करून दु:ख नाहीसे करतो. असे असतांना माझे दु:ख का नाहीसे होत नाही ? इतके बोलून बाबांसमोर प्रश्न ठेवला की, भगवान आहे असे तुम्ही म्हणता तर मला तो दाखवू शकता काय ? बाबा लगेच उत्तरले, ठिक आहे. घरी चला मी तुम्हाला परमेश्वर दाखवितो. त्यानंतर बाबा आणि गंगारामजी रंभाड हे दोघेही गंगारामजींच्या घरी गेले. 

    "परमेश्वर म्हणजे काय"

घरी गेल्यावर बाबांनी त्यांना कापूर आणि अगरबत्ती आणावयास सांगितली. कापूर आणि अगरबत्ती. आणल्यावर ते बाबांच्या समोर बसले. बाबांनी अगरबत्ती लावली. कापूर ज्योत लावली. कापूर विझल्यावर गंगारामजींच्या दोन्ही डोळ्यांना अश्रूंची धार लागली. ते खूप रडू लागले ते काहीच बोलत नव्हते. काही वेळाने ते शांत झाले.

बाबांनी त्यांना समजावले. गंगारामजी भगवंताची ज्योत लावली. त्यासमोर ती ज्योत कमी पडली. त्यामुळे तिची प्रखरता कमी झाली. भगवंताने तुमची आत्मज्योत चैतन्य केली. म्हणून तुम्ही खूप रडू लागले. असे बाबांनी निरूपण केले. कारण माणूस जरी सर्व व्यवहार करतो तरी व्यवहार करतांना माणसाला वाटते की आपण जागृत आहो. व जे करतो ते चांगले व सत्य करतो. परंतु काही वेळेस त्यांचे मन काही व्यवहार करतांना ग्वाही देत नाही. आणि मनात सारखे काहीतरी विचार करीत असतो. तेव्हा तो खरे व्यवहार करीत नाही म्हणून त्याचे मन त्याला सारखे डिवचत असते. म्हणजेच त्याची आत्मज्योत जागृत होऊन त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नाही. आणि हिच त्याची खरी आत्मप्रचीती आहे. आणि हाच आत्मा परमात्म्याचा एक भाग आहे. हाच परमात्मा खरा "परमेश्वर" आहे. तो चोवीसही तास मानवाजवळ जागृत असून चैतन्य आहे.

जेव्हा मानवाच्या आत्म्याला काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा मानव भयभीत होतो आणि त्याचे आत्मबल कमी होते. त्यामुळे त्यावर भयभीत करणारी दुसरी कल्पनारूपी शक्ती स्वार होते. तिला तो भूत समजतो आणि म्हणून ही कल्पनारूपी शक्ती त्याच्या मनातून केव्हाही निघत नाही.
   
भयभीत झालेले लोक जेव्हा बाबांकडे येतात तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत असतात की, अचेतन शक्ती आहे. मानवाला तेव्हाच सेवक मानले जाते जेव्हा त्याचा आत्मा चैतन्य बनतो. आणि तो आत्मा त्याला जागृत करतो. जरी माणसाला असे वाटत असेल की, साक्षात्कार मिळाला म्हणजे आत्मा चैतन्य झाला पण यांस बाबा कधीही मान्य करीत नाही. कारण माणव स्वभाव असा आहे की, तो मोह, माया, अहंकार यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात या गोष्टी फार लवकर तयार होतात. आणि तो अचेतन होऊ शकतो. कारण बाबा विदेहावस्थेत असतांना परमेश्वराने त्यांच्या सह संपूर्ण मानवाला बेईमान म्हटले आहे हे बाबांना त्याने शिकविले आहे. म्हणून बाबा नेहमी सांगतात की, जो पर्यंत मानव परमेश्वराबद्दल जागृत होत नाही, तो पर्यंत त्याचा आत्मा चैतन्य होऊ शकत नाही. 

बाबांनी परमेश्वराचे जे संतुलन केले आहे, जी जागृती आत्मातून मिळाली आहे ती खरी भगवंताची शक्ती आहे. ती निराकार आहे. बाबांनी तिला आकार करून दाखविली आहे. ती अदृश्य आहे. तिला कोणीही पाहू शकत नाही. तिचे फक्त गुण दिसतात. परंतु बाबांनी त्या शक्तीला पाहले आहे. बाबांनी विश्वाएवढा एकच डोळा पाहीला आहे. ती अफाट शक्ती आहे. तीच खरी आत्मजोत आहे. ती प्रत्येक मानवात आहे आणि तोच परमेश्वर आहे. त्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.





10 comments:

  1. छान माहिती दिली दादा नमस्कार जी

    ReplyDelete
  2. सुंदर माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  3. Chan mahiti dili dada
    Namskar ji

    ReplyDelete
  4. छान सूंदर माहिती गंगारामजी रंभाड याना बाबानी आत्म्याची आत्मप्रचीती करवून दिली । सर्वाना माझा नमस्कार जी

    ReplyDelete
  5. खूप सुंदर माहिती... नमस्कार

    ReplyDelete