【"माझा अनुभव"】[अनुभव क्रमांक:१६४] प्रकाशित दिनांक: ०५ नोव्हेंबर २०१६
【"दारूच्या व्यसनी व्यक्तीसोबत संगत, झाली आयुष्याची गंमत, दिली सदबुद्धी वेळेवर, आहे कृपा जागृत"】
माझे नाव 'विदेश मडावी' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव 'मार्गात आल्यानंतरचा दैवी शक्तीचा अनुभव' सादर करीत आहे.
आपण पहिला अनुभव मध्ये मार्गात येण्याचे कारण सांगत असतो आणि दुसरा अनुभव आपण काही चूकतो किंवा त्यातून शिकतो किंवा अपेक्षीत योग मागतो, त्याचप्रमाणे मी माझा हा दुसरा अनुभव आपल्या समोर सादर करीत आहे.
माझा अनुभव हा २०१२ ऑगष्ट महिन्या मधील आहे, नागपंचमीचा दिवस होता. मला माझ्या बहिणीला जाभळी वस्तीगृहमध्ये सोडायला जायचे होते, तर मी माझे काका व माझी लहान बहीण असे आम्ही तिघेजण पिंडकेपार वरून शाळा सुटल्यावर दुचाकीने निघालो आणि कारंजामध्ये गाडीत पेट्रोल भरले व तिथुन निघालो. तर गोरेगावमध्ये पोहचल्यानंतर माझ्या काकानी मला ५० रू मागीतले. तर मी त्यांना विचारले तर आताच येतो म्हणून म्हणाले व ते दारू पिऊन आले. मग आम्ही तिथून बाहेर पडलो व जाभळीला पोहचलो.
माझी बहीण मुलीच्या वस्तीगृहमध्ये गेली व पुढे माझ्या काकाचे मित्र मिळाले तिथे पन त्यांनी दारू पिली. मग आम्ही तिथून काकाच्या मित्राच्या गावाला निघालो आणि गावी पोहचलो मला वाटते ते आपल्या बाबा चे सेवक असेल, कारण त्यांच्या दुकानाच्या फळीवर "दारू पिऊन येऊ नये" अस लिहिलेलं होत. मग त्यांच्या मित्रानी त्यांना ५० रू दिले. मग आम्ही तिथून बाहेर पडलो, त्यानंतर दुसऱ्या मित्राच्या गावाला आलो तर त्यांच्या इथे दारूचे दुकान होते.
त्यांनी काकाला खूप दारु पाजली नंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि त्या गावावरून मुंडिपार १५ कि. मी. अंतरावर आहे, तो अंतर फक्त ५/६ सहा मिनिटांत पार केला, मला तर खूप भीती वाटत होती आणि पाऊस पडण्याचा भास होत होता. मुंडिपार मध्ये पोहचलो आणि एका हॉटेल मधे नाश्ता केला मग तिथून आसलपाणी या गावा करीता आम्ही निघालो.
तिथून गाडी मी चालवत होतो ४/५ कि.मी. पर्यंत चालवित असते वेळी, रस्त्यावर गाईंचा झुंड खूप मोठ्या प्रमाणात होता, ज्यामुळे मला गाड़ी चालविने अशक्य होते, म्हणून काकाजीनी गाडी चालवायला घेतली, थोडयाच अंतरावर गेलो आणि काकाजीचे लक्ष्य दुसरी कडे गेले व आम्ही सर्व गाडी सहित एका झाडाला धड़कलो, त्यावेळेस गाडीचा वेग ८०/९० ची होती.
गाडी धडकल्या नंतर गाड़ी ची हालत खूप खराब झाली होती व गाड़ी चे अनेक पार्ट पूर्णतः तुटलेले होते. गाड़ी ची अवस्था इतकी वाईट झाली होती की आम्ही जाते वेळी पश्चिम दिशेला होतो व जेव्हा गाडी धड़कली तर दिशा पूर्व झाली, अशी भयानक गाडी फिरली होती.
आम्ही दोघे पण ६ ते ७ फुट अंतरावर पडलो होतो, मग मी हिम्मत करुन कसतरी उठलो आणि काकाला आवाज दिला, पण ते काही उठत नव्हते. नंतर खूप प्रयत्न केल्या नंतर काकाजी उठले. काकांच्या चेहऱ्यावर व माझा पायाला जखम झाली होती. मग तिथूनच आम्ही काकांच्या मित्राला फोन केला आणि त्या मित्राने तिथेच थांबायला सांगितले. ते सर्व मित्र आल्यानंतर आम्ही कुराडी या गावी आलो व डॉक्टरांकडे जाऊन प्रथम उपचार केला, जखमेवर बँडेज पट्टी बांधून आम्ही परतलो.
नंतर धडकलेली गाड़ी दुरुस्तीला टाकन्यास मिस्त्री कड़े गेलो. तर त्यांनी पूर्ण गाड़ी चा खर्च २२०० रूपये सांगितले. व ४ दिवस लागेल अशी माहिती दिली. तर आम्ही ती गाड़ी मिस्त्री कड़े ठेवून आसलपानी या गावी आलो व तिथे थांबून जेवण करुण आम्ही दुसऱ्या दिवशी पिंडकेपार ला घरी आलो.
घरी आल्यानंतर घरच्यांनी गाडी बद्दल विचारले असता आम्ही खोटे सांगितल की, गाड़ी शेणा वरुण घसरुण पडली. व तिला दुरुस्त करण्यास मिस्त्री कड़े दिली. जेव्हा ४ दिवसा नंतर गाडी आणायला गेलो तेव्हा आईला न सांगता मी घरातील पैसे जवळ घेतले व ते पैसे गाड़ी दुरुस्त करणाऱ्या मिस्त्री ला दिले. मग गाड़ी घरी परत आणल्या नंतर आईला मी सांगितले की घरी असलेले पैसे मी घेतले होते, त्यावेळी आईनी काही म्हंटले नाही.
पण माझी चूक मला भोवली आणि मला असे वाटत होते की, माझ्या पायाला कमी जखम असेल पण पाया मध्ये दगड चा टुकड़ा रुतलेला होता आणि पायाचा आता २ इंच काड़ी जाईल अशी अवस्था झाली होती. नंतर माझ्या लक्ष्यात आले की, मी मार्गात असून दारू पिणाऱ्या सोबत इकडे-तिकडे फिरलो, नाश्ता केला, त्याला पैसे दिले. ही माझी खुप मोठी चूक आहे व या चुकीची मला शिक्षा पण मिळाली आहे.
मग मी बाबाला समोर ठेवून व आपल्या चुकीची क्षमा याचना करु लागलो. सोबतच योग मगितला की माझे दुःख लवकरात लवकर बरे व्हावे. बाबाला समोर ठेवून मी औषध उपचार केले व बाबांनी मला माफ़ करुन माझे दुःख दूर होण्यास २ महीने लागले. तेव्हा मला अनुभव आला की, दारुच्या व्यसनी व्यक्तीसोबत संगत किवा त्यांचा सोबत कोणतेही खाद्य पदार्थ व इतर व्यवहार करने म्हणजे आपली मोठी चूक आहे. या चुकीची शिक्षा फक्त स्वतःला मिळत असते इतरांना नाही.
आपल्या मार्गात दैवी शक्ती २४ तास चैतन्यमय आहे. तिचे लक्ष्य प्रत्येक सेवकांकडे आहे. म्हणून जी चूक मी केली ती चूक आपण सेवकांनी नाही करावी. दुःखास पात्र न होता तत्व, शब्द, नियमांची योग्य वागणूक ठेवावी.
लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेविक :- विदेश मडावी
पत्ता :- रा. पिंडकेपार, जिल्हा गोंदिया
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.★ जीवन एस. पाटील: 7020000823 ★
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
या अनुभवाने लक्षात आले की व्यसनी लोकांची संगत सुद्धा आपल्याला भोवते ।इतर सेवकानी लक्षात घेण्यसारखे आहे। नमस्कार जी
ReplyDeleteनमस्कार दादा, होय दादा आपण कळत नकळत अशा चुका करीत असतो, तर काही चुका आपल्या लक्षात असून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व आपल्या सोयीनुसार वागतो, त्यामुळे भगवंत वेळेवर सद्बुद्धी नक्की देतोय.
Deleteअंतरात्मा स्वच्छ व शुध्द असला तरी त्याला देहाच्या सगतीने अनेक सुख दुख भोगावी लागतात.
ReplyDeleteतसेच आपल असते. जशी संगत लाभेल तसा माणूस घडतो. आपला आपण शत्रू बनतो,नाहीतर मित्र !
जशी संगती लाभते तसा माणूस घडतो. त्या व्यक्तीला गती किंवा अधोगती प्राप्त होते.
वरील अनुभवात हेच सागण्याच प्रयत्न केला आहे... खूप छान अनुभव... नमस्कार... धन्यवाद!
नमस्कार दादा, या अनुभवातून आपल्याला शिकण्यास मिळते की, आपली संगत कशी असावी व आपली वागणूक कशी ठेवावी.
ReplyDeletenamskar ji dada
ReplyDeleteदैवी शक्तीचा खूप सुंदर अनुभव सादर केलं दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई