"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (१८)
"अंतरीचे बोल"
महादेव कॉलेज मध्ये का आला नाही हे पाहण्यासाठी महादेवचा मित्रा विठ्ठल राऊत रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्याच्या घरी आला होता. कारण तो त्या दिवशी आजारी असल्यामुळे बाबांच्या सल्ल्यानुसार कॉलेज ला गेला नव्हता. त्याचा मित्र त्याला भेटायला आला तेव्हा तो अभ्यास करून नुकताच झोपला होता. मित्र आल्याचे कळताच तो झोपेतून उठला आणि मित्राशी गप्पागोष्टी करू लागला. बोलता बोलता तो त्याला म्हणाला. विठ्ठल, आपल्याला डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरवायचे आहेत. या वेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी जेवण करीत होते. ते शब्द त्यांनी ऐकले. त्यांना खूप वाईट वाटले. ते विचार करू लागले, तेव्हा त्यांना वाटले हे शब्द त्यांचे स्वतःचे नाहीत, "बोलविता धनी वेगळाची" या म्हणीप्रमाणे हे शब्द त्यांच्या अंतरात्म्यातून भगवंतांनी काढले आहेत. त्या रात्री आनंदाने सर्वजण झोपी गेले.
दुसरा दिवस उजाडला. बाबा कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे ते सकाळीच कामानिमित्य घरा बाहेर गेले होते. दुपारी अकराच्या सुमारास बाबा घरी आले व आपल्या आसनावर विराजमान झाले. त्यापूर्वी महादेव आणि त्याचा मित्र डॉ. झोडेकडून औषधी घेऊन आले होते. महादेव औषधी घेऊन नुकताच आपल्या खोलीत झोपला होता. परंतु, महादेव एकाएकी कसं तरी करू लागला. त्याने डोळे फिरविले. त्यावेळेस त्याची आई घरातच होती. ती पण घाबरून तिथे धावत आली आणि जोरात रडत रडत ओरडली की महादेव कसं तरी करतो आहे. त्याने डोके फिरविले आहे. हे ऐकून बाबा आसनावरून उठून आता गेले. बाबा आणि आई यांचे ते एकुलते एक अपत्य होते. तरीपण बाबा त्या परिस्थितीत अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी आपले मन कठोर केले आणि आईला म्हटले, तू रडू नकोस. ही वेळ रडण्याची नाही. संघर्षांची आहे. मानवी जीवन हे संघर्षमय आहे. मानवी जिवन संघर्षातूनच सुखी होते. संघर्ष करणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे. म्हणून रडणे बंद कर आणि आपण आलेल्या परिस्थितीला तोंड देऊ. मानव हा कर्मकर्ता आहे. त्यामुळे त्याच्याहातून चुका होणे स्वाभाविक आहे म्हणून आपण भगवंताला कापूर लावून झालेल्या चुकीची क्षमा मागू.
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी भगवान बाबा हनुमानजीला कापराची ज्योत लावली आणि विनंती केली की, भगवान बाबा हनुमानजी तुम्ही कर्म करीत नाही. आम्ही मानव कर्म करीत असतो. त्यामुळे आमच्या हातुन काही चुका होणे शक्य आहे. आमच्या हातुन काही चुका नकळत झाल्या असल्यास मी संपूर्ण दोषी आहे. तुम्ही निर्दोष आहात म्हणून मला क्षमा करा. परंतु बाबांनी विनंती करूनही महादेवला आराम झाला नाही. तो तसाच डोळे फिरवीत होता. तेव्हा बाबांनी आईला विनंती करून क्षमा मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे आईने भगवंताला कापराची ज्योत लावून क्षमा मागितली. तरीपण त्याला आराम झाला नाही हे पाहून बाबा त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याच्या कानात सांगितले की, महादेव, तुला बोलता येत नाही. तू डोळे फिरवले आहेस. तरी तू ज्या अवस्थेत आहेस त्याच अवस्थेत मनातल्या मनात बाबा हनुमानजी म्हणून अंतःकरणापासून क्षमा माग. याप्रमाणे बाबांनी महादेवला मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे त्याने बाबा हनुमानजीची क्षमा मागितली असता तो एकदम उठून उभा झाला आणि बाबांना म्हणाला, मला आता खूप बरे वाटते आहे. मला आता काहीही होत नाही. याप्रमाणे महादेवला परमेश्वरी साक्षात्कारची व चमत्काराची प्रचीती आली. तेव्हापासून त्यांची देखील बाबा हनुमानजीवर श्रद्धा बसली.
महादेव त्याच्या मित्राजवळ बोलला होता की डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरवायचे आहे. तो शब्द भगवंताला पूर्ण करावयाचा होता. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या डोळ्यासमोरही तो शब्द सारखा फिरत होता. पंधरा मिनिटानंतर तो पुन्हा आजारी झाला आणि त्याची परिस्थिती पुनः पूर्वीसारखीच झाली. परमेश्वराने या मार्गात हेच शिकवले आहे की माणसाचे कुठे चुकते हे त्याने लक्षात घ्यावे. म्हणून बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की, या मार्गात आल्यावर जर त्याला दुःख आले तर त्याने प्रथम आपली चूक शोधावी. त्याने आपले आत्मसंशोधन करावे. म्हणजे त्याची चूक लक्षात येते व त्या चुकीची क्षमा मागितल्यास त्यातून त्याची सुटका होते.
बाबांनी त्यांचे कनिष्ठ बंधू मारोतराव यांना डॉ. झोडेंना बोलवण्यास सांगितले. बाबांच्या शेजारी एक विठोबाजी धापोडकर नावाचे नाडीपरीक्षा करणारे वैद्य राहत होते. ते नाडीपरीक्षा करून आयुर्वेदिक औषध देत असत. त्यांनाही बोलावून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मारोतराव दोघांनाही बोलवावयास गेले. थोड्या वेळाने डॉ. झोडे घरी आले. त्यांच्या पाठोपाठ विठोबाजी वैद्यपण आले. डॉक्टरांनी महादेवला पूर्णपणे तपासले. ते बाहेर येऊन बाबांना म्हणाले, महादेवला धनुर्वात झाला आहे. त्याची काळजी घ्या. या बिमारीची मुदत फक्त चार तास असते. तेव्हा बाबा डॉक्टरांना म्हणाले की, तुम्ही तसे सर्टिफिकेट द्या म्हणजे मी त्याला मेडीकल कॉलेज किंवा मेयो दवाखान्यात नेतो. त्याप्रमाणे डॉक्टरांनी बिमारीचे सर्टिफिकेट दिले आणि ते आपल्या दवाखान्यात निघुन गेले. त्यानंतर आलेल्या वैद्यांनी त्याची नाडीपरिक्षा केली. त्यांनी पन धनुर्वाद असल्याबद्दल बाबांना सांगून काळजी घ्यावयास सांगितले.
बाबा त्या मुलाला घरी तशाच परिस्थितीत सोडून घराच्या बाहेर पडले. त्यांनी मेडीकल काँलेज, मेयो हास्पिटल आणि नागपुर महानगरपालिका आणि इतर ठिकानी रुग्णवाहिकेकरिता फोन केला पण कुठेही रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणून बाबा घरी परत न येता तीन खंबा चौक, मोमीनपूरा येथे गेले. तेथे सायकल रिक्षा केला. तेथून सायकल रिक्षाने इतवारी पोष्ट आँफीसजवळ आले. तेथे तो रिक्षा सोडून दिला. तेथे आँटोरिक्षावाले उभे होते. त्यातील एका आँटोरिक्षावाल्यास ते म्हणाले एक सीरीयस केस आहे. टिमकीयेथून ती मेडिकल काँलेजमध्ये पोहचवावची आहे. जे काही भाडे पडेल ते देऊ. त्यातील एक आँटोरिक्षावाला तयार झाला. त्याने बाबांजवळ आपला रिक्षा आणला. बाबा त्यात बसून रंभाजी रोडवरील रामेश्वर तेलघाणीजवळ आले. आँटोरिक्षा तेथेच रस्त्यावर ठेऊन घरी पायीच परत आले. तेव्हा महादेव उठून बसला होता. कुटुंबातील सर्व लोकांनी कापूर लावून भगवंताला विनंती केली की, भगवंता, प्रयत्नांना यश देण्याचा अधिकार तुलाच आहे. म्हणून मनोच्या प्रकृतीला आराम पडू द्या. त्यांनतर बाबा, आई, महादेव आणि बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई ऑटोरिक्षाकडे जायला निघाले. मनो पायीच रिक्षापर्यंत गेला. ते सर्व रिक्षात बसले. त्यांनतर ऑटोरिक्षा चालू झाला. जवळच शंभर फुटांवर रस्त्यातच हनुमानजीचे मंदिर आहे. त्या मंदिरासमोर ऑटोरिक्षा आपोआपच बंद पडला. जवळ जवळ पंधरा मिनिटे ऑटोरिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तो सुरू झाला नाही. त्यांनतर तो आपोआपच सुरू होऊन गोळीबार चौकाकडून मेडिकलकडे जाण्यास निघाला. गोळीबार चौकात डॉ. झोडे यांच्या दवाखाण्यासमोर तो ऑटोरिक्षा पुनःबंद पडला. तेथे दहा मिनिटे तो चालू करण्यात पुनः गेले. चालू झाल्यावर तो पुढे गेला. गांधीबाग फवारा चौकात पुन्हा तो बंद पडला. तेव्हा बाबांना खूप राग आला. ते त्या ऑटोरिक्षा चालकावर खूप रागावले आणि म्हणाले की मी तुम्हास अगोदरच सांगितले होते की, सिरीयस केस आहे. मेडिकल कॉलेज ला पोहचवायची आहे. तेव्हा आपण का सांगितले नाही की, माझी गाडी खराब आहे. दुसरी घेऊन जा. ते पुढे म्हणाले, ही गाडी जीवघेणी आहे. तुम्हाला कोणाच्या जीवाची पर्वा नसते. फक्त पैसे पाहिजे असतात. अश्या गाडीला लाथ मारून तिची तोडमोड केली पाहिजे. असे म्हणताच ती गाडी पुनः सुरू झाली. तेथून ती सरळ निघाली आणि मेडीकल कॉलेजला पोहोचली.
तेथे डॉक्टरांनी मनोला तपासले. तेव्हा बाबांनी तेथील डॉक्टरांना विचारले की माझ्या मुलाला कोणता आजार झाला आहे ? तेव्हा संपुर्ण तापसाअंती कोणतीही बिमारी नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तेव्हा बाबांनी त्यांना डॉ. झोडेंनी दिलेले सर्टिफिकेट दाखविले. डॉ. झोडे M.B.B.S असल्यामुळे त्यांचे सर्टिफिकेट पाहून सर्व डॉक्टरांना आश्चर्य वाटले. ते सर्व विचारात पडले. त्यांनी धनुर्वाताच्या वार्डात फोन केला आणि पाच मिनिटांनी त्यांना सांगितले की, बाहेर रुग्णवाहिका उभी आहे. आपण त्याला धनुर्वाताच्या वार्डात घेऊन जा.
मनोला त्या वार्डात नेण्यात आले. वार्ड इंचार्ज डॉक्टरांनी त्याला बेड दिला. सीरीयस केस समजून डॉक्टरांनी फटाफट तपासणे सूरु केले. त्यांनी वरिष्ठ डॉक्टरानांही बोलाविले. त्यांनीही त्याला तपासले. जेव्हा वार्ड इंचार्ज डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांना बाबांनी विचारले की, डॉक्टरसाहेब मुलाला कोणती बिमारी आहे? तेव्हा डॉक्टर उत्तरले की, सिरीयस आहे. तेव्हा बाबांनी पुन्हा विचारले, डॉक्टर साहेब आपल्या पुस्तकात सिरीयस नावाची बिमारी आहे का? त्या वर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा बाबा म्हणाले , डॉक्टर मी लिहून देतो की, जोपर्यंत बिमारीचे पूर्णपणे निदान होत नाही, तो पर्यंत मी त्याला औषध देऊ देणार नाही मुलगा माझा आहे काही कमी जास्त झाल्यास जबाबदारी माझी आहे. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना मूर्ख म्हटले. तेव्हा बाबा म्हणाले मी महामुर्ख आहे. त्यानंतर बाबांनी एका सेवकाला आईकडे पाठवून निरोप द्यायला सांगितले की, मनोला कोणताही औषध देऊ नका. इंचार्ज डॉक्टरांशी बाबांनी वाद घातल्यामुळे ते डॉक्टरांच्या खोलीत निघून गेले. कारण वाद निर्माण झाल्यामुळे बाबांना वाटत होते की, तो औषध देईलच वरिष्ट डॉक्टर मनोला तपासून आणि औषध उपचार करण्यास सांगून दुसरीकडे गेले होते. म्हणून त्याने वरिष्ठ डॉक्टक्टरांना फोन करून बोलाविले. त्या इंचार्ज डॉक्टरांनी पुन्हा तपासले पण उपचार करता आले नाही.
त्या वार्डात इतर रोग्यांना भेटण्याकरिता लोकं येत होते. त्यातील काही सुशिक्षित लोक म्हणू लागले की, मुलाचे वडील किती मूर्ख आहेत. मुलगा एवढा सिरीयस असून सुद्धा ते त्याला औषध देऊ देत नाहीत. हे शब्द बाबांच्या कानावर पडताच ते त्या लोकांना सांगू लागले की, खरोखरच मी महामुर्ख आहे. नुसताच मूर्ख असतो तर डोक्यावर हात ठेवून बसलो असतो, तुमच्याशी बोललो नसतो. लोक मात्र आश्चर्यच करीत बसले. वरिष्ठ डॉक्टर आल्यावर वार्ड इंचार्ज ने त्यांच्याकडे औषध देऊ न देण्याबद्दल बाबांची तक्रार केली. तक्रारीत डॉक्टरांनी सांगितले की, बिमारीचे पूर्णपणे निदान करा आणि त्या नंतर औषध द्या. अन्यथा देऊ नका. निदान केल्याशिवाय औषध दिले तर त्याचा जीव जाईल असे मुलाचे वडील म्हणतात.
सर्व डॉक्टरांनी तपासले असतानाही रोगाचे अचूक निदान झाले नाही. हे सर्व पाहून बाबांनी मनाशी म्हणाले की, परमेश्वर मनोची परीक्षा घेत आहे थोड्या वेळाने घरचे काही लोक मनो ज्या बेडवर होता तेथून बाबांजवळ आईचा निरोप सांगण्याकरिता धावत आले. आईचा निरोप ऐकुन बाबा त्यांच्यावर खुप रागवले आणि म्हणाले, तुम्ही मला आता काहीही सांगू नका, तुम्ही जा.मी येतो आहे इतके बोलल्यावर बाबांनी मनोच्या बेडजवळ जाऊन त्याला विचारले, तुला काय झाले? तेव्हा तो बाबांना म्हणाला मी जगु शकत नाही. त्यावर बाबा त्याला म्हणाले, महादेव तुला काहीच होत नाही, तु घाबरु नकोस तेव्हा तो बाबांना पुन्हा म्हणाला, मला खरोखरच काहीच होत नाही. त्यावर बाबांनी पुन्हा उत्तर दिले. होय, तुला काहीच होत नाही. तेव्हा मनोने थोडा विचार केला आणि तो बाबाला म्हणाला मला काहीही होऊ नये याकरीता काय करावे लागेल, तेव्हा बाबांनी त्याला मार्गदर्शन केले की, तू बाबा हनुमानजीला समोर ठेऊन त्यांचे चिंतन कर आणि धैर्याने काम घे, सर्व काही ठीक होईल. एवढे बोलून बाबा बेडजवळुन निघुन गेले आणि डॉक्टराच्या खोलीत जाऊन उभे राहीले तो शांत पडून राहिला.
बाबांना शंका वाटत होती की, डॉक्टर काहितरी उलटेसीधे करतील त्याची अट होती की, जोपर्यंत रोगाचे निदान पूर्ण होत नाही तोपर्यंत औषध द्यायची नाही. ते डॉक्टरवर लक्ष ठेऊनच उभे होते परंतु दोघेही आपसात बोलत नव्हते.
वेळ जात होती डॉ. झोडेच्या म्हणण्यानुसार चार तास संपत आले होते धनुर्वाताच्या केसवर चार तासात उपचार झाले नाहीत तर तो रोगी दगावतो असे डॉक्टराचे निदान आहे बाबा आणि सर्व लोकांचे लक्ष त्या डॉक्टर आणि मनोकडे सारखे होते. काही वेळानी बाबांनी घड्याळात पाहिले तेव्हा दवाखान्यात एडमिट करून चार तास झाले होते काही लोक बाबांकड़े घाईने आले परंतु ते बाबांशी बोलायला घाबरत होते. कारण बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केली असून त्यांच्या शब्दात महानशक्ती आहे. स्वयम् सिद्ध आहेत, हे त्यांना माहीत होते. तरीपण हिंमत करून ते बाबांन कड़े गेले बाबा त्यांना घाईने येताना पाहून रागावले आणि म्हणाले, मला माहित आहे. तुम्ही मला काहीही सांगू नका आणि त्यांनी त्यांना हात हलवून सांगीतली की, मी येतो आहे असे त्याला सांगा. त्याप्रमाणे महादेवजवळ ती मंडळी येऊन सांगू लागली बाबा येत आहेत. त्याप्रमाणे बाबा त्याच्या बेडजवळ आलेत आणि त्यांनी त्याला विचारले, काय झालं तुला? तेव्हा तो बाबांना म्हणाला, बाबा मी जीवंत राहू शकत नाही. तेव्हा बाबांनी विचारले जिवंत न राहण्याचे कारण काय? तो उत्तरला, पाहा , माझे दोन्ही डोळे वर चढले आहेत. तेव्हा बाबांनी त्याच्याकडे पाहून म्हटले तुझे दोन्ही डोळे ठिकाणावर आहेत. तू पुन्हा पुन्हा तेच ते सांगू नकोस. हे चांगले नाही. तुला काहीही होत नाही. मग मी आता काय करू असे पुन्हा महादेवने बाबांना विचारले असता बाबा म्हणाले, तू फक्त भगवंताला बाबा हनुमानजीला समोर ठेव व चिंतन कर इतके बोलून बाबा डॉक्टरांच्या ऑफीसकडे गेले.
ऑफीसमध्ये येऊन डॉक्टरांना ते म्हणाले, " ऍडमिट करायला साडे चार तास झालेत. आपण रोगाचे निदान करू शकले नाही. म्हणून आमची केस आम्हाला परत करा. तेव्हा डॉक्टर बाबांना म्हणाले की पागल झाला आहात काय? केस परत नेऊन काय करणार? तेव्हा बाबांना खूपं राग आला . ते डॉक्टरला म्हणाले, डॉक्टर आता मला पागल म्हणू नका. तुम्ही पागल झाले आहात. आपण मला यापूर्वी मूर्ख म्हणालात. मी स्वतःला महामूर्ख म्हणवून घेतले. पण लक्षात ठेवा, लोक मला बाबा म्हणतात. मी आपल्या अधिकारात आलो म्हणून मला काहीही बोलू नका. बाबांना ओळखा नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होईल. माझी केस मला परत करा. तेव्हा डॉक्टरांना खूप राग आला. डॉक्टरांनी रजिस्टर बाबांच्या समोर सहीकरिता ठेवले आणि म्हटले, यावर सही करा . पुन्हा जर केस आणली तर मी पुनः ती परत घेणार नाही, असे तावातावाने डॉक्टरांनी बाबांना सांगितले. तेव्हा बाबांनी त्यांना म्हटले की, मी पुन्हा केस तुमच्याकडे आणणार नाही . गरज पडली तर खाजगी दवाखान्यात घेऊन जाईन. असे सांगून बाबांनी रजिस्टरवर सही केली . सर्व कागदपत्रे घेऊन बाबा महादेवच्या बेडजवळ आले आणि आईला म्हणाले , "चला , घरी जाऊ" त्या वेळेस महादेव झोपला होता. बाबांनी हे पाहिले होते की जेव्हा रजिस्टरवर त्यांनी सही तेव्हाच त्याला झोप लागली. आई बाबांना म्हणाली, 'आताच महादेव झोपला. थोडे हळू बोला’. बाबाचे बोलणे एकून महादेव जागा झाला. हे पाहताच बाबा त्याला म्हणाले " चल महादेव ‘आपण घरी जाऊ' "त्यावेळेस महादेव बाबांना म्हणाला की, माझा उपचार येथे नाही म्हणून, आपण घरी जाऊ. आता मला बरे वाटते. यानंतर बाबा आईला म्हणाले की, तू महादेवाला कपडे घालून दे. कारण तो आजारी आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की केस सीरियस आहे. हे एकूण महादेव स्वतःच उठून उभा राहिला आणि आईला म्हणाला, दे माझे कपडे मी स्वतःचा घालतो. मी कुठे सीरियस आहे ? कपडे घातल्यावर ते सर्व वार्डाच्या बाहेर यावयास निघाले. तेव्हा बाबा महादेवाला म्हणाले, "मी तुला धरून हळूहळू रिक्षाजवळ घेऊन जातो. कारण डॉक्टर म्हणतात तू सीरियस आहेस." त्याचप्रमाणे बाबांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, "नको, मी स्वतःच रिक्षापर्यत पायी चालतो" आणि स्वतः चालत चालत रिक्षाजवळ आला.
तत्पूर्वी बाबांनी मारोतरावांना रिक्षा आणावयास सांगितले होते. त्याचप्रमाणे त्यानी रिक्षा आणून वार्डासमोर उभा ठेवला होता. सर्व जण वार्डाबाहेर येऊन रिक्षाजवळ आले. त्यानंतर आई आणि महादेव रिक्षाने घरी परत आलेत. बाबांबरोबर आलेली सेवक मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक बसने गोळीबार चौरस्ता येते आले आणि आपआपल्या घरी गेले.
घरी परत आल्यावर बाबांनी आईला विचारले, "महादेव जेवला काय?" तेव्हा आई ने संगीतले की, "नाही, तो जेवला नाही. त्याने फक्त एक कप कॉपी घेतली आणि तो झोपला आहे. "तेव्हा बाबा म्हणाले,ठीक आहे. त्याला आराम करू दे". थोड्या वेळाने महादेवचे मामा श्री. सोमाजी बुरडे हे त्यांच्या घरी आले. बाबांनी त्याना संपूर्ण हकीकत सांगितली. ती ऐकून त्याना वाईट वाटले. महादेव त्या रात्री शांतपणे झोपला. त्याला काहीही त्रास झाला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी झोपून उठल्यावर तो बाबांना म्हणाला, "बाबा तुम्ही मला भगवंत दाखविला. माझा इतर देवांना मानण्याचा भार कमी झाला. तेव्हापासून तो एकाच परमेश्वराला मानू लागला. त्यापूर्वी मनोने दवाखान्यातून आल्यावर भगवान बाबा हनुमानजीला कापराची ज्योत लावून विनंती केली होती की, "भगवान बाबा हनुमानजी मी आपणास भगवान नाही असे म्हणटले होते. परमेश्वर कोणी नाही. मानव सर्वेसर्वा आहे, असेही म्हटले होते. ही माझी फार मोठी चूक झाली आहे. मोठी चुक झाली आहे. त्यामुळे मला खुप त्रास झाला. तरी आपण मला क्षमा करा. यापुढे मी एकच भगवंताला मानीन. "परमेश्वर हा सर्वेसर्वा आहे, मानव कुणीही नाही".
त्याचप्रमाणे त्याच्या अंतरात्म्यातून जे शब्द निघाले त्यामुळे डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरले. ते "अंतरीचे बोल" आहेत म्हणून शब्द हाच परमेश्वर आहे हेही सिद्ध होते. तसेच बाबांच्या शब्दांचा अनादर करणे हा परमेश्वराचाच अनादर आहे हेही या प्रसंगापासून शिकावयास मिळते.
परमेश्वराचा हा चमत्कार पाहून परमेश्वर वेळेनुसार परिस्थिती पाहुन तो मानवाच्या भावनेनुसार कार्य करतो व त्याला शिकवितो तो महान दयाळु आहे. त्याची महाशक्ति आहे.
हाच महादेव आज डॉ. मनो ठुब्रीकर या नावाने अमेरिकेत व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया येथे असोसिएट प्रोफ़ेसर ऑफ़ सर्जरी म्हणून कार्यरत आहे. डायरेक्टर ऑफ़ सर्जिकल रिसर्च या संस्थेत तो जगातील नावजलेल्या शास्त्रज्ञामध्ये सातव्या क्रमांकाचा शास्त्रज्ञ आहे. हीच त्याला परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करापरमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.मग, Home म्हणून दिसेलया खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.