Followers

Sunday, 15 November 2020

प्रकरण क्र. (२७) "ज्ञान परस मररस योगी"

 


                 "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                        'सुधारित पाचवी आवृत्ती'


      प्रकरण क्रमांक (२७): ज्ञान पररस मररस योगी

१९८३ सालची घटना आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या निवासस्थानी एक दिवस रात्री आपल्या असानावर झोपले होते. त्यांना झोपेत स्वप्न दिसले. त्या स्वप्नात त्यांना कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तु दिसली नाही. फक्त त्यांना मोठमोठी अक्षरे लिहिलेली दिसलीत. त्यांच्या मुखातुन सारखे तेच तेच शब्द बाहेर पडत होते. ते शब्द होते "ज्ञान पररस मररस योगी" जवळजवळ अर्धातासपर्यंत ते हे शब्द वाचत होते. त्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यानंतरसुध्दा त्यांच्या मुखातुन तेच शब्द बाहेर पडत होते म्हणून बाबांनी आपल्या डायरीत त्या शब्दांची नोंद त्याच वेळेस करुन ठेवली. हे शब्द जरी त्यांना स्वप्नात दिसले तरी ते शब्द परमेश्वरानेच त्यांच्या मुखकमलातुन बाहेर काढले होते. त्यावर बाबांनी बराच विचार केला आणि नंतर ते सर्वांना सांगू लागले की, ज्याप्रमाणे परिस नावाच्या वस्तुचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याप्रमाणे ज्ञान हे परिसा सारखे आहे. या ज्ञानाला जो स्पर्श करतो त्याचे सोने होईल. म्हणजे तो महानज्ञानी होतो. परंतु मानवी जीवनात दैवीशक्तीकरिता मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याची अत्यावश्यकता आहे. हेच दैवी शक्तीचे उगमस्थान आहे.

 परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी दिलेल्या "मरे या जिये भगवत नामपर" या तत्वाप्रमाणे परमेश्वराच्या नावावर मेले तर भगवंत भक्ताच्या पाठीशी उभा होतो आणि परिसासारखे रस तयार होऊन तो ज्ञानी बनतो. जर तो परमेश्वराच्या चरणी मेला नाही तर रस तयार होत नाही. म्हणून माणूस परमेश्वराच्या चरणी मेल्यावरच त्याचा रस तयार होतो आणि रस बनल्यावर ती व्यक्ती योग्यासारखी बनते. हा या मार्गातील सेवकांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे. परमेश्वराच्या नावावर मरणारी व्यक्ती बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागली तर ती योगी बनते. अन्यथा तिला कितीही पुस्तकी ज्ञान असले तरी ती योगी बनु शकत नाही. त्याला परमेश्वराची साथ असणे आवश्यक आहे. कर्तव्याने आत्मानुभव येतो. आत्मप्रचिती होते, आत्मज्ञान वाढते. तेव्हाच तो ज्ञानी पुरुष होऊन योगी बनतो हे सिध्द होते.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.