Followers

Friday, 11 December 2020

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे अनमोल मार्गदर्शन

 


[महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे अनमोल मार्गदर्शन]
     !! ----------------------------------------------!!

खालील मार्गदर्शन आवर्जून बघा व जास्तीतजास्त शेयर करा आणि आपल्या या YOU TUBE चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा. यामुळे भगवत गुणांचा आनंद सेवकांना घेता येईल. आपल्या चॅनल वर तुमच्या LIKE आणि COMMENT आठवणीने द्या.  नमस्कार.!!
__________________________________

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-१
लिंक:https://youtu.be/M2DUvlRNvQY

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-२
लिंक:https://youtu.be/_pFs-aykK4E

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-३
लिंक:https://youtu.be/R1dPtcWTrdc

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-४
लिंक:https://youtu.be/8slcrcDHSdI

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-५
लिंक:https://youtu.be/hTibJ1KaJOg

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-६
लिंक:https://youtu.be/u-1pqyKqauk

◆महानत्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन भाग-७
लिंक:https://youtu.be/auB77oNz4Pk

                      !!!..नमस्कार..!!! 

प्रकरण क्र: (२९) "मर्यादित कुटुंब" हे प्रकरण नक्की वाचा व आवर्जून शेयर करा.

 


"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)

             'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२९) 

                             "मर्यादित कुटुंब"


महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माच्या शिकवणुकीत जे चार तत्व, तीन शब्द आणि पाच नियम दिलेले आहेत. त्यातील नियम पाचमध्ये त्यावेळच्या परिस्थितीनुसार मानव मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान जमा करणे हा नियम दिला होता. त्याप्रमाणे बाबांनी सेवकांचे मानव मंदिर, सहकारी बँक, ग्राहक भांडार याच्या स्वरुपात सजविल्यानंतरही सेवकांना जीवनचरितार्थ चालवितांना त्रास होतो हे लक्षात आल्यानंतर त्याच्या कारणाचे संशोधन करुन त्यावर निदान काढले. सध्याची देशाची किंवा सपूर्ण जगाची परिस्थिती पाहून जाता मानवांना भेडसावणाऱ्या समस्या कोणतेही

सरकार पूर्णपणे सोडवू शकत नाही किंवा कोणतेही सरकार आपल्या देशाची भरभराट करु शकत नाही. वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई, उद्योगधंदे कमी पडणे याला जर कोणी जबाबदार असेल तर ती वाढती लोकसंख्या आहे. जोपर्यंत या वाढत्या

लोकसंख्येला आळा बसणार नाही. तोपर्यंत हल्लीच्या काळात कोणताही देश आपली प्रगती करु शकत नाही. म्हणून प्रत्येक देशाच्या सरकारने याविषयी बरेच संशोधन करुन कुटुंब कल्याण या नावाची योजना राबविणे सुरु केले आहे.

त्यात भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ही योजना भारतात सरकारतर्फे यशस्वी झाली नाही. भारत सरकार अजूनही मर्यादित कुटुंबाकरिता मानव जागृती करुन निरनिराळ्या प्रकारच्या योजना राबवीत आहे पण सरकार अजुनही लोकसंख्येला मात्र आळा घालु शकले नाही.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवान बाबा हनुमानजीचा वार्षिक कार्यक्रम आणि एका भगवंताचा सदतिसावा प्रगट दिनोत्सव दि. १७/८/१९८४ रोजी साजरा करीत असतांना सेवकांना भेडसावित असलेल्या समस्यांचे निवारण खालीलप्रकारे मार्गदर्शन केले. ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, "जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी जे पाच नियम दिले आहेत त्यातील पाचवा नियम मंदिर सजविण्याकरिता फंड अनुदान गोळा

करणे याऐवजी "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम आजपासून अमलात आणावा." कारण फंड अनुदान भरपूर झाले असून त्या फंडाचा सदुपयोग आपण चांगल्या कामाकरिता केला आहे आणि त्या सर्व गोष्टींचा लाभ सेवकांना मिळतही आहे. परंतु

सेवकांना त्यांच्या मुलांचे योग्यरित्या पालनपोषण करता यावे आणि त्यांना चांगले शिक्षण देता यावे याकरिता प्रत्येक कुटुंबात परिवार-नियोजन आणण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावेत असा आदेश सेवकांना दिला.

१) या मार्गात जे सेवक आहेत किंवा होतील, त्यांच्या कुटुंबातील ज्याचे लग्न झाले आहे किंवा पुढे होईल त्यांनी लग्नानंतर १६ वर्षांच्या अवधीमध्ये फक्त दोन मुले होऊ द्यावीत.

२) डॉक्टरी सल्ला घेऊन बायांनी गर्भप्रतिबंधक उपाय करावेत.

३) प्रत्येक कुटुंबात मुलाच्या लग्नाची वयोमर्यादा २५ वर्षांची असावी. २५ वर्षांच्या आत कोणत्याही मुलाचे लग्न करु नये.

महानत्यागी बाबा जुमदेवजी पुढे म्हणाले की, आज असे पाहण्यात येत आहे की, लग्न झाल्यावर ४-५ वर्षातच ३-४ मुले जन्माला येतात. त्यामुळे आईवडिलांची त्यांचे पालनपोषण करतांना तारांबळ उडते आणि त्यांना खूप त्रास होतो. त्याप्रमाणे

आईच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. वरील नियमांचे पालन केल्यास त्रास कमी होईल आणि खर्चात बचत होऊन जीवनमान उंचावेल म्हणून सर्वांनी यापुढे "मर्यादित कुटुंब" हा नियम पाळावा असा आदेश दिला आणि त्या दिवसापासून म्हणजे १७ ऑगस्ट १९८४ पासून सर्व सेवकांनी तो नियम अमलात आणला.

अशाप्रकारे जे काम सरकार एकाएकी करु शकत नाही ते कार्य या मार्गातील सेवक बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शन करुन त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळवितात.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★जिवन एस. पाटील: 7020000823


सौजन्य: "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.