▶ "मानवधर्म सेवक मेळावा म्हणजे काय? आणि आपण तो कसा साजरा करतो?"
【लेख स्पष्टीकरण】
मेळावा म्हणजेच जास्त प्रमाणात एकत्र येऊन, एकमेकांची ओळख करणे, एकमेकांचा परिचय करणे व जास्त संख्येने उपस्थित होऊन शुभ कार्याची शोभा वाढविणे, इत्यादी. मानवधर्म सेवक मेळावा म्हणजेच की, मानवा मध्ये फक्त दोनच जाती आहेत ते म्हणजे नर आणि नारी तर, या दोनच जातींना लक्षात घेऊन जो धर्म बनला आहे त्यालाच मानवधर्म म्हणतात व या मानवांचाचं मेळावा म्हणजेच मानवधर्म मेळावा.
आपण या मानवधर्म सेवक मेळाव्याला अगदी आंनदाने साजरा करतो. विविध कलेचा प्रदर्शन करून जसे की, नृत्य कला, चित्रकला, संगीतकला इत्यादी.
शोभायात्रा काढून मानवधर्माचा प्रसार करून आपण मानवधर्माची शोभा वाढवितो. छान-छान विचार ऐकून ,आपण मानवधर्माची शोभा वाढवितो व मानवधर्माचा प्रसार करतो. अशा प्रकारे आपण मानवधर्म सेवक मेळावा साजरा करतो.
आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून हा मोलाचा मार्ग आपण सर्वाना मोफत मध्ये वाटून दिला. मार्गाचा प्रसार आणि प्रचार ध्यानात ठेवून प्रत्येक सेवक/सेविकेला स्वावलंबी बनवून प्रपंच साधून परमार्थ करण्यास सांगितले.
दरवर्षी आपल्या मौदा आश्रमात मानवधर्म सेवक मेळाव्याचे आयोजन केले जाते, हे आपण सर्व सेवक जाणतो. हा मेळाव्या मार्फ़त सेवकांची एकदुसऱ्यास भेट होत असून, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन या माध्यमातून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच कालावधी मध्ये हा एक शोभणीय मेळावा, सेवकांना आनंद देऊन जातो.
एक खूप छान म्हण आहे,
“यशस्वी म्हणून जगायला
अंगी मोठी चिकाटी हवी
जिथे उभे असू तिथून
आभाळ पाह्ण्याची दृष्टी हवी”
आपण सर्व सेवकांना बाबांनी आत्मविश्वासु बनविले आहे, आपल्या आत्म्यात जागृत दैवी शक्ती वास करते याचा अनुभव करून दिला आहे, यामुळे आपले ध्येय एका जागेवर राहून, आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यास बळ प्रदान करते.
या मेळाव्याच्या उद्देशाने लक्षात येते की, आपल्या मार्गाचा प्रचार खुप मोठया प्रमाणात होत आहे, यातून आपल्या मार्गाची पसंती व प्रसिद्धी आपल्याला जाणवते, आणि जेव्हा आपण सर्व एका मंडपात एकत्रित येतो तेव्हा मात्र आपली विशाल एकता पाहून समाजाला मानवधर्माची व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या त्यागाची निस्वार्थ प्रतिमा दिसून येते.
याप्रसंगी, अनेक स्पर्धा, कला कृती, अन्य सांस्कृतिक बाबी दर्शविल्या जातात. मार्गातील जेष्ठ सेवकांचे, मंडळातील अधिकारी गणांच्या सुंदर अश्या मार्गदर्शनाने, परिसर अत्यानंदीत होतो.
या माध्यमातून सेवक आपल्या सोबत छान असे अनुभव घेऊन जाऊन, पुढल्या वर्षीची तयारी मोठ्या आनंदाने आपल्या हृदयात समाविष्ट करतो, याप्रकारे
मानवधर्म सेवक मेळावा आपण साजरा करतो.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
No comments:
Post a Comment