Followers

Monday, 27 April 2020

प्रकरण क्रमांक (२) भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला



  "मानवधर्म परिचय अभ्यासक्रम मोहीम
    (वर्ष २०१७-१८)

         "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (२)

  "भगवत प्राप्ति चा मार्ग सापडला"

१९३३ साली जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्यांशी नेहमी भांडण होत होते. म्हणून तेथे ठुब्रीकर घराणे कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले. रंभाजी रोड, टिमकी येथील रामेश्वर तेलघाणीच्या मागे असलेले झुनके सावकार यांचे घर विकाऊ होते. ते घर ठुब्रीकर बंधूनी घेण्याचे ठरविले आणि घरमालकाशी सौदा केला. त्याअगोदर त्या घराबद्दल अशी हकीकत होती की, ते घर सैतानी आहे. त्या घरात भुताटकी आहे. एक मुसलमान त्या घरात पाय ठेवल्याबरोबर मरण पावला. म्हणून ते घर विकत घेऊ नये. असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबांचे घराणे हिंदु संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते. त्यांचे गुरू श्री. यादवराव महाराज. धापेवाडा हे होते. बाबांच्या वाडवडिलांनी असा विचार केला की, आपण होमहवन, पूजा, अर्चा केल्यावर ती भूताटकी नष्ट होईल आणि आपण सुखात राहु शकू असा विचार पक्का करुन त्यांनी घर विकत घेतले. यावेळेस बाबा बारा वर्षाचे होते. सध्या बाबा ज्या घरात राहतात तेच हे घर होय.

ठरल्याप्रमाणे त्या घरात राहावयास येण्यापूर्वी त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरुमंत्राने होम हवन, पूजा अर्चा केली आणि आनंदाने त्या घरात राहावयास आले. आगीतून निघून फुफाट्यात पडणे या म्हणीप्रमाणे या घरात राहावयास आल्यानंतर कोणालाही सुखशांती लाभत नव्हती. ते वर्षभर सुद्धा सुखी राहू शकले नाहीत. घरातील लोकांना सारखे स्वप्नविकार होत होते. जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता. पायरीवर कुणीतरी सारखा चालतो आहे असा त्यांना भास होत होता. घरासमोर रात्रभर कुत्री ओरडणे वैगरे भुताटकीचे प्रकार सुरू होते. त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यासारखी ओरडून मरत असत.

अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब दुःखी होते. बाबांचे वडिल श्री. विठोबा यांनी बरेच उपचार केलेत. औषधोपचार केला गुरुविद्देद्वारे होमहवन केले. मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केलेत. देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपाय केलेत. कित्येक नवस केले. नानाप्रकारे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती. हजारो रूपये खर्च झाले होते. भूताटकीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले. यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते. परिवारात शांतता नव्हती. बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पाठ होता. त्यात असा उल्लेख आहे की, जेथे हनुमान चालीसा वाचला जातो तेथे भुत राहु शकत नाही तेव्हा भुताटकीचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज दोन तिन वेळा हनुमान चालीसा वाचित होते परंतु घरात सुख समाधान नव्हते. लहान मुले सारखी आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते. या भूताटकिचा खेळ सारखा बारा वर्षे सुरु होता.

१९४५ सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट बाबांचे रोज दोन तीन वेळा हनुमान चालीसा वाचने सुरु होते. त्याच बरोबर हनुमानजीला ते विनंती करीत होते की, "बाबा हनुमानजी" तुम्ही काहितरी योग द्या आणि हे दुःख दूर करा.

एके दिवशी बाबांचे लहान बंधू मारोतराव हे घरी एकटेच झोपले होते माजघरात कोणीच नव्हते  आणि बाबा छपरीत बसले होते. बाबा छपरीतून माजघरात गेले तेव्हा मारोतराव उठून बसले होते. तेव्हा बाबांनी मारोतरावला विचारले की, तू का बसला आहेस, तेव्हा मारोतरावनी विचारले की, माझे पाय कोणी हालवले, आणि मला कोणी उठवले तेव्हा बाबा पुन्हा मारोतरावला म्हणाले की, मी आताच  घरात आलो आणि घरात तर कोणीही नाही मग तुझे पाय कोणी हालविले हे मला माहिती नाही. इतके बोलून बाबा आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी याचा छडा लावण्याकरिता मांत्रिकाकड़े जाण्याचा विचार केला.

बाबा मांत्रिकाकड़े जाण्याचा तयारीत असताना बाबा हनुमानजीला विनंती केल्या प्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांचाकड़े कधी न येणारी एक साधी व्यक्ति त्यांच्या घरी आली. त्याने बाबांना विचारले की, तू कुठे जात आहेस. तेव्हा बाबांनी वरील घडलेला प्रकार त्या व्यक्तिजवळ कथन केला. ते त्यांना म्हणाले, मी मांत्रिकाकड़े जात आहे. हे ऐकून त्या व्यक्तीला दया आली. ते बाबांना म्हणाले, तुम्ही कशाला जाता, माझ्याजवळ  'परमेश्वरी कृपा' संपादन करण्याचा एक मंत्र आहे. तो एका संन्याशाने दिलेला मंत्र आहे. त्याचा विधि केल्याने 'परमेश्वरी कृपा' संपादन करता येते आणि सर्व दुःखांचे निवारण होते. त्या मंत्राने जर मी कोणालाही तीर्थ करुन दिले तर त्याचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो. असे मला बरेच अनुभव आले आहेत.

तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला विचारले की हा संन्याशाचा मंत्र तुमच्याजवळ  कसा आला. कारण तुम्ही तर संन्यासी दिसत नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले की, माझे वडील हे एका संन्याशाबरोबर राहत होते. तो संन्याशी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच्याजवळ असलेले सर्व ग्रंथ घरी आणले. वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकांचे दुःख दूर केले. हे करीत असतांना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झालेत. मी स्वतः या मंत्राचा विधी कधी केला नाही. ज्यांनी ज्यांनी हा विधि केला व करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विधी करतांना मरण पावले तर काही पागल झाले. त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकड़े जाण्याचे रद्द केले. थोड़ा वेळ थांबुन तो मंत्र आणि त्याचा पत्ता बाबांनी त्या व्यक्तीकडून लिहून घेतला. ती व्यक्ती मौदा या गावात राहणारी होती. त्या मंत्राने तीर्थ तयार करुन ते मारोतराव यांना पिण्यास दिले. तीर्थ घेतल्यानंतर मारोतरावांना समाधान वाटले. त्यामुळे बाबांच्या मनात आले की, आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या मंत्राचा विधी पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे. अशाप्रकारे बाबांना भगवतप्राप्तीचा मार्ग सापडला. यावेळेस बाबा ऐन तारूण्यात म्हणजे अवघे चोवीस वर्षाचे होते.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन पाटील- 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

©परमात्मा एक मानवधर्म परिवार
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

🌏वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या प्रकारे FOLLOW' करा. अगोदर सर्वात शेवटी जा..
मग,
                   "Home" म्हणून दिसेल 
या खाली 'view web Version' वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये 'follow' बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा ''follow बटन लाल कलर मध्ये" येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे "लाल बटन असलेलं follow" वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला 'Unfollow' दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

◆टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

🙋🏻‍♂ FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

नमस्कार..!!😊

2 comments:

  1. खुप सुंदर माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
  2. नमस्कार जी....👍💐

    ReplyDelete