Followers

Friday, 1 May 2020

प्रकरण क्रमांक (६) "एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग" हे प्रकरण नक्की वाचन करा.

 
                 "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (६)
                
                     "एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग"

बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यावर सुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोक हिंदुधर्मातील सर्व देवांना उदाहरणार्थ राम, कृष्ण, शंकर, पार्वती, देवी इत्यादी, मानत असत. त्यांची पूजा अर्चा करीत असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख पूर्णपणे नाहीसे झालेले नव्हते. कुटुंबात दुःख आले तर बाबा मंत्रोच्चाराने फूक मारीत असत. मंत्रोच्चाराने तीर्थ करून देत आणि दुःख नष्ट करीत असत. परंतु ती तात्पुरतीच दूर होत असत.

इतर लोकांना हे माहीत झाल्यावर ते दुःखी कष्टी लोक बाबांकडे येऊ लागले. बाबा मंत्रोच्चाराने फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. बाबा हे विधी करणारे असले तरी त्यांना यातील काहीही समजत नव्हते. ते अज्ञातवासात होते. परंतु त्यांच्या मंत्राने लोकांना भगवंताचे गुण मिळत होते.

एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची एक बाई बाबांकडे आपले दुःख घेऊन आली. ती कैलास टॉकीजच्या मागे राहत होती. तिच्या अंगात खूप भूत येत होते. बाबा जुमदेवजी हे बाबा हनुमानजीचे नाव घेऊन, हातात झाडू घेऊन तो मंत्रोच्चाराने तिच्या डोक्यावर मारत होते. पण तो मार तिला लागत नव्हता. तिच्या अंगात येणारे भूत पलित निघत नव्हते. ही पलित काढण्याची क्रिया सतत अडीच वर्षे सुरू होती. इतरांना मात्र भगवंताचे गुण मिळत होते. परंतु तिला मात्र गुण मिळत नव्हते. तिच्या अंगात एवढे जोरदार पलित येत होते की, या काळात स्वतःच्याच गालाचे मांस स्वतःच्याच हाताच्या नखाने ती ओरखडून काढायची आणि खायची. इतकी बेशुद्धावस्थेत ती होती. तिच्या गालावर खूप मोठी जखम झाली होती. बाबांना विचार पडला की हनुमानजी या कल्पनारूपी शक्तीवर मात का करीत नाहीत! त्यांनी बेचाळीस दिवस हवन करायचे ठरविले, जेणेकरून तिला आराम मिळेल.

ठरल्याप्रमाने बाबांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरीच सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून बेचाळीस दिवसांचे हवन करण्यास सुरुवात केली. एकोणवीसशे अठ्ठेचाळीस सालचा जुलै महीना महीना होता, ती बाई रोज हवनात येऊन बसायची. तिला या बेचाळीस दिवसांच्या हवनात रोज काहीना काही दिसत असे. त्याप्रमाणे ती सारखी बडबड करायची.

हवन सुरू असताना ती असा उल्लेख करायची की हे हवन खोटे आहे. परंतु कृष्ण भगवान हवनात उभे आहेत. ते आकाशाला टेकले आहेत. बाबा हनुमानजी पाताळात फिरत आहेत आणि भूतांना शोधून आपल्या शेपटीत गुंडाळून दहा हजार, विस हजार, चाळीस हजार, सत्तर हजार, एक लाख, इतके भुत आणून ते हवनात टाकत आहेत. ते सर्व जळत आहेत. जसजसे हवनाचे बेचाळीस दिवस पूर्ण होत होते, तसतशी भूतांची संख्या वाढतच होती. बाबा हनुमानजी शेपटीत एक लाख, दोन लाख, पन्नास लाख भुत शेपटीत गुंडाळून आणून हवनात टाकत आहेत आणि ते हवनात जळत आहेत. शेवटी-शेवटी तर भूतांची कोटी अब्जात गणना करू लागली आणि हवनात टाकल्याचा उल्लेख केला. तेव्हा बाबांनी मनात विचारले,  इतने सैतान कहाँसे आये? बाबांना वाटले जेवढे लोक मरन पावतात ते सर्व भूत सैतान होतात. त्यांना मुक्ती मिळत नाही. म्हणून मुक्ती मिळण्याकरिता परमेश्वरी कार्य करणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे बाबांनी बेचाळीस दिवस हवनविधी करुण तिच्या अंगात येणार भुत पलित काढले. या काळात हवनाच्या अंगाऱ्याने तिच्या गालाची जखम पूर्ण भरली आणि मांस काढण्याची क्रिया बंद झाली.

"भगवंताची लीला न्यारी" या म्हणीप्रमाने त्या बाईच्या अंगातून भूत येणे पूर्णपणे बंद झाले नव्हते. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रेचाळीसाव्या दिवशी सकाळी सहा वाजता बाबांच्या घरी आली आणि आपले अंग फिरवू लागली. बाबा जेमतेम प्रातर्विधी आटोपुन बसले होते. त्यांनी हवनाचा अंगारा आणि मंत्रोच्चाराने त्यावर फुक मारून तो तिच्या अंगावर उडविला आणि तिच्या अंगात येणारे भुत बाहेर काढले. समाधान मिळाल्यावर ती घरी जावयास निघाली. परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर ती परत बाबांकडे आली. पुन्हा अंग फिरवू लागली. बाबांनी मंत्रोच्चाराने उपचार केले आणि अंग फिरणे बंद केले. शुद्धीवर येऊन घरी जावयास निघाली. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुन्हा बाबांकडे यायची आणि अंग फिरवायची. बाबा उपचार करून तिला शुद्धीवर आणायचे. असे दिवसभर सुरू होते. बाबांनी मंत्रोच्चाराने संपुर्ण दिवस तिच्या अंगातील भूत काढून तिला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते तिला पूर्णपणे समाधान देऊ शकले नाहीत.  

या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही. दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यातच पूर्ण वेळ घालविला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण भूत निघाले नाही. तिला समाधान मिळाले नव्हते. सायंकाळ पर्यंत प्रयत्न सुरू होते. दिवसभर बाबांनी संघर्ष केल्यावर ते त्रस्त झाले होते. सायंकाळी ती पुनः आल्यावर बाबा विचार करू लागले की, बाबा हनुमानजीच्या शक्तीपुढे ही कल्पनारुपी शक्ती टिकाव धरून आहे. याचाच अर्थ असा की हनुमानजी, राम, शंकर, देवी यांच्यात ह्या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही. तेव्हा बाबांनी हनुमानजीला विनंती केली की, "हे हनुमाजी आपने सारे दैवत की पहचान करायी और इस बाई का एक सैतान नही निकाल सकते। हे हनुमानजी, आप मुझे बताओ, ऐसी कौनसी शक्ती है जो एक पलमे इसे निकालेगा। मैं इसके बाद किसी भी देवताको नहीं मानूँगा।" अशी बाबांनी प्रतिज्ञा केली आणि ते त्या बाईला म्हणाले, 'यह आखरी फुक है बाई। इसके बाद नही आना।' इतके बोलून तिच्या अंगावर अंगारा घेऊन मंत्रोच्चाराने फुंक मारली. तेव्हा तिच्या अंगातील भूत निघाले व ती जी घरी गेली, ती पुन्हा परत आलीच नाही. अशाप्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान मिळाले. 

हे पाहून बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे लक्ष त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे गेले. त्यांना वाटले की, ही कोणती तरी शक्ती आहे. त्यामुळे त्या बाईच्या अंगातील भूत नष्ट केले. त्याप्रमाणे त्यांनी त्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले. अश्या प्रकारे बाबांना एक भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधून घेण्यात आलेली आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

No comments:

Post a Comment