Followers

Saturday, 2 May 2020

प्रकरण क्रमांक (७) "एका भगवंताची प्राप्ती" | हे प्रकरण नक्की वाचन करा.


               "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (७)
   
                       "एका भगवंताची प्राप्ति"

मागील प्रकरणात नमुद केल्याप्रमाने बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानजीला विनंती केल्यावर प्रतिज्ञा केली की, मी आजपासून कोणत्याही देवाला मानणार नाही. हे सांगीतल्यावर बाबांनी त्या शिंपी समाजाच्या बाईचे संपूर्ण दुःख दुर केले. त्यानंतर बाबांनी या शक्तिचा विचार केला की, ही कोणती शक्ती असावी की जिच्यामुळे बाबा हनुमानजीच्या मंत्रोच्चाराने त्या बाईचे दुःख दुर झाले परंतु जे त्याच मंत्राने प्रतिज्ञाच्या अगोदर झाले नाही.

बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी हनुमानजीसमोर प्रश्न ठेवला की, "हे हनुमानजी, संसार में ऐसी कोणसी शक्ती है, जो सैतानको एक पलमें निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमे समझा दो"। या वेळेस बाबा स्वतः निराकारमधे आले आणि शब्द परमेश्वररूपी (बाबा हनुमानजी) बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की, "यह एकही परमेश्वर है, जिसने इस सृष्टीका निर्माण किया है। वह एक जागृत शक्ती है जो निराकार है। यह चौवीस घंटे चैतन्य है उसे प्राप्त करने के लिये पाच दिन हवन करना पड़ेगा"। त्यानंतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की, "परिवारके लोग सुनो, हम कलसे पाच दिन हवन करेंगे"।

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी पाच हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वद्य प्रतिपदा होता व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख २० ऑगस्ट १९४८ होती. पाचव्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रम्हांड चढले ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खुप आकांत करून रडू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, में कहाँ आ गया हूँ। असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून रडू लागले. घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, "घरवाले सुनो, मैं कहाँ आ गया हूँ। सेवक भगवान बन गया"। हे ऐकून आणि बाबांना रडतांना बघून घरची मंडळी घाबरली व त्यांना 'बाबा चूप हो जाओ' असे विनवू लागली. परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते, मैं कहा आ गया हूँ। असे म्हणत बाबा सारखे एक ते दीड तासपर्यंत आकांत करून रडत होते. त्यानंतर ते शांत झाले. निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले आणि आराम केला. परंतु ते गुंगीतच होते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी श्रावण वद्य षष्टी होती. त्या दिवशी १९४८ सालच्या ऑगस्ट महिन्याची २५ तारीख असून बुधवार दिवस होता. या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवनाची समाप्ती म्हणून घरच्या लोकांनी हवन केले. हवन संपल्याबरोबर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले. ते देहभान विसरले. त्यांचे ब्रम्हांड चढले आणि ते निराकार स्थितीत आले. काही वेळाने त्यांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की, या देशात जितकी दैवते मानतात, उदा. हिंदुधर्मातील राम, कृष्ण, शंकरजी, सर्व देवी, देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त सर्व अवलिया, उदा. गजानन महाराज, साईबाबा, त्याचप्रमाणे इतर धर्मातील दैवते जसे अल्ला, येशू ख्रिस्त, महावीर जैन, बुद्ध इत्यादी हे सर्वजण त्यांना एकानंतर एक येऊन दर्शन देत आहेत आणि मी अमुक आहे असे म्हणून आपआपला परिचय देत आहेत असे ते सारखे बडबडत होते. त्यानंतर जगातील सर्व देव त्यांच्या अंगात एकानंतर एक येऊन त्यांना आपआपला परिचय करून देऊ लागले. यांत शेषनागाने पण आपला परिचय दिला. ही क्रिया खूप वेळपर्यंत सुरू होती.

ही संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आलेत. त्यांनी आपला परिचय दिला. या वेळेस बाबांच्या मुखकामलातून असे उदगार निघाले की, "मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहा ढूंढ रहा है। मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छूट जाऊँगा, तेरा शरीर मृत हो जायेगा"।  तेव्हा बाबांना वाटले की, "मैं कितना पागल हूँ। भगवान मेरे पास होकर मैं उसे कितना लम्बा ढूढ़ रहा हूँ"। हे सर्व शब्द बाबांच्या कानावर पडत होते. ते देहभान विसरले होते तरी त्यांना ते समजत होते .

काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असतांना एका क्षणी त्यांच्याच मुखकामलातून पुन्हा असे शब्द निघाले की , "सेवक मैं भगवान हूँ। तू मानव है । मैं जानता हूँ , मानव बेईमान है। उनमेसे तू एक मानव है। भलेही तूने मुझे प्राप्त किया , मैं भगवान हूँ। मैं मानवपर कदपि ही विश्वास नही करता'। हे शब्द बाबाच्या कानी पडले , तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले. भगवंताने मला बेईमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ते त्याचे उत्तर शोधू लागले . काही वेळाने त्यांना उत्तर सापडले की याचे उत्तर इमान हेच आहे आणि इमान हाच भगवान आहे असे समजून त्यांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की , "हे भगवान मैं जीवन में इमान रखूँगा और सत्य सेवा करूँगा ऐसा आपको सत्य वचन देता हूँ"। यानंतर परत विचार केला की, चोवीस तास मानवाजवळ असणारी अशी कोणती शक्ती आहे जी नाहीशी झाल्यावर शरीर मूत होते ? यावर विचार केला असता त्यांना आत्मा ही शक्ती आठवली . म्हणून पुन्हा असे शब्द निघाले की , "परमात्मा एक। मरे या जिये भगवंत नामपर"। हे बाबांचे वचन होते जे त्यांनी एका परमेश्वराला दिले . पुन्हा थोडा वेळाने बाबाचाच मुखकमलातून असे शब्द बाहेर निघाले की , "दु:खदारी  दूर करते हुये उद्धार। इच्छा अनुसार भोजन"। हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले असे त्यांना वाटले .

 थोडा वेळ शांत राहून निराकार अवस्थेतच त्यांनी घरच्या मंडळीना उद्देशुन म्हटले की , "परिवार के लोग सुनो , इस परिवारके लोग सारी पूजा बंद करके एकही भगवान को माने।" असा आदेश त्यांनी दिला . त्यानंतर घरच्या मंडळींनी बाबांना आश्वासन दिले की , बाबा , आजसे हम एकही भगवान को मानेंगे । त्यानंतर बाबांची निराकार अवस्था ( ब्रम्हाड अवस्था ) संपली. पण ते निराकार अवस्थेतच होते. तेव्हापासून घरचे लोक एकाच भगवंताला मानू लागले. सर्व देवांची पूजा करणे त्यांनी बंद  केले. त्यांनी देवळात जाणे बंद केले. अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली . तो दिवस श्रावण वद्य षष्ठीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताचा प्रगट दिन म्हणून आपआपल्या घरी हवनकार्य करुन तो दिवस साजरा करतात. याशिवाय मानव धर्माचा तो सर्वात मोठा सण आहे असे समजतात.

या दिवसापासून बाबा जुमदेवजी यांना बाबा हनुमानजी यांनी खऱ्या अर्थाने एका परमेश्वराची ओळख करुन दिली. तेव्हापासून बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजी यांना भगवंत न मानता आपले गुरु मानू लागले. सृष्टि निर्मात्या परमेश्वराचे प्रतिक म्हणून कसलीही खूण नाही. कोणत्याही धर्माप्रमाणे परमेश्वराचे काहीतरी प्रतिक असणे आवश्यक आहे. हिंदुधर्माप्रमाणे गुरुचीच पूजा करणे म्हणजे भगवंताची पुजा करणे होय असे समजतात. बाबा जुमदेवजी हे हिंदुधर्माचे असल्यामुळे त्यांनी आपले गुरु बाबा हनुमानजी यांचे प्रतिक एकच भगवान म्हणून लोकांपुढे ठेवले आहे. भगवंत व्यक्ति नसून ती चैतन्यशक्ति आहे. ती चोवीस तास जागृत असून निराकार आहे. बाबा हनुमानजी हे भगवंत नाही असे स्पष्ट केले. या मार्गात हवनाला महत्व आहे. परंतु मानवाचे लक्ष भगवंता कडे असावे म्हणून हवन करतांना किंवा दररोज पूजा करतांना बाबा हनुमानजींचे प्रतिक ठेवले आहे. जेणेकरून मानवाच्या मनात भगवंताविषयी जागृती निर्माण होईल आणि सदोदित मानव भगवंताचे मनन करील.

 बाबा हनुमानजींनी बाबा जुमदेवजींना अनेक देव देवतांची ओळख करुन दिली हे आपण वर पाहिले आहे. त्यांनी भगवंताला प्रिय असणारे कार्य केले आहे. म्हणून ते परमेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आणि या जगातील भाबड़ी जनता त्यांना परमेश्वर मानून पूजा करू लागली. परंतु ते परमेश्वर नव्हते तर मानवच होते. म्हणून जनतेने त्यांच्यासारखेच कार्य करावे. त्यांना परमेश्वर म्हणून पूजू नये. कारण परमेश्वर हा एकच आहे, जो सृष्टिचा निर्माता आणि जगाचा विधाता आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

9 comments:

  1. Replies
    1. आपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  2. खूपच सुंदर माहिती दिली दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  3. अति सुंदर माहिती ! सर्वाना माझा नमस्कार,,🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद गोपाल दादा मालधुरे.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  4. खूप छान माहिती

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  5. 🙏 नमस्कार जी 💐

    ReplyDelete