"मानवधर्म परिचय अभ्यासक्रम मोहीम" (वर्ष २०१७-१८)
मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी) 'सुधारित पाचवी आवृत्ती'
प्रकरण क्रमांक: (३) "परमेश्वरी कृपा प्राप्ती"
बाबांना हनुमानजीच्या मंत्राची प्राप्ती झाल्यावर त्यांना असे वाटले कि, पाच भावांपैकी कोणीतरी एकाने याचा विधी पूर्ण करावा आणि परमेश्वरी कृपा प्राप्त करावी. जर कोणी तयार झाला नाही तर आपण स्वतः हा विधी करावा. या उद्देशाने दोन-तीन दिवसानंतर पाचही भावांची बैठक त्यांनी बोलावली. सर्वजण एकत्रित बसल्यावर बाबांनी तो मंत्र सर्वांसमोर ठेवला आणि चारही भावांना उद्देशून ते म्हणाले कि, या मंत्राने आपणास परमेश्वराला जागवायचे आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करावयाची आहे. त्याकरिता विधी करने आवश्यक आहे. म्हणून हा मंत्र मी आपल्या सर्वांसमक्ष ठेवीत आहे. हा मंत्र ज्यांनी मला दिला, त्यांनी हा विधी केलेला नाही. याशिवाय त्यांनी असेही सांगितले कि, हा विधी करीत असतांना तो नीट न साधल्यामुळे काहीजण मरण पावले तर काही पागल झाले. परंतु या मंत्राचा विधी नीट साध्य झाला तर मात्र घरातील सर्व दुःख नाहीशी होऊन संपुर्ण कुटुंबाला नेहमी सुख व समाधान मिळेल. इतकेच नव्हे तर या मंत्राने दुसऱ्यांची दुःखे सुद्धा दूर करता येतील. आपण पाच भाऊ आहोत. उद्या माझ्यावर कोणीही आरोप लावू नये कि आपण स्वतः मंत्र मिळाल्यावर तो गुप्त ठेवला आणि स्वतः त्याचा उपयोग केला. ज्याची इच्छा असेल त्याने हा विधी करावा. माझी पुर्ण संमती आहे.
त्यानंतर तो मंत्र एकानंतर एक याप्रमाणे सर्व भावांनी वाचला आणि सर्वांच्याच तोंडून एकच विचार निघाला कि, हा विधी एकेचाळीस दिवस करावा लागेल, तो हनुमानजीचा असल्यामुळे फार कठीण आहे आणि विधी पूर्ण करावाच लागतो, तो मधेच सोडून देता येत नाही. जर विधी पूर्ण झाला नाही तर आपण एकतर मरू अन्यथा पागल होऊ अशी आम्हला भीती वाटते. म्हणून आम्ही हा विधी करीत नाही. हे ऐकून बाबा थोडे स्तब्ध झाले. थोड्या वेळाने ते चारही भावांना उद्देशुन म्हणाले की, आपण पाच भाऊ आहोत. तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही करू नका, परंतु एक भाऊ मरण पावला आणि आपण चारच भाऊ आहोत असे समजा आणि तुम्ही माझ्या कुटूंबाचा प्रतिपाळ करण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळेस बाबांच्या कुटूंबात फक्त आई (बाबांची पत्नी) आणि मुलगा मनो हे दोघेच होते. त्यावेळी बाबांनी असा संकल्प सोडला की, मी हा विधी करून भगवंताची प्राप्ती करिन किंवा मरीन परंतु मागे फिरणार नाही. यावरून बाबांच्या स्वभावातील "दृढनिश्चयीपणा" हा गुण दिसून येतो .
याप्रमाणे निर्णय घेऊन बाबांनी घरातील मंडळीला घर चुन्याने स्वच्छ करण्यास सांगितले आणि विधी सुरु करण्याचा दिवस व तारीख निश्चित केली. तो दिवस सोमवार होता व २६ नोव्हेंबर १९४५ ही तारीख होती.
ठरल्याप्रमाणे बाबांनी त्या दिवशी पहाटेसच आंघोळ केली. त्यांच्या घराजवळ हनुमानजीचे मंदिर होते. त्या देवळात ते पाणी, अगरबत्ती व कपूर घेऊन गेले. तेथे हनुमानजीची पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती व कापुर लावला आणि एकदाच मंत्र म्हटले. त्यानंतर हनुमानजीला एकवीस प्रदक्षिणा घातल्या. हा कार्यक्रम सुर्यदयपूर्वीच पूर्ण केला. अशाप्रकारे एकेचाळीस दिवसांच्या विधीला (साधनेला) प्रारंभ केला.
• "पहिली परीक्षा आणि प्रतिसाद"
विधीच्या एकविसाव्या दिवशी बाबा दुपारी घरी बसले असता बाबांचे दुसरे थोरले बंधू श्री. नारायणराव त्यांचाकडे आले आणि ते त्यांना सांगू लागले की, "माझ्या मुलीची प्रकुती खूप खराब आहे. काही कळत नाही. तरी तू माझ्याबरोबर चल, तिला बघ व तिला होणाऱ्या त्रासातून कसेही करून मुक्त कर." तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले, "भाऊ, मला यातले काहीच कळत नाही. मी फक्त पहाटेस बाबा हनुमानजीला कापूर लावून मंत्र म्हणतो आणि प्रदक्षिणा घालतो. याशिवाय मला तिळमात्रही कळत नाही." तेव्हा भावाने बाबांना म्हटले, तू काहीच करू नकोस, पण एक वेळ स्वतःच्या डोळ्यांनी तिला पाहून घे. त्यांच्या बंधूनी त्यांना अशी गळ घातली. बाबांना भावाची विनवणी ऐकून राहवले नाही. ते गहिवरले आणि मनाशी थोडा विचार करून म्हणाले, चल, तुझी इच्छाच आहे तर तिला पाहण्यास येतो. असे म्हणून बाबा उठले व बंधुबरोबर त्यांच्या घरी गेले. ते बाबांच्या घरासमोरच राहत होत.
बाबांनी त्या मुलीला पाहिले तेव्हा त्यांना तिला पाहून खूप दुःख झाले. त्या मुलीच्या संपूर्ण अंगभर मोठे मोठे खुप फोड झाले होते आणि ते फुटून त्यातून संपूर्ण शरीरभर रक्त वाहत होते. संपूर्ण शरीराला लाल मुंग्या लागल्या होत्या. त्या मुलीच्या शरीराचा किंचितसा भाग सुद्धा रिकामा दिसत नव्हता, तर तो मुंग्यांनी व्यापला होता. हे पाहून बाबा खूप घाबरले आणि विचारमग्न झाले. त्यांच्या मनात विचार आले की, बाबा हनुमानजीला प्रसन्न करण्याकरिता विधी खूप कठीण आहे अशी जी समजूत आहे ती खरी असावी. आता मात्र परमेश्वर आपल्याला हा विधी पूर्ण करू देणार नाही. विधी तर पूर्ण करायचाच आहे. नाहीतर काय दुःख येतील हे सांगता येत नाही. "एकीकडे खाई आणि दुसरीकडे विहीर" या म्हणीप्रमाणे बाबांची अवस्था निर्माण झाली होती. पण बाबांचा निर्धार पक्का होता, ते डगमगले नाहीत. तेथे बाबा काहीही न बोलता आणि कोणतेही उपचार न करता घरी परत आले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे विधीच्या बाविसाव्या दिवशी बाबा ठरलेल्या वेळेनुसार विधी करायला देवळात गेले. तेथे त्यांनी बाबा हनुमानजीच्या मूर्तीला नेहमीप्रमाणे आंघोळ घालून कापूर व अगरबत्ती लावली आणि विनंती केली की, "हे बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर फार मोठी आपत्ती आणून ठेवली आहे. मी आपणांस विनंती करतो की, मला प्रथम आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा." त्यांनतर एकवीस प्रदक्षिणा घालून घरी आले. बाबांच्या मनात मात्र या दिवशी कोणताच विचार आला नव्हता. तो त्यांचा दिवस असाच गेला.
तेविसाव्या दिवशी बाबा पहाटेस विधी आटोपून घरी येऊन सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळच बसले होते. ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घरातील अंगणात खेळत होती. बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले. तिला पाहून बाबांना आश्चर्य वाटले. त्या मुलीचे सर्व फोड बसले होते. हे पाहून बाबांना समाधान वाटले. याप्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वराविषयी असलेले अतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहून त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद देताच बाबांना पहिली सफलता मिळाली. परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार होण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे बाबांनी एकेचाळीस दिवसांचा विधी पूर्ण केला आणि बेचाळीसाव्या दिवशी बाबांनी साखरेचा नैवैद्य परमेश्वराला दाखवून त्याची समाप्ती केली. प्रसाद सर्वांना वाटला. तो दिवस ६ जानेवारी १९४६ रोज रविवार असून बाजाराचा दिवस होता. या वेळेस बाबा जेमतेम २५ वर्षांचे होते. यावरून बाबांचा आणखी एक गुण लक्षात येतो की, परमेश्वराच्या बाबतीत त्यांच्या मनात खूप आत्मीयता आणि जिद्द होती.
बाबांनी विधी समाप्त केल्यानंतर त्याच दिवशी ते मौदा येथे ज्या व्यक्तीने त्यांना मंत्र दिला होता, त्या व्यक्तीकडे गेले. त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले. थोडावेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की, एकेचाळीस दिवसांचा विधी काल पुर्ण झाला आणि आज बेचाळीसाव्या दिवशी त्या विधीची समाप्ती केली. विधी सुरळीत पार पडली असे सांगून बाबांनी पुढील कार्य सांगण्याची विनंती त्यांनी केली.
पुढच्या कार्यबद्दल सांगताना ती व्यक्ति बाबांनी म्हणाली की, रोज एक वेळा याप्रमाणे ७, ११, २१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१, आणि १०१ दिवस त्याच मंत्राने १०८ वेळा मंत्र म्हणून तितक्याच वेळा हवनात तुप आणि हवनपुडा यांची आहुती टाकावी लागते, परंतु तो संन्याशी त्रिताल (एका रात्रीतुन तीनवेळा) हवन करीत होता. त्याची विधी अशी की, हवन संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू करून रात्रभरातच तिन्ही हवन सूर्यादयपूर्वी संपले पाहिजे. जागा साफ करणे, अंघोळ करणे, हवनाची रचना करून एकशेआठ वेळा मंत्रोच्चाराने आहुती सोडणे. पहिले संपले की दुसरे सुरू करण्यापूर्वी तिच जागा स्वच्छ करून व अंघोळ करून त्याच जागेवर परत हवनाची रचना करावी. पुन्हा प्रसाद करावा व हवन पुर्ण करावे. तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर, ती जागा स्वच्छ करुन व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे. अशा प्रकारे तीन हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे. हे त्रिताल हवन ७, ११, २१ ते १०१ दिवस करावे लागते.
हवनाकरीता लागणारे साहित्य म्हणजे रानगोवऱ्या, पिंपळ, वड, संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी पाच झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफुल, आहुतीत सोडायला तूप, दही, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेली फोटो, गोमूत्र, चंदनचुरा, हवनपुडा, अबीर सेंदुर, गुलाल, पान सुपारी इत्यादी सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई (हलवा) करावी लागते.
हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपुरला परत आले. तेव्हा घरातील सर्वजण त्यांची वाट पाहतच होते. घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व महिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले, ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थिती खुप खराब आहे. म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रिताल हवन करू. याशिवाय त्रिताल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल. म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण सर्वांचे जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही. त्यामुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवन कार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस त्रिताल हवन करायचे ठरविले.
ठल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवा जुळव मोठ्या मुश्किलीने केली आणि संध्याकाळी सात वाजता पहिल्या हवनाला सुरवात केली. या मार्गातील सेवक ज्या प्रमाणे हवनाची मांडणी करतात, त्याचप्रमाणे त्याची मांडणी केली आणि सांगितल्याप्रमाणे हवन कार्याला सुरवात केली. पहिले हवन संपले की दुसरे, तिसरे हवन करीत पूर्ण सात दिवस त्रिताल हवन केले. पहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत, नंतर दुसरे हवन रात्री अकरा वाजता सुरू करीत. तिसरे हवन रात्री तीन वाजता सुरू करून पहाटे पाच वाजता संपत असे. परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत. यावेळेस खुप त्रास होत होता. बाबा स्वतः हवन करीत होते. त्याशिवाय स्वतःच हवनात आहुती सोडायचे. दुसऱ्या कुणालाही हवनात आहुती टाकायची परवानगी नव्हती. हवन करताना बाबा कोणाशीही बोलत नसत. एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे. जर काही विचारायचे असेल तर पाटीवर पेन्सिलीने लिहून किंवा कागदावर पेनने लिहून विचारत असत. याप्रमाणे बाबांनी सतत सात दिवस त्रिताल हवन केले.
• "साक्षात्कार व प्रचीती"
त्रिताल हवणाच्या पहिल्याच दिवशी दुसरे हवन चालू असताना ठरल्याप्रमाणे बाबांचे कनिष्ठ बंधू मारोतराव झोपले होते. ते गाढ झोपेत असताना जोरजोरात ओरडत होते की, 'लंगोटीवाले बाबा की जय।' हे शब्द जेव्हा बाबांच्या कानावर पडले, तेव्हा बाबांनी ते एका कागदावर लिहून घरच्या लोकांना त्यांना विचरावयास सांगितले की, तू असे का ओरडलास? तेव्हा बाबांचे वडील बंधू श्री. जागोबाजी यांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि ते उठून बसल्यावर त्यांना विचारले की तू 'लंगोटीवाले बाबा की जय' असे का म्हणालास? तेव्हा त्यांनी सर्वाना सांगितले की, बाबा हनुमानजी डोक्यावर चांदीचा मुकुट घालून, उजव्या हातात चांदीचा गदा घेऊन घराभोवती फिरत आहेत असे दृश्य स्वप्नात दिसले. नंतर त्यांनी बाबांना ही हकीकत सांगितली. दुसरे हवन संपल्यावर बाबांनी विचार केला की, परमेश्वर आता आमचे संरक्षण करण्याकरिता उभा आहे.
या त्रिताल हवणात श्री. जागोबाजी हे जागेची साफसफाई करणे, रांगोळी घालणे इत्यादी कामे करीत होते, तर आपल्या सर्वांच्या आई सौ. वाराणसीबाई ह्या प्रसाद तयार करायच्या. याप्रकारे सात दिवस त्रिताल हवन करून सातव्या दिवशी सर्वांनी भोजन करून सोहळा पार पाडला आणि बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली.
या परमेश्वरी कृपेचा फायदा ते इतरांना करून देत होते. त्यांच्याकडे जे कोणी दुःखी, कष्टी लोक येत होते, त्यांचे दुःख मंत्राने तीर्थ करून व मंत्रोच्चाराने फूंक मारून दुर करू लागले.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधून घेण्यात आलेली आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन पाटील- 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर
🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या प्रकारे FOLLOW' करा. अगोदर सर्वात शेवटी जा..
मग,
"Home" म्हणून दिसेल
या खाली 'view web Version' वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये 'follow' बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा ''follow बटन लाल कलर मध्ये" येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे "लाल बटन असलेलं follow" वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला 'Unfollow' दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
◆टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
🙋🏻♂ FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
Namskar ji
ReplyDeleteबाबानी किती कठिन परिश्रम करून ही दैवी शक्ति प्राप्त केली । आपल्या सेवकाना किती साध्या आणि सोप्या पद्धतीने दैवी शक्ति प्राप्त प्राप्त करण्याचा मार्ग दिला । अकल्पनीय आहे । नमस्कार जी
ReplyDelete