【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: १७ जून २०१६
【"लई केले डॉक्टरी व वैदवान्यांचे उपचार पण कुठेच थारा नाही लागला, परमात्मा एक मार्गात प्रवेश केला आणि त्यागाच्या हवणाच्या दिवशी आमच्यावर करणी करणारा जाणता मरण पावला"】
माझे नाव चंद्रशेखर गुणवंतरावजी बारई आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
माझ्या परिवारात सर्व सुखी समाधानी होते, साधारणतः कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. माझे वडील मांढळ बाजार समिती मध्ये कमिशन एजन्ट (दलाल) होते. त्यामुळे पैशाची कमी नव्हती. आम्ही तिन भाऊ व दोन बहिणी आहोत. एका बहिणीचे लग्न ठरलेले होते.
एकदा अचानक माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली. ही गोष्ट १९९४ ची आहे. त्यांना पोटाचा त्रास होता. त्यांचे पोट खुप दुखायचे आणि त्यामुळे त्यांना ते सहन होत नव्हते. तेव्हा त्यांना नागपुरला दवाखान्यात भर्ती केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी, एक्सरे काढले, पण त्यामध्ये सर्व काही नॉर्मल निघाले.
नंतर ऑपरेशन सुद्धा केले, पण त्यामध्ये सुद्धा काहीही निघाले नाही. डॉक्टरांना आम्ही विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, ऑपरेशन केले पण त्यातही काही समजले नाही की, पोट कशाने दुखतोय. नंतर औषधी वगैरे दिली, तर थोडं बरं वाटायला लागलं. मग सुटी घेऊन त्यांना घरी आणले. थोडे दिवस बरे गेले व काही दिवसाने पुन्हा तोच त्रास सुरू झाला. पुन्हा आम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो.
असे करता-करता वर्ष लोटले, पण काहीही आराम मिळालेला नव्हता. काय करावे कळत नव्हते. दोन ऑपरेशन केले, एका दवाखान्यातुन दुसऱ्या दवाखान्यात आम्ही फिरत होतो, परंतु माझ्या वडिलांना एकही फायदा होत नव्हता. कुणी सांगायचे की, बाहेरचे काही लागलेले असेल तर वैदाकडे जावुन बघा, पण आमचा त्यावर विश्वास नव्हता. तरीही ज्या लोकांनी आम्हाला जे उपाय सांगितले, आम्ही तसेच करत होतो.
वैद्यवानीकडे गेल्यावर त्यांना पैसे द्यायचे. दवाखान्यात पैसा लागायचा, वैदयाला पैसा लागायचा, असे करता करता आमच्याकडील पैसा संपला. शेती होती पण, करणारा कुणी नव्हता, कारण मी कामठीला शिक्षण घेत होतो. भाऊ लहान होते आणि आई वडीलांच्या सेवेत असायचे. घरची आर्थिक परिस्थिती पुर्ण बिघडली होती. वेळेवर दहा रूपयाला सुद्धा आम्ही अडत होतो. खर्च करायला पैसे नव्हते. अशावेळी कोणी मदत पण करत नव्हते.
पण म्हणतात ना की, "वेळ खराब असली की, स्वतःची सावली पण साथ देत नाही" असेच काही अनुभव आम्हाला त्यावेळी आले. म्हणुन मग आम्ही शिक्षण कसे घेणार असा विचार म्हणात यायचा, म्हणुन शिक्षण सोडुन शेती केली. कारण खर्च झेपत नव्हता, तरी पण हिंमत सोडली नव्हती. इच्छा नसतांना सुद्धा वैद्यवानी केले, भाग पाहीले, कुणी म्हणत होते की, "परमात्मा एक" मार्गात जा, पण माझे वडील म्हणायचे की, मरून जाईन पण मार्ग घेणार नाही, ते मला आवडत नाही. कारण, ते नास्तीक स्वभावाचे होते. कधी देवाची पुजा वगैरे करत नव्हते.
माझ्या वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस खुप जास्त खालावत चालली होती. कुणी म्हणायचे की, घालक घातली आहे. लोक ज्याप्रकारे आम्हाला सांगायचे, त्या पद्धतीने आम्ही उपचार करतच होतो. एके ठिकाणी भाग पाहीला तर त्यांनी सांगितले की, तुमच्या व्यवसायात तुमचा झगडा ज्यांच्या सोबत झाला, त्यांनी जाणत्याच्या हातुन बंगाली विद्येतुन करणी केली, त्यामुळे कितीही औषधोपचार केला, तरी काही उपयोग होणार नाही आणि हा पोळा शेवटचा आहे, असा बंध आहे. यामुळे आम्ही घरचे सगळे लोक घाबरून गेलो, काय करावे समजत नव्हते. काहीही सुचत नव्हते. शेवटी वडीलांनीच म्हटले की, आपण "परमात्मा एक" मार्गात प्रवेश करू आणि हाच शेवटचा पर्याय आमच्याकडे उरला होता.
आमच्या गावी सेवक होते, पण मार्गदर्शक नव्हते. म्हणून आम्ही मांढळला मार्गदर्शकांकडे जावुन मार्गाची रूपरेषा समजुन कार्य सुरु केले आणि सात दिवसांच्या कार्यामध्येच माझ्या वडिलांचे दुःख व घरातील दुःखी वातावरण बरे झाले. पोळाही गेला, पण माझ्या वडीलांच्या केसालाही धक्का लागला नाही. नंतर माझे वडील शेतावर पण जाऊ लागले व त्यांची प्रकृती पुर्ण सुधारली होती. ते पण कोणतीही औषध न घेता व कोणतेही ऑपरेशन न करता. बाबांच्या तत्व, शब्द, नियमांचे पालन करून माझे वडील आणि माझा परिवार सुखी समाधानी झाला.
त्यानंतर आम्ही एका वर्षातच त्यागाचे कार्य घेतले. पण भगवंताची कृपा बघा, मार्गात आल्यानंतर ज्या जाणत्याने माझ्या वडिलांवर करणी करण्याचे खुप प्रयत्न केले, पण त्याचे वार त्याच्यावरच उलटले व तो आमच्या घरच्या त्यागाच्या हवनाच्या दिवशी मरण पावला. ही एवढी मोठी भगवंताची लीला आम्हाला अनुभवायला मिळाली. आम्ही स्वतःला खुप भाग्यवान समजतो की, आम्हाला वेळेवर हा मार्ग मिळाला, नाहीतर आज आम्ही कोणत्या परिस्थितीत असतो याचा विचार पण करू शकत नाही. म्हणुन आपले जीवन सुखी करायचे असेल तर बाबांचे तत्व, शब्द, नियम आपल्या आचरणात व विचारांत उतरवावे आणि बाबांच्या विचारांनी चालुन जीवन सुखी करावे.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- चंद्रशेखर गुणवंतरावजी बारई
पत्ता :- मु./पो. वेलतुर, ता. कुही, जि. नागपुर.
सेवक नंबर :- ९८२४
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
फार छान अनुभव दादा
ReplyDeleteआपले धन्यवाद निखिल दादा! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!
Delete