Followers

Thursday, 30 April 2020

प्रकरण क्रमांक (५) "वेळेचं महत्व"


               "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
             'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (५)

                                 "वेळेचे महत्व"

बाबांनी परमेश्वरी कृपा संपादन केल्यावर सुद्धा त्यांचा घरची मंडळी हिंदूधर्मात असलेल्या सर्व देवांना मानत होती. त्यांची पूजा करीत होती. सर्व सण साजरे करीत होती. एकादशा, चतुर्थी या दिवशी उपवास करीत होती.

श्री बाळकृष्ण आणि नारायणराव यांच्या घरी अकरा दिवसांचे हवनकार्य सुरू असताना भारतीय संवत पौष महिना सुरू होता. या हवनाच्या काळातच पौष वद्य चतुर्थी आली होती. तो रविवार असून १९४६ च्या जानेवारीची वीस तारीख होती. ही चतुर्थी हिंदूंमध्ये मोठ्या चतुर्थ्यांमधील एक चतुर्थी मानली जाते. या दिवसाला वैदिकदृष्ट्या फार महत्व आहे असे समजतात. या दिवशी बाबांच्या घरातील बाया मंडळींना उपवास होता. हवन संपायला रात्री बराच उशीर होत होता. साधारणतः अकरा वाजत असत. त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी बाबांना विनंती केली की, आज बायांना निर्जला उपवास आहे आणि रात्री अकरा वाजता हवन संपते. त्यामुळे त्यांना जेवायला खूप उशीर होईल. त्यामुळे त्यांना रात्री खूप उशिरा पर्यंत उपाशी राहावे लागेल. म्हणून आमची अशी विनंती आहे की, अगोदर जेवण करून नंतर हवन करावयास जावे. त्यामुळे स्त्रियांना त्रास होणार नाही.

बाबांनी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि स्वतःच असा विचार केला की, देवाची पुजा नंतरही केली तरी काय फरक पडणार आहे! परमेश्वराला आवडणारे कार्य करणे हीच खरी परमेश्वराची आराधना, असे मनाशी ठरवून त्यांच्या विनंतीला मान दिला. संध्याकाळी जेवण आटोपल्यावर हवनकार्य करायला ते आपल्या जेष्ठ बंधूंकडे गेले. त्या वेळेस हवनकार्य करायला अर्थातच बराच उशीर झाला होता.

हवन आटोपून बाबा घरी आले. बाबांची झोपण्याची एक वेगळीच १६×३० ची खोली होती. त्या खोलीत बाबा एकटेच झोपत असत आणि घरची इतर मंडळी दुसऱ्या खोलीत झोपत असत. नेहमीप्रमाणे बाबा मनात काहीही विचार न आणता खोलीचे दार बंद करून झोपले. साधारणतः मध्यरात्रीनंतर एक दोनच्या सुमारास बाबा चोर चोर म्हणून जोरजोरात ओरडू लागले. हे ओरडणे ऐकून बाजूच्या खोलीत झोपणाऱ्या मंडळींची झोप उडाली. सर्व पुरुष मंडळी जागी झाली. ती बाबांच्या खोलीकडे धावत आली आणि पाहतात तर खोलीचे दार बंद आहे आणि बाबा झोपेत जोरजोराने ओरडत होते. त्यांनी बाबांना जागे केले आणि विचारले की कुठे चोर आहे? खोलीला दुसरे दार होते. त्या दाराकडे जाऊन पाहिले तर तेही दार बंद होते. त्यांनी बाबांना विचारले, "तुम्ही चोर चोर का ओरडत आहेत?" हे ऐकून बाबांच्या लक्षात आले की, आपण स्वप्नात होतो. आपल्याकडे कोणीही चोर आले नाहीत. त्या अगोदर ते स्वप्नातच बडबडले की, मी माझ्या उजव्या हाताच्या मुठीत चोराला धरून ठेवले आहे. ती मूठ घट्ट धरली असून पोटावर आहे. तो पळण्याची धडपड करतो आहे. हे पाहत असतांनाच त्यांना घरच्या मंडळींचा आवाज आला आणि ते जागे होऊन उठून बसले. त्यांनी संपूर्ण खोलीच्या चोहीकडे पाहिले. त्यांना त्यांच्या घरची मंडळी उभी असलेली दिसली. याशिवाय त्यांना काहीही दिसले नाही. ते त्यांना सांगू लागले की, माझ्या अंगाशी खूप वानर भिडले होते. मी जिकडे करवट बदलत होतो, तिकडे ते माझ्या शरीराने दाबल्या जात होते. त्यांच्यातील एक वानर जो मुख्य वाटत होता, तो माझ्या पोटावर बसला होता. ते सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याच्या तयारीत होते. म्हणून मी त्या मुख्य वानराचा एक पाय उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडला. तो पळण्याची खूप धडपड करीत होता. मला असे वाटले की, हाच बाबा हनुमानजी आहे आणि तो मला सोडून जात आहे. याशिवाय काहीही सांगितले नाही आणि त्यांना आपल्या खोलीत परत जाण्यास सांगितले. सर्वजण आपआपल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणे झोपले.

दुसऱ्या दिवशी बाबांनी घरच्या सर्व मंडळींना एकत्र जमविले आणि नंतर त्यांना रात्री घडलेल्या घडामोडीबद्दल सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.

काल जेवण झाल्यावर हवनकार्य उशिरा सुरू केले. नेहमीची ठरलेली वेळ टळून गेली होती. त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाले होते. त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले. ते आपल्या दारात येऊन तसेच उभे राहिले. तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो. ते म्हणाले, "मैं तेरे बाप का नौकर नहीं हूँ। मैं समयपर तेरे यहाँ आया हुँ। मैं भूखा प्यासा तेरे द्वार पर खडा हुँ। और तू खा रहा हैं।" इतके बोलून ते वानरसेना घेऊन माझ्या अंगाशी आले आणि त्या वानरसेनेसह माझ्या शरीराशी खेळून ते चालते झाले. तेव्हा मी बाबा हनुमानजींचे पाय धरले व क्षमा मागितली. ते जाण्याची तयारी करत होते, पण मी त्यांना सोडले नाही. याचा मी संपूर्ण विचार केला असता मला असे वाटते कि, परमेश्वर योग्य वेळेस धावून येतो. आपण ठरविलेली वेळ ही त्याचीच वेळ असते. म्हणून संपूर्ण काम वेळेवर करावे. आज जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे परमेश्वरी कृपेपासून बरेच दूर जावे लागले असते. मी त्यांना क्षमा मागितली व परमेश्वराला जवळ ठेवले आहे. तरी आपण यापुढे याची जाण ठेवावी असा घरातील मंडळींना त्यांनी उपदेश केला.

यावरून हे सिद्ध होते कि, वेळेचे महत्व किती असते. आपण नेहमी पाहतो कि, बाबा सर्व कामे वेळेवर करतात आणि वेळेचे पूर्णपणे बंधन पाळतात. आपणही यापासून वेळेचे बंधन पाळण्याचे व्रत घेऊ या.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधून घेण्यात आलेली आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw


वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

6 comments:

  1. खूप छान माहिती...नमस्कार जी

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद पप्पू दादा मते.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  2. खूप छान माहिती दादा नमस्करजी दादा व ताई

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete
  3. आपल्या मार्गात वेळेचे फार महत्व आहे परमात्मा आपल्या बोलावन्यची वाट बघत असतो आपणच चुकतो परमात्मा नाही। सर्वाना माझा नमस्कार ,🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपले धन्यवाद गोपाल दादा मालधुरे.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!

      Delete