Followers

Tuesday, 28 April 2020

[माझा अनुभव] श्री. सुधीरजी भोयर


【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: ०३ जून २०१६

【"केला दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास, झाला भूतबाधा व अंधश्रद्धेचा नाश"】

माझे नाव सुधीर केशवरावजी भोयर आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

माझे लग्न झाल्यानंतर सतत दोन वर्ष माझ्या पत्नीचे अबोरशन व्हायचे. एका अती मागासलेल्या गावात माझी नोकरी असल्याने आम्हाला किरायाच्या घरात रहावे लागत होते. त्या घरात भूतबाधा आहे असे लोक सांगायचे. पण आमचा त्यावर कधी विश्वास नव्हता. त्या दोन वर्षात मला दारूचे व अनेक वाईट व्यसन सुद्धा लागले होते. मी खुप वैदवाणी सुद्धा केली.

नंतर काही दिवसांनी म्हणजेच, नऊ महिन्यानंतर माझ्या घरी बाळ जन्माला आले त्यामुळे आम्हाला खुपच आनंद झाला. परंतु, त्या दिवशी पासुन सतत दवाखाना व बुवाबाजी सुरू झाली. ती सतत ४ ते ५ महीने चालली.

एके दिवशी मी खुप दारू पिऊन घरी झोपलो होतो. तेव्हा माझ्या चुलत भावाने "परमात्मा एक" मार्गाची माहिती सांगितली (प्रकाशजी भोयर), तसेच माझ्या घरातील सर्व व्यक्ती गुरुमार्गी होते आणि गुरुमार्गी असलेल्या घरामध्ये खुप अंधश्रद्धा असते, ते मला आवडत नव्हते.

मी खुप मोठा शिवभक्त होतो. मुलगा रामजन्माच्या दिवशी जन्मला व मी शिवभक्त होतो. मला दुःखाच्या प्रसंगी कोणत्याच देवांनी साथ दिली नाही. बरेचदा माझ्या बाळावर व माझ्यावर संकटे सुद्धा आली. नंतर आम्ही दोघेही (पती,पत्नी) मनाचा पुर्णपणे निश्चय करून घरातील सर्व देवी-देवतांच्या फोटोंचे विसर्जन केले. 

आमच्या शाळेतील देशमुख सर "परमात्मा एक" मार्गात होते. त्यांच्यासोबत डॉ. श्री. गोविंदराव डोनाडकर (रा. किन्हाळा, ता. देसाईगंज) यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यांनी दिलेल्या ७,११ दिवसांच्या कार्यात आम्हाला लाभ व सुख समाधान मिळाले आणि आजपर्यंत माझ्या कुटुंबात अंधश्रद्धा व वाईट व्यसन काधिही आले नाही.

तात्पर्य :- ह्या मार्गात प्रवेश केल्यानंतर अनेक वाईट व्यसनांच्या मार्गाने जाणारा पैसा वाचतो, भुतबाधा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, अनेक विधी, नवस यावरील पैसा वाचून घरगृहस्थी उंचावते. समाजात मान-मर्यादा मिळतो. धन्य ते 'महानत्यागी बाबा जुमदेवजी' ज्यांनी या मानव धर्माची स्थापना करून आम्हा दुःखी कष्टी लोकांना एक भगवान प्राप्त करून दिला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार.....!

सेवक:- श्री. सुधीर केशवरावजी भोयर (मार्गदर्शक)
पत्ता :- मु./पो./ता. आरमोरी, जि. गडचिरोली
सेवक क्रमांक :-२०५५५
मार्गदर्शक :- श्री. गोविंदरावजी दोनाडकर, किन्हाळा
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw


वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

4 comments:

  1. 🙏जी काकाजी छान अनुभव

    ReplyDelete
  2. खुओ छान परमेशवरी कृपेचा मानवी अनुभव
    तुम्ही मार्गात येण्या अगोदर नानातरीचे व्यसन होते .
    आणि तुमच्या कुटूंबात भूतबदा अनेक देवी-देवतांचे पूजन करून शुद्धा समाधानी नोहती.
    परमात्मा एक मार्गात प्रवेश करताच सर्व दुःख दूर झाले. किती महान शक्ती आहे आपल्या मानव धर्मात..
    नमस्कार.....

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार दादा, खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद.!!

      Delete