"मानवधर्म परिचय अभ्यासक्रम मोहीम" (वर्ष २०१७-१८)
"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी) 'सुधारित पाचवी आवृत्ती'
प्रकरण क्रमांक: (४) "भूतबाधेचा नाश"
बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यावर ते त्यांच्याकडे येणाऱ्या दुःखीकष्टी लोकांचे दुःख दूर करुन त्यांतून त्यांना मुक्त करीत असत. हल्ली भूतबाधेविषयी जी अंधश्रद्धा लोकांत पसरलेली आहे तीच अंधश्रद्धा त्यावेळेससुद्धा परंपरेनुसार लोकांच्या मनात घर करुन बसली होती. लोकांचा भूतबाधेवर अतीव विश्वास होता. म्हणूनच लोक ह्या भूतबाधेपासून मुक्ति मिळविण्याकरीता दैवी शक्तिजवळ जाऊन त्या त्रासापासून स्वतःला वाचविण्याचे प्रयत्न करतात. अशा प्रकारे बाबांच्या घरी भूतबाधांवर विश्वास ठेवणारे लोक होते आणि त्यांना सुद्धा या परमेश्वरी कृपेचा लाभ होऊन त्यांची भूतबाधा नाहिशी झाली आणि ते अंधश्रद्धेपासून मोकळे झाले.
बाबांच्या घरासमोर बाबांचे दोन जेष्ठ बंधू श्री. बाळकृष्ण आणि नारायणराव हे वेगळे राहत होते. त्यांच्या घरी बाळकृष्णाची पत्नी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात भूत येत होते. घरातील सर्वांना त्याचा रात्रभर त्रास होत होता. बाबांच्या घरी हवनकार्य झाल्यामुळे त्यांना सुखशांती लाभली होती. बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली होती म्हणून ते दोघेही भाऊ बाबांकड़े त्रिताल हवन संपल्याच्या दुसऱ्या दिवशीच आले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की, "बाबा, आपण आमच्या घरी हवन करावे. त्यामुळे आमची दुःखे दूर होतील." बाबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सांगितले की, मी रोज सायंकाळी एकाच वेळेस अकरा दिवस हवन करीन.
ठरल्याप्रमाणे बाबांनी हवनकार्याला सुरुवात केली. श्रीमती सीताबाई ह्या बाजुलाच बसत असत. हवनाच्या पहिल्याच दिवशी हवन सुरु असतानाच त्या बाईच्या अंगात पुष्कळशी भूते येऊ लागली. आहुती टाकणे सुरु असतानाच त्या बाईच्या तोंडातून असे शब्द निघत होते की, मी अमुक आहे. अमुक माझे नाव आहे. मी अमुक ठिकाणी राहते. मला बाबा हनुमानजीने पकडले आणि हवनात टाकले. असे शब्द सारखे हवन संपेपर्यंत रोज त्या बाईच्या तोंडातून निघत होते. तिसर्या हवनाच्या दिवशी वरील शब्द जवळ जवळ दोन तास त्या बाईच्या तोंडातून निघाले. त्यानंतर तिच्या तोंडातून दुसरे शब्द बाहेर पडले. माझ्या अंगाची खूप आग होते आहे. मी पेटते आहे आणि आता मरते आहे, असे त्या जोरजोराने ओरडत होत्या. हे शब्द ऐकून आणि त्यांची होणारी दुर्दशा बघून बाबांना खूप वाईट वाटले.
त्यांना राहवले नाही. त्यांनी कापूर लावून बाबा हनुमानजीला विनंती केली की, बाबा हनुमानजी माझ्यासमोर ही फार मोठी समस्या उभी झाली आहे. तरी आपण तिला समाधान द्यावे. विनंती पूर्ण झाल्यावर आणि कापूर विझल्यावर परमेश्वराने बाबांच्या विनंतीला प्रतिसाद दिला. त्या बाईच्या तोंडातून पुन्हा शब्द निघाले की, 'मै पार्वती हूँ। बाबा हनुमानजी मुझे कैलास बुलाने आये और कहने लगे की, उस औरत के शरीर की अंगार हो रही है। तुम वहाँ जाओ और उसे संभालो। पार्वतीजीने आगे कहा कि, मेरी अंगार हो रही है। मुझे इक्कीस गुंड पानी से नहलाओ और सफेद वस्त्र पहनाओ।' बाबांना हे शब्द ऐकून खूप आश्चर्य वाटले. त्यांना वाटले तिच्या बोलण्यात हे असे परिवर्तन कसे झाले. तेव्हा बाबांनी पाटीवर लिहून त्या घरातील लोकांना तिला विचारावयास सांगितले की, "अबतक शैतान आये। अभी पार्वती कैसे आयी।" त्याप्रमाणे त्या बाईला बाबांच्या भावाने विचारले, तेव्हा ती उत्तरली की हनुमानजी मुझे कैलास बुलाने आये और मुझसे कहाँ, उस झाड (बाई) के शरीर में प्रवेश करो और उसे बचाओ। हे ऐकल्यानंतर बाबांनी पाटीवर लिहून आदेश दिला की, उसे इक्कीस गुंड पानी से नहलाकर सफेद वस्त्र पहनाओ और बादमें हवनकार्य मे लाओ। त्याप्रमाणे त्या बाईला एकवीस गुंड पाण्याने आंघोळ घालून पांढरे कपडे नेसायला लावले आणि ती बाई परत हवनकार्यात येऊन बसली. तोपर्यंत हवन करण्याचे थांबविण्यात आले होते. त्यानंतर हवनकार्य पूर्ण केले. त्या दिवसापासून त्या बाईच्या अंगात भूत येणे अजिबात बंद झाले आणि तेव्हापासून तिच्या अंगात प्रत्येक शनिवारी पार्वती येऊ लागली.
हे अकरा दिवसांचे हवनकार्य सुरू असताना एके दिवशी ज्या व्यक्तीने बाबांना मंत्र दिला होता ती व्यक्ती हवन सुरू असताना बाबांकडे आली आणि हवनात बसली. हवन संपल्यावर ती व्यक्ती बाबांना सांगू लागली की, मी ज्या जागेवर बसलो होतो ती जागा हवन सुरू असताना खूप जोरजोरात हलत होती. संपूर्ण आहुती देणे बंद झाल्यावर जागा हलणे बंद झाले. यावरून बाबांनी असे अनुमान काढले की, या घरातील संपूर्ण भूतबाधा नष्ट होऊन ते शुद्ध झाले आहे. आता येथे परमेश्वर वास करील. याप्रमाणे त्या घरातील सर्वांना सुखशांती मिळाली.
बाबांमुळे भूतबाधा नाहीशी होते हे जेव्हा लोकांना कळू लागले तेव्हा बरेचजण बाबांकडे येत होते. बाबा त्यांना मंत्राने तिर्थ करून देत होते. तसेच त्यांच्या दुःखावर मंत्राद्वारे फुक मारून त्यांचे दुःख दूर करीत होते. जेव्हा प्रत्येक शनिवारी श्रीमती सीताबाई ह्यांच्या अंगात पार्वती येत होती तेव्हा त्यांचाकडे भूतबाधेने पीडित आलेले लोक येत होते. त्या लोकांच्या अंगात देवी, देवता, भूत, सैतान येत होते. तेव्हा ते त्या पार्वतीशी खूप वादविवाद करीत असत. तेव्हा पार्वती त्यांना सर्वात शेवटी म्हणायची की, 'मैं तुझे जला दूँगी.' तेव्हा ते लोक शांत होत होते आणि त्यांच्या अंगातील देवी, देवता, भूत, सैतान नाहीसे होऊन, ते शुद्धीवर येत होते. त्यानंतर त्यांच्या अंगात कधीही भूत येत नसत.
अशा प्रकारे त्यांच्याकडे दुःखपीडित लोकांना पण सुख मिळू लागले आणि परमेश्वरी कृपेचा लाभ मिळू लागला. अशाप्रकारे बाबांनी परमेश्वरी कृपेने भूतबाधा नष्ट होते, भुते परमेश्वराला घाबरतात आणि जेथे परमेश्वर वास करतो तेथे भूत राहू शकत नाही. हे सिद्ध करून दाखविले. भूतबाधा, देवदेवता, यांवर लोकांच्या असलेल्या अंधश्रद्धेला बाबांनी मूठमाती दिली. जरी बाबा लोकांचे दुःख दूर करीत होते तरी त्यांना याबद्दल काहीही कळत नव्हते. ते अज्ञातवासात होते.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार....
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधून घेण्यात आलेली आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
खूप सुंदर माहिती दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई
आपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!
Deleteखूप छान माहिती सादर केली दादा👌👌🙏🙏💐💐
ReplyDeleteआपले धन्यवाद.! आपली प्रतिक्रिया नेहमी आम्हाला प्रोत्साहित करणारी असावी, नमस्कार.!!
Deleteसर्वाना माझा नमस्कार।
ReplyDeleteनमस्कार जी.!!
Delete