【"जीवन झाले छान-छान, भगवंताची कृपा लई महान"】
【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: २२ जून २०१६
माझे नाव 'रुपेश अनिलजी मेश्राम' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
सन २००० हे वर्ष आमच्या कुटुंबासाठी एक वरदानचं ठरले . कारण याच वर्षी आम्हाला मानव धर्माची ओळख झाली. मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबामध्ये माझे आई-वडिल व आम्ही तीघे भाऊ असे एकूण ५ सदस्य होते.
माझ्या वडीलांना दारु पिण्याची खूपच वाईट सवय होती. सवय म्हणनेही चुकीचे ठरेल कारण ते दारुच्या अगदी आधिण झाले होते. दारु शिवाय ते राहुचं शकत नव्हते अशी परिस्थिती होती.
माझे वडिल हे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. व आम्ही त्या वेळेस भंडारा इथे पोलीस क्वार्टर मध्येच राहायचो. त्याच वेळेस माझे वडिल हे नोकरीतून सस्पेंड झाले होते आणि असे या आधी ते दोन ते तिन वेळा सस्पेंड झाले आणि आता वेळ नोकरीतुन डिसमिस होण्याची पाळी आली होती. आणि आमची परिस्थिती ही खुपच हालाकीची होती कारण आमच्या कडे नाही शेती होती नाही बँक बॅलेंस होता.
आमचं संपूर्ण परिवार हे फक्त वडिलांच्या पगारावरच अवलंबून होते. आम्ही तिघेही भाऊ शिक्षणाचे होतो त्यामुळे शिक्षणाला व घरखर्चाला पैसा तर लागणारच परंतु पगारही बंद मग करायच कस ? असे खुप मोठे संकट माझ्या आईवर आले होते. कारण माझी आईच आमच्या कुटुंबाचे आधार स्तंभ होती. कुटुंबाची सर्व जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती.
नंतर आमच्या ओळखीच्या एक काकु होत्या त्यांनी या मार्गाविषयी माझ्या आईला सांगितले व नंतर आईने विचार केला व ठाम निश्चय करुन त्या काकुंसोबत आई मार्गदर्शक काकाजी यांच्याकडे गेले. मग काकाजींनी सांगितले की या मार्गात कुटुंबातील सर्वांनाच याव लागते परंतु माझे वडिल हे मार्ग स्विकारण्यास विरोध करायचे. मग माझी आई आणी आम्ही तीघं भाऊ मिळुन आम्ही विनंती व प्रार्थना करत गेलो.
एकदा परिस्थिती अशी आली की, माझ्या वडिलांची नोकरी ही जाणारच तेव्हा माझी आई ही एस.पी. ऑफिसला जाऊन साहेबांना आपली परिस्थिती सांगुन विनवणी केली व नोकरी वाचवली कारण, आम्ही (वडिल सोडून) मार्गाशी जुडलो होतो. नंतर माझ्या वडिलांनी सुद्धा विचार केला की ह्या एका पुजेमुळे माझी नोकरी वाचली म्हणून ते सुद्धा या मार्गाशी जुडले व नंतर आमच्या परिस्थितीत सुधारणा घडुन येऊ लागली.
आज मार्गात येवून आम्हाला जवळजवळ १६ वर्षे होत आहेत व मार्गाशी जुडलो तेव्हापासून कसल्याही प्रकारचे मोठे दुःख आमच्या परिवारात आले नाही कारण आमच्या सोबत भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत. आज मी शिक्षक म्हणून शासकीय नोकरीवर आहो माझा मोठा भाऊ हा मेकॅनीकल इंजिनिअर आहे व लहान भाऊ हा नुकताच इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा देऊन आला. वडिलांचे सुद्धा नोकरीचे अडिच वर्षे शिल्लक आहेत व गोंदियामध्ये आता आमचा स्वतःच एक घर आहे.
हे सर्व सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्याकडे त्या परिस्थितीत खायला अन्न नव्हते आणि आज ही परिस्थिती आहे याचे कारण म्हणजे फक्त आपला एक "मानव धर्म".
लिहिन्यात काही चूक-भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- रुपेश अनिलजी मेश्राम
पत्ता :- मु. श्रीनगर, पो./ता./जि. गोंदिया
सेवक नंबर :- १४२५४
मार्गदर्शक :- तुळस्कर काकाजी, भंडारा
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
[युवा सेवकांचा ग्रुप]
"एडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपुर.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
No comments:
Post a Comment