【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: २४ मे २०१६
【"चर्चा बैठकीचा नेहमी लाभताच सहवास, प्रत्येक संकटावर मात करुनी वाढतो परमेश्वरावरील विश्वास"】
माझे नाव कु. रितु वासुदेवजी वाडीभस्मे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'चर्चा बैठकीचे महत्व' सादर करीत आहे.
आम्हाला मानव धर्मात येऊन २३ वर्ष झाले. माझ्या जन्माच्या अगोदर पासून आमच्याकडे "मानव धर्म" आहे, म्हणजेच माझा जन्म एक सेविका म्हणूनच झाला. त्यामुळे लहानपणापासूनच मी घरच्यांसोबत नेहमी चर्चा बैठक मध्ये जायची. लहान असल्यामुळे मला बैठक मध्ये सांगितलेले कळत नव्हते, पण मनात मात्र भगवंताविषयी खुप विश्वास निर्माण झाला आणि काहीही दुःख आले तर सर्वात अगोदर भगवंताचे स्मरण करते.
एकदा मी माझ्या मावशीकडे स्लॅब वरून उतरताना पडली आणि माझ्या पायाला लागले. मला चालताच येत नव्हते. मग मावशीच्या मुलींनी मला घरात आणले व याबद्दल मावशीला सांगितले, तर मावशी घाबरली. कारण, काही दिवसांपूर्वी माझ्या मावशीची मुलगी पण तिथल्या स्लैप वरून पडली होती व तेव्हा ती बेशुद्ध झाली होती.
तेव्हा तिथेच बेडवर मी विनंती केली व भगवंताला योग मागितला की, "माझ्या पायाचे हाड तुटायला नको" आणि पायाला "बाबा हनुमानजी" म्हणून फुका मारल्या. कारण, या अगोदर शाळेत खेळतांना माझ्या भावाच्या पायाचे हाड तुटले होते व त्याला झालेला असह्य त्रास मी बघितला होता, त्यामुळे जेव्हा पडल्यावर मला चालता येत नव्हते, तेव्हा लगेच मला त्याची आठवण झाली व भीती वाटु लागली.
नंतर मावशीच्या मुलींनी मला सायकलने घरी सोडून दिले. घरी गेल्यावर मी बाहेरच्या बेडवर बसली आणि त्यांनी आईला सांगितले, तर आई रागावली कश्याला स्लाप वर गेली म्हणून आणि आई घरात गेली. आमच्या घरच्या बाहेरच्या हाल मध्ये पुजेच्या खोलीचा एक दार आहे, तर तो दार मी माझ्या मावशीच्या मुलीला खोलायला सांगितले आणि तीर्थ बनविण्यासाठी पाणी आनून मागितले आणि चालता येत नसल्यामुळे मी बसत बसत पुजेच्या पाटाजवळ गेली व विनंती करून तिर्थ बनविला.
नंतर थोड्या वेळाने आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पायाचा X -Ray काढला. त्याची रिपोर्ट दुसर्या दिवशी मिळणार होती. मग सायंकाळी आम्ही आयुर्वेदीक पट्टी वाल्याकडे गेलो. त्यांनी सांगितले की, पायचे जॉइंट घसरले आहे. बघा, मी भगवंताला मागितल्यालेल्या योगाप्रमाणे माझ्या पायाचे हाड तुटले नाह व हे ऐकून मला समाधान वाटले. परंतु ते म्हणाले की, एकदाचे हाड तुटलेले चालते, पण जॉइंटचा प्रॉब्लेम बरा व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. कधी कधी एक वर्ष पण लागतो म्हणाले.
मग आम्ही त्यांची औषध बांधली तर त्याच औषध नी मला एक महिन्यातच पुर्णपणे आराम झाला. दुसरी कुठलीच औषध घेतली नाही. डॉक्टरांची X-Ray Report पण आणली नाही. जो त्रास दुर व्हायला एक वर्ष पण लागु शकतो, असे म्हटले तो त्रास एका महिन्यात दुर झाला. कारण भगवंतावर असलेला विश्वास. ते आयुर्वेद औषध वाले काका पण म्हणाले की, हिला खुपच लवकर आराम झाला. नाहीतर हा त्रास इतक्या लवकर बरा होत नाही व त्यानंतर मी शाळेत पण जायला लागली.
ते म्हणतात ना....
"दवा के साथ दुवा भी जरूरी है"
या अनुभवातून मी हे सांगु इच्छिते की, माझ्या मनात भगवंताविषयी जो विश्वास निर्माण झाला तो चर्चा बैठक मधील शक्तीमुळे. जरी मला बैठक मधील मार्गदर्शन समजत नव्हते, तरी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला. म्हणजेच चर्चा बैठक ही एक भक्ती आहे, शक्ती आहे.
म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे की, आपल्या घरच्या बाल सेवक-सेविकांना नेहमी चर्चा बैठकमध्ये सोबत घेऊन जावे आणि सगळ्यांनी चर्चा बैठकला नेहमी जाण्याचा प्रयत्न करावा व मी सुद्धा करणार.
लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.
नमस्कार..!
सेविका :- कु. रितु वासुदेवजी वाडीभस्मे
पत्ता :- मु./पो./ता. साकोली, जि. भंडारा
सेवक नंबर :- ४८९३
मार्गदर्शक :- श्री. वसंतरावजी ठेेंगळी, साकोली
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुपला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार (FACEBOOK PAGE)
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार (YOU TUBE CHANNEL)
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
खूप छान प्रेरणादायी अनुभव आहे. धन्यवाद रितू ताई
ReplyDeleteनमस्कार.!!
नमस्कार जी खुप छान अनुभव आहेत या अनुभवातून चर्चा बैठकीचा अर्थ समजायला आलात ताई
ReplyDeleteआपले मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार!!
Delete🙏जी ताई
ReplyDeleteधन्यवाद कमलेश दादा नान्हे नमस्कार!!
Deleteचर्चा बैठक ही एक शाळा आहे .आणि सेवकाला मानव धर्म म्हणजे काय हे समजण्यासाठी चर्चा बैठक मध्ये जाणे खुप गरजेचे आहे .शाळेत गेल्याशिवाय मानव केव्हाच शिकू शकत नाही.धन्यवाद रितू ताई चर्चा बैठकीचा महत्व अगदी अनुभव देऊन सांगितल.नमस्कार जी दादा व ताई
ReplyDeleteखूप छान प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाजी, नमस्कार
Deleteतुमचं नाव कळू शकणार का!
खूप छान अनुभव रितू ताई..... नमस्कार 🙏💐
ReplyDeleteधन्यवाद विकास दादा नमस्कार
Deleteखुप छान अनुभव रीतू ताई नमस्कार
ReplyDeleteधन्यवाद आपले नमस्कार
Deleteखूप छान आणि सुंदर अनुभव ताई
ReplyDelete