【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: ०९ जून २०१६
【"मार्गात प्रवेश करुनी कार्य केले सुरू, तेव्हा भगवंताने पुसले आमचे अश्रु"】
माझे नाव 'विदेश प्रेमलालजी मडावी' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
माझ्या आईला बाहेरचे लावलेले होते, त्यामुळे आईच्या अंगात भुत रुमत होता आणि तो एवढा ताकदवान होता की, आईला कोणीही धरुन ठेवलं तरीपण तो भुत कुणालाही सांभाळत नव्हता आणि अशा प्रकारामुळे आईची अवस्था खूप वाईट झालेली होती.
आईचा त्रास पुष्कळ दिवस चालत राहिला, त्यावेळी मी जांभडी या गावी आश्रम शाळेमध्ये शिकत होतो. घरी दुसरा त्रास म्हणजे माझ्या वडिलांचे दारु, गांजा आणि बिड्या पिण्याचा छंद होता. माझे वडील कुठलेही काम करत नव्हते त्यामुळे त्यांची मिळकत पण काहीच नव्हती.
आमच्या गावामधे डॉक्टर इंगोले आहेत त्यांच्या शेतात आई घर चालवण्याकरिता कामाला जात होती. संपूर्ण घरखर्च हा आईच्या कमाईवर अवलंबून होता पण माझे वडील स्वतः तर काही करीत नव्हते, परंतु आईने कमावून आणलेले पैसे घरून मागत असायचे आणि घरुन पैसे नाही मिळाले तर ते विटभट्टी वाल्याला उसने मागत असायचे. मग त्या पैश्यांची दारु पिऊन घरात आले की माझ्या आईला खूप मारत होते आणि शाळेच्या परीक्षेच्या दिवसांमध्ये ते मला वीटभट्टी वाल्यांची उधारी चुकवण्यासाठी घेऊन जात असायाचे काम करायला.
वडिलांच्या अश्या वागणूकीमुळे मी इयत्ता चौथी मध्ये असताना तीन वेळेला नापास झालो आणि नंतर पुन्हा प्रयत्न करून चौथ्यांदा परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मी इयत्ता सातवीची परीक्षा दिली आणि त्यानंतर मी नागपुरला राहत होतो. नागपूरला मी कॅटेरर्सचे काम करायला सुरुवात केली, कारण त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता.
मी नागपूरला असतांना माझ्या वडिलांच्या मनात काय विचार आला माहिती नाही, त्यांनी ठरविलं की, त्यांना परमात्मा एक मार्गात जायला पाहिजे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला (श्री गेदलाल मडावी) यांना फोन केला आणि एके दिवशी आई, वडील आणि माझ्या दोन्ही बहिणी मार्गदर्शक काकाजीकडे गेले होते. तेव्हा काकाजीने सांगितले की, आधी तुम्ही संपूर्ण कुटुंब विचार करा आणि तुमचा पक्का विचार झाल्याशिवाय मला मार्ग देता येणार नाही. मला या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की, घरचे सगळे मार्ग घेण्याकरिता मार्गदर्शक काकाजींकडे गेले होते. मग घरातील सर्व सदस्यांनी बसुन पक्का विचार केला आणि विचार झाल्यानंतर त्यांनी मार्गदर्शक काकाजींना निर्णय पक्का केला म्हणुन सांगितल.
मार्गदर्शक काकाजींनी मार्गाचे सर्व नियम आणि अटी सांगून घराची सफाई करायला सांगितली. घराची साफसफाई आणि पुराण्या देवी देवतांच्या प्रतिमांचे विसर्जन केल्यानंतर मार्गदर्शक काकाजींनी कार्य चालू करण्याची परवानगी दिली. वडिलांनी सकाळी उठून अगरबत्ती कापुर लावायला सुरुवात केली. घरी जोत लागली तेव्हापासुन माझ्या आईला होणारा त्रास पूर्णपणे नष्ट झालं. त्यावेळी मार्गात म्हणा किंवा घरी माझी उपस्तिथी नव्हती कारण मला याबाबत माझ्या वडिलांनी किंवा घरच्यांनी माहीतीच दिलेली नव्हती.
काही दिवस वडिलांनी मार्गाच्या सर्व तत्व, शब्द आणि नियमांचे पालन केले पण काही दिवसांनी त्यांनी परत दारु पिणे आणि गांजा पिणे सुरु केले. त्या कारणास्तव आईची प्रकृती परत पूर्वीसारखी झाली. असेच मग एके दिवशी असा प्रसंग घडला की, गावाच्या बाहेर क्रिकेटचा सामना चालू होता आणि तिथे वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. मी त्यावेळी शाळेत होतो आणि मला फोन आला की, तुझे वडील खूप गंभीर अवस्थेत आहेत. मी तेव्हा दुपारच्या वेळेस जेवन करुन बसलो होतो. सोबत माझ्या दोन्ही बहिणी होत्या आणि लगेच काही वेळाने पुन्हा फोन आला की तुझे वडिल मरण पावले. हे कळताच मी सायकलने घरी आलो तर घरी पुष्कळ लोक होते. नियमांचे उल्लंघन केल्याने माझ्या वडिलांना प्राण गमवावे लागले.
तेरवीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर लगेच आईची प्रकृती आणखी जास्त बिकट व्हायला सुरुवात झाली. माझे मोठे वडील श्री. सुरजलालजी मडावी यांनी म्हटलं की, "तुम्ही आता त्वरीत परमात्मा एक मार्गात या, नाहीतर तुझ्या आईचे पण तुझ्या वडिलांसारखे होईल". नंतर मी काही दिवस विचार केला, खर सांगायचं तर मी खूप घाबरून गेलो होतो त्यामुळे मी शब्द दिला की, "मी मार्ग स्वीकार करणार".
मग आम्ही गोंदिया ला मार्गदर्शक श्री. शोभेलालजी कुसराम काकाजी यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला आमच्या दुःखाबाबत विचारले. त्यांना घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितल्या नंतर काकाजींनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि या मार्गात येण्याआधी सर्व मूर्तीपूजा आणि मुर्त्यांच विसर्जन करायला सांगितले, तसेच एकाच भगवंताच्या चरणी मरावे लागेल हे सुद्धा सांगितले.
मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला सात दिवसाचे साधे कार्य दिले आणि त्या कार्याच्या तीन दिवसांमध्ये आम्हाला सुख समाधान लाभेल, सर्व दुःख दूर झाले. भगवंतानी माझ्या आईला भुत लावणार्या व्यक्तीला एवढी मोठी शिक्षा दिली की तो काही दिवस राहीला आणि मरण पावला.
आम्ही "परमात्मा एक" मार्ग घेतला नसता तर माझी आई राहिली नसती आणि आम्ही सुख समाधानाने जगू शकलो नसतो. मी परमेश्वराला जे पण मागितले मला मिळाले आणि मला आज छान नौकरी आहे. अजून पण आई बाबांच्या कृपेने व्यवस्थित आहे आणि कामाला पण जाते.
आज बाबांच्या कृपेने आम्ही सर्व बाबतीत सुखी समाधानी जीवन जगत आहोत, अशीच कृपा माझ्या कुटुंबावर असू द्या. सत्य, मर्यादा, प्रेम आणि तत्व, शब्द, नियमांचे पालन करण्याची शक्ति माझ्यात नेहमी असू द्या ही बाबांना विनंती.
लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- विदेश प्रेमलालजी मडावी
पत्ता :- मु. पिंडकेपार, पो. कारंजा, ता./जि. गोंदिया
मार्गदर्शक :- श्री. शोभेलालजी कुसराम, गोंदिया
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुपला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
मंगेश संग्रामे :- 7057624579
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1
© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
No comments:
Post a Comment