Followers

Sunday, 17 May 2020

प्रकरण क्रमांक: २२ "आत्मप्रचिती"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२२) 
   
                                  "आत्मप्रचीती"

एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना बरोबर घेऊन मानव जागृती विषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोडी या गावी दौऱ्यावर गेले होते. ते परमात्मा एक सेवक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था, भंडारबोडी येथे निवासाला थांबले होते. ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे होते. या कृष्णपक्षास पितृपक्ष असेही म्हणतात. हिंदु धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राध्द करतात. त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

भगवतकार्याची चर्चाबैठक आटोपल्यावर बाबांनी त्या ठिकाणी मुक्कात केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते. त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की , सध्या श्राध्दपक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्तिदिवस आहे. तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करू लागले की, आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्युलोकांतुन मुक्ती मिळाली होती. ते या पृथ्वीतलाला (जगाला) सोडून गेले होते. ते मनाशीच बोलले, जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते . पण आता तसे करणे शक्य नाही. या विचारात ते चिंतामग्न झाले आणि या विचारतच देहभान विसरले. ते नकारात आले. त्यांच्या अंतरात्म्यातून खालील संवाद बाहेर पडलेत ? जे त्यांनी त्यांच्याच कर्णाव्दारे ऐकले.

त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघला की, "सेवक, तू पागल हो गया। किस बातकी तू चिंता कर रहा है। तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजीला म्हणाले, "बाबा, आज मेरे पिताजी का मुक्ति का दिन है। अगर मैं अपने घरपर होता तो उनकी याद में एकही समय भोजन करता। लेकिन मैं बाहर गांव में हूँ। मैं कुछ भी नही कर सकता"। बाबाचे हे शब्द ऐकून भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजीला म्हणाले , "हे सेवक सुन, तेरे पिताका शरीर और मेरा आत्मा एक है। तू एक भगवान को मानता है, इसलिए तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिताका शरीर छोड़कर मुझमे विलीन हो गया, और तूने तेरे पिताका शरीर जलाकर राख कर दिया। अब बोल सेवक, तू राखकी पूजा करता है या मेरी। भगवंताचे हे शब्द ऐकून महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले, भगवान आजसे मेरे मन का शुद्धिकरण हुआ। में इस तरह के पुराने विचार मेरे दिल मे कभी नही लाऊंगा और भगवान , मैं तेरी ही पूजा हमेशा करूँगा असे बाबांनी भगवंताला सत्य वचन दिले.

 अशा प्रकारे भगवंताने (बाबा हनुमानजीने) महानत्यागी बाबा जुमदेवजींना आत्मप्रचीती दिली. तेव्हापासून बाबांनी सेवकांना मुत्यु झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला लावले .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




2 comments:

  1. छान माहिती। सर्वाना माझा नमस्कार

    ReplyDelete
  2. खुप छान माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete