Followers

Monday, 18 May 2020

प्रकरण क्रमांक: (२३) "मोगरकसा तलाव"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती'  प्रकरण क्रमांक (२३) 
                                  "मोगरकसा तलाव"

सत्ययुगातील गोष्टी आपण इतिहासात वाचतो. रामायणात असा उल्लेख आहे की, जेव्हा श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले होते, तेव्हा भरताने श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरळीत चालविला होता. हेतू हा की, श्रीराम हा सत्य आचरण करणारा मर्यादा पुरूषोत्तम होता. तीच लक्षणे त्यांच्या पादुकांत होती. त्यामुळेच राज्यकारभार सुरळीत चालला. परंतु या कलियुगात सुद्धा पादुकांना तेवढेच महत्व आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या रूपात बाबा जुमदेवजी हे मोंगरकशा तलाव येथे गेले असतानाची ही घटना आहे. एक जोडनाव जी पाण्याने संपूर्ण भरून सुद्धा तलावात न डुबता तरंगत होती आणि त्यात असलेला सेवक जीवंत राहिला. हा एक परमेश्वराचा साक्षात्कार आहे.

       १९७८ सालातील एप्रिल महिन्याची गोष्ट महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराबद्दल मानवाला जागविण्याकरिता नेहमीप्रमाणे सात सेवक घेऊन रामटेक तालुक्यातील काही गावांत दौरा काढला. १/४/१९७८ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी नागपूरच्या आपल्या सेवकांसोबत नागपूर रामटेकवरून भंडारबोडी येथील परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत पोहचले. तेथे बाबांचे भगवतकार्यावर मार्गदर्शन झाले. दुसऱ्या दिवशी दोन एप्रिलला बाबांनी सेवकांना, पाच बैलगाड्या बरोबर घेऊन कांद्री येथे दौरा केला. तेथे भगवतकार्याची चर्चा बैठक आणि बाबांचे मार्गदर्शन होऊन मुक्काम केला. तीन एप्रिलला पंचाळा येथे दौरा होऊन चार एप्रिलला मंगरली या गावात दौरा केला. या गावाच्या दौऱ्यात नागपूरसह लोहारा, कांद्री, सिवनी, भंडराबोडी, सालईमेटा, पंचाळा, मांडवी या गावांतील बरेच सेवक होते. मंगरली हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले १५-२० घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात या मार्गात आलेले दोन सेवक राहत होते. त्यांपैकी एक सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता म्हणून बाबांचा मुक्काम दुसऱ्या सेवकाकडे झाला. ज्या सेवकाकडे बाबा थांबले होते त्या ठिकाणी त्या सेवकाचा मामा पण थांबला होता तो म्हातारा होता. त्याला पंधरा दिवसांपासून सारखा ताप येत होता. या गावात भगवत कार्याची चर्चा बैठक होऊन बाबांनी मानवजागृतीवर सेवकांना मार्गदर्शन केले.

           चर्चाबैठकीच्या अगोदर तेथे या दौऱ्यात ज्या बायामंडळी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण स्वयंपाक केला होता. चर्चाबैठक संपल्यावर भोजनाची तयारी झाली. सर्व सेवक आणि बाबा भोजनास बसले. सोबत आलेल्या बायांनी पंगती वाढल्यात. तो म्हातारा बाबांकडे आला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. त्या पंगतीतच तो बाबांच्या आदेशानुसार जेवायला बसला. जेवण झाल्यावर तो बाबांजवळ पुन्हा आला आणि बाबांना नम्रपणे म्हणाला की, बाबा आपण धन्य आहात. मला पंधरा दिवसांपासून खूप ताप होता. त्यामुळे मी जेवलो नव्हतो. पण आपल्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आणि आज मी पोटभर जेवलो. हा किती मोठा चमत्कार आहे की, बाबांच्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने सेवकांनाच नव्हे तर इतरांना सुद्धा परमेश्वरी कृपेचा लाभ मिळतो आणि त्यांचे दुःख नाहीसे होते.

              जो सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता त्याचे नाव होते शेरकी. तो रात्री लग्नावरून परत आला. त्या रात्रीला मंगरली या गावातच मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलला शेरकी नावाच्या सेवकाने बाबा जुमदेवजींना विनंती केली की, बाबा येथून दहा मैलांवर मोंगरकशा नावाचा एक ऐतिहासिक तलाव आहे. त्याच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आहे. फार सुंदर दृश्य आहे. आपण तेथे सर्वजण वनभोजनास चलावे. त्यावर बाबांनी संमती दिली. साधारणतः माणसे व बाया मिळून साठ सेवक हजर होते. सर्वांनी चहापाणी, नास्ता घेतला आणि सर्वजण वनभोजनास जाण्याची तयारी करू लागले. सामान घेऊन जाण्याकरिता बैलबंडिची आवश्यकता होती. तेव्हा सेवकाचा म्हातारा मामा म्हणाला, एक बंडी आहे. त्याचे बैल म्हातारे आहेत. त्यांतील एक बैल असा आहे की, तो मोंगरकशा तलाव संपल्यावर खाली बसला तर उठतच नाही . त्याच्या अंगावरून ट्रक गेला तरी तो उठत नाही. हे शब्द बाबांनी ऐकले . तेव्हा बाबा म्हणाले , बंडीला त्या बैलालाच जुपा काय होईल ते परमेश्वर करील आणि लवकर वनभोजनास चला. सर्व सेवक तयार झाले सामानाकरिता एक बैलबंडी आणि सेवकांकरिता खाचर तयार केले ज्या बंडीत जास्त साहीत्य होते , तेथे पाच-सहा सेवक बसले होते आणि त्याच बंडीला तो बैल जुंपला होता. ती बंडी नागपूरचा एक सेवक श्री. जगन्नाथजी सोनकुसरे चालवत होता. तो म्हातारा पण बाबांबरोबर वनभोजनास आला. जाताना तो समोरच्या खचरामध्ये बसला होता आणि बंडी मागे होती. त्याला सारखी भीती वाटत होती की , बैल चालता चालता खाली बसतो काय ? म्हणून तो सारखा मागे वळून पाहत होता. परंतु त्याला तो बैल चालताना दिसत होता . किंबहुना तो बैल त्याच्या जोडीला बैलाचे मानाने धावत होता. संपुर्ण प्रवासात तो बैल एकदाही खाली बसला नाही. त्यामुळे या बसक्या बैलाचे त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटत होते. बाबा आणि सर्व सेवक मोंगरकशा तलावापाशी पोहचले. हा तलाव भंडारा जिल्ह्यात आहे. चांगलीशी जागा पाहून झाडाच्या सावलीत सर्व सामान उतरविले. तेथे स्वयंपाकाकरिता काळया दगडांची जमवाजमव केली. चूल तयार केली. दौऱ्यावर आलेल्या काही बाया मंडळी तलावावरून अंघोळ करून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. बायांना बाबांनी सांगितले की तुम्ही या बाजूला आंघोळ करून या ती पूर्व दिशा होती. आणि पुरूष मंडळी तो डोंगा दिसतो तेथे म्हणजे त्या दिशेच्या विरूध्द दिशेला, पश्चिमेला आंघोळ करायला जातील मुक्काम दक्षिण दिशेला होता. स्वयंपाकाला सुरूवात झाल्यावर बाबा सर्व सेवकांना (पुरूष) म्हणाले की , चारपाच सेवक येथे थांबा आणि बाकीचे सर्व आंघोळ करायला चला. त्याचप्रमाणे सर्व सेवक बाबांसोबत डोंगा असलेल्या बाजूला, पश्चिमेला आंघोळ करायला निघाले तेथे पोहचल्यावर काही सेवकांना पोहणे माहीत असल्यामुळे त्यांनी पोहण्यासाठी बाबांची परवानगी मिळण्यासाठी त्यांना विनंती केली तेव्हा तेथे वनखात्याचा चौकीदार होता. त्याने त्यांना पोहायला  जाऊ नये यासाठी विनंती केली. कारण तलावात सुरूवातीलाच दोन हत्ती, पुढे तीन हत्ती आणि मध्यभागी चार हत्ती पाणी आहे संपूर्ण तलावात खूप जाळे आहे त्यामुळे येथे कोणीही कोळी मासोळी पकडायला आत जात नाही, कारण जाळ्यात पाय अडकले तरी तो वर येत नाही आणि बुडून त्याचा अंत होतो, असे तो म्हणाला. त्यावर बाबांनी काठाजवळ पोहायला परवानगी दिली. त्यानंतर सेवक लोक पोहू लागले. बाजूलाच एक जोडनाव होती. तेव्हा एका सेवकाने ती जोडानांव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा. त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली. त्यांत पाच-सहा सेवक होते त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते. म्हणून ते सेवकांना म्हणाले की, मी नावेत येत नाही. नाव थोडी दूर पाण्यात गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतून पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर तेथे श्री. मोतीरामजी हरडे (दिवानजी) नावाचे एकच सेवक उरले होते. कारण त्यांना पोहता येत नव्हते. दिवानजीला वाटले की, आपण आता नाव चालवू ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते. म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला ते वल्हे पाण्यात टाकले. वल्हे पाण्यात घेतल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार न मिळाल्यामुळे दिवानजी उजव्या नावेत पडले हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते तेव्हा बाबा म्हणाले दिवानजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेलात बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की , तुला पोहता येते काय ? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की, तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली. बाबांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की, तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करून भोजनास या तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे. त्याप्रमाणे बाबा जायला निघाले. त्यावेळेस ते पायात पादुका घालावयास विसरले होते त्या तलावाच्या काठावरच राहिल्या होत्या .

बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली. काही सेवक नावेत बसून कपडे धुऊ लागले. लोहारा या गावचा सेवक श्री. शामरावजी कार याने त्या नावेला जोराने लाथ मारली. त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि उकडे कारचा पाय चिरला गेला. श्री. श्रीराम भंडारबोडीवाला हे पुन्हा पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत चढतांना ती नाव एका बाजुला वाकली. त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभड पडले. नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडानावेत संपूर्ण पाणी भरले होते. काठावर असलेले १५-२० सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली, हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या  बायांपर्यंत पोहचला. तेथे धर्मपुरी या गावची सौ. चंद्रभागाबाई ही सेविका होती. ती जोराने म्हणाली, बाबा असतांना नाव बुडू शकत नाही. त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते. बाबा तेव्हा तीनचारशे पावले चालत आले होते. त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला. त्याचक्षणी त्यांच्या पायाला खडे रूतू लागले. तेव्हा बाबांच्या लक्षात आले की, आपण पायात पादुका घातल्या नाहीत, आणि त्या आपण तलावाच्या काठावरच विसरलो आहोत. बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी ? बाबांच्या शब्दांवर अंमल न केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता. परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती.

     बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले तेव्हा नागपूरचे सेवक श्री. लक्ष्मणरावजी उराडे हे एकटेच त्या जोडनावेत दोन भागात पाय देऊन उभे आहेत संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले. बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते. त्यांना म्हणाले, हे तुम्ही काय केले ? तुम्हा सेवकांना बाबा सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता. तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बाबांना संपूर्ण चौकशी केली , किती सेवक नावेत होते ? किती सेवक पोहून बाहेर निघाले? आणि किती आत बुडाले ? चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते. म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरिता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला मादरी या गावाचा कचरू नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, "तुला पोहता येते काय?" त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की, पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरून काठावर आण. त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करून त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री. उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की, हे कसे काय घडले? त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली. 

         प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरून ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की, मला पोहता येत नाही म्हणून उडी मारू शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार म्हणजे दोन्ही क्रियांत मी मरणारच आहे. जीवंत राहू शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, "मरे या जिये भगवत नामपर! बाबा हनुमानजी आप मुझे मारो, या तारो मैं आपके शरणमें हुँ। अशी याचना करीत होतो. “देव तरी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री. उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरून सुध्दा बुडाली नाही. ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिध्द होते आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरून सुध्दा ती बुडाली नाही. धन्य आहे तू भगवंता! नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतून पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली. 

         दुसऱ्या घटनेत श्री. संपत शेरकी सांगतात की, गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडला होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले.  तेव्हा त्याच्या मनात आले की, मी आता बुडणार आणि हाही बुडणार म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातून वाचवा. मी आता मरतो आहे तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंदचा हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरून पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंदला आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशाप्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जीवंत सुखरूप निघाले. धन्य तो परमेश्वर !  त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय ! समर्थ बाबा जुमदेवजीकी जय ! परमात्मा एक ! सत्य, मर्यादा प्रेम कायम करनेवाले, अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले मानव धर्म की जय ! असा हर्षकल्लोळात जयघोष केला. 

          वनखात्याच्या चौकीदार हाही त्या वेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही. तो मरतोच पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात ? हे तुमचे गुरू तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत. ते घाबरतात पण तुमची हिंमत आणि तुमच्या गुरूने दिलेली परवानगी यामुळे खरोखरच भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिध्द होते. 

          त्यानंतर सर्वजण भोजनाच्या ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावर नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले "बाबा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते? केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की , हा प्रसंग बाबांचे न ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्य वचन त्या सर्वांनी दिल. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवरा-आवर करून मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरूपपणे परत आले वरील प्रसंगावरून हे सिध्द होते की , बाबांच्या रूपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकाच्या रूपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रूप आहे हे "बसका बैलं" म्हणजे जनावराने देखील ओळखले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

1 comment:

  1. अतिशय छान माहिती दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete