"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५)
"सौराष्ट्र दौरा"
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावर मानव-धर्म स्थापन केला. हा नवीन धर्म असल्यामुळे ते अहोरात्र या मार्गाचा प्रसार करण्याकरिता आणि मानवजागृती व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी गेले ५३ वर्षे सारखे गावोगोवी, खेडोपाडी दौरा करीत आहेत. त्यामुळे हा मार्ग अनेकांनी अवलंबिलेला आहे, आजच्या घटकेस या मार्गात हजारो कुटुंबातील लोकं सेवक आहेत. सुरूवातीला जरी या मार्गाची वाढ अत्यंत धिम्या प्रमाणात झाली तरी आता ती उत्तरोत्तर वाढतच आहे. खालील तक्त्यावरून हे लक्षात येईल.
१९४७ ते १९७० पर्यंत २३८ परिवार
१९७१ ते १९८० पर्यंत १,१२६ परिवार
१९८१ ते १९९० पर्यंत ३,३५२ परिवार
१९९१ ते २००० पर्यंत १०,५०६ परिवार
२००१ ते ३१ डिसेंबर २०१० पर्यंत २४,९८८ परिवार
सुरूवातीला जास्त सेवक न होण्याचे कारण की हा मार्ग एकदम नवीन आहे. जुनी संस्कृती सोडून नवीन संस्कृतीची ही निर्मिती आहे. वर्षानुवर्ष लोकांमध्ये जे जुने आचारविचार आहेत, ज्या भावना आहेत. त्यांना काडीमोड देणे लोकांना जमत नाही. परंतु या मार्गाचा सेवक झाल्यावर त्यांना जो आत्मानुभव येतो तो पाहून या नवीन संस्कृतीमध्ये लोकांचे आगमन होत आहे. गावोगावी बाबांनी दौरा केल्यामुळे या मार्गाचे सेवक भारताच्या चारही भागात पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर अमेरिकेला सुद्धा या मार्गाचे सेवक आहेत. असाच एक दौरा १९८२ साली २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सौराष्ट्र येथे गेला होता. या दौऱ्यात महानत्यागी बाबा जुमदेवजीसोबत गावोगावचे साधारणतः ५० सेवक होते. बाबांनी केलेल्या प्रत्येक दौऱ्यात विशेष अनुभव येतात. सौराष्ट्र दौऱ्यात सुध्दा असे अनेक अनुभव आलेत. ते अनुभव परमेश्वराने कशाप्रकारे दिले हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
महानत्यागी बाबा जुमदेवजी साधारणतः ५० सेवकासोबत दिनांक २० नोव्हेंबर १९८२ ला सायंकाळी ७ वाजता हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसने सुरतला जाण्यास निघाले. २१ नोव्हेंबर ला दुपारी १:३० वाजता ते सुरत येथे पोहचले. दि. २२ नोव्हेंबर ला निंबायत खाडी सुरत येथे हवनकार्य आटोपून तेथील सेवकांचा परिचय बाबांना करून देण्यात आला. त्यानंतर तेथे उपस्थित सेवकांनी या मार्गाची दीक्षा घेण्याचे कारण आणि त्यांचे आत्मानुभव यावर चर्चा झाली. रात्री ८ वाजता मानवजागृतीवर अनुभवात्मक भजनाचा कार्यक्रम होऊन बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर जेवण करून आराम केला.
दिनांक २३ डिसेंबर १९८२ ला सुरत शहर बघण्याचे ठरले म्हणून बाबा सेवकांबरोबर सुरत दर्शनाकरीता दुपारी १ वाजता निघाले. निघताना बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, आपण कोणत्याही देवळात किंवा मंदिरात गेलो तरी तेथील मूर्तीला नमस्कार करू नये. फक्त मानवाने तयार केलेली कला बघू, कारण परमेश्वर दगडात नाही. तो निर्जीव वस्तूंमध्ये नाही तर सजीवांमध्ये आहे.
सुरत शहर बघता बघता ते अंबामातेच्या देवळात गेले. तेथे बाबांनी पुन्हा सर्वाना आठवण करून दिली की मूर्तीला नमस्कार करू नये. आपण येथे या देशातील कला पाहावयास आलो आहोत. तरी कला बघून पुढे जाऊ या. देऊळाच्या पायऱ्याशेजार खालच्या बाजूला हनुमानजीचे मंदिर होते. सर्वजण देवळाच्या बाहेर निघाले पण हेमराज सातपुते आणि आसाराम सव्वालाखे हे मागे राहिले. हनुमानजीचे देऊळ असल्यामुळे आणि या मार्गाचे प्रतीक बाबा हनुमानजी असल्यामुळे हेमराज सातपुते यांचे मन होलावले आणि "तेथे कर माझे जुळती" या म्हणीप्रमाणे त्यांनी श्रध्देने त्या हनुमानजीच्या मूर्तीला नमस्कार केला. आसारामजी सव्वालाखे यांनी पाहिले. परंतु दोघांनीही त्याबद्दल आपसात चर्चा केली नाही. किंबहुना ही आपली चूक झाली. येथे त्यांनी बाबांचा शब्द तोडला. त्यांचे हे परमेश्वराचे शब्द असल्यामुळे तो एकाअर्थी परमेश्वराचा अपमान झाला होता. त्यानंतर पुढे साईनाथ मंदिर तापी नदी, चमडीभर जागा बघून पुढे अश्विनीकुमार तीन पत्ती हा भाग सर्वानी पाहिला परंतु तेथे अक्षरश: तीन पत्तीदेवजी पाच पत्ती होती. सर्वांनीच बाबांच्या आदेशाचे पालन करून कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही. फक्त सृष्टिसौंदर्य, नवनवीन तयार केलेली कलात्मक देवळे, भव्य इमारती इत्यादी रमणीय स्थळे पहिली. अश्विनीकुमार तीन पत्ती बघून तेथून सायंकाळी लिंगायत खाडी येथे परत येण्यास निघाले. सुरत दर्शनाकरीता स्पेशल बस केली होती.
परत येतांना बसच्या समोर एक व्यक्ती आली आणि त्याला वाचिवण्याकरिता बसच्या ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. सातपुते हा मागे बसला होता आणि आसारामजी सव्वालाखे हा समोरच्या सीटवर जे ५ जण बसले होते त्यापैकी एक जण होता. ब्रेक जोराने मारल्यामुळे बस एकदम थांबली आणि बस मधील सेवक लोकं आपआपल्या सीटवरच आदळलेत. परंतु हेमराज सातपुते हा त्याच्या सीटवरून उडून आसाराम सव्वालाखेच्या अंगावर जाऊन आदळला. तसा हेमराज सातपुते हा सव्वालाखेच्या सीटपासून ३-४ सीट मागे बसला होता. या घडामोडीमुळे सव्वालाखेच्या छातीला जबर मार लागला त्यामुळे तो मी मरतो आहे असे जोराने बसमध्येच ओरडू लागला. त्यानंतर बस सरळ डॉक्टरांकडे नेण्यात आली. तेथे त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. अपघाताची केस असल्यामुळे डॉक्टर औषधोपचार करण्यात तयार नव्हते परंतु बाबांची महिमा ऐकून त्यांनी औषधोपचार केला. हे कसे घडले हे डॉक्टरांनी विचारले असता त्यांना सांगण्यात आले की, सव्वालाखेवर सातपुते पाच फुट जागेवर आपटला गेला. तेव्हा डॉक्टर म्हणाले फार मोठी दुखापत झाली आहे. पण औषध दिलेले आहे आराम होईल त्यानंतर निंबायत खाडी येथे सर्वजण परत आले.
रात्री ८ वाजता उघना यार्ड, सुरत येथे सेवकांचे अनुभावात्मक भजनकार्य, सेवकांचे अनुभव यावर चर्चासत्र झाले आणि शेवटी मानवजागृतीवर बाबांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सुरू असतांना सव्वालाखे निंबायत खाडी येथे आराम करीत होता. त्याच्या प्रकृतीला पूर्णपणे आराम पडला नव्हता. बाबांनी सेवकांना कोणती चूक झाली हे विचारले असता कोणीही सांगावयास तयार नव्हते कोणाच्याही लक्षात त्याची चूक आली नाही. शेवटी सव्वालाखे यांच्या लक्षात त्याच्या हातून झालेली चूक लक्षात आली आणि त्याने एका सेवकाच्या हातून बाबांना कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या चुकीची माहिती देण्यास पाठविले. बाबांना हि गोष्ट कळल्यावर ते निंबायत खाडीला कार्यक्रम आटोपल्यावर परत आले. त्यांनी सातपुतेला विचारले असता त्याने होकार दिला की, मी हनुमानजीच्या देवळात नमस्कार केला आणि सव्वालाखे यांनी ते पाहिले. मी आपल्या आदेशाचे उल्लंघन केले ही माझी महान चूक झाली आहे असे बाबा आणि उपस्थित सेवकांना सांगून तो पुढे म्हणाला की, माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल भगवान बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच सेवकबंधू क्षमा करतील अशी त्याने बाबांना विनंती केली. त्याप्रमाणे बाबांनी दोघांच्याही हातून घडलेल्या चुकीबद्दल क्षमा केली आणि तिकडे सव्वालाखे यांच्या प्रकृतीला आराम पडला, तत्पूर्वी सव्वालाखेला एका तासातून तीनवेळा बाबा हनुमानजीला क्षमा मागण्यास सांगितले अशाप्रकारे बाबांनी दोघांनाही क्षमा करून त्यांना त्यांच्याकडे झालेल्या चुकीपासून मुक्त केले. परंतु ही चूक अगोदरच सांगितली असती तर त्या दोघांवर ही आपत्ती आली नसती.
यावरून हे सिध्द होते की, चूक दाबून ठेवली, त्यातल्या त्यात बाबांच्या आदेशाचे पालन केले नाही तर किती मोठे दुःख येते. जसे चोरी करणाऱ्या पेक्षा चोरी करण्यास सांगणारा माणूस हा मोठा गुन्हेगार होतो त्याप्रमाणे चूक करण्यापेक्षा चूक लपविणारा हा जास्त गुन्हेगार असतो हे सिध्द होते. त्याचप्रमाणे परमेश्वराला चुकीची क्षमा मागितल्यास तो मानवाला क्षमा करून त्याचे दुःख दूर करतो. इतका परमेश्वर मायाळू आहे.
त्या दिवशी रात्रीला १२ वाजता जेवण आटोपून काहीजण तेथे झोपले होते, तर काहीजण जागेच्या अभवामुळे दुसऱ्या सेवकांकडे २-३ ठिकाणी झोपावयास गेले होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व सेवकांना उलटी आणि शौचास होऊ लागले. यावरून बाबांना आणि सर्वांना वाटले की अन्नातून विषबाधा झाली असावी. तेथे बाबांनी असा आदेश दिला की, जेथे जेथे सेवक थांबले आहेत तेथून त्या सेवकांची माहिती आणावी. त्याप्रमाणे माहिती घेतली असता ज्या ज्या ठिकाणी सेवक थांबले होते त्या त्या ठिकाणी ज्या सेवकांनी जेवण केले होते त्या सर्वांनाच उलटी आणि शौचास होत आहे हे समजले. हे समजल्यावर बाबांनी श्री. शिरपूरकर सेवक याला सांगितले की, जवळपास कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलावून आण कारण ही अन्नातील विषबाधा दिसते आहे. सर्व सेवक परमेश्वराच्या नावाचा सारखा जयघोष करू लागले शिरपूरकर डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला डॉक्टरांनी विचारले की उलटी कशी होते, तेव्हा ईश्वरी कला, त्याच क्षणी शिरपूरकरला उलटी आली आणि डॉक्टर समोरच उलटी करीत, अशी उलटी करीत आहेत आणि सारखे शौचास जात आहेत असे त्यांनी सांगितले. ते डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरांनी सर्वांना तपासून इंजेक्शन दिलेणी ओषधोपचार केला.
लहान मोठे मिळून साधारण २०० सेवकांना विषबाधा झाली होती. म्हणून बाबांनी सांगितले की आपण या सर्वांवर कोठूनही औषध उपलब्ध करून औषधोपचार करा कारण ही विषबाधा होणे चांगले नाही. अशी घटना घडणे हे योग्य नव्हे कारण आम्ही नागपूरला राहत असून भगवतकार्याचा दौरा करीत आहोत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी सर्वांवर उपाय करून विषबाधेपासून सर्वांना वाचविले. काही सेवक खूब लांब झोपायला गेले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी त्या दिवशी माहिती मिळू शकली नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी असे कळले की, त्यांना सुद्धा विषबाधा झाली होती. परंतु त्यांनी भगवंताच्या नावाचे (बाबा हनुमानजी) तीर्थ घेतल्यामुळे विना औषधाने त्यांची विषबाधा नाहीशी झाली. त्या दिवशी रात्री सर्वजण औषधोपचारानंतर शांत झोपले. कोणतीही वाईट घटना घडली नाही. परमेश्वराने सर्वांना जीवदान दिले
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बाबांना आपल्या घरी चहा पिण्याकरिता निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे बाबा सेवकांना घेऊन त्या डॉक्टरांकडे चहापाणी घ्यावयास गेले. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना सांगितले की रात्रीला झालेली विषबाधा ही भयंकर स्वरूपाची होती. जरी औषधोपचार केला तरी ती आटोक्यात येण्यासारखी नव्हती. उलट कितीतरी जण दगावयास पाहिजे होते. परंतू कोणीही दगावले नाही. यावरून आपल्याजवळ फार मोठी परमेश्वरी शक्ती आहे असे मला वाटते. त्यावर बाबांनी डॉक्टरांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, या मार्गावर जागृत शक्ती आहे . म्हणून कोणी दगावले नाही. या परमेश्वरी कृपेचा अनुभव या मार्गातील कित्तेक सेवकांना आलेला आहे.
दि. २४ नोव्हेंबर १९८२ साली पटलेवाडी सुरत येथे सेवकांचा परिचय, अनुभव कथन आणि बाबांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर २५ नोव्हेंबर १९८२ ला रात्री साडेदहा वाजता बसने अहमदाबादला बाबा सेवकांसोबत जावयास निघाले. २६ नोव्हेंबरला बापूनगर, मोरारजी चौक, अहमदाबाद येथे भगवतकार्याचे चर्चासत्र, अनुभव, परिचय आणि बाबांचे मानवजागृतीवर मार्गदर्शन झाले. दि. २७ नोव्हेंबरला अहमदाबाद दर्शनाकरिता बसने निघून झुलता मिनार, गोमतीपूर, काकडीया तलाव, बालवटीका, अपना बाजार, सिद्धी सय्यद जाळी, भद्राकली मंदिर, हरिसिंगची वाडी, गांधी आश्रम, मानव मंदिर ओपन सिनेमा हॉल, विज्ञान भवन, भाव निरझर इत्यादी ऐतिहासीक स्थळे पाहलीत. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली.
दि. २८ नोव्हेंबरला सौराष्ट्र पाहण्याकरिता स्पेशल बसने सर्व सेवक निघाले. सायला चोतील, नवरगुजा पाहून जामनगर पाहिले आणि रात्री जामनगरला मुक्काम केला. या बसमध्ये जेवणाकरिता एक काँट्रॅक्टर ठेवला होता. त्याने सेवकांशी व्यवस्थित व्यवहार केला नाही. त्याने सेवकांना त्रास दिला. पोटभर जेवण दिले नाही. बाबा बरोबर असल्यामुळे परमेश्वरी कृपा होती. त्यामुळे त्याच्यावर खूब वाईट प्रसंग आले. त्याचा स्टोव्ह झाडाला अडकून फुटला. त्याने काटकसर करूनही त्याला या धंद्यात खूब मोठा तोटा झाला आणि तो आर्थिक अडचणीत आला.
दि. २९ नोव्हेंबरला बाबा आणि सर्व सेवक जामनगरवरून द्वारकापुरी येथे आले. तेथे सुदामपुरी, द्वारका मंदिर, अरबी समुद्र पहिला. नंतर समुद्रात असणाऱ्या द्वारकामंदिरात जाण्याकरिता सर्वजण नावाने निघाले. नावेत ५० सेवक आणि ५० लोक इतर असे एकूण १०० लोक बसले होते. बाबा नावेतील वरच्या भागाला बसले होते. नाव सुरू झाली. नाव पाण्यातून जातांना ती दोन्ही बाजूंना डोलू लागली. तेव्हा नाविक खूब घाबरला. त्यांच्या लक्षात येईना की, वारा नसतांना नाव हेलकावे का घेत आहे. नावेचे दोन्ही काठ पाण्याच्या पातळीपर्यंत हेलकावे घेत होते. तेव्हा सेवकांनी बाबा हनुमानजींच्या जयघोष केला. त्यांत इतर लोकही सामील झाले आणि नावेचे हेलकावे घेणे बंद झाले. त्यानंतर नाव सुरळीतपणे द्वारका मंदिरात पोहचली. जेव्हा नाव समुद्रातून जात होती तेव्हा जोराचा वारा सुरू नव्हता किंवा समुद्राच्या लाटाही जोराने वाहत नव्हत्या. नावाने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती असे बाबांचे म्हणणे होते. सेवकांनी मंदिरात नमस्कार केला नाही, तर केवळ मानवाने बनविलेली कलाकृती पाहिली. नावेने हेलकावे खाणे ही परमेश्वरी लीला होती. असे बाबांचे म्हणणे होते.
द्वारकामंदिराच्या परिसरात पोहचल्यावर बाबांनी नेहमीप्रमाणे सर्व सेवकांना कोणत्याही देवळात नमस्कार करू नये असे आदेश दिले. परिसरात शिरल्याबरोबर कृष्णमंदिराजवळ सर्वजण पोहचले. द्वारकानगरीचे मुख्य द्वार बंद होते. ते सायंकाळी ६ वाजता उघडणार होते. तोपर्यंत सर्वजण दार उघडण्याची वाट पाहून तेथेच थांबले,बरोबर ५ वाजता मुख्य द्वार उघडले गेले. तेथून सर्वजण सुदाम महाराजांच्या बैठकित गेले. तेथे जे सुदाम महाराज होते ते बैठकित आले आणि आपल्या सिंहासनावर बसले. त्या ठिकाणी अशी एक प्रथा आहे की प्रथम सुदाम महाराज लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून दान वसूल करतात आणि त्यानंतरच पुढे द्वारकानगरी पाहण्यासाठी आत जाऊ देतात. त्याप्रमाणे सुदाम महाराज आपल्या आसनावर बसल्यानंतर बाबांसह सर्व सेवक आणि इतर लोक खाली बसले. यानंतर सुदाम महाराजांनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले की कृष्णाची द्वारका आहे. येथे दान केल्यास पुण्य मिळते . अन्यथा त्रास होतो. म्हणून पुण्य मिळविण्याकरिता आपल्या शक्तीनुसार प्रत्येकाने ५०१, १००१, ५००१ रुपये दान करावे हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटले. या मार्गातील एक सेवक श्री. नागेराव खापरे यांना बाबांनी सांगितले की, त्या सुदाम महाराजांना सांगा की, आमच्याबरोबर आमचे धर्मगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी आहेत. ते निष्काम भावनेने कार्य करतात. ते गुरुपूजा घेत नाहीत आणि दान पण देत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला दान देऊ शकत नाही. त्याप्रमाणे नागोराव खापरेंनी सुदाम महाराजांना तसे सर्वासंमक्ष सांगितले. तेव्हा हे ऐकून तेथील पुजाऱ्यांनी सेवकविरुद्ध कट रचला की यांना दर्शन घेऊ द्यायचे नाही. तेथून सर्वजण कृष्णाच्या देवळाजवळ आले तेथे सर्वजण देवळाचे दार उघडेल या आशेने थांबले होते. परंतु कट केल्याप्रमाणे तेथील पुजारी एकानंतर एक परत जात होते, पण कृष्णाच्या मंदिराचे दार उघडले नाही. तेव्हा तेथेच बाबांनी सर्व सेवकांना मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबर जे इतर लोक होते त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, या देशात पुजाऱ्यांची एवढी सत्ता आहे की, ते दान दिल्याशिवाय देवाचे दर्शन घेऊ देत नाहीत. पुजारी लोकांनी देवाला विकायला काढले आहे. पण देव देवळात नाही. तो प्रत्येक मानवाजवळ आहे. त्यांचा आत्म्यात आहे. म्हणून म्हटले आहे की,
"मंदिर, मस्जिद, गुरुद्वारोने बाँट लिया भगवान को,
सागर बाँटो धरती बाँटो, मत बाँटो इंसान को।"
मानवाला आपसात वाटू नका कारण त्याला वाटल्यास भगवंताला (परमेश्वराला) वाटल्यासारखे होईल. त्यानंतर बाबांनी सर्व सेवकांना आदेश दिला की, बाबा हनुमानजीचा जयघोष करून परत चला. त्याप्रमाणे सर्व सेवकांनी खालीलप्रमाणे जयघोष केला.
भगवान बाबा हनुमानजी की जय।
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय।
परमात्मा एक।।
सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले
मानव धर्म की जय।
आणि सर्व सेवक मुख्य व्दाराच्या बाहेर निघाले. एक सेवक श्री. केशव चिचघरे हा सर्वात मागे राहिला होता. मुख्य व्दाराजवळ एक साधू, धुनी लावून बसला होता. केशव चिचघरे जेव्हा गेटजवळ आला तेव्हा एक पुजारी असे म्हणाला की, यांनी दान दिले नाही. म्हणून यांची नाव पाण्यात बुडेल. हे शब्द त्या साधूकडून ऐकल्यावर त्यांच्या अंगाची लाहीलाही झाली आणि त्यांनी रागारागाने त्या पुजाऱ्यांना उत्तर दिले की तुम्ही पुजारी स्वतःला काय समजता आहात ? त्या सर्वांवर परमेश्वराची कृपा आहे म्हणून ते काहीही न बोलता निघून गेले. तुम्ही पुजारी इतके नीच आहात की, जर कोणी दान दिले नाही तर तुम्ही त्यांना देवाचे दर्शनही घेऊ देत नाही. हे सर्व केशव चिचघरेनी ऐकल्यावर त्यांनी बाबांना सांगितले तेव्हा बाबा म्हणाले की, ही सर्व मूर्ख लोकांची सत्ता परमेश्वराला मान्य नाही आणि ती लवकरच बदलेल. याकरिताच या मार्गाची उत्पत्ती आहे. बाबा व्दारकेला आराम करण्याकरिता एका ठिकाणी थांबले. तेथे काही कारणास्तव सेवकांचे जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरशी खूप भांडण झाले. तेव्हा बाबांनी सर्व सेवकांना आवरले. त्या कॉन्ट्रॅक्टरचे खूप आर्थिक नुकसान झाले ३० नोव्हेंबरला द्वारकेवरून पोरबंदर येथे सर्व पोहचले.
तेथे भारत मंदिर, दवाखाना आणि गांधीजींचे घर सर्वांनी पाहिले. तेथून सर्वजण सोमनाथला पोहचले. तेथे सोमनाथचे ऐतिहासिक मंदिर पाहून समुद्रकिनाऱ्यावरील सृष्टी- सौंदर्य पाहिले. त्यानंतर तेथे रात्रीला मुक्काम करून १ डिसेंबर रोजी जुनागड येथे सर्वजण आले. जुनागडचा किल्ला, ९,९९९ पायऱ्या असलेले गडावरील देवस्थान पाहिले. तेथून वीरपूरला जाऊन "जलाराम बापूचे" मंदिर पाहिले. हे मंदिर पाहिल्यानंतर बाबांच्या मनात असे विचार आले की, आपणही कुठेतरी चांगलीशी जागा मिळवून अशाच प्रकारचे "मानव-मंदिरा" चे भवन आपल्या मंडळातर्फे बांधावे. त्या ठिकाणी आपल्या सेवकांना सुख, शांती आणि समाधान मिळेल. त्याप्रमाणे येथूनच प्रेरणा घेऊन बाबांनी नागपूर येथे मानव मंदिर उभारले आहे.
विरपूरवरून गोंडलला गेल्यावर योगी महाराजांचे मंदिर पाहिले. २ डिसेंबरला गोंडलवरून आकोट होत सांरगपूरला गेले. तेथे लक्ष्मीनारायणचे मंदिर व हनुमान मंदीराची कलाकृती सर्वांनी पाहिली. तेथून ३ डिसेंबरला पुन्हा अहमदाबाद येथे परत आले. वरील सर्व ठिकाणी सर्व सेवक मंदिरात फिरलेत परंतु बाबांच्या आदेशानुसार कोणत्याही सेवकाने, कोणत्याही मंदिरात, कोणत्याही मूर्तीला नमस्कार केला नाही.
३ डिसेंबरला जुना बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवावर भजनकार्य आणि मानव जागृतीवर बाबांचे मार्गदर्शन झाले. तेव्हा बाबा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, मंदिरात कोणत्याही मूर्तीला नमस्कार कोणीही केला नाही. कारण बाबा सजीवामध्ये परमेश्वरी रूप पाहतात. निर्जीवामध्ये परमेश्वर वास करीत नाही. मूर्ती ही निर्जीव वस्तू आहे. म्हणून बाबांचे सेवक कोणत्याही मूर्तीला नमस्कार करीत नाहीत. ते रूप सजीवांमध्येच पाहतात म्हणून त्यांना आत्मप्रचीती, आत्मानुभव आणि आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळेच सेवकांची आत्मशक्ती वाढते. भावनेचा नाश होतो आणि मानव हा अनुभवाचे तज्ञ होतो. तो भगवंताला समोर ठेवून आत्मसाक्षात्कारांनी आपले भविष्य बनवून उज्ज्वल करतो.
दिनांक ४ डिसेंबर रोजी नवा बापूनगर, अहमदाबाद येथे रात्री ८ वाजता मानवी अनुभवात्मक चर्चाबैठक, भजनकार्य, सेवकांचे अनुभव आणि मार्गदर्शन होऊन दि . ५ डिसेंबरला अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने नागपूरला प्रस्थान होऊन ६ डिसेंबर १९८२ ला सकाळी ७ वाजता नागपूरला आगमन झाले
या सौराष्ट्र दौऱ्यात जे जे घडले त्याला सर्व परमेश्वरी कृपा कारणीभूत आहे आणि तिनेच ही परिस्थती उत्पन्न करून तिला पूर्णपणे सांभाळले आहे. त्याचे कारण मानव हा कर्मकर्ता असल्यामुळे त्याच्या हातून चुका होणे स्वाभाविक आहे आणि तो चुकला की त्याचे परिणाम चुकी एवढेच होतात. हे परमेश्वराने मानवाला शिकविले आहे. वरील सर्व घटनेवरून हे सिध्द होते की, बाबा बरोबर भगवंत नेहमी वास करतो. त्यामुळे त्यांचेपुढे सेवकांवर कितीही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यात तरी त्या चुटकी सारख्या सहजतेने सुटतात.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
अतिप्रम माहिती दादा
ReplyDeleteनमस्कार जी
नमस्कार जी सर्वांना. बाबांच्या या दौर्यावर आलेल्या अनुभवा मुळे खूप काही शिकायला मिळाले. नावेने समुद्रातून जात असताना, हवा नसताना सुद्दा नाव डगमगत होती कारन परमेश्वराची लीला न्यारी आहे. सेवकांचे धैर्य पाहण्यासाठी हा प्रकार घडत होता. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांना जय घोष करायाला सांगितले आणि नाव हलने बंद झाले. किती मोठ अनुभव आहे. बाबांच्या सोबत प्रत्यक्षात दैवी शक्ति उभी होती. नमस्कार जी. धन्यवाद. अप्रतिम आठवणी सादर केले.
ReplyDelete