【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९२) प्रकाशित दिनांक: ०२ नोव्हेंबर २०१६
【"मार्गात येताच भगवंताने दिला योग, बरा झाला वडिलांचा असाध्य रोग"】
माझे नाव कु. दुर्गा हिरामणजी गभने आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात आई-वडील, आजी, माझ्या दोन बहिणी, एक लहान भाऊ आणि मी असे एकूण ७ सदस्य होते.
सर्वप्रथम मी सांगु इच्छिते की, आपल्या मार्गात जास्तीत जास्त वाईट व्यसनाने पीडित व व्यसनाधीन कुटुंब आलेले आहेत, पण माझ्या वडिलांना दारूचे व्यसन नव्हते. तरीसुद्धा आम्ही खुप दुःखी होतो. माझ्या आजीचे नेहमी पाय दुखायचे, म्हणून तिने खुप डॉक्टरी उपचार केले. तरीसुद्धा तिला आराम मिळत नव्हता. माझ्या आजोबांना कुष्ठरोग झालेला होता. मी ३ वर्षाची असतांना ते मरण पावले. तसेच माझ्या वडिलांना वयाच्या सातव्या वर्षापासूनच पायाला पांढरे डाग झालेले होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे आमच्या कुटुंबात अनुवांशिक रोग होता.
पांढऱ्या डागांमुळे वडिलांना खुप त्रास व्हायचा. आमच्या परिसरातील डॉ. रहांगडाले यांच्याकडून वडिलांनी सतत १० वर्षे उपचार केला परंतु त्यांना काहीच आराम झाला नाही. कोणी सांगायचे की या गावी या रोगाचे औषध मिळते तर वडील त्या गावी जायचे. गावोगावी फिरून सुद्धा वडिलांच्या रोगाचे निदान झाले नाही. आम्ही अगदी हताश होऊन गेलेले होतो. कारण सतत उपचार करून घरची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. वडिलांच्या रोगाकरिता जवळपास एक लक्ष रुपये खर्च करून सुद्धा वडिलांना काहीच आराम नव्हता. त्यांना दररोज एका वेळेला ४-५ गोळ्या घ्यावे लागायचे. अशा परिस्थितीत घरी वडील एकटेच कमावणारे होते आणि आम्ही ६ सदस्य त्यांच्यावर निर्भर होतो. खरंच घरचा कमावणारा व्यक्ती जर सतत आजारी राहत असेल तर त्या घरची परिस्थिती किती वाईट असेल. आमची उदरनिर्वाहाची जबाबदारी वडिलांवर होती. तरी वडिलांनी आपला धीर खचू दिला नाही आणि एक-एक पैसा जोडून एक प्रवासी वाहतुकीची काळ्या-पिवळ्या रंगाची गाडी घेतली. पण कदाचित आमच्या मागे कर्मभोग लागलेले होते कि काय, तर त्या गाडीने सुद्धा आम्हाला साथ दिली नाही. एका वर्षात ३ वेळा गाडीच्या इंजिनची दुरुस्ती केली आणि भरपुर पैसे खर्च केले. पण ती गाडी हाती लागली नाही.
अशा बिकट परिस्थितीत आम्ही अगदी खचुन गेलेलो होतो. तेव्हा म्हणतात ना की, प्रत्येक दु:खानंतर सुखाची किरण येते. तर ही सुखाची किरण आमच्या हि जीवनात आली. माझ्या वडिलांचे मित्र श्री. प्रेमराजजी करंजेकर यांनी आम्हाला "परमात्मा एक" या मार्गाविषयी माहिती दिली. ते माझ्या वडिलांना म्हणाले की,"तु कितीतरी औषधी उपचार केले, तरी तुझ्या प्रकृतीला काहीच आराम नाही. तर तु आता परमात्मा एक या मार्गात ये". मग माझे वडील घरी आले आणि म्हणाले की, "आपण परमात्मा एक या मार्गात जाऊ". आम्ही सर्वांनी मार्गात जायचे ठरवले, पण माझी आजी तयार नव्हती, कारण ती शिवभक्त होती. तिने मला नातु झाला तर तो ५ वर्षाचा झाल्यानंतर पचमढीला नवस काढीन असे कबुल केले होते. त्याच वर्षी २००८ साली माझा भाऊ ५ वर्षाचा झाला आणि आम्ही पचमढीला जाऊन त्याचे नवस काढले. मग नवस काढुन आल्यानंतर दिनांक २४ मे, २००८ ला आम्ही मार्गात प्रवेश करण्याकरिता लाखांदुरचे मार्गदर्शक श्री. राजुजी ठाकरे काकाजी यांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा व्यवस्थित आणि सविस्तर समजावुन सांगितली. मग त्यांनी आम्हाला मार्गात वचनबद्ध करून ११ दिवसांचे कार्य दिले.
वडिलांना असाध्य रोग असल्या कारणाने त्यांनी आम्हाला तळलेले पदार्थ, मांसाहार आणि ब्रम्हचर्य व्रत याचे बंधन दिलेले होते. आम्ही दिलेल्या बंधनाचे आणि वडिलांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमांचे पालन करून जोमाने कार्य केले. आज आम्ही सुख-समाधानाने जीवन जगत आहोत. वडिलांना पण पुष्कळ आराम मिळाला. त्यांची औषधी सुरु आहे, पण आधी ते दररोज चार ते पाच गोळ्या घ्यायचे आणि आता दररोज एकच गोळी घेतात व त्यांचे पांढरे डाग पुष्कळ कमी झालेले आहेत.
मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार वडिलांसाठी दवा आणि दुवा दोन्ही सुरु आहे. अर्थातच मार्गात आल्याने आमचे जीवन सुरळीत सुरु आहे. मग आम्ही त्यागाचे कार्य केले आणि दिनांक २ जानेवारी, २०१५ ला आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले. त्यागाचे कार्य सुरू असताना, वडिलांनी कोणतीही गोळी वगैरे घेतली नाही. बाबांची औषध पुर्णपणे बंद होती आणि दिनांक ९ ऑक्टोबर, २०१५ ला नववे हवनकार्य हर्षोल्लासाने पार पडले. आता आम्ही आनंदाने बाबांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करून स्वावलंबी जीवन जगत आहोत. खरंच बाबांची कृपा खुप महान आहे.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.
नमस्कार...!
सेविका :- कु. दुर्गा हिरामणजी गभने
पत्ता :- मु. दिघोरी (मोठी), ता. लाखांदुर, जि. भंडारा
सेवक नंबर :- ३४६८४
मार्गदर्शक :- श्री. राजुजी ठाकरे, लाखांदुर
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे :- 7057624579
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
छान अनुभव ताई
ReplyDeleteनमस्कार जी
अतिशय सुंदर अनुभव ताई नमस्कार ताई
ReplyDelete