Followers

Tuesday, 19 May 2020

【"मांत्रिकाच्या त्रासाने त्रस्त झालो', 'शेवटच्या क्षणी परमात्मा एक मार्गी आलो"】



                              【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९१) प्रकाशित दिनांक: ०१ डिसेंबर २०१६

【"मांत्रिकाच्या त्रासाने त्रस्त झालो', 'शेवटच्या क्षणी परमात्मा एक मार्गी आलो"】

माझे नाव प्रफुल दिलीपजी थोटे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

या मार्गात सर्वच सेवक दुःखी आलेले आहे. हा मार्ग सुखी लोकांनां दिसत नसतो, हे खरं आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंब दुःखा मुळेच या मार्गात आले. माझ्या कुटुंबावर दुःख असे होते की, कुटुंबात बाहेरचं लावलेलं होतं. माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती. माझे वडील दारू पिण्याचा नादात, घरातील सर्व दागिने गहाण ठेवून दारू पीत असायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली होती.

माझ्या आईला मांत्रिकाचा त्रास होता. माझी आई रात्र भर झोपत नसायची. रात्रीचे १२ वाजले कि, माझी आहे घुमायची. तिला स्वप्नात एक माणूस, मला व माझ्या वडिलांना मारतांना दिसायचा. हे बघून माझी आई घाबरून व दचकून उठायची आणि रडायची.  ती म्हणायची कि, "तुम्ही माझ्यासमोर बसून राहा", माझ्या आईच्या स्वप्नातीलं माणूस आमच्या घरासमोर राहत होता. त्यामुळे माझी आई घाबरायची.

असे काही दिवस चालले. नंतर माझ्या वडिलांचे सुद्धा डोकं दुखायचे. रात्री १२ वाजले कि, माझे वडील घराबाहेर जायचे. हे बघून मी घाबरत होतो आणि मला रडायला येत होतं. मला वाटायचं मी काय करू? कोणाकडे जाऊ?

माझ्या आईची आई, म्हणजेच माझी आजी, माझ्या आईची भेट घेण्याकरिता आली. आजी मार्गातील सेविका होती (आई चा लग्नानंतर मार्गात प्रवेश). त्यामुळे माझ्या आजीने वडिलांना मार्गाबद्दल माहिती दिली. नंतर आम्ही सर्व जण झोपलो आणि आजी रात्री १२ च्या सुमारास झोपेत बोलत होती. नंतर सकाळच्या वेळेस, मी तिला विचारले की, "रात्री काय बडबडत होतीस", तर आजी म्हणाली की, "तो तुझ्या घरासमोरचा माणूस, मला म्हणत होता की, तू खूप शहाणी झालीस काय? त्यांना मार्ग घे म्हणत आहेस".

तर आजी म्हणाली की, "मी भगवंताचे नाव स्मरण केले, तेव्हा बाबा आले आणि तो लगेच पळाला"! हे सर्व माझ्या स्वप्नात झाले, म्हणून बडबडली असेल.

पुढे काही दिवस त्रासात लोटले आणि माझ्या आईची प्रकृती खूप जास्त खराब झालेली होती. काही दिवसातच पोळा होता, तेव्हा माझे वडील एका मांत्रिकाजवळ गेले. ते म्हणत होते की, "परमात्मा एक मार्ग घे, नाहीतर तुझी पत्नी मरून जाईल". माझे वडील घरी आले व घडलेलं सर्व सांगितलं. पुढे पोळा सण झाल्यावर माझ्या वडिलांचे मित्र, वडिलांना म्हणाले की, "तुला तुझ्या पत्नीची चिंता नाही आहे वाटते", तुला तिला असेच मारायचे आहे कि काय ? 

"त्यापेक्षा मार्गात ये, सर्व नीट होईल".

नंतर आम्ही माझ्या आईसोबत, मार्गदर्शक श्री. रमेशजी धनजोडे यांच्या घरी गेलो. तिथे मार्गदर्शकांनी मार्गाबद्दल सर्व माहिती दिली. सर्व जुने विचार व देवी-देवतांच्या फोटोचे विसर्जन करायला सांगितले आणि वडिलांना सांगितले की, "तुम्हाला यापुढे कधीही दारू पिता येणार नाही म्हणून, मन पक्के करावे". मला तिथेच परमेश्वरावर विश्वास बसला कारण, त्यांच्याकडे आम्ही आईला नेतांना, पकडून कसेबसे नेले. परंतु, मार्गाबद्दल सर्व माहिती दिल्यावर, आम्हाला ३ दिवसांचे साधे कार्य दिले आणि परत घरी येतांना आई स्वतः आमच्यासोबत चालत आली.

पुढे आम्हाला मार्गदर्शकांनी ७ दिवसांचे साधे कार्य दिले. आम्हाला खूप समाधान लाभले व कित्येक दिवसांचा चुकीचा काळ दूर झाला आणि परमेश्वराची जाणीव मिळाली. आम्हाला कार्यात समाधानी लाभली व आमच्या कुटुंबात आनंद दरवळू लागला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार.

सेवक : प्रफुल दिलीपजी थोटे
रा : आझाद चौक, कुही, जिल्हा: नागपूर
सेवक नंबर : २४२२६
मार्गदर्शक : श्री. रमेशजी धनजोडे
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

1 comment:

  1. दैवी शक्तीचा खूप सुंदर अनुभव दादा
    नमस्कार जी

    ReplyDelete