Followers

Monday, 18 May 2020

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】


                                 【माझा अनुभव】
अनुभव क्रमांक: १८३ प्रकाशित दिनांक: २३ नोव्हेंबर २०१६

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】

माझे नाव 'तेजस्विनी विकासजी उराडे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

आमचे मार्गात येण्याचे कारण हे की, माझे बाबा खुप व्यसनी होते. दारू, सट्टा, लॉटरी, यांचे त्यांना खुप व्यसन होते. ते फारसे जास्त वेळ घरी राहत नव्हते. ऑफिसला जायच्या नावाने निघायचे आणि कुठे पण जायचे. घरची परिस्थिती खुप खराब होती. त्यांना घरी काय असते-नसते त्याची काहीच जाणीव (चिंता) नसायची. ते खुप जास्त दारू प्यायचे. 

त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कर्ज करुन ठेवलेले होते. नोकरीवर पण नव्हते त्यामुळे पगार मिळत नव्हता. यामुळे घरची परिस्थिती खुप खराब होती. बाबा दारू पिऊन यायचे आणि आईला-ताईला आणि आम्हाला खुप मारायचे. बाबाचे दोन्ही यकृत खराब झाले होते. बाबांना डॉक्टरने सांगितले होते की, फोटो मोठी करुण घ्या हार घालण्यासाठी (म्हणजे मरण्याच्या वाटेवर लागने), तरीही ते काही सुधरले नाही. रोज दारू पिऊन येणे आणि मारझोड करणे, शिव्या-गाळी करने हाच नेहमी प्रकार चालायचा.

माझी आत्या मौदा येथे राहत होती. त्या बाबांना नेहमी म्हणायच्या की, अगरबत्तीची पूजा असते तो मार्ग (परमात्मा एक मानव धर्म)घेत का नाही? तर बाबा सर्वांना म्हणायचे की, मी खुप अगरबत्त्या आणि खुप मेनबत्त्या लावल्या, पण माझी दारू कधीच नाही सुटनार.

त्यानंतर आमच्या घराजवळून काही अंतरावर एक सेवक काकाजी राहात होते. त्यांचे नाव घुले काकाजी असे आहे, ते मार्गात होते. त्यांनी आईला सांगितले होते. पण, बाबा आईचे ऐकत नव्हते. एक दिवस ते काकाजी बाबांना भेटले व त्यांना मार्गाबद्दल पुर्ण सविस्तर माहीती दिली, अनुभव सांगितले, तर बाबा तयार झाले की, ठीक आहे, जर चांगले होईल तर मी करणार.

त्यानंतर आम्ही आमच्या मार्गदर्शक काकाजीकड़े गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली. पण मार्ग देण्यास नकार दिला की, मी आता मार्ग देऊ शकत नाही. आमचे कार्य सुरु आहे. तेव्हा बारा वर्षातून येणारे त्यागाचे(शुद्धीकरण) कार्य सुरु होते. तर त्यांनी आम्हाला दहा ते बारा दिवस दिले. आम्ही घरी आलो नंतर बाबांनी पुन्हा तेच सुरु केले. 

त्यानंतर आम्ही दहा ते बारा दिवसांनी काकाजीकड़े गेलो, काकाजींनी आम्हाला तीन दिवसाचे कार्य दिले. आम्ही घरी आलो. माझ्या बाबांनी आम्हाला घरी सोडले आणि ते बाहेर गेले. आम्ही घरी गेलो तर आमच्या घराला पूर्ण इलेक्टरीक करंट होता. आम्ही बाबांना फोन केला आणि घरी बोलावले आणि घरा जवळचे सेवक त्यांना आणि काकाजींना कॉल केला. ते म्हणाले बाबाचे नाव स्मरण करा आणि घरी प्रवेश करा. आम्ही तसेच केले तर, करंट कुठे गेला कळलच नाही.

घुले काकाजी आम्हाला म्हणाले, मार्गात मरावं लागते "मरे या जिये भगवंत नामपर" या तत्वाप्रमाणे. आम्ही आमच्या घरचे पूर्ण देवांचे विसर्जन केले आणि काही काका, मामाकडे दिले. काकाजींनी सांगितले, सकाळी उठून आंघोळ करुण विनंती करावी लागणार. आम्ही बाबाला पाठ आणायला सांगितले आणि घरी साफसफाई सुरु केली. बाबा बाहेर गेले आणि दारूच्या दुकानाजवळ जाऊन बसले. पण काय माहिती काय झाले? आत जाण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. पाठ घेवून घरी परत आले. त्या दिवसापासून आम्ही कधीच बाबाला दारू पिऊन असलेल्या व्यक्ति जवळ उभे सुद्धा पाहिले नाही. मार्गात आम्हाला खुप सुख समाधानी मिळाली.

त्यानंतर ६ जून, २०१४ ला माझे वडील परमेश्वरात विलीन झाले. आम्हाला आलेला अनुभव, ज्या चुकीमुळे आज माझे वडील आमच्यात नाहीत. शब्द रूपी परमेश्वर असतो, हे सत्य आहे. यावर आलेला अनुभव मी आपल्यासमोर सांगू इच्छिते. 

माझी ताई अभ्यासात खूप हुशार नव्हती. पण बाकी गोष्टी पण ती मन लावून करत होती. ताई अभ्यासात हुशार नसल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरविले व बारावीत असतांना तिचे लग्न जुळले. तिचे लग्न पक्के झाले आणि लग्नाची २७ फेब्रुवारी तारीख ठरली. ताईची बारावीची परीक्षा २२ की २३ फेब्रुवारी पासून होती, तर ताई परिक्षेचे ओळखपत्र आणायला शाळेत जायला घाबरत होती. कारण तीला वाटत होते की, माझे सर आणि मॅडम मला रागावणार, इतक्या लवकर लग्न करत आहे म्हणणार. ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती. जितके काम असेल तितकेच बोलायची. आम्हाला माहिती होते की, ताई भितीमुळे शाळेत जाणार नाही. तेव्हा माझे वडिल त्यांच्या मुखातून काही शब्द काढून खूप मोठ्या त्रासात गेले. 

त्यांनी ताईला म्हटले की, तु शाळेत जा आणि परिक्षेचे ओळखपत्र घेऊन ये. जर कोणी रागवले किंवा काही म्हटले तर त्यांना सांग की, माझ्या वडीलांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या  आहेत, म्हणून ते माझे लग्न करून देत आहेत. कळत-नकळत बाबा असे का बोलले माहिती नाही? माझ्या ताईचे लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर आई-बाबा, मी, ताई-भाऊजी फिरायला गेलो. फेब्रुवारी मध्ये त्यांचे लग्न झाले आणि आम्ही एप्रिलच्या शेवटी फिरायला गेलो. तिथे माझ्या बाबांची प्रकृती खराब झाली. नंतर उपचार वैगरे केल्यावर कळले की, बाबांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. 

भगवंताने बाबांना व आम्हाला शिक्षा दिली की, जिभेला हाड नसल्यामुळे वाटेल ते बोलू नये. सेवकांनी खोटे बोलल्यावर भगवंत लगेच शिक्षा देतात. त्यानंतर आम्ही माफीचे कार्य केले आणि बाबांचे उपचार चालु ठेवले. अपेक्षा होती की, यश मिळेल पण यश मिळाले नाही. त्यांनी ५ वर्ष रक्तशुद्धीकरण केले आणि सहाव्या वर्षी ते परमेश्वरात विलीन झाले. 

त्यानंतर आम्ही कार्य केले आणि नंतर त्यागाचे कार्य केले व पक्के सेवक झालो. आता माझ्या भावाला माळ दिली आहे. आता सर्व ठीक आहे आणि माझे पण लग्न झाले. मी आता लग्नानंतर अनेकात आहे. आपल्या मार्गात शब्दाला खुप महत्त्व आहे. मला याचा अनुभव आला आहे, म्हणून सेवकांनो विनंती करते की, कधीही विचार करून मुखातून शब्द काढावे.  

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार...!

सेविका :- तेजस्विनी विकासजी उराडे
पत्ता :- रा. परसोडी वाघमारे ले-आऊट, उमरेड

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

3 comments:

  1. खूप छान अनुभव ताई
    सेवकांनी शब्द वापरतांना विचार करून वापरला पाहिजे.

    ReplyDelete