"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२५)
"ईच्छा अनुसार भोजन"
मोगरकशा तलावावर घडलेल्या प्रसंगातून सर्व सुखरुप मंगरली या गावी संध्याकाळी आल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांना हया मार्गावर ते तत्व, शब्द आणि नियम शिकविले आहेत तसेच या मार्गची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आलेत त्यावर आपआपले विचार मांडले. त्यानतर बाबांचे मार्गदर्शन झाले. सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली. त्या वेळेस रात्रीचे बारा वाजले होते.
बैठक समाप्त झाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले, आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्यावयास पाहिजे. या गावात आल्यापासून दोन दिवस झाले. पण दूधाचा चहा मिळाला नाही. तर आता पाहिजे अशी इच्छा प्रगट केली. सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की, बाबा एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दूध कोठून मिळणार? घरीपण दुध नाही. कारण माझ्या घरच्या म्हशी जगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरुसुध्दा तिच्याबरोबर होते. त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दुध पिऊन टाकले. म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातुन चरुन आल्यात तेव्हा मी दुध काढण्याकरिता गेलो असता म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही. आता सांगा बाबा, मी दुधाचा चहा कसा पाजु? तेव्हा बाबा म्हणाले, मला माहित नाही की दूध कोठे मिळेल! तुम्ही दुध कोठुनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा. तो सेवक गवळी होता व साधारणतः ऐंशी वर्षाचा म्हातारा होता. तो बाबांना म्हणाला, बाबा या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळत नाही हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणले, मला तुमचा अनुभव माहीत नाही. आणि त्याचे काही करावयाचेही नाही. आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे. तेव्हा त्या सेवकाने बाबांना विनंती केली की, बाबा आपण मला मार्गदर्शन करा की मला दुध कोठून मिळेल?
महानत्यागी बाबा जुमदेवजी सर्वांना उद्देशुन म्हणाले, मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केलेली आहे. भगवंत दूध देईल. त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले, ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिले नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की, बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजींना दुधाचा चहा पाहिजे, तर बाबांकरिता दुध द्या. बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबांच्या आदेशाचे पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली. त्यानंतर तो बाहेर आला. भगवंताचे नामस्मरण करुन त्याने म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो म्हशीचे दूध काढू लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या म्हशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशींचे दृध तो चर- चर करीत काढू लागला. त्या म्हशीने साधारणतः दोन लिटर दुध दिले. या मार्गातील सेवक नवरगावचे सरपंच श्री. वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहावयास गेले असता त्याला दुधाने पूर्ण भरलेले भांडे दिसले. त्याने तो गंज आणून बाबांजवळ ठेवला तेव्हा सर्वजण ही भगवंताची लीला बघून अवाक झाले. त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले, या संपूर्ण दघाचा चहा बनवा. त्यात मुळीच पाणी टाकु नका आणि थेंबभर दुध शिल्लक ठेवू नका. त्याप्रमाणे त्या संपूर्ण दुधाचा चहा बनवुन तो सर्वांना दिला.
तो म्हातारा गवळी सेवक बाबांना म्हणाला की बाबा याच म्हशीप्रमाणे दुसरी म्हैस सुध्दा दुध देईल काय? त्यावर बाबांनी उत्तर दिले तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पाहा. तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागत असाल तर परमेश्वर नक्कीच यश देईल. परमेश्वर देतो पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही.
म्हणून बाबांनी तत्वात सांगितले आहे की, "इच्छा अनुसार भोजन" म्हणजेच मानवाने कोणतीही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो, ती पूर्ण करतो. पण त्याकरिता एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे.
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जिवन एस. पाटील: 7020000823
सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
छान माहिती मिळाली जी दादा
ReplyDelete।इच्छानुसार भोजन म्हणजेच मनात चिंतन
ReplyDeleteकरीत असलेले असाध्य कार्य ज्याला कठिन कार्य म्हणतो त्या कार्याची पूर्ण होण्यासाठी मनात आनलेली उत्कठ भावना त्या कार्यावर एक चित्त एक लक्ष जेव्हा आपण केंद्रित करतो तेव्हा आकर्षण निर्माण होतो त्या आकर्षण मधे असलेली तीव्रता आपले असाध्य कार्य पूर्ण करते। बाबा ची दुधाचा चहा पिण्याची उत्कठ भावना त्यानी दुधावर एक चित एक लक्ष केंद्रित केले आणि आकर्षण शक्ति निर्माण झाली आणि इच्छानुसार भोजन प्राप्त झाले। म्हणूनच परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी बाबानी एक चित्त एक लक्ष सेवकाना सांगितले आहे।
खूपच सुंदर माहिती दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई
🙏जी दादा व ताई
ReplyDelete