Followers

Monday, 18 May 2020

【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】


                            【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९०) प्रकाशित दिनांक: ३० नोव्हेंबर २०१६

     【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】

माझे नाव 'रविंद्र खुशालरावजी पराते' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझ्या दैनंदिन जीवनात आलेला चौथा अनुभव सादर करीत आहे.

नागपूर ते भंडारा रोडवरील महालगांव या ठिकाणी डॉक्टर श्री. लखुजी साबळे हे पशुवैद्यकीय अधिकारी राहतात. ते मला व माझ्या हाताखाली असलेल्या मुलाला जवळपास सहा ते सात महिने पासुन औषधीचे ऑर्डर देतो म्हणायचे, पण द्यायचे नाही. असेच सहा ते सात महिने निघून गेले. तर मी एक दिवस अचानक त्यांना फोन केला तर ते मला म्हणाले की, "पराते जी मुझे आपसे कोई बात नही करनी", आणि फोन ठेवून दिला!

 मी एकदम शांत झालो आणि विचारात पडलो की, माझी अशी कोणती चुक झाली? हे साहेब असे नाराज झाले. परमेश्वराला मी तेव्हाच प्रणाम केला व म्हटले, "बाबा माझ्या चुकीची मला क्षमा करा". तो दिवस तसाच गेला. तेव्हा माझे कार्य सुरू होते आणि आम्ही सर्व सकाळी उठून भगवंताच्या समोर विनंती ला बसलो व बाबांसमोर शब्द ठेवले की, बाबा डॉक्टरांना सद्बुद्धी द्या, त्यांनी ऑर्डर पण दिला पाहिजे व ते भेटले पण पाहीजे आणि पहा सेवकांनो बाबाची कृपा, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही फोन न करता त्यांच्याकडे गेलो व त्यांची जाण्याची व आमची पोहोचण्याची वेळ ही एक झाली. बघा सेवकांनो भगवतांनी माझी हाक ऐकली. मग आम्ही आतमध्ये बसलो. सर्व नीट पार पडले व जायच्या वेळी डॉक्टर स्वतः म्हणाले की, "परातेजी ऑर्डर तो लिखो" तेव्हा मी एकदम खुश झालो आणि मला साहेबांनी छान अशी औषधींची ऑर्डर दिली.

तेव्हा मी सर्वप्रथम भगवंताचे आभार मानले आणि माझा तो दिवस आनंदात गेला. डॉक्टर साहेब पण तेव्हा पासून नेहमी ऑर्डर देत असतात.  

एक अनुभव आणखी सांगु इच्छितो, माझा मुलगा प्रसाद रविन्द्र पराते. याचे जन्मतःच वजन हे १.४ किलोग्राम होते. वजन वाढविण्यासाठी डॉक्टरांनी जे जे सांगितले ते सर्व आम्ही केले पण वजन काही वाढेलच नाही. सर्व औषधोपचार झाला, चेकअप झाले पण फरक काही पडेना. एक गोष्ट नंतर लक्षात आली ती म्हणजे, माझ्या पहील्या बाळाला जो आजार (CMV) होता. तर मी त्या विषयावर डॉक्टर सोबत चर्चा केली तर ते म्हणाले की, त्या (CMV) आजाराचे प्रतिजैविके त्याच्या आईच्या शरीरात आहे, त्यामुळे त्याला याची भिती नाही. पण माझे मन काही मानेना. तर मी डॉक्टरांना विनंती केली आणि ती (CMV) टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आली. 

नंतर डॉक्टरांनी त्या आजाराचा उपचार सुरू केला. जवळपास तो उपचार १ ते दोन महीने चालला. नंतर डॉक्टरांनी सांगितले की, आता हा सुरक्षित आहे. कसलीही भिती नाही. वजन हळूहळू वाढेल. परंतु माझे सासरे म्हणाले, जावई तुम्ही याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. तर मी सर्वप्रथम माझे मार्गदर्शक श्री. विष्णुजी ठवकर मु. बिडगणेशपूर यांची भेट घेतली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मार्गदर्शक काकाजींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की, त्याला आता काहीही होणार नाही. कोणत्याही डॉक्टर कडे न्यायची गरज पडणार नाही. पण माझे सासरे काही ऐकत नव्हते. तर एक दिवस मी म्हणालो चला तुमची इच्छा पुर्ण करून घेऊ तुम्ही सांगाल त्या डॉक्टर कडे जाऊ. 

तर ते म्हणाले ठिक आहे आणि आम्ही नागपूर रामदासपेठ येथे बाळाचे तज्ञ डॉक्टर साल्पेकर कडे नेले. जेव्हा डॉक्टरांनी बाळाला चेक केले तेव्हा ते म्हणाले, हा एकदम मस्त आहे. याला कुठलाही त्रास नाही. वजन खाण्यापिण्याणे वाढेल. तर, अशाप्रकारे भगवंत नेहमी माझ्या शब्दावर उभे राहिले. माझ्या कुटुंबात आनंद बहरला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागते.

नमस्कार..!

सेवक: रविन्द्र खुशालरावजी पराते
रा: पुलगाव, जिल्हा: वर्धा 
सेवक नंबर: ४२४००
मार्गदर्शक: श्री. विष्णूजी ठवकर 
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


1 comment:

  1. खूप छान अनुभव दादा
    नमस्कार जी दादा व ताई

    ReplyDelete