Followers

Wednesday, 6 May 2020

प्रकरण क्रमांक: (११) "प्रथम सेवक"

      "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
        'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (११) 
   
  "प्रथम सेवक"

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर तिचा लाभ अनेक गोरगरीब आणि दु:खी कष्टी लोकांना मिळू लागला. बाबांनी भगवंताला शब्द दिल्याप्रमाणे ते निष्काम भावनेने इमाने इतबारे भगवंत प्राप्ती मानवाला जागविण्याचे कार्य करु लागले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात जे काही शारीरिक आर्थिक किंवा मानसिक दु:ख असेल त्यातुन त्यांना मुक्त करून त्यांना सुखी समाधानी केले. याप्रमाणे अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला. त्यातील काही लोक या मार्गाचे उपासकही (सेवक) बनले. त्यापैकी यामार्गाचे प्रथम सेवक बनण्याचे श्रेय श्री. गंगारामजी रंभाड यांनी घेतली.

श्री. गंगारामजी रंभाड हे टिमकी येथे बाबांच्या मोहल्यात राहणारे. बाबांच्या घराशेजारी गडीकर यांचा क्लब होता. तेथे कॅरम वैगरे करमणुकीची साधने होती. त्या मोहल्यातील लोक सायंकाळच्या सुमारास फावल्या वेळात तेथे करमणुक करण्याकरिता जमा होत असत. बाबा देखील फावल्या वेळी तेथे जाऊन बसत असत. तेथे ते परमेश्वराप्रती मानवला जागविण्यासाठी नेहमी चर्चा करीत असत. बाबांची ही चर्चा ऐकुन तेथील लोक त्यावर विचार करीत असत. त्यातील काही जण याचा लाभही घेत असत. याच क्लबमध्ये गंगारामजी रंभाड हे सुध्दा नेहमी येत असत आणि बाबांच्या चर्चेत सहभागी होत असत.

गंगारामजी रंभाड हे हिंदु संस्कृतीत वाढलेले त्यांचे घराने गुरूमार्गी होते त्यांचे गुरूजी सोनारबाबा नावाचे होते. तरी सुध्दा ते भूतबाधेने पीडित होते. त्यांच्या अंगात भूत पलित येत होते. त्यामुळे खुब  त्रस्त झाले होते. गुरूमार्गी असूनही त्यांचे गुरू त्यांना या दु:खातून मुक्त करू शकले नाहीत. तेव्हा त्यांचा देवावरचा विश्वास उडला होता. त्यांना वाटत होते की जगात देव नाही. सर्व गुरू सारखेच आहेत. नुसते देवाच्या नावावर लोकांना लुबाडून आपले पोट भरतात. ते देवाचे उपासक आहेत असे दाखवितात. ते थोंडात आहेत. जे लोकांचे दु:ख दुर करू शकत नाहीत, ते गुरू कसले आणि त्यांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली आहे, तो जर या गुरूंना मदत करीत नसेल तर तो परमेश्वर कसला ? या अनेक विचारामुळे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडाला होता. त्यांनी गुरूच्या प्रयत्नाव्यतिरिक्त आपले दु:ख दुर करण्याकरिता समाजात सुरू असलेल्या जुण्या रूढीप्रमाणे अंधश्रध्देचा उपचार केला. डॉक्टरांचे औषधोपचार केले. पण काहीही उपयोग झाला नाही. त्यांची प्रकृती ती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे मन उव्दिग्न झाले होते. 
    
एक दिवस महानत्यागी बाबा जुमदेवजी क्लबमध्ये परमेश्वराबद्दल चर्चा करीत असतांना गंगारामजी रंभाड यांनी बाबांना प्रश्न केला की जगात परमेश्वर नाही काय ? तेव्हा बाबांनी उत्तर दिले, "परमेश्वर नक्की आहे" परमेश्वर ही वस्तु दिसत नाही आणि ती कोणी पाहू शकत नाही. ती आत्मजोत आहे. ती चोवीस तास जागृत असून चैतन्य आहे. गंगारामजींनी पुन्हा प्रश्न केला की, मी गुरूमार्गी आहे. माझ्या अंगात सैतान, भूतपलित येतात. ते काही केल्या निघत नाहीत. गुरू हा परमेश्वराचा उपासक असतो. तो परमेश्वराच्या साहाय्याने लोकांची भूत पलिते नष्ट करून दु:ख नाहीसे करतो. असे असतांना माझे दु:ख का नाहीसे होत नाही ? इतके बोलून बाबांसमोर प्रश्न ठेवला की, भगवान आहे असे तुम्ही म्हणता तर मला तो दाखवू शकता काय ? बाबा लगेच उत्तरले, ठिक आहे. घरी चला मी तुम्हाला परमेश्वर दाखवितो. त्यानंतर बाबा आणि गंगारामजी रंभाड हे दोघेही गंगारामजींच्या घरी गेले. 

    "परमेश्वर म्हणजे काय"

घरी गेल्यावर बाबांनी त्यांना कापूर आणि अगरबत्ती आणावयास सांगितली. कापूर आणि अगरबत्ती. आणल्यावर ते बाबांच्या समोर बसले. बाबांनी अगरबत्ती लावली. कापूर ज्योत लावली. कापूर विझल्यावर गंगारामजींच्या दोन्ही डोळ्यांना अश्रूंची धार लागली. ते खूप रडू लागले ते काहीच बोलत नव्हते. काही वेळाने ते शांत झाले.

बाबांनी त्यांना समजावले. गंगारामजी भगवंताची ज्योत लावली. त्यासमोर ती ज्योत कमी पडली. त्यामुळे तिची प्रखरता कमी झाली. भगवंताने तुमची आत्मज्योत चैतन्य केली. म्हणून तुम्ही खूप रडू लागले. असे बाबांनी निरूपण केले. कारण माणूस जरी सर्व व्यवहार करतो तरी व्यवहार करतांना माणसाला वाटते की आपण जागृत आहो. व जे करतो ते चांगले व सत्य करतो. परंतु काही वेळेस त्यांचे मन काही व्यवहार करतांना ग्वाही देत नाही. आणि मनात सारखे काहीतरी विचार करीत असतो. तेव्हा तो खरे व्यवहार करीत नाही म्हणून त्याचे मन त्याला सारखे डिवचत असते. म्हणजेच त्याची आत्मज्योत जागृत होऊन त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नाही. आणि हिच त्याची खरी आत्मप्रचीती आहे. आणि हाच आत्मा परमात्म्याचा एक भाग आहे. हाच परमात्मा खरा "परमेश्वर" आहे. तो चोवीसही तास मानवाजवळ जागृत असून चैतन्य आहे.

जेव्हा मानवाच्या आत्म्याला काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा मानव भयभीत होतो आणि त्याचे आत्मबल कमी होते. त्यामुळे त्यावर भयभीत करणारी दुसरी कल्पनारूपी शक्ती स्वार होते. तिला तो भूत समजतो आणि म्हणून ही कल्पनारूपी शक्ती त्याच्या मनातून केव्हाही निघत नाही.
   
भयभीत झालेले लोक जेव्हा बाबांकडे येतात तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत असतात की, अचेतन शक्ती आहे. मानवाला तेव्हाच सेवक मानले जाते जेव्हा त्याचा आत्मा चैतन्य बनतो. आणि तो आत्मा त्याला जागृत करतो. जरी माणसाला असे वाटत असेल की, साक्षात्कार मिळाला म्हणजे आत्मा चैतन्य झाला पण यांस बाबा कधीही मान्य करीत नाही. कारण माणव स्वभाव असा आहे की, तो मोह, माया, अहंकार यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात या गोष्टी फार लवकर तयार होतात. आणि तो अचेतन होऊ शकतो. कारण बाबा विदेहावस्थेत असतांना परमेश्वराने त्यांच्या सह संपूर्ण मानवाला बेईमान म्हटले आहे हे बाबांना त्याने शिकविले आहे. म्हणून बाबा नेहमी सांगतात की, जो पर्यंत मानव परमेश्वराबद्दल जागृत होत नाही, तो पर्यंत त्याचा आत्मा चैतन्य होऊ शकत नाही. 

बाबांनी परमेश्वराचे जे संतुलन केले आहे, जी जागृती आत्मातून मिळाली आहे ती खरी भगवंताची शक्ती आहे. ती निराकार आहे. बाबांनी तिला आकार करून दाखविली आहे. ती अदृश्य आहे. तिला कोणीही पाहू शकत नाही. तिचे फक्त गुण दिसतात. परंतु बाबांनी त्या शक्तीला पाहले आहे. बाबांनी विश्वाएवढा एकच डोळा पाहीला आहे. ती अफाट शक्ती आहे. तीच खरी आत्मजोत आहे. ती प्रत्येक मानवात आहे आणि तोच परमेश्वर आहे. त्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

[माझा अनुभव] 【"अज्ञानी सेवक, कुव्यसनांच्या आहारी जाऊनी होत्याचे नव्हते करी"】

【"माझा अनुभव"】अनुभव क्रमांक (१६३) प्रकाशित दिनांक: ०४ मार्च २०१६

【"अज्ञानी सेवक, कुव्यसनांच्या आहारी जाऊनी होत्याचे नव्हते करी"】
माझे नाव 'कुंडलिक उमेशजी मोहबे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात एकूण ५ सदस्य होते. माझे आई-वडील, मोठी ताई, लहान ताई आणि मी. सर्व सेवकांना माहिती आहे की, या मार्गात येणारा सेवक हा दुखीच येतो. सुखी मानव आपल्या मार्गात येत नाही. याच प्रकारे आमच्या परिवारात सुद्धा फार दुःख होते. ते असे की, आमच्या गावातील एका व्यक्ती आमच्यावर जादू चालवित असे. त्यामुळे आमच्या परिवारात माझ्या आईला खुप त्रास होत होता. माझी आई लघवी करायला बसू शकत नव्हती, एखाद्या भिंतीवर किवा कुंपावर एक पाय ठेवून लघवी करावी लागत असे.

आम्ही आईच्या उपचाराकरिता खूप दवाखाने, पंडा, पुजारी यांच्याकडे जाऊन-जाऊन त्रासुन गेलो पण, काही आराम झाला नाही, त्यामुळे आर्थिक व मानसिक दृष्टीने बेजार झालो. माझे वडील पण खुप दारू पित होते व लोकांशी भांडण करत असायचे. आई कधी वडिलांना समजवायला गेली तर आईला माझे वडील मारत असे. एकप्रकारे कुटुंबातील अशांतीने आम्ही ग्रासून गेलेले होतो.

आमच्या कडे मनेरीचे दुकान होते. मनेरीचे दुकान घेऊन आई-वडील दुर्गाबाईच्या डोहावर दुकान लावण्याकरीता गेले व दुकान लावले असता, तिथे आमच्या दुकानाच्या बाजूला एक हॉटेल परमात्मा एक सेवकांचे होते व ते सेवक भाऊ व सेविका बाई दुकान चालवित होते. माझ्या आईने सेविका बाईला आमच्या परिवारातील सर्वांचे दुःख सांगितले.

तेव्हा ती सेविका म्हणाली की, आमच्या परमात्मा एक मार्गात जगातील सर्व दुःख दूर होतात. ते म्हणाले की जर तुम्ही या मार्गात आले तर तुमचे सर्व दुःख दूर होणार, तुमचा पाय पण बरा होणार. सेवक भाऊ व सेवकीन बाई ने परमात्मा एक मार्गाबद्दल संपूर्ण माहिती आई-बाबांना दिली.

दुर्गाबाईच्या डोहावरुन येई पर्यंत अंधार झाला होता म्हणून आई-वडिलांनी त्या सेवक भाऊ व सेवकीन बाईच्या घरी खोडशिवनी येथे मुक्काम केला. त्या सेवकांच्या घरुन परत आल्यावर आम्ही आपल्या परीवारातील पाचही सदस्य साकोली या गावी कार्य घेण्याकरीता श्री. बाबुजी मार्गदर्शक यांच्याकडे गेलो. तेव्हा त्यांनी आमचे सर्व दुःख विचारून मार्गाविषयी माहीती दिली. 

त्यांनी सांगितले की, जुने विचार बंद करुन व घरातील सर्व देवी-देवतांच्या मूर्ती व प्रतिमेचे विसर्जन करुन मार्गात यावे लागते. मग आम्ही घरी परत आलो व घरातील संपूर्ण देवी-देवतांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे विसर्जन केले. घरातील देवी-देवतांचे वृंदावन, लिंबु, धागे-दोरे यांचे सुध्दा विसर्जन केले आणि दुसऱ्या दिवशी मार्गात प्रवेश करण्याकरिता पुन्हा साकोलीला मार्गदर्शकांकडे गेलो.

मग आम्ही मार्ग स्वीकारला व मार्गदर्शकांनी दिलेल्या ३ दिवसांच्या कार्यात माझ्या आईच्या पायाला थोडा आराम झाला. नंतर सात दिवसांच्या व अकरा दिवसाच्या कार्यात माझ्या आईचा पाय पुर्ण पणे दुरुस्त झाला. भिंतीवर, कुंपनावर वगैरे पाय ठेऊन लघवी करायची गरज राहिली नाही. नंतर एक ते दिड वर्ष झाले सर्व छान राहिले आणि माझ्या वडीलांनी पुन्हा दारु पिने सुरू केले व तत्व शब्द आणि नियमांना तोडायला सुरुवात केली.

मग आमची परिस्थिती पुन्हा जशी मार्गात येण्याआधी होती तशीच झाली. आम्हाला पोटभर अन्न सुध्दा मिळत नव्हते. माझे वडील दारु प्यायचे आणि आईने वडीलांना काही म्हटले की, माझे वडील आईलाच मारायचे. मार्गी येऊन अशी आमची स्वकर्माने दुर्गती झाली. नंतर मला घेऊन माझी आई मामाच्या गावी गेली. मग माझे वडील मामाच्या गावी मला व आईला नेण्याकरीता येत असायचे परंतु, माझी आई वडिलांना म्हणत असे की तुम्ही दारु सोडाल व परमात्मा एक मार्गात जाऊन वचन द्याल तरच मी येते नाहीतर मी येत नाही. 

तीन ते चार महीने मी व माझी आई मामाच्याच गावी होतो. नंतर माझे वडील पुन्हा आम्हाला नेण्याकरीता मामाच्या घरी आले व आपण मार्गात जाऊ चला, म्हणुन आम्हाला घरी घेऊन आले. नंतर आम्ही चिचगड या गावावरुन कार्य घेतले. आता आमचे मार्गदर्शक श्री. इंद्रपालसिंहजी कश्यप यांच्या कडुन कार्य सुरू आहेत. आता बारा वर्ष झालेत आम्हाला पूर्णपणे सुख-समाधानी आहे व समाधान मिळाले आहेत. म्हणुन मी सर्वांना सांगू इच्छितो की या मार्गातील दैवी शक्तीची परीक्षा घेऊ नये, केव्हा आपले कुकर्म आपणास संपवतील ते या पृथ्वीवरील अज्ञानी मानवास कळणार पण नाही. आज आमचे भाग्य कि आम्ही सावरलो म्हणून आज परमेश्वरी कृपेचा साथ आमच्यासोबत आहे व आम्ही सुखी जीवन जगत आहोत.

लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक :- कुंडलिक उमेशजी मोहबे
पत्ता :- मु. बोरगाव (बा.),पो. फुटाना, ता. देवरी, जि. गोंदिया
मार्गदर्शक : श्री. इंद्रपालसिंहजी कश्यप, चिचगढ
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा  जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Tuesday, 5 May 2020

प्रकरण क्रमांक: (१०) " चार तत्व"

         "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (१०) 
 【"चार तत्व"】

महानत्यागी बाबा जुमदेवजी हे एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी विदेह अवस्थेत असतांना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले आणि त्यांना बेइमान म्हटले. त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्राती जागविण्याचे कार्य करीन असे वचन देऊन 'परमात्मा एक' , 'मरे या जिये भगवत् नामपर' हे वचन दिले. भगवंत बाबांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी बाबांना पुढील दोन वचने दिलीत. 'दु:खदारी दूर करते हुये उध्दार' आणि 'इच्छानुसार भोजन' हीच वचने या मार्गाचे सिद्धांत ठरून बाबांनी भगवतप्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही चार तत्वे दिली आहेत. 

१.  परमात्मा एक
२.  मरे या जीये भगवत् नामपर
३.  दु:खदारी दूर करते हुये उध्दार
४.  इच्छाअनुसार भोजन

■ १. परमात्मा एक

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अशा एका परमेश्वराचे, जो मानवाची सर्व प्रकारची दु:खे दूर करू शकतो, त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले. तेव्हा त्या परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले. 'तुज आहे तुजपाशी तरी तू भुललासी' या म्हणीप्रमाणे ते बाबांना म्हणाले, "सेवक तु मुझे कहाँ देख रहा है। मै २४ घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा, तेरा शरीर मृत हो जायेगा।" तेव्हा बाबांनी विचार केला की, अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जीवंत आहे. तेव्हा त्यांना आत्मा ही वस्तु आठवली. मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे. आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. संपुर्ण प्राण्यांचा आत्मा मिळून 'एक परमात्मा' आहे. म्हणजेच परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे. हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला 'परमात्मा एक' मानले. ती आत्मज्योत आहे. जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे. म्हणजेच सर्व मानव समान आहेत असे बाबा समजतात. त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत. कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे. आत्मा चोवीस तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे. म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे. ती निराकार आहे. ती आकारात येत असली तरी ती अदृश्य आहे. ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात.

■ २. मरे या जिये भगवत् नामपर

मानव हा पृथ्वीतलावर जन्माला आला तरी तो परमात्म्याचा एक अंश आहे. परमेश्वराने त्याला बुध्दी दिली असून इतर गुणांबरोबर त्याच्यात मोह, माया, अहंकार, निर्माण केला आहे. तो स्वत:ला सर्वेसर्वा समजतो. तो परमेश्वराला मानत नाही. त्यामुळे तो त्याचा बुध्दीचा उपयोग करून मोह, माया, अहंकारात फसतो. ज्यामुळे तो दु:खी होतो. ते दु:ख निवारण करण्याकरिता तो नाना तऱ्हेने उपचार करतो. परंतु जेव्हा त्याचे दु:ख नष्ट होत नाही, तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सांगतात की, मनुष्य हा सर्वोसर्वा नाही. परमेश्वर ही एक शक्ती आहे. मानव हा कर्मकर्ता आहे त्याने फळाची आशा करू नये. फळ देणारा भगवानच आहे. म्हणुन मानवाने जीवंत असतांना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करून त्याला प्रिय असणारे कार्य करावे. म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याचा आत्मा, परमेश्वरात विलीन होतो. अन्यथा तो चौऱ्यांशी योनीत फिरत असतो. त्या आत्म्याला अशांती मिळते आणि लक्ष चौऱ्यांशी भोग येतात. परमेश्वराला समोर ठेवून मानवाचे कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह, माया आणि अहंकार नष्ट होतात. यालाच म्हटले आहे की, " मरे या जिये भगवत नामपर।"

■ ३. दु:खदारी दुर करते हुये उध्दार

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगीतले आहे की, मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले. मोह, माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वांशी सत्य व्यवहार केले, तो मर्यादेने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. प्राकृतीक वातावरणामुळे त्याला दु:ख येते, तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अडी-अडचणी येतात. अशा वेळेस तो अनेक उपचार करतो. त्यावेळेस परमेश्वरालाच समोर ठेऊन उपचार केले तर त्याचे दु:ख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजरीत्या नष्ट होतात. या कामात परमेश्वर त्याला साथ देतो. सरतेशेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते. अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याच्या जीवनाचा उध्दार करतो.

■ ४. इच्छा अनुसार भोजन

मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालविण्याकरिता खुप गोष्टींची आवश्यकता भासते. तो आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनवु शकेल याकडे त्याचे जास्त लक्ष असते. तेव्हा त्याने भगवंताजवळ त्याला पाहीजे असलेल्या वस्तूंची इच्छा केली आणि परमेश्वराजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तू सहज सुलभरीत्या मिळते. हेच 'इच्छा अनुसार भोजन' होय. इच्छा अनुसार भोजनाचा अर्थ मानवाला केव्हाही जेव्हा त्याला जे काही खाण्याची इच्छा झाली, तर तेच खायला मिळाले पाहिजे असे नाही. जसे 'असेल माझा हरी, तर देईल पलंगावरी' हे चुकीचे आहे. त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याने इच्छा केली तरच त्याला ती वस्तू मिळते. अन्यथा मिळत नाही. म्हणजेच इच्छाअनुसार भोजनाकरिता त्याला त्याप्रमाणे कर्म करणे महत्वाचे आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

"मार्गाची विसरूनिया शिकवण, केले जवळ मित्र वाईट व्यसन', 'आहे जागृत शक्ती मार्गात, क्षणात दिली अद्दल चट्कन"

【"माझा अनुभव"】

【"मार्गाची विसरूनिया शिकवण, केले जवळ मित्र वाईट व्यसन, आहे जागृत शक्ती मार्गात, क्षणात दिली अद्दल चट्कन"】

माझे नाव 'बाळा नंदनकर' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव "चुकीच्या मित्रांसोबत संगत केल्याने परिवारावर किती मोठे संकट निर्माण झाले यावर आलेला अनुभव" सादर करीत आहे.

ही गोष्ट वर्ष १९८९ ची आहे. आपल्या मार्गात दारू पिण्यास मनाई आहे, हे माझ्या सर्व मित्रांना माहित होते. तरीपण ते मला न सांगता गोळीबार चौक मध्ये एका बियर बार मध्ये घेऊन गेले. मला माहीत नव्हते की, दारू म्हणजे काय होते? आणि बियर बार कशाला म्हणतात? मी ३ मित्रांसोबत बियर बार मध्ये गेलो, तर तिथे प्रकाश फारच कमी होता. मग त्यांनी स्वतःकरीता बियर आणि नाश्ता बोलवला आणि माझ्या करीता थंडी पेप्सी मागवली. मी चुप चाप बसून पेप्सी पित होतो. मग सर्व मित्र मला म्हणाले की, काय तु पेप्सी पित आहे, ही बियर पी, ही दारू नाही आहे, पेप्सी सारखी आहे. मी सर्व मित्रांना मनाई केली, परंतु त्यांनी मला जबरदस्तीने बियर दिली आणि मी एक ग्लास ती बियर घेतली.

मग मी घरी आलो आणि जेवण करून झोपलो. ही गोष्ट मी घरी आपल्या आई आणि वडिलांना सांगितली नाही. अशाप्रकारे मी मार्गाच्या शिकवणूकीचे उल्लंघन केले व बाबांनी दिलेल्या मर्यादेचे पालन केले नाही. नंतर काही दिवस ठीक गेले आणि मी पण ही गोष्ट विसरून गेलो.

माझ्या घरी तेव्हा गायी, म्हशींचा धंदा होता आणि घरी आटा चक्की सुद्धा होती. मग हळुहळु चक्कीचा धंदा कमी होऊ लागला आणि गायी, म्हशी पण दुध कमी देऊ लागल्या. यामुळे माझे वडील विचार करू लागले की, असे का होत आहे! वडील माझ्या आईला म्हणाले, काय चुक झाली की धंदा एकदम कमी झाला. मग माझ्या वडिलांनी कार्य पण केले, परंतु योग आला नाही. त्यानंतर माझे वडील विचार करू लागले की, काय चुक झाली!

मग एके दिवशी माझ्या वडिलांनी मला विचारले की, तुझ्या हातून काही चुक झाली काय? मी खोटे बोललो व म्हटले, नाही. माझ्या वडिलांना माझ्यावर पुर्ण शंका आली, कारण कार्य करून पण योग मिळत नव्हता. त्यामुळे माझे वडील पुन्हा म्हणाले की, मी पुन्हा विचारतो की, तु काही चुक केली काय? परंतु, मी चुप. 

माझ्या खोटे बोलण्यामुळे वडिलांना फारच राग आला आणि ते मला म्हणाले की, तु बाबांच्या समोर कापुर, अगरबत्ती लावुन सांग की, माझ्या हातून काहीच चुक झाली नाही. तेव्हा मला फारच भीती वाटली आणि कापूर, अगरबत्ती लावून बाबांच्या समोर बसलो आणि माझ्या तोंडातुन आपोआपच शब्द बाहेर आले आणि मी बाबांना सांगितले की, "बाबा मी मित्रांसोबत दारू पिली, त्याकरिता मला माफी द्यावी". हे शब्द ऐकुन माझे वडील माझ्यावर रागावले. त्यानंतर मी आपल्या वडिलांना झालेला पुर्ण प्रकार सांगितला.

मग दुसर्या दिवशी आम्ही सर्व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या निवास स्थानी गेलो आणि माझ्या चुकीची पुर्ण माहिती बाबांना सांगितली. त्यावर बाबा म्हणाले की, नीलकंठराव, उद्या पासून तुम्ही ११ दिवसांचे त्यागाचे कार्य करा. मग आम्ही ११ दिवसांचे त्यागाचे कार्य केले व आमचे कार्य पण छान झाले आणि धंदा पण अगोदरसारखा सुरू झाला व गाय, म्हैस पण व्यवस्थित दुध देऊ लागले.

आपण जर बाबांनी दिलेल्या शिकवणूकीच्या बाहेर गेलो, तर आपल्या परिवारावर किती मोठे संकट निर्माण होते हे या अनुभवातून जाणवते. त्यामुळे व्यसनी मित्रांची संगत न केलेलीच बरी. 

या मार्गात बाबांनी दिलेल्या ४ तत्व, ३ शब्द आणि ५ नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, यामुळे आपला परिवार सदैव सुखी, समाधानी आणि आनंदी राहतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक :- बाळा नंदनकर
पत्ता :- बाळाभाऊ पेठ, नागपुर.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 70200000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Monday, 4 May 2020

प्रकरण क्रमांक (९) "एका भगवंताचा पहिला गुण"

                     "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
               'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (९) 
   
                       "एका भगवंताचा पहिला गुण"

बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली. त्यानंतर ते जवळ जवळ तीन महिने विदेह अवस्थेत होते. ते परमेश्वरात विलीन झाले होते. रंगारी समाजाच्या शांताबाईच्या अंगात येणारे भूत पलित खुप प्रयत्न करूनही ते नष्ट करू शकले नाहीत, तिला समाधान देऊ शकले नाहीत. शेवटी बाबा हनुमानजीची प्राप्ती करूनही बाबांना तिच्या अंगात येणारे भूत नाहीसे करता आले नाही. परमेश्वरच मानवाचे कोणत्याही प्रकारचे दु:ख दुर करू शकतो. त्यालाच अनन्यभावे शरण जाणे आवश्यक असते हे लक्षात घेऊन त्या बाईला पुर्णपणे समाधान देण्याकरिता बाबा हनुमानजीजवळ पुन्हा प्रतीज्ञा केली की यापुढे जीवनात मी कोणत्याही देवाला (दैवत) मानणार नाही. यानंतर त्या शांताबाईला तिच्या दु:खापासून बाबांनी मुक्त केले. नंतर बाबांनी ते दु:ख दूर करणाऱ्या शक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली.

त्याच शांताबाईच्या घरात याच तीन महिन्यांच्या काळात, बाबा निराकार अवस्थेत असतानाही पुन्हा दु:ख आले. एके दिवशी या बाईची सासू बाबांच्या घरी रडत-रडत आपले दु:ख घेऊन आली. बाबा घरी नसल्यामुळे ती बाबांचे कनिष्ठ बंधू श्री. मारोतराव यांच्याकडे गेली आणि रडत बसली. त्या वेळेस बाबा हे त्यांचे जेष्ठ बंधू बाळकृष्णाजी यांच्या घरी बसले होते. तिला रडताना पाहून मारोतरावांचे मन गहिवरले. ते बाबांना हे सांगायला गेले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की, 'बाबा एक औरत रोते हुये आई है। बहुत रो रही है। लगता है बहुत बडे संकट मे फँसी है। आप चलिये। तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की, ठीक है। मैं आ रहा हूँ। तुम उस बाई को बगल मे खडे रखना ताकि उसकी छाँव हमपर न पडे। कारण बाबा निराकार अवस्थेत असताना परमेश्वराने त्यांना अशी जागृती दिली होती की, "सेवकपर किसी भी औरत की छाँव न पडे वरना वो जिंदा नही रहेगा। "त्याचप्रमाणे मारोतरावांनी त्या बाईला बाजुला उभे केले. बाबा घरी आले आणि आपल्या आसनावर बसले.

बाबा घरी आल्यावर त्यांनी त्या बाईला विचारले की, 'कहो बाई, आप कैसी आई ? क्यों रो रही हो ?' तेव्हा बाईने बाबांना विनंती केली की, 'बाबा आप जान लो मैं क्यों रो रही हूँ। आप बाबा है।' बाबा काहीच बोलले नाहीत. यावेळेस बाबा निराकार अवस्थेतच होते. ते परमेश्वरात विलीन झाले होते. त्यामुळे ते त्या बाईची अवस्था ओळखत होते. थोड्या वेळाने बाबांच्या मुखकमलातून खालील वाक्य निघालीत. बाबा म्हणाले :
"नाथ गोरख, हाजिर हो जाओ।"
"हाजिर बाबा।"
"जाओ, यमराज को बुलाकर लाओ।"
"चला बाबा।"
त्यानंतर दहा मिनिटे ते स्तब्ध राहिले. त्यानंतर पुन: ते म्हणाले, 
"यमराज आ गये"
"हाँ बाबा, मैं आ गया।"
"देखो यमराज, उस बच्चे के गले मे फासा डाला है। उसे निकालो, नहीं तो तेरे साथ यमपुरी उल्टी कर दूँगा।"
"नही बाबा, मै अभी उस बच्चे के गले का फासा निकालता हुँ।"
"नहीं तुम पहले जाओ, उसे निकालो, तू बेइमान है।"
"नही बाबा, आप मेरे साथ मेरी यमपुरी इल्टी कर दोगे। मुझपर विश्वास कीजीये बाबा !  मैं अभी फासा निकालता हुँ।"
"तुम अभी जाओ और उसका फाँसा जल्दी निकालो।"
"चला बाबा!"

त्यानंतर बाबा थोडा वेळ थांबले. सगळीकडे शांतता पसरली होती. काही वेळाने बाबा त्या बाईला म्हणाले, "बाई, तुम्हारा बच्चा ऊठकर बैठा है। उसे अभी ले जाओ" त्या बाईचे रडने थांबले. तिने बाबांना नमस्कार केला आणि ती हसत हसत घरी गेली आणि आश्चर्य हे की, त्या शांताबाईचा मुलगा उठून बसला होता. तिला खुप समाधान वाटले. ती बाई त्या मुलाला (नातवाला) घेऊन बाबांकडे आली. तिने बाबांचे दुरूनच दर्शन घेतले. अशा प्रकारे एका परमेश्वराने त्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. हा पहिलाच अनुभव या एका परमेश्वराने प्रथम त्या घरात दिला. याप्रमाणे बाबांनी केवळ पीडित आणि दु:खी लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी एका भगवंताची प्राप्ती केली.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

["अंधश्रद्धा सोडुनी मार्गात आलो, सर्व दुःखाचे निवारण होऊनी सुखी झालो"] हा अनुभव नक्की वाचन करा व आवर्जून शेयर करा.

                         【"माझा अनुभव"】

【"अंधश्रद्धा सोडुनी मार्गात आलो, सर्व दुःखाचे निवारण होऊनी सुखी झालो"】

माझे पुर्ण नाव 'राहुल यादवरावजी पराते' आहे. आज मी "माझा अनुभव" या मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे.

माझे जन्म भगवंताच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आशिर्वादाने आपल्या मार्गातच झाले. माझे आई वडील प्रथम या मार्गात आले होते. तरी माझ्या आई वडिलांतर्फे आमचे मार्गात येण्याचे कारण मी माझ्या शब्दात आपल्या समोर ठेवत आहे.

माझे वडील श्री. यादव उरकुडाजी पराते रा. मुल, जि. चंद्रपुर, मार्गात येण्याचे कारण असे आहे की, माझे वडील एम.एस.ई.बी. मध्ये उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून राजुरा, जि. चंद्रपुर येथे कार्यरत होते. त्यांचे जन्म गाव चंद्रपुर. माझे आजी व आजोबा चंद्रपुरला राहत होते. माझ्या वडीलांची तब्येत बरी राहत नव्हती. त्यांना कावीळ झालं होतं. त्यांनी डॉक्टर कडे जाऊन औषधोपचार केला व त्यांना तात्पुरते आराम पडले. तेव्हा आमचे काही नातेवाईक तंत्र मंत्र जानकार होते. ते म्हणायचे की, तुझ्या मागे जिन (काळी बाधा किंवा साडेसाती) लागलेली आहे. माझ्या वडीलांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही.

त्यानंतर माझ्या आई सौ. ममता यादवराव पराते आणि वडीलांचे लग्न एप्रिल १९८३ मध्ये जोडण्यात आले व २२ मे १९८३ ला त्यांचे लग्न होऊन वरात चंद्रपुरच्या घरी आली व वडीलांची तब्येत अचानक पुन्हा खराब झाली. त्यांना पुन्हा तोच कावीळचा त्रास व्हायला लागला. जेवतांना अन्नाचा एक घास सुद्धा पोटात जात नव्हता. त्यांना जेवतांना उलट्याच व्हायच्या. घरी सर्व वह्राडी मंडळी जमली होती. माझ्या वडीलांचे चुलत भाऊ, माझे काका श्री अशोक पराते नागपुर वरून त्यांच्या लग्नाला आले होते. काका त्यांचा प्रकृतीकडे पाहून फार व्यथीत होत होते. ते या मार्गाचे सेवक होते. त्यांचे वडील स्व. श्री रामभाऊ पराते हे मार्गदर्शक होते. त्यांनी माझ्या वडीलांना जवळ घेऊन सांगीतले की, 'यादव मी तुला एका भगवंताचे तिर्थ करून देतो तु ते तिर्थ घे'. त्यावर माझ्या वडील काहीच बोलले नाही.

आमच्या घरी त्यावेळेस मधल्या खोली मध्ये मोठया आकारात ओम काढला होता. त्यामध्ये साईबाबा, गजानन महाराज, व दत्ताची मुर्ती काढलेली होती. त्याच्यासमोर ते रोज नतमस्तक होऊन प्रकृतीची सुधारण्याची व जेवण करू देण्याची आराधना करीत होते. परंतु त्यांना याचा काही फायदा होत नव्हता. नंतर माझ्या काकांनी त्यांना एका भगवंताचे तिर्थ करून दिले. त्यादिवशी त्यांनी एक पोळी जेवण केलं. परत दुसर्या दिवशी पुन्हा तिर्थ बनवून दिलं तर दोन पोळी जेवण केलं आणि तिसर्या दिवशी पुन्हा तिर्थ बनवुन दिलं तर त्या दिवसापासुन पुर्ण पोटभर जेवण सुरू झाले व कोणत्याही प्रकारची बाधा न राहता त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली.

 त्यांनी माझ्या वडीलांना एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती रोज सकाळी व सायंकाळी लावण्यास सांगितले. कोणत्याही देवळात हात जोडायचे नाही. कोणतीही आरती घ्यायची नाही व एकाच भगवंताच्या नावावर मरायचे, सर्व देवांचे विसर्जन करायचे, कोणत्याही प्रकारचे व्यसन करायचे नाही. माझ्या वडीलांना दारूचे खुप व्यसन होते परंतू त्यांची प्रकृती तीन तिर्थात पुर्ण पणे बरी झाली. त्यांचा एका भगवंतावर विश्वास बसला व त्यांनी एका झटक्यात दारू सोडुन दिली व एका भगवंताची अगरबत्ती माझे वडील व माझी आई यांनी दोघेच मार्गदर्शकानी सांगितल्याप्रमाणे जवळपास एक वर्ष साधे कार्य केले. व नंतर ते दोघेही जानेवारी १९८४ ला सावनेर खापा येथे माझे काका व त्यांचे वडील मार्गदर्शक यांच्या घरी गेले. ते दोघांनाही महानत्यागी बाबा जुमदेवजी कडे टिमकी येथील निवास्थानी घेऊन गेले व बाबांची भेट करवून दिली. बाबांनी माझ्या आई वडिलांना परी पूर्ण मार्गदर्शन केले व त्यागाचे कार्य करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मार्गदर्शकांनी त्यांना त्यागाचे कार्य दिले व सांगितले की, काहीही झालं तरी दवाखान्यात जायचं नाही. भगवंताचे तिर्थ घ्यायचे, आपले दुःख भगवंता समोर ठेवायचे व "मरे या जिये  भगवत नामपर" याप्रमाणे राहायचे.

 परंतू माझी आई त्यावेळेस दोन महीन्याची गरोदर होती व तिला डॉक्टरांनी बाळासाठी व तिच्या प्रकृतीसाठी औषधी दिल्या होत्या. ते दोघेही नागपूर वरून त्यागाचे कार्य घेवून आल्यावर त्यांनी विचार केला की "मरे या जिये भगवत नामपर" याप्रमाणे राहायचे. औषध, गोळ्या घ्यायच्या नाही असे त्यांनी ठरविले. नंतर माझ्या आजी, आजोबा, काका, आत्या यांना सांगितले  व राजुरा येथे किरायाच्या घरात त्यागाचे कार्य सुरू केले. परंतु माझ्या आईला त्यागाच्या कार्यामध्ये उलट्यांचा फार त्रास व्हायचा. ती अन्नाचा एक घास सुद्धा खाऊ शकत नव्हती. तरी तिला माझे वडील नेहमी सफरचंद खायला द्यायचे. ती जेवण करत नव्हती तरी तिला भगवंत सर्व काम करायची शक्ती देत होते. ४१ दिवसापर्यंत ती थोडं फार जेवली असेल वा नसेल पण तिने एका भगवंताच्या नावावर त्यागाचे कार्य परी पूर्ण केले आणि ४२ व्या दिवशी त्यागाच्या कार्याची समाप्ती करून त्याच दिवशी ते नागपूरला गेले. भगवंताची फोटो आणली. सोबत माझ्या वडीलांचे काका (मार्गदर्शक) आले त्यांनी हवन कार्याची विधी सांगितली. त्याप्रमाणे त्यागाचे हवन घडविले व सुखी समाधानी झाले.

 त्यागाच्या कार्यात माझा मोठा भाऊ गौरव याचा त्याग आईच्या गर्भातच पूर्ण झाला व तो २५ ऑक्टोबर १९८४ ला जन्माला आला. त्यानंतर मी व त्यानंतर माझा लहान भाऊ शैलेश जन्माला आला.  भगवंताच्या कृपेने आतापर्यंत आम्ही सुखी समाधानी आहो.

या मार्गामध्ये सुखी समाधानी राहायचे असेल तर बाबांनी दिलेल्या ४ तत्व, ३ शब्द, ५ नियमांचे काटेकोर पणे पालन केले पाहीजे व ते आपल्या जिवनात आचरणामध्ये आणायला पाहीजे. तरच सुख समाधान मिळते अन्यथा नाही.

समाधान म्हणजे एक प्रकारचे "वैभव" असुन ते अंतःकरणाची "संपत्ती" आहे. ज्याला ही संपत्ती मिळते तो खरा "सुखी" होतो आणि हे सुख मिळवण्यासाठी आपल्या कुटूंबात एकता असायला पाहीजे, बाबांच्या आदेशांचे व तत्व, शब्द , नियमांचे पालन करायला पाहीजे, तरच खरे सुख आपल्याला मिळते. माझ्या वडीलांचे व आमच्या कुटूंबाचे जीवनमान सुखी,समृद्धी करण्यात एका भगवंताची कृपा तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले. तसेच माझ्या वडीलांचे काका स्व. रामभाऊ पराते (मार्गदर्शक) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. मी व माझे आईवडील व माझे दोन्ही भाऊ मनःपुर्वक खूप आभारी आहोत. आम्ही जिवनात ह्या कृपेला कधीच विसरणार नाही.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

सेवक: राहुल यादवरावजी पराते
रा. मुल, जि. चंद्रपुर.
सेवक नंबर:- १७७०
मार्गदर्शक:-  स्व.श्री रामभाऊजी पराते
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 3 May 2020

प्रकरण क्रमांक (८) "विदेहावस्था" हे प्रकरण नक्की वाचन करा व शेयर करा.

"मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
   'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (८)
 "विदेहावस्था"

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य षष्टी दि २५/०८/१९४८ रोज बुधवारला केली. तेव्हापासून ते निराकार अवस्थेतच होते. त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती. ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते. बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडली होती. त्यांनी आपसात विचार केला की, या स्थितीबद्दल परमेश्वराजवळ विनंती करून बाबांना मुक्त करावे. त्याप्रमाणे ती सर्व मंडळी एका भगवतप्राप्तीच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे आली. तेव्हा बाबा निराकार अवस्थेतच होते व परमेश्वरात विलीन झालेले होते.

घरच्या मंडळींनी बाबांना विनंती केली की, हे भगवंत सेवककी यह स्थिति कबतक रहेगी ? आप सेवक को इस स्थिति से मुक्त कीजीये। तेव्हा परमेश्वररुपी बाबाने उत्तर दिले की, अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी तो आपने उसे भगवान की सेवा करने क्यों लगाई उस समय आपने उसे रोकना था। अब सेवक भगवानका हो गया, न की किसीका रहा और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड और सेवक का सर मेरा धड ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनोकी आत्मा एक हो गई है।

भगवंताने बाबांच्या मुखकमलातून पुन्हा घरच्या लोकांना उद्देशून शब्द काढले की, सेवक भगवान बन गया। इसीलिये सेवक एक ही समय थोडासा साधा भोजन करेंगे। जिसमें दाल, चावल, सब्जी और घी होगा। और कोई भी औरत, घरकी हो या बाहर की, उसकी छाव  सेवक पर न पडे। नही तो सेवक कहींका नहीं रहेगा। जिंदा नहीं रहेगा। अशा प्रकारे भगवंताने सेवकाला (बाबांना) दैवी शक्तीची जागृती दिली. जी ला आज समाजात बरेच लोक मानतात. 

याच दिवसापासून बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात प्रत्येक शनिवारी जी पार्वती येत होती ती त्यांच्या अगांत येण्याची क्रिया बंद झाली. बाबांच्या कुटुंबात परमेश्वराची (हनुमानजी) प्राप्ती केल्यानंतरही दु:ख येत होते. तेही याच दिवसापासून नाहीसे झाले. बाबांच्या कुटुंबात जी अनेक दैवते मानल्या जात होती ती मानणे बंद झाले. याशिवाय त्यांच्या घरातील भुतबाधा पण नष्ट झाली. 

           परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रध्देमुळे काही सण मानत नव्हते. त्यातील पोळा हा एक सण होता. बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच आठ दिवसांनी पोळ्याचा सण आला. त्याच्या दोन दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले. आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की, यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा. त्याप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले. 

श्रावण अमावस्या आली पोळ्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारुन दाराच्या आड लपून बसला होता. तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता. परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. तो साप कोणालाही दिसला नाही. परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो डोके वर काढुन शांत होता. कुठलीही हालचाल करीत नव्हता. हे बाबांनी पाहीले. याही वेळेस बाबा विदेही स्थितीतच होते. त्यानंतर बाबांनी स्वत:च छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले. त्या साध्या मारानेच साप मरन पावला. एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो. हे पाहून बाबा आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खुब विचार केला. तेव्हा ते म्हणाले, कित्येक काळापासुन या घरात जे दु:ख होते त्याला खरा कारणीभुत हा साप होता. कोणीतरी मरन पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून तो सापाच्या रुपात भूत होता. एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात चोवीस तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रुपात खेळत आहे. त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तिच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता. त्याचप्रमाणे त्याला परेश्वररुपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला. अशा प्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भुतबाधेचे संकट नाहीसे झाले तेव्हापासून आजतागायत त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही. बाबा आज ज्या घरात वास्तव्य करीत आहेत त्या घरात चोहोबाजुंनी प्रसन्नता आहे. तेथे आल्हाददायक वातावरण आहे. कारण तेथे चोवीस तास जागृत शक्ती चैतन्यरुपात खेळत आहे. तेव्हापासून त्यांच्या घरात सुखशांती लाभली आहे. 

कोणताही सण मानू नये. कोणताही देवाला मानू नये. एकाच परमेश्वराची आराधना करावी. हे जरी ठरवले होते, तरी विधिलिखित काही असते या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते म्हणून त्यांनी पोळ्याच्या सणाचे निमित्य करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले.

बाबा विदेह अवस्थेत असतांना त्यांना रात्रदिवस विश्वात खूप मोठा एकच डोळा दिसत होता. यामुळे ते घाबरले होते. तो एकच डोळा बघण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे जेष्ठ बंधू श्री.बाळकृष्ण यांना सांगितले कि, भैया, मैं तेरे घर आकर तेरे पास सौऊंगा। मुझे इस घरपर विश्वमे एकही आंख दिखाई देती हैं। यह देखकर मुझे डर लगता हैं। इसलिये वह मैं देख नहीं सकता। एवढा मोठा एकच डोळा बाबांना एक सव्वा महिनापर्यंत एकसारखा दिसत होता.

बाबा आपल्या जेष्ठ बंधूंना सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या घरी जाऊन झोपू लागले. श्री बाळकृष्णांजींचे घर बाबांच्या घरासमोरच होते. बाबांना तेथेपण झोपेतून जाग येत होती आणि त्यांना बाबा हनुमानजींची भली मोठी आकृती दिसत होती. तेव्हा बाबा बंधूंना झोपेतून उठवायचे आणि सांगायचे कि, तू बाबा हनुमानजीला सांग तू माझ्या भावाच्या मागे लागू नकोस. तू देवळात जाऊन रहा. त्याप्रमाणे बाळकृष्णाजी तेवढ्या रात्रीच हातपाय धुऊन भगवंताच्या नावाने कपूर लावायचे आणि विंनती करायचे कि, हे भगवंता मी आपणांस विंनती करतो कि, तुम्ही माझ्या भावाच्या मागे लागू नका. त्याला कुटुंब आहे. त्याला प्रपंच आहे. म्हणून त्यास मोकळे करावे. अशी विनंती करून परत झोपायचे.

बाबांना एक डोळा दिसणे, बाबा हनुमानजीची प्रतिमा दिसणे या लक्षणांवरून सिद्ध होते की, बाबा परमेश्वरात विलीन झाले आहेत. कारण भगवंतप्राप्तीकरिता सुरवातीला बाबांनी जी प्रतिज्ञा केली होती की एकतर मरीन किंवा भगवंताला प्राप्त करीन पण मागे फिरणार नाही. त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परमेश्वराला प्राप्त करून ते त्यांच्यात विलीन झाले होते. 

बाबांची ही विदेहावस्था जवळजवळ तीन महिने होती. या विदेह अवस्थेत एके दिवशी बाबानी आपल्या कुटुंबातील लोकांना निराकार बैठकीत मार्गदर्शन केले की, घरवलो सुनो, आप सब लोग तीन महिनेतक भगवानसे विनंती करो की, हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे उसे गृहस्थी मे रखो। त्याप्रमाणे घरातील सर्व मंडळींनी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी तीन महिन्यांपर्यत एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती व कापूर लावून वरील प्रमाणे विनंती केली. तीन महिने पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी हवंन करून त्याची समाप्ती केली आणि त्यानंतर बाबा त्याच दिवशी शुद्धीवर आले. त्यांची विदेहीवस्था संपली. त्यांना सर्वसाधारण गृहस्थिप्रमाणे सर्व समजू लागले आणि त्याच बरोबर त्यांचा अज्ञातवासही संपला. ते अज्ञातवासात परमेश्वराची(हनुमानजीची) प्राप्ति केल्या पासून म्हणाले जानेवारी १९४६ पासून जवळजवळ तीन वर्षे होते. कारण कारण हा १९४८ सालच्या नोव्हेंबर महिन्याचा दिवस होता. बाबा दुसऱ्या दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करिता उद्योग करू लागले. अशा प्रकारे बाबांच्या कुटुंबाला शांती मिळाली. बाबांनी आपल्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. बाबांबद्दल लोकांना जसजसे हळूहळू माहीत होऊ लागले तसतसे लोक या मार्गात येऊ लागले. सेवक बनू लागले. याप्रमाणे सद्गुरू समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांना पाच ऑगस्ट एकोणविसशे चौऱ्यांशी रोजी या मार्गातील सेवकांनी महानत्यागी ही पदवी बहाल केली आणि त्यांना सद्गुरू समर्थच्याऐवजी महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा.