Followers

Monday, 18 May 2020

【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】


                            【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: (१९०) प्रकाशित दिनांक: ३० नोव्हेंबर २०१६

     【"भगवंतावरील अतूट विश्वास, करी सर्व रोगांचा नाश"】

माझे नाव 'रविंद्र खुशालरावजी पराते' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझ्या दैनंदिन जीवनात आलेला चौथा अनुभव सादर करीत आहे.

नागपूर ते भंडारा रोडवरील महालगांव या ठिकाणी डॉक्टर श्री. लखुजी साबळे हे पशुवैद्यकीय अधिकारी राहतात. ते मला व माझ्या हाताखाली असलेल्या मुलाला जवळपास सहा ते सात महिने पासुन औषधीचे ऑर्डर देतो म्हणायचे, पण द्यायचे नाही. असेच सहा ते सात महिने निघून गेले. तर मी एक दिवस अचानक त्यांना फोन केला तर ते मला म्हणाले की, "पराते जी मुझे आपसे कोई बात नही करनी", आणि फोन ठेवून दिला!

 मी एकदम शांत झालो आणि विचारात पडलो की, माझी अशी कोणती चुक झाली? हे साहेब असे नाराज झाले. परमेश्वराला मी तेव्हाच प्रणाम केला व म्हटले, "बाबा माझ्या चुकीची मला क्षमा करा". तो दिवस तसाच गेला. तेव्हा माझे कार्य सुरू होते आणि आम्ही सर्व सकाळी उठून भगवंताच्या समोर विनंती ला बसलो व बाबांसमोर शब्द ठेवले की, बाबा डॉक्टरांना सद्बुद्धी द्या, त्यांनी ऑर्डर पण दिला पाहिजे व ते भेटले पण पाहीजे आणि पहा सेवकांनो बाबाची कृपा, दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही फोन न करता त्यांच्याकडे गेलो व त्यांची जाण्याची व आमची पोहोचण्याची वेळ ही एक झाली. बघा सेवकांनो भगवतांनी माझी हाक ऐकली. मग आम्ही आतमध्ये बसलो. सर्व नीट पार पडले व जायच्या वेळी डॉक्टर स्वतः म्हणाले की, "परातेजी ऑर्डर तो लिखो" तेव्हा मी एकदम खुश झालो आणि मला साहेबांनी छान अशी औषधींची ऑर्डर दिली.

तेव्हा मी सर्वप्रथम भगवंताचे आभार मानले आणि माझा तो दिवस आनंदात गेला. डॉक्टर साहेब पण तेव्हा पासून नेहमी ऑर्डर देत असतात.  

एक अनुभव आणखी सांगु इच्छितो, माझा मुलगा प्रसाद रविन्द्र पराते. याचे जन्मतःच वजन हे १.४ किलोग्राम होते. वजन वाढविण्यासाठी डॉक्टरांनी जे जे सांगितले ते सर्व आम्ही केले पण वजन काही वाढेलच नाही. सर्व औषधोपचार झाला, चेकअप झाले पण फरक काही पडेना. एक गोष्ट नंतर लक्षात आली ती म्हणजे, माझ्या पहील्या बाळाला जो आजार (CMV) होता. तर मी त्या विषयावर डॉक्टर सोबत चर्चा केली तर ते म्हणाले की, त्या (CMV) आजाराचे प्रतिजैविके त्याच्या आईच्या शरीरात आहे, त्यामुळे त्याला याची भिती नाही. पण माझे मन काही मानेना. तर मी डॉक्टरांना विनंती केली आणि ती (CMV) टेस्ट करायला लावली आणि ती पॉझिटिव्ह आली. 

नंतर डॉक्टरांनी त्या आजाराचा उपचार सुरू केला. जवळपास तो उपचार १ ते दोन महीने चालला. नंतर डॉक्टरांनी सांगितले की, आता हा सुरक्षित आहे. कसलीही भिती नाही. वजन हळूहळू वाढेल. परंतु माझे सासरे म्हणाले, जावई तुम्ही याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवा. तर मी सर्वप्रथम माझे मार्गदर्शक श्री. विष्णुजी ठवकर मु. बिडगणेशपूर यांची भेट घेतली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मार्गदर्शक काकाजींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की, त्याला आता काहीही होणार नाही. कोणत्याही डॉक्टर कडे न्यायची गरज पडणार नाही. पण माझे सासरे काही ऐकत नव्हते. तर एक दिवस मी म्हणालो चला तुमची इच्छा पुर्ण करून घेऊ तुम्ही सांगाल त्या डॉक्टर कडे जाऊ. 

तर ते म्हणाले ठिक आहे आणि आम्ही नागपूर रामदासपेठ येथे बाळाचे तज्ञ डॉक्टर साल्पेकर कडे नेले. जेव्हा डॉक्टरांनी बाळाला चेक केले तेव्हा ते म्हणाले, हा एकदम मस्त आहे. याला कुठलाही त्रास नाही. वजन खाण्यापिण्याणे वाढेल. तर, अशाप्रकारे भगवंत नेहमी माझ्या शब्दावर उभे राहिले. माझ्या कुटुंबात आनंद बहरला.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागते.

नमस्कार..!

सेवक: रविन्द्र खुशालरावजी पराते
रा: पुलगाव, जिल्हा: वर्धा 
सेवक नंबर: ४२४००
मार्गदर्शक: श्री. विष्णूजी ठवकर 
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


प्रकरण क्रमांक: (२३) "मोगरकसा तलाव"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती'  प्रकरण क्रमांक (२३) 
                                  "मोगरकसा तलाव"

सत्ययुगातील गोष्टी आपण इतिहासात वाचतो. रामायणात असा उल्लेख आहे की, जेव्हा श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले होते, तेव्हा भरताने श्रीरामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरळीत चालविला होता. हेतू हा की, श्रीराम हा सत्य आचरण करणारा मर्यादा पुरूषोत्तम होता. तीच लक्षणे त्यांच्या पादुकांत होती. त्यामुळेच राज्यकारभार सुरळीत चालला. परंतु या कलियुगात सुद्धा पादुकांना तेवढेच महत्व आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या रूपात बाबा जुमदेवजी हे मोंगरकशा तलाव येथे गेले असतानाची ही घटना आहे. एक जोडनाव जी पाण्याने संपूर्ण भरून सुद्धा तलावात न डुबता तरंगत होती आणि त्यात असलेला सेवक जीवंत राहिला. हा एक परमेश्वराचा साक्षात्कार आहे.

       १९७८ सालातील एप्रिल महिन्याची गोष्ट महान त्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वराबद्दल मानवाला जागविण्याकरिता नेहमीप्रमाणे सात सेवक घेऊन रामटेक तालुक्यातील काही गावांत दौरा काढला. १/४/१९७८ ला महानत्यागी बाबा जुमदेवजी नागपूरच्या आपल्या सेवकांसोबत नागपूर रामटेकवरून भंडारबोडी येथील परमात्मा एक सेवक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेत पोहचले. तेथे बाबांचे भगवतकार्यावर मार्गदर्शन झाले. दुसऱ्या दिवशी दोन एप्रिलला बाबांनी सेवकांना, पाच बैलगाड्या बरोबर घेऊन कांद्री येथे दौरा केला. तेथे भगवतकार्याची चर्चा बैठक आणि बाबांचे मार्गदर्शन होऊन मुक्काम केला. तीन एप्रिलला पंचाळा येथे दौरा होऊन चार एप्रिलला मंगरली या गावात दौरा केला. या गावाच्या दौऱ्यात नागपूरसह लोहारा, कांद्री, सिवनी, भंडराबोडी, सालईमेटा, पंचाळा, मांडवी या गावांतील बरेच सेवक होते. मंगरली हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले १५-२० घरांचे छोटेसे गाव आहे. या गावात या मार्गात आलेले दोन सेवक राहत होते. त्यांपैकी एक सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता म्हणून बाबांचा मुक्काम दुसऱ्या सेवकाकडे झाला. ज्या सेवकाकडे बाबा थांबले होते त्या ठिकाणी त्या सेवकाचा मामा पण थांबला होता तो म्हातारा होता. त्याला पंधरा दिवसांपासून सारखा ताप येत होता. या गावात भगवत कार्याची चर्चा बैठक होऊन बाबांनी मानवजागृतीवर सेवकांना मार्गदर्शन केले.

           चर्चाबैठकीच्या अगोदर तेथे या दौऱ्यात ज्या बायामंडळी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण स्वयंपाक केला होता. चर्चाबैठक संपल्यावर भोजनाची तयारी झाली. सर्व सेवक आणि बाबा भोजनास बसले. सोबत आलेल्या बायांनी पंगती वाढल्यात. तो म्हातारा बाबांकडे आला आणि त्याने त्यांना नमस्कार केला. त्या पंगतीतच तो बाबांच्या आदेशानुसार जेवायला बसला. जेवण झाल्यावर तो बाबांजवळ पुन्हा आला आणि बाबांना नम्रपणे म्हणाला की, बाबा आपण धन्य आहात. मला पंधरा दिवसांपासून खूप ताप होता. त्यामुळे मी जेवलो नव्हतो. पण आपल्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने माझा ताप नाहीसा झाला आणि आज मी पोटभर जेवलो. हा किती मोठा चमत्कार आहे की, बाबांच्या आगमनाने आणि मार्गदर्शनाने सेवकांनाच नव्हे तर इतरांना सुद्धा परमेश्वरी कृपेचा लाभ मिळतो आणि त्यांचे दुःख नाहीसे होते.

              जो सेवक बाहेरगावी लग्नाला गेला होता त्याचे नाव होते शेरकी. तो रात्री लग्नावरून परत आला. त्या रात्रीला मंगरली या गावातच मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलला शेरकी नावाच्या सेवकाने बाबा जुमदेवजींना विनंती केली की, बाबा येथून दहा मैलांवर मोंगरकशा नावाचा एक ऐतिहासिक तलाव आहे. त्याच्या चारही बाजूनी घनदाट जंगल आहे. फार सुंदर दृश्य आहे. आपण तेथे सर्वजण वनभोजनास चलावे. त्यावर बाबांनी संमती दिली. साधारणतः माणसे व बाया मिळून साठ सेवक हजर होते. सर्वांनी चहापाणी, नास्ता घेतला आणि सर्वजण वनभोजनास जाण्याची तयारी करू लागले. सामान घेऊन जाण्याकरिता बैलबंडिची आवश्यकता होती. तेव्हा सेवकाचा म्हातारा मामा म्हणाला, एक बंडी आहे. त्याचे बैल म्हातारे आहेत. त्यांतील एक बैल असा आहे की, तो मोंगरकशा तलाव संपल्यावर खाली बसला तर उठतच नाही . त्याच्या अंगावरून ट्रक गेला तरी तो उठत नाही. हे शब्द बाबांनी ऐकले . तेव्हा बाबा म्हणाले , बंडीला त्या बैलालाच जुपा काय होईल ते परमेश्वर करील आणि लवकर वनभोजनास चला. सर्व सेवक तयार झाले सामानाकरिता एक बैलबंडी आणि सेवकांकरिता खाचर तयार केले ज्या बंडीत जास्त साहीत्य होते , तेथे पाच-सहा सेवक बसले होते आणि त्याच बंडीला तो बैल जुंपला होता. ती बंडी नागपूरचा एक सेवक श्री. जगन्नाथजी सोनकुसरे चालवत होता. तो म्हातारा पण बाबांबरोबर वनभोजनास आला. जाताना तो समोरच्या खचरामध्ये बसला होता आणि बंडी मागे होती. त्याला सारखी भीती वाटत होती की , बैल चालता चालता खाली बसतो काय ? म्हणून तो सारखा मागे वळून पाहत होता. परंतु त्याला तो बैल चालताना दिसत होता . किंबहुना तो बैल त्याच्या जोडीला बैलाचे मानाने धावत होता. संपुर्ण प्रवासात तो बैल एकदाही खाली बसला नाही. त्यामुळे या बसक्या बैलाचे त्या म्हाताऱ्याला आश्चर्यच वाटत होते. बाबा आणि सर्व सेवक मोंगरकशा तलावापाशी पोहचले. हा तलाव भंडारा जिल्ह्यात आहे. चांगलीशी जागा पाहून झाडाच्या सावलीत सर्व सामान उतरविले. तेथे स्वयंपाकाकरिता काळया दगडांची जमवाजमव केली. चूल तयार केली. दौऱ्यावर आलेल्या काही बाया मंडळी तलावावरून अंघोळ करून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. बायांना बाबांनी सांगितले की तुम्ही या बाजूला आंघोळ करून या ती पूर्व दिशा होती. आणि पुरूष मंडळी तो डोंगा दिसतो तेथे म्हणजे त्या दिशेच्या विरूध्द दिशेला, पश्चिमेला आंघोळ करायला जातील मुक्काम दक्षिण दिशेला होता. स्वयंपाकाला सुरूवात झाल्यावर बाबा सर्व सेवकांना (पुरूष) म्हणाले की , चारपाच सेवक येथे थांबा आणि बाकीचे सर्व आंघोळ करायला चला. त्याचप्रमाणे सर्व सेवक बाबांसोबत डोंगा असलेल्या बाजूला, पश्चिमेला आंघोळ करायला निघाले तेथे पोहचल्यावर काही सेवकांना पोहणे माहीत असल्यामुळे त्यांनी पोहण्यासाठी बाबांची परवानगी मिळण्यासाठी त्यांना विनंती केली तेव्हा तेथे वनखात्याचा चौकीदार होता. त्याने त्यांना पोहायला  जाऊ नये यासाठी विनंती केली. कारण तलावात सुरूवातीलाच दोन हत्ती, पुढे तीन हत्ती आणि मध्यभागी चार हत्ती पाणी आहे संपूर्ण तलावात खूप जाळे आहे त्यामुळे येथे कोणीही कोळी मासोळी पकडायला आत जात नाही, कारण जाळ्यात पाय अडकले तरी तो वर येत नाही आणि बुडून त्याचा अंत होतो, असे तो म्हणाला. त्यावर बाबांनी काठाजवळ पोहायला परवानगी दिली. त्यानंतर सेवक लोक पोहू लागले. बाजूलाच एक जोडनाव होती. तेव्हा एका सेवकाने ती जोडानांव पाण्यात नेण्याकरिता विनंती केली. तेव्हा बाबा म्हणाले, जर नाव चालवता येत असेल तरच घेऊन जा. त्याप्रमाणे ती नाव बाबांच्या परवानगीने तिची दोरी सोडून आत नेण्यात आली. त्यांत पाच-सहा सेवक होते त्यावेळेस बाबा किनाऱ्यावर बसूनच आंघोळ करणार होते. म्हणून ते सेवकांना म्हणाले की, मी नावेत येत नाही. नाव थोडी दूर पाण्यात गेल्यावर ज्या सेवकांना पोहता येत होते त्यांनी पटापट नावेतून पाण्यात उड्या मारल्या. त्यानंतर तेथे श्री. मोतीरामजी हरडे (दिवानजी) नावाचे एकच सेवक उरले होते. कारण त्यांना पोहता येत नव्हते. दिवानजीला वाटले की, आपण आता नाव चालवू ते नावेच्या डाव्या भागाला उभे होते. म्हणून त्यांनी वल्हे उचलले आणि त्यांच्या उजव्या भागाला ते वल्हे पाण्यात टाकले. वल्हे पाण्यात घेतल्यामुळे आणि त्याला खालच्या बाजूला आधार न मिळाल्यामुळे दिवानजी उजव्या नावेत पडले हे दृश्य बाबा आंघोळ करता करता पाहत होते तेव्हा बाबा म्हणाले दिवानजी तुम्हाला नाव चालवता येत नाही तर नावेत कशाला गेलात बाबांना वाटले हे पाण्यात बुडतील म्हणून त्यांनी गडीरामजी डोनारकर या सेवकाला विचारले की , तुला पोहता येते काय ? त्याने होकार दिल्याबरोबर बाबांनी त्याला आदेश दिला की, तुम्ही पोहत जा आणि त्या नावेची दोरी ओढून किनाऱ्यावर आणा आणि बांधून ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी ती नाव आणून किनाऱ्यावर बांधून ठेवली. बाबांची आंघोळ आटोपल्यावर बाबा सर्व सेवकांना म्हणाले की, तुम्ही सर्वजण लवकर आंघोळ करून भोजनास या तोपर्यंत मी मुक्कामाच्या ठिकाणी जातो आहे. त्याप्रमाणे बाबा जायला निघाले. त्यावेळेस ते पायात पादुका घालावयास विसरले होते त्या तलावाच्या काठावरच राहिल्या होत्या .

बाबा तेथून गेल्यामुळे काही सेवकांनी बांधून ठेवलेल्या नावेची दोरी सोडली. काही सेवक नावेत बसून कपडे धुऊ लागले. लोहारा या गावचा सेवक श्री. शामरावजी कार याने त्या नावेला जोराने लाथ मारली. त्यामुळे ती नाव खोल पाण्यात गेली आणि उकडे कारचा पाय चिरला गेला. श्री. श्रीराम भंडारबोडीवाला हे पुन्हा पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले आणि नावेला पकडून ते नावेत चढतांना ती नाव एका बाजुला वाकली. त्याबरोबर नावेत असणारे लोक पाण्यात भडाभड पडले. नाव जेव्हा सरळ झाली तेव्हा त्या जोडानावेत संपूर्ण पाणी भरले होते. काठावर असलेले १५-२० सेवक जोराने ओरडू लागले की नाव पाण्यात बुडाली, हा आवाज स्वयंपाक करणाऱ्या  बायांपर्यंत पोहचला. तेथे धर्मपुरी या गावची सौ. चंद्रभागाबाई ही सेविका होती. ती जोराने म्हणाली, बाबा असतांना नाव बुडू शकत नाही. त्या बाईला बाबांच्या कृपेबद्दल किती आत्मविश्वास होता हे दिसून येते. बाबा तेव्हा तीनचारशे पावले चालत आले होते. त्यांच्याही कानावर ओरडण्याचा आवाज आला. त्याचक्षणी त्यांच्या पायाला खडे रूतू लागले. तेव्हा बाबांच्या लक्षात आले की, आपण पायात पादुका घातल्या नाहीत, आणि त्या आपण तलावाच्या काठावरच विसरलो आहोत. बाबांनी मनात विचार केला की भगवंता, काय केले या सेवकांनी ? बाबांच्या शब्दांवर अंमल न केल्यामुळे या सेवकांवर हा प्रसंग ओढवला होता. परंतु बाबांच्या ऐवजी त्यांच्या पादुका तेथे असल्यामुळे त्यावर मात झाली होती.

     बाबा पादुका घालण्याकरिता परत तलावाच्या काठावर आले आणि तलावावरील दृश्य त्यांनी पाहिले तेव्हा नागपूरचे सेवक श्री. लक्ष्मणरावजी उराडे हे एकटेच त्या जोडनावेत दोन भागात पाय देऊन उभे आहेत संपूर्ण नाव पाण्याने भरलेली आहे तरी ती पाण्यात तरंगत आहे असे दिसले. बाबांच्या बाजूला काही सेवक उभे होते. त्यांना म्हणाले, हे तुम्ही काय केले ? तुम्हा सेवकांना बाबा सांगूनही तुम्ही बाबांचे ऐकत नाही आणि असे प्रसंग तुम्ही बाबांना दाखवता. तेव्हा त्या सेवकांनी बाबांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बाबांना संपूर्ण चौकशी केली , किती सेवक नावेत होते ? किती सेवक पोहून बाहेर निघाले? आणि किती आत बुडाले ? चौकशी अंती त्यांना कळले की सर्वजण बाहेर निघाले, पण गोपीचंद तुपट या सेवकाला पोहता येत नव्हते. म्हणून तो आतच आहे. त्याला काढण्याकरिता संपत शेरकी पाण्यात गेला. संपत शेरकीने गोपीचंदला काठावर आणले. बाबांच्या बाजूला मादरी या गावाचा कचरू नावाचा सेवक उभा होता. त्याला बाबांनी विचारले, "तुला पोहता येते काय?" त्याने होय म्हटल्याबरोबर त्याला बाबांनी आदेश दिला की, पाण्याने भरलेल्या नावेची दोरी धरून काठावर आण. त्याप्रमाणे बाबांच्या आदेशाचे पालन करून त्याने त्या नावेला पोहत जाऊन काठावर आणले. त्याबरोबर श्री. उराडे हेही काठावर आले. सर्वजण बाहेर निघाल्यावर बाबांनी त्यांना विचारले की, हे कसे काय घडले? त्यावर त्यांनी खालील माहिती सविस्तरपणे सांगितली. 

         प्रथम उराडे साहेब म्हणाले, नावेने कलाटणी घेतल्याबरोबर मी नावेला घट्ट धरून ठेवले. नावेत संपूर्ण पाणी भरल्यावर ती सरळ झाली आणि मी उभा झालो. विचार केला की, मला पोहता येत नाही म्हणून उडी मारू शकत नाही. नावेत संपूर्ण पाणी भरल्यामुळे ती नाव बुडणार म्हणजे दोन्ही क्रियांत मी मरणारच आहे. जीवंत राहू शकत नाही. तेव्हा मी भगवंताला प्रार्थना केली आणि म्हटले, "मरे या जिये भगवत नामपर! बाबा हनुमानजी आप मुझे मारो, या तारो मैं आपके शरणमें हुँ। अशी याचना करीत होतो. “देव तरी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे खरोखरच भगवंताने श्री. उराडे यांना जीवदान दिले. नाव संपूर्ण पाण्याने भरून सुध्दा बुडाली नाही. ती पाण्यात तरंगत राहिली. म्हणजेच भगवंताने त्या नावेला खालून टेका दिला होता हे सिध्द होते आणि हा किती मोठा साक्षात्कार आहे की नावेत पाणी भरून सुध्दा ती बुडाली नाही. धन्य आहे तू भगवंता! नाव काठावर आणली असता बादलीने त्या नावेतून पाणी काढले आणि दोरीने ती काठावर बांधून ठेवली. 

         दुसऱ्या घटनेत श्री. संपत शेरकी सांगतात की, गोपीचंद ज्या भागातील पाण्यात पडला होता त्याच भागात तो पण पडला आणि त्याला वर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु गोपीचंदने संपतला पाण्यातच एकदम मिठी मारली. त्यामुळे त्याच्या पोहण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्याला हात फेकणे अशक्य झाले.  तेव्हा त्याच्या मनात आले की, मी आता बुडणार आणि हाही बुडणार म्हणून संपतने भगवंताला प्रार्थना केली, भगवान बाबा हनुमानजी आपण मला या प्रसंगातून वाचवा. मी आता मरतो आहे तेव्हा परमेश्वराने त्याच्यावरही कृपा केली. त्याने भगवंताला विनंती केल्याबरोबर गोपीचंदचा हात सुटला. लगेचच त्याने आपले दोन्ही हात पाण्यात मारले व तो वर आला. हात पाण्यावर मारल्याबरोबर संपतच्या हातात गोपीचंदचे धोतर आले. तो धोतर धरून पोहत पोहत काठावर आला आणि त्याने गोपीचंदला आपल्याबरोबर ओढत काठावर आणले. अशाप्रकारे सर्वजण तलावाच्या बाहेर जीवंत सुखरूप निघाले. धन्य तो परमेश्वर !  त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांच्या रूपात परमेश्वर उभा होता आणि त्याने या सर्व सेवकांची त्या वाईट प्रसंगातून मुक्तता केली. त्यानंतर सर्वांनी भगवान बाबा हनुमानजी की जय ! समर्थ बाबा जुमदेवजीकी जय ! परमात्मा एक ! सत्य, मर्यादा प्रेम कायम करनेवाले, अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले मानव धर्म की जय ! असा हर्षकल्लोळात जयघोष केला. 

          वनखात्याच्या चौकीदार हाही त्या वेळेस तेथे हजर होता. तो म्हणाला, या तलावात जो उडी मारतो तो वर येत नाही. तो मरतोच पण तुम्ही सर्वजण सहीसलामत कसे वर आलात ? हे तुमचे गुरू तुमच्याबरोबर असल्यामुळेच त्यांचाच महिमा आहे. येथे कोळी मासोळी धरत नाहीत. ते घाबरतात पण तुमची हिंमत आणि तुमच्या गुरूने दिलेली परवानगी यामुळे खरोखरच भगवंत तुमच्याजवळ आहे हे सिध्द होते. 

          त्यानंतर सर्वजण भोजनाच्या ठिकाणी आले. सर्वांनी भरपूर भोजन केले. सर्वांच्या आनंदाला पारावर नव्हता. सर्वजण बाबांना म्हणाले "बाबा आज या प्रसंगातून वाचलो नसतो तर काय झाले असते? केवढा मोठा प्रसंग ओढवला होता आणि सर्व सेवक बाबांसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्या सर्वांनी बाबांना शब्द दिला की , हा प्रसंग बाबांचे न ऐकल्यामुळे, त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यामुळे ओढवला. यापुढे बाबांचे शब्द नेहमी अंमलात आणू असे सत्य वचन त्या सर्वांनी दिल. बाबांनी त्या सर्वांना क्षमा केली. जेवण आटोपल्यावर सामानाची आवरा-आवर करून मंगरली या गावात सायंकाळी सर्व सेवक सुखरूपपणे परत आले वरील प्रसंगावरून हे सिध्द होते की , बाबांच्या रूपात परमेश्वर नेहमी सर्वत्र असतो. सर्व सेवकांनी त्यांच्या शब्दांचा आदर करायला पाहिजे. परमेश्वर बाबांच्या पादुकाच्या रूपातही हजर असतो. बाबा परमेश्वराचे रूप आहे हे "बसका बैलं" म्हणजे जनावराने देखील ओळखले.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】


                                 【माझा अनुभव】
अनुभव क्रमांक: १८३ प्रकाशित दिनांक: २३ नोव्हेंबर २०१६

【"व्यसनाचा नाद सुटता नाते जुडले परमेश्वराशी, पण अज्ञानी शब्दप्रयोगाने परत मुके समाधानाशी"】

माझे नाव 'तेजस्विनी विकासजी उराडे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

आमचे मार्गात येण्याचे कारण हे की, माझे बाबा खुप व्यसनी होते. दारू, सट्टा, लॉटरी, यांचे त्यांना खुप व्यसन होते. ते फारसे जास्त वेळ घरी राहत नव्हते. ऑफिसला जायच्या नावाने निघायचे आणि कुठे पण जायचे. घरची परिस्थिती खुप खराब होती. त्यांना घरी काय असते-नसते त्याची काहीच जाणीव (चिंता) नसायची. ते खुप जास्त दारू प्यायचे. 

त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कर्ज करुन ठेवलेले होते. नोकरीवर पण नव्हते त्यामुळे पगार मिळत नव्हता. यामुळे घरची परिस्थिती खुप खराब होती. बाबा दारू पिऊन यायचे आणि आईला-ताईला आणि आम्हाला खुप मारायचे. बाबाचे दोन्ही यकृत खराब झाले होते. बाबांना डॉक्टरने सांगितले होते की, फोटो मोठी करुण घ्या हार घालण्यासाठी (म्हणजे मरण्याच्या वाटेवर लागने), तरीही ते काही सुधरले नाही. रोज दारू पिऊन येणे आणि मारझोड करणे, शिव्या-गाळी करने हाच नेहमी प्रकार चालायचा.

माझी आत्या मौदा येथे राहत होती. त्या बाबांना नेहमी म्हणायच्या की, अगरबत्तीची पूजा असते तो मार्ग (परमात्मा एक मानव धर्म)घेत का नाही? तर बाबा सर्वांना म्हणायचे की, मी खुप अगरबत्त्या आणि खुप मेनबत्त्या लावल्या, पण माझी दारू कधीच नाही सुटनार.

त्यानंतर आमच्या घराजवळून काही अंतरावर एक सेवक काकाजी राहात होते. त्यांचे नाव घुले काकाजी असे आहे, ते मार्गात होते. त्यांनी आईला सांगितले होते. पण, बाबा आईचे ऐकत नव्हते. एक दिवस ते काकाजी बाबांना भेटले व त्यांना मार्गाबद्दल पुर्ण सविस्तर माहीती दिली, अनुभव सांगितले, तर बाबा तयार झाले की, ठीक आहे, जर चांगले होईल तर मी करणार.

त्यानंतर आम्ही आमच्या मार्गदर्शक काकाजीकड़े गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली. पण मार्ग देण्यास नकार दिला की, मी आता मार्ग देऊ शकत नाही. आमचे कार्य सुरु आहे. तेव्हा बारा वर्षातून येणारे त्यागाचे(शुद्धीकरण) कार्य सुरु होते. तर त्यांनी आम्हाला दहा ते बारा दिवस दिले. आम्ही घरी आलो नंतर बाबांनी पुन्हा तेच सुरु केले. 

त्यानंतर आम्ही दहा ते बारा दिवसांनी काकाजीकड़े गेलो, काकाजींनी आम्हाला तीन दिवसाचे कार्य दिले. आम्ही घरी आलो. माझ्या बाबांनी आम्हाला घरी सोडले आणि ते बाहेर गेले. आम्ही घरी गेलो तर आमच्या घराला पूर्ण इलेक्टरीक करंट होता. आम्ही बाबांना फोन केला आणि घरी बोलावले आणि घरा जवळचे सेवक त्यांना आणि काकाजींना कॉल केला. ते म्हणाले बाबाचे नाव स्मरण करा आणि घरी प्रवेश करा. आम्ही तसेच केले तर, करंट कुठे गेला कळलच नाही.

घुले काकाजी आम्हाला म्हणाले, मार्गात मरावं लागते "मरे या जिये भगवंत नामपर" या तत्वाप्रमाणे. आम्ही आमच्या घरचे पूर्ण देवांचे विसर्जन केले आणि काही काका, मामाकडे दिले. काकाजींनी सांगितले, सकाळी उठून आंघोळ करुण विनंती करावी लागणार. आम्ही बाबाला पाठ आणायला सांगितले आणि घरी साफसफाई सुरु केली. बाबा बाहेर गेले आणि दारूच्या दुकानाजवळ जाऊन बसले. पण काय माहिती काय झाले? आत जाण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. पाठ घेवून घरी परत आले. त्या दिवसापासून आम्ही कधीच बाबाला दारू पिऊन असलेल्या व्यक्ति जवळ उभे सुद्धा पाहिले नाही. मार्गात आम्हाला खुप सुख समाधानी मिळाली.

त्यानंतर ६ जून, २०१४ ला माझे वडील परमेश्वरात विलीन झाले. आम्हाला आलेला अनुभव, ज्या चुकीमुळे आज माझे वडील आमच्यात नाहीत. शब्द रूपी परमेश्वर असतो, हे सत्य आहे. यावर आलेला अनुभव मी आपल्यासमोर सांगू इच्छिते. 

माझी ताई अभ्यासात खूप हुशार नव्हती. पण बाकी गोष्टी पण ती मन लावून करत होती. ताई अभ्यासात हुशार नसल्यामुळे घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरविले व बारावीत असतांना तिचे लग्न जुळले. तिचे लग्न पक्के झाले आणि लग्नाची २७ फेब्रुवारी तारीख ठरली. ताईची बारावीची परीक्षा २२ की २३ फेब्रुवारी पासून होती, तर ताई परिक्षेचे ओळखपत्र आणायला शाळेत जायला घाबरत होती. कारण तीला वाटत होते की, माझे सर आणि मॅडम मला रागावणार, इतक्या लवकर लग्न करत आहे म्हणणार. ती जास्त कोणासोबत बोलत नव्हती. जितके काम असेल तितकेच बोलायची. आम्हाला माहिती होते की, ताई भितीमुळे शाळेत जाणार नाही. तेव्हा माझे वडिल त्यांच्या मुखातून काही शब्द काढून खूप मोठ्या त्रासात गेले. 

त्यांनी ताईला म्हटले की, तु शाळेत जा आणि परिक्षेचे ओळखपत्र घेऊन ये. जर कोणी रागवले किंवा काही म्हटले तर त्यांना सांग की, माझ्या वडीलांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या  आहेत, म्हणून ते माझे लग्न करून देत आहेत. कळत-नकळत बाबा असे का बोलले माहिती नाही? माझ्या ताईचे लग्न व्यवस्थित पार पडले. त्यानंतर आई-बाबा, मी, ताई-भाऊजी फिरायला गेलो. फेब्रुवारी मध्ये त्यांचे लग्न झाले आणि आम्ही एप्रिलच्या शेवटी फिरायला गेलो. तिथे माझ्या बाबांची प्रकृती खराब झाली. नंतर उपचार वैगरे केल्यावर कळले की, बाबांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. 

भगवंताने बाबांना व आम्हाला शिक्षा दिली की, जिभेला हाड नसल्यामुळे वाटेल ते बोलू नये. सेवकांनी खोटे बोलल्यावर भगवंत लगेच शिक्षा देतात. त्यानंतर आम्ही माफीचे कार्य केले आणि बाबांचे उपचार चालु ठेवले. अपेक्षा होती की, यश मिळेल पण यश मिळाले नाही. त्यांनी ५ वर्ष रक्तशुद्धीकरण केले आणि सहाव्या वर्षी ते परमेश्वरात विलीन झाले. 

त्यानंतर आम्ही कार्य केले आणि नंतर त्यागाचे कार्य केले व पक्के सेवक झालो. आता माझ्या भावाला माळ दिली आहे. आता सर्व ठीक आहे आणि माझे पण लग्न झाले. मी आता लग्नानंतर अनेकात आहे. आपल्या मार्गात शब्दाला खुप महत्त्व आहे. मला याचा अनुभव आला आहे, म्हणून सेवकांनो विनंती करते की, कधीही विचार करून मुखातून शब्द काढावे.  

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार...!

सेविका :- तेजस्विनी विकासजी उराडे
पत्ता :- रा. परसोडी वाघमारे ले-आऊट, उमरेड

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 17 May 2020

प्रकरण क्रमांक: २२ "आत्मप्रचिती"


                       "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२२) 
   
                                  "आत्मप्रचीती"

एके दिवशी महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना बरोबर घेऊन मानव जागृती विषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोडी या गावी दौऱ्यावर गेले होते. ते परमात्मा एक सेवक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था, भंडारबोडी येथे निवासाला थांबले होते. ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे. हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे होते. या कृष्णपक्षास पितृपक्ष असेही म्हणतात. हिंदु धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राध्द करतात. त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. 

भगवतकार्याची चर्चाबैठक आटोपल्यावर बाबांनी त्या ठिकाणी मुक्कात केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते. त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की , सध्या श्राध्दपक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्तिदिवस आहे. तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करू लागले की, आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्युलोकांतुन मुक्ती मिळाली होती. ते या पृथ्वीतलाला (जगाला) सोडून गेले होते. ते मनाशीच बोलले, जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते . पण आता तसे करणे शक्य नाही. या विचारात ते चिंतामग्न झाले आणि या विचारतच देहभान विसरले. ते नकारात आले. त्यांच्या अंतरात्म्यातून खालील संवाद बाहेर पडलेत ? जे त्यांनी त्यांच्याच कर्णाव्दारे ऐकले.

त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघला की, "सेवक, तू पागल हो गया। किस बातकी तू चिंता कर रहा है। तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजीला म्हणाले, "बाबा, आज मेरे पिताजी का मुक्ति का दिन है। अगर मैं अपने घरपर होता तो उनकी याद में एकही समय भोजन करता। लेकिन मैं बाहर गांव में हूँ। मैं कुछ भी नही कर सकता"। बाबाचे हे शब्द ऐकून भगवान बाबा हनुमानजी महानत्यागी बाबा जुमदेवजीला म्हणाले , "हे सेवक सुन, तेरे पिताका शरीर और मेरा आत्मा एक है। तू एक भगवान को मानता है, इसलिए तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिताका शरीर छोड़कर मुझमे विलीन हो गया, और तूने तेरे पिताका शरीर जलाकर राख कर दिया। अब बोल सेवक, तू राखकी पूजा करता है या मेरी। भगवंताचे हे शब्द ऐकून महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले, भगवान आजसे मेरे मन का शुद्धिकरण हुआ। में इस तरह के पुराने विचार मेरे दिल मे कभी नही लाऊंगा और भगवान , मैं तेरी ही पूजा हमेशा करूँगा असे बाबांनी भगवंताला सत्य वचन दिले.

 अशा प्रकारे भगवंताने (बाबा हनुमानजीने) महानत्यागी बाबा जुमदेवजींना आत्मप्रचीती दिली. तेव्हापासून बाबांनी सेवकांना मुत्यु झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला लावले .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.




Saturday, 16 May 2020

【"जुने विचार बंद करणे"】


                            【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: १८०  प्रकाशित दिनांक: २० नोव्हेंबर २०१६

                        【"जुने विचार बंद करणे"】

माझे नाव दिनेश जुमळे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव 'मार्गात आल्यानंतरचा दैवी शक्तीचा अनुभव' सादर करीत आहे.

आमच्या घरात असलेल्या एका कुत्र्यामुळे (रजत) आलेला अनुभव सांगत आहे. जसे आपण पूर्ण कुटुंब एकत्रित राहतो. तसेच, आपल्यासोबत असणारा आपला एक सगळ्यांना आवडणारा प्राणी जो आपल्या घराची वेळोवेळी रक्षण करतो तो म्हणजे आपल्या घरातील कुत्रा. ही गोष्ट आहे सन २०११ ची माझ्या बाबांनी घरी एक कुत्रा आणला होता. त्याचे नाव आम्ही रजत असे ठेवलेले होते. तो सगळ्यांचा आवडता होता तो लहान असल्यामुळे घरातील मंडळी त्याचा खूप लाड करत असे, पण काही दिवसांनी रजत बद्दल परिसरातून तक्रारी येऊ लागल्या की, तो परिसरात कोंबड्यांचा मागे धावतो व तो त्यांना खाऊ शकतो अश्या प्रकारच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे बाबा त्या गोष्टीला कंटाळले व त्यांनी विचार केला कि, याला कुठे तरी दूर नेऊन सोडायचे. पण बाबाचे मन काही केल्या मानत नव्हते. कारण, तो सगळ्यांचा लाडका होता आणि आमच्या घरातील एक सदस्य पण.

तरीपण काय करणार लोकांच्या तक्रारी खूप वाढलेल्या होत्या. त्यामुळे बाबांनी कंटाळून त्याला आमच्या गावाजवळील १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांढळ या गावाजवळ नेऊन सोडले होते. ती गोष्ट मला पण माहिती नव्हती. कारण, तेव्हा मी कुही येथे राहत होतो. त्याला बाबांनी कुठेतरी नेऊन सोडले त्या गोष्टीचे मला खूप दु:ख झाले. कारण, तो माझा खूप आवडता कुत्रा (रजत) होता.
मी कधीही गावाला गेलो असता तो माझ्या नेहमीच अंगावर खेळायचा माझ्यावर जोरजोरात भुंकायचा. तेव्हा मी अवधूत डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, कुही येथे पोलिटेक्निक करत असल्यामुळे, कुही येथे मी माझ्या मोठ्या वडिलांच्या मुला सोबत रूम करून राहत होतो. 

ते पण कुही येथे श्री सद्गुरू दत्त डिप्लोमा कॉलेज फार्मसी, कुही येथे डी-फार्म ला शिकवत होते. त्याच बरोबर सकाळ-सायंकाळ शिकवणी वर्ग पण घ्यायचे त्याकरिता आम्ही तिथेच राहत होतो. रजतला (कुत्रा) कुठेतरी नेऊन सोडले व मला माहिती नव्हते तर मला दुसऱ्या दिवशी अचानक माझ्या लहान भावाचा नरेशचा फोन आला कि बाबांनी आपल्या कुत्र्याला (रजत) ला कुठेतरी नेऊन सोडले. तेव्हा खूप वाईट वाटले. मला रडायला पण येत होते कारण, तो माझा खूप आवडता होता. माझ्या बाबानापण खूप पश्चाताप होत होता, त्यांनी पेपर मध्ये तो हरवलेला आहे म्हणून त्याची जाहिरात देऊ अशी तयारी दर्शवलेली होती.

मी पण भगवंताला माझा कुत्रा (रजत) मिळू द्या अशी विनंती रोज करत होतो आणि मला रडायला पण येत होते. कारण, एखाद्या मुक्या प्राण्याची भावना व्यथा कोणाला समजून येणार? कारण, तो मुका प्राणी आहे. मी मग मनात पक्का विचार केला कि, मी आपल्या कुत्र्याला (रजत) ला काहीपण करून शोधून काढणार. व मी आपल्या मोठ्या वडिलांच्या मुलाची (गणेश) ची मोटारसायकल घेऊन मांढळ तसेच आजूबाजूच्या गावात शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मला मिळाला नाही.

मग मी बाबा हनुमानजी समोर शब्द ठेवला कि, माझा कुत्रा (रजत) मला मिळू द्या. मी एक पाव पेढ्याचा प्रसाद वाटणार. मग मी चापेगडी येथिल माझ्या गावाला गेलो.

तिथून पण साईकल ने मी त्याची दोन ते तीन दिवस शोधमोहीम सुरु केली पण काही केल्या तो मला मिळाला नाही आणि माझ्या कडे दुसरा पर्याय पण नव्हता. मी एके दिवशी जेवण करत असताना माझ्या मित्राचा मला फोन आला कि तुझा कुत्रा (रजत) मिळाला आहे आणि तो मांढळ कडून एका शेतकऱ्याचा बंडी मागे चापेगडी च्या दिशेने येत आहे. कारण, जो व्यक्ती माझ्या बाबासोबत माझ्या कुत्र्याला (रजत) सोडायला गेलेला होता तो त्याच रस्त्याने कुठे तरी मय्यतीला जात होता. त्याच्याकडे माझा मोबाईल नंबर नसल्यामुळे त्याने माझ्या मित्राला फोन केला होता.

माझा मित्र लगेच माझ्या घरी आपली मोटार सायकल घेऊन आला आणि मी माझा जेवणाचा ताट सोडून त्याला (रजतला) आणायला निघालो. तर तो आम्हाला रस्त्यातच मिळाला व माझ्या अंगावर उड्या मारू लागला व माझ्यावर जोरजोरात भुंकू लागला. त्याला असे वाटले असेल कि, तुम्ही मला का बर सोडले होते. मला पण तो भेटल्यामुळे खूप चांगले वाटले व माझे मन भरून आले. मी त्याला मोटारसायकल वर बसवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही केल्या मोटारसायकल वर बसतच नव्हता त्याला जणू असे वाटत होते कि आणखी हे मला कुठे तरी दूर नेऊन सोडणार, मला पण काय करू काहीच समजत नव्हते. 

त्याला दहा ते बारा किलोमीटर पायी नेऊ शकत नव्हतो. त्यानंतर त्याला मी जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत पायी नेले. त्यामुळे तो थकला व मग मी त्याला मोटारसायकल वर बसवून घरी आणले आणि त्याची अंघोळ करून दिली व त्याला बिस्कीट खाऊ घातले. पण तो काही केल्या बिस्कीटाला तोंड पण लावत नव्हता मला त्याची खूपच दया येत होती. मग तो बिस्कीट खाल्यानंतर इकडे तिकडे फिरू लागला त्यामुळे आमच्या घरातील मंडळींना तो भेटल्याचा खूप आनंद झाला. त्याच्या तक्रारी येणे पण बंद झालेल्या होत्या नंतर मी बाबा हनुमानजीला दिलेला शब्द पन पूर्ण केला.

त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी घडलेली होती कि, माझ्या कुत्र्याच्या (रजत) डोक्याला काहीतरी लागलेल होत व त्यामुळे जखम झालेली होती. ही गोष्ट जवळपास दहा ते पंधरा दिवसा अगोदरची आहे. जखम जास्तच मोठी होत होती त्यामुळे घराजवळील मार्गात असलेल्या एका सेवकाने त्याच्याकरिता औषध आणून दिली. काही प्रमाणात त्याला आराम झाला नंतर त्याला लावण्यासाठी तीच औषध मी पण फार्मसी मधून आणली आणि त्याच बरोबर बाबा हनुमानजीला विनंती केली कि, त्याला आलेले दुखः दूर होऊ द्या व मी तीन दिवस त्याच्या जखमेवर रक्षा लाऊन फुक मारत गेलो आणि हळू-हळू जखम भरत आली व ती पूर्णपणे भरून दुरस्त झाली.

बघा परमेश्वराची कृपा हि मानवावरच नसून प्राणी, पक्षी, जीव, जंतू यावर सुद्धा आहे. एक वेळेस आपण कोणाला विसरू शकतो पण भगवंत आपल्याला विसरू शकत नाही. त्याच्या कृपेचा मायाळू हात आपल्या डोक्यावर नेहमीच असतो. ह्या अनुभवातून आपल्याला माहिती मिळते. तो मानवावरच नाही तर प्राणी-पक्षी इत्यादीवर सुद्धा त्याची कृपा दृष्टी असतेच.

या अनुभवात एक माझी खूप मोठी चूक झालेली ती म्हणजे, "मी बाबा हनुमानजी समोर शब्द ठेवला कि माझा कुत्रा (रजत) मला मिळू द्या व तो मिळाल्यास मी एक पाव पेढ्याचा प्रसाद वाटीन". असा शब्द देणे म्हणजे "नवस" करण्यासारखे आहे आणि त्याला आपल्या मार्गात बंधन आहे. म्हणजेच आपल्या मार्गात बाबांनी सर्व जुने विचार बंद करायला सांगितले आणि मार्गात येताच आपण परमेश्वरास शब्द देत असतो की, "मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले" आणि मी ती चूक केली. 

म्हणून, कोणत्याही सेवकांनी कधीही असे शब्द परमेश्वरास देऊ नये, कि जर तुम्ही माझी ही ईच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला हे देईल किंवा ते देईल. परमेश्वरास फक्त ४ तत्व, ३ शब्द आणि ५ नियम पाहिजे असतात, त्याला या नश्वर दुनियेतील दुसरे काहीच नको म्हणून, कुणीही अशी चूक कधीही करू नये. कारण, त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर येऊ शकतात. याबद्दल काळजी घ्यावी ही नम्र विनंती.


लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांना क्षमा मागतो. 

नमस्कार...!

सेवक : दिनेश रा. जुमळे
पत्ता : चापेगडी, कुही, नागपूर
सेवक क्रमांक: १०१०५
मार्गदर्शक: मा. श्री. हिरामनजी नंदनवार
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

प्रकरण क्रमांक: (२१) "अभाग्यास भाग्यप्राप्ती"



                        "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
                 'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक (२१) 
   
                            "अभ्याग्यास भाग्यप्राप्ती"

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी प्राप्त केलेल्या परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी त्यांची नानातऱ्हेची दुःखे नष्ट करण्याकरिता घेतला. शारीरिक दुःखबरोबरच त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दु:खही दूर झाले याशिवाय अनेकांना नानातऱ्हेचे योग प्राप्त झाले आहेत. बाबा स्वयम् परमेश्वरात विलीन झालेले आहेत. त्यांच्या मुखकमलातून जे शब्द निघतात त्याचप्रमाणे प्रत्येकाला योग मिळतो आणि आपले भाग्य बनविता येते. अशाच एका अभाग्याने आपले भाग्य या मार्गात येऊन बनविले आहे. त्या अभाग्याचे नाव आहे श्री हरिभाऊ कुंभारे.

श्री हरिभाऊ कुंभारे हे जुनी मंगळवारी, नागपूर येथे राहतात. त्यांना दोन पत्नी आहेत. त्यांचे दुर्भाग्य की त्यांचे पहिले लग्न झाल्यावर पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले, पण तेथेही ते अपयशी ठरले. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी खूप प्रयत्न केलेत, पण योग आला नाही. हा कर्मभोगाचा भाग आहे. तेव्हा ते कुटुंबासह महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे आलेत आणि प्रार्थना करू लागले. तेव्हा बाबांनी त्याना सांगितले, तुम्ही अभागी आहात. तुम्हाला आमच्या मानव धर्माचा स्वीकार करावा लागेल. तरच तुमचे भाग्य उदयास येईल. त्यावर हरिभाऊंनी बाबांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबांनी संपूर्ण मार्गदर्शन करून अनेक देवांची पूजा बंद करून एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानावे लागेल, तसेच कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेमाने वागावे लागेल हे सांगून त्यांच्याकडून तसे वचन घेतले. त्यांनी या मार्गात येण्याकरिता करावी लागणारी ४१ दिवसांची साधना सुरू केली. ती साधना पूर्ण करताना त्या काळात पाळावयास काही अटी दिल्यात. साधना पूर्ण झाल्यावर ४२ व्या दिवशी कार्याची समाप्ती करून हवनकार्य थाटामाटात पार पडले. आणि ४३ व्या दिवसापासून बाबा हनुमानजीच्या नावाने ते माळ जपू लागले.

साधारणतः चार वर्षांनंतर बाबा हनुमानजींनी त्यांच्या स्वप्नात एक साक्षात्कार दखविला. त्यांना स्वप्नात दिसले की, एक छोटासा बाळ साधारणता सात आठ महिन्याचा असलेला रांगत आला आणि त्यांच्या पत्नीचे दूध पिऊन अंगणात खेळावयास गेला. हरिभाऊनी ही घटना बाबांना समजावून सांगितली. तेव्हा बाबा जुमदेवजीनी सागितले, परमेश्वराला पुढे काय घडवायचे आहे ते तुम्ही पाहा. 

सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही गोळीबार चौक नागपूर येथे राहते. ती हरिभाऊंची धाकटी बहीण आहे. तिला मुले होत होती पण ती जन्माला आल्यानंतर थोड्यात वेळाने परमेश्वराला प्रिय होत होती. अशारीतीने तीन मुले मरण पावल्यामुळे त्यांनी मुले जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केलेत पण दुख दूर झाले नाही. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानव धर्माचे पहिले सेवक श्री. गंगारामजी रंभाड हे तिच्या घराजवळ राहत होते. ती त्यांच्या घरी आली आणि आपली हकीकत तिने त्यांना सांगितली. या मार्गाबद्दल तिला थोडीफार माहिती होती. तेव्हा त्या सेवकाने तिला बाबा हनुमानजीच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून त्याला आपली मनोकामना सांगायला लावले. पुढे परमेश्वर काय घडवतो ते पाहा असे ते म्हणाले. त्याप्रमाणे तिने कार्य केले. 

"भगवान के पास देर है, अंधेर नही" या म्हणीप्रमाणे त्या बाईची मनोकामना पूर्ण झाली. तिला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा कसलाही त्रास न होता झालेत. ती तिसऱ्यांदा गरोदर राहिली, परंतु या वेळेस तिला गरोदर असताना खूप त्रास होत होता. तिने डागा मेमोरिअल हॉस्पीटलमध्ये जाऊन औषधोपचार केलेत. पण तेथेही त्रास नाहीसा झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्रास वाढतच गेला. एकवेळ अशी आली की, तिने आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु दोन अपत्ये पोरकी होणार हा ही विचार तिच्या मनात आला. असा विचार करीत असताना पुन्हा बाबा हनुमानजींची आठवण झाली आणि एके दिवशी सकाळीच ती बाई आंघोळ करून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निवासस्थानी बाबांना भेटावयास गेली. त्यावेळेस बाबा घरी नव्हते. म्हणून ती बाई बाबा हनुमानजींच्या फोटोसमोर बसली आणि अगरबत्ती लावून तिने भगवंताला विनंती केली की भगवंता या गरोदरपणात मला खूप त्रास होत आहे. मला या दुःखातून मुक्त करा. मला जे अपत्य होईल ते तुझ्या चरणी वाहून देईन. यावेळी ती या मार्गाची सेविका होती. तिचे दुख नाहीसे झाले, यावेळेस ती सात महिन्यांची गरोदर होती. तिने भगवंताला अशी विनंती केली ती तिने घरी कोणालाही सांगितली नाही. 

वत्सलाबाईंची मनोकामना पूर्ण झाली. परमेश्वराने तिचे शब्द ऐकून तिला त्रासातून मुक्त केले. कारण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी जी एका भगवंताची प्राप्ती केली आहे ती परमेश्वरी कृपा जागृत आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिने एका छानशा गोंडस मुलाला जन्म दिला. दिवसेंदिवस वाढत वाढत तो आठ महिन्यांचा झाला. एक दिवस रांगत असताना पायरीवरून तो खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली.  खूप औषधोपचार केले पण दुःख होत नव्हते. तेव्हा वत्सलाबाईने आपल्या घरातील लोकांना सांगितले की हा मुलगा मी भगवंताला वाहून देईन असे त्यांना वचन दिले आहे. हा मुलगा आपला नाही. तो भगवंताचा आहे. म्हणून त्याचे दुःख दूर होत नाही. म्हणून त्याला भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच एक उपाय आहे. तेव्हाच त्याचे दुःख दूर होईल. तेव्हा घरच्या लोकांनी तिला अडविले. ते तिला म्हणाले , भगवंताला शब्द दिला म्हणून काय पोटच्या गोळ्याला असे वाहून देतात काय ?  परंतु त्या बाईचा निर्धार पक्का होता.  तिला नक्की माहीत होते की, वाहून दिल्याशिवाय दुःख दूर होणार नाही. तिने घरच्या लोकांना बजावून सांगितले की मी बाबा जुमदेवजींकडे जाते आणि सर्व हकीकत सांगते. ते ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे मी पुढील कार्य करीन. 

सौ . वत्सलाबाई त्या मुलाला घेऊन बाबा जुमदेवजींच्या निवासस्थानी आली. बाबांना संपूर्ण हकीकत तिने सांगितली आणि परमेश्वराला दिलेले वचन तिने पूर्ण केले नाही याची चूक कबूल केली. बाबांनी शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि बाबांनी तिला मार्गदर्शन केले की, बाई हा मुलगा तुझा नाही. तुला असे वचन देण्यास कोणी सांगितले ? ती उत्तरली, बाबा मला खूप कष्ट होत होते. मी ते सहन करू शकत नव्हते. मला कोणीही सांगितले नाही. मी स्वतःच भगवंताला अंतःकरणाला दुःख दूर होण्याकरिता वचन दिले. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे. तू भगवंताला मुलगा वाहून दे. बाई म्हणाली, बाबा आपण म्हणाल त्या दिवशी मुलगा वाहून देईन. त्यावेळी बाबांनी तिला अट घातली की मी मुलगा दान घेईन पण दोन्ही डोळ्यांत अश्रुंचा एकही थेंब न आणता हसतमुखाने दान द्यावे लागेल. अश्रूचा एक थेंब जरी डोळ्यात दिसला तर मी दान घेणार नाही. त्याप्रमाणे बाईने अट मंजूर केली आणि त्यांनी तिला तिसर्या दिवशी सायंकाळी त्या मुलाला घेऊन येण्यास सांगितले. ठरलेला दिवस शनिवार होता. त्या दिवशी १९७० सालची जानेवारी महिन्याची तीन तारीख होती. ठरलेला दिवस उजाडला बाबांनी एका सेवकातर्फ २०, ३० सेवक आणि श्री. हरिभाऊ कुंभारे यांना सहकुटुंब बोलावून घेतले सायंकाळी ७ वाजता सर्व हजर झाले सौ. वत्सलाबाई सदावर्ती ही पण आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन वेळेवर आली. भगवंताला सर्वांनी एकतेने प्रणाम केला आणि आनंदाच्या सोहळयात सुरूवात झाली.

 सौ. वत्सलाबाई आपल्या मुलाला भगवान बाबा हनुमाजीच्या प्रतिमेसमोर झोपवले अगरबत्ती लावली, कापूर लावला आणि भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली की, बाबा हनुमानजी मी आपणास वचन दिल्याप्रमाणे आज मुलाला वाहून देत आहे . हा माझा मुलगा नसून तो तुमचा आहे त्याला आपण स्वीकारावे. असे म्हणून तिने मुलाला वाहून दिले. कापूर विझाल्यावर तिने त्या मुलाला उचलेले आणि बाबा जुमदेवजींसमोर ती उभी झाली. बाबा सारखे तिच्या डोळ्यांकडे बघत होते. त्या बाईने हसतमुखाने त्या मुलाला बाबा जुमदेवजींना दान दिले तिच्या डोळयात अचूंचा एक थंबही आला नाही. त्याचवेळी बाबांनी त्या मुलाला घेऊन श्री हरिभाऊ कुभांरे यांना समोर बोलावून त्या अभाग्याला तो दान दिला. परमेश्वरी लीला अगाध आहे त्याला जे घडवायचे होते, ते त्यांनी घडामोडी करून घडविले.

 आश्चर्याची गोष्ट अशी की , ज्यावेळी हरिभाऊंनी मुलाला आपल्या हातात घेतले त्याचवेळी त्यांनी तो मुलगा आपल्या लहान पत्नीजवळ दिला आणि साक्षात्कार घडला की , त्या बाईने मुलाला हातात घेताच तिच्या स्तनातून दूध बाहेर येऊ लागले . हे तेथे जमलेल्या सेवकांनी पाहिले आणि वत्सलाबाई चे दूध आटले गेले ही भगवंताची लीला पाहून सर्व सेवक आश्चर्यचकित झाले आणि म्हणून बाबांनी प्राप्त केलेल्या एका परमेश्वराची कृपा जागृत आहे विशेष सांगायचे म्हटल्यास या दान दिलेल्या मुलाचा चेहरा वत्सलाबाईच्या दोन मुलांच्या चेहच्यापेक्षा वेगळा आहे . वत्सलाबाईची दोन मुले तिच्या चेहऱ्यावर असून हा तिसरा मुलगा हरिभाऊंच्या चेहऱ्यावर आहे धन्य तो परमेश्वर.

अशाप्रकारे बाबांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सेवकांची इच्छा परिपूर्ण होऊन त्याला त्याच्या जीवनात समाधान लाभते . परंतु त्याकरिता एक परमेश्वराला समोर ठेवून मानवतेचे कार्य केले पाहिजे म्हणजे या कलियुगात सुद्धा सत्ययुगाचा लवलेश आहे हे वरील गोष्टीवरून सिद्ध होते . अशाप्रकारे या मार्गात अभाग्यास भाग्य लाभते हे सिद्ध झाले आहे .

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन एस. पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


Friday, 15 May 2020

【दुःखाचा लाटा येई वारंवार, आलो एक भगवान मार्गी, सुख मिळाले अपरंपार】


                               【"माझा अनुभव"】
   अनुभव क्रमांक: १७७,  प्रकाशित दिनांक: १७ नोव्हेंबर २०१६

【दुःखाचा लाटा येई वारंवार, आलो एक भगवान मार्गी, सुख मिळाले अपरंपार】

माझे नाव 'लोकेश रामलालजी पडोळे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

आमच्या परिवारामध्ये ६ सदस्य आहेत. ताईच्या लग्नानंतर कुटुंबामधे पाच सदस्य राहिलो. आई-बाबा, दोन मोठे दादा आणि मी. माझ्या वडिलांनी लहानपणापासून खूप कष्ट केले, आणि कधी-कधी दारू प्यायचे, त्यामुळे त्यांची प्रकृति कालांतराने बरी राहत नसायची. त्यामुळे माझ्या वडिलांकडून कडून खुप जास्त जळ काम जमत नव्हते. नंतर माझ्या वडिलांनी पानठेला लावला. पण परिस्थिती एवढी खराब झालेली होती की, घरामध्ये खायला अन्न सुद्धा  राहत नव्हते. माझ्या वडिलांनी पानठेला तर लावला होता पण वाढत्या महागाईमुळे घर चालणार एवढे उत्पन्न त्यामधुन होत नव्हते.

नंतर पुढे माझ्या वडिलांनी पानठेल्यामध्ये देशी दारूची विक्री सुरु केली. कारण दुसरे कुठले काम बाबा कडून होतच नव्हते. आमचे शिक्षण सुद्धा सुरू होते, माझ्या वडिलांनी दारू तर विकली पण आम्हाला कधीही व्यसन लागलेला नाही , माझे वडील आम्हाला एकच सांगत होते की, तुम्ही शिक्षण शिका, नाहीतर  माझ्यासारखे दारू विकावे लागणार, मग आमचे शिक्षण हळूहळू सुरू झाले पण माझ्या वडिलांची प्रकृति जास्तच खराब राहायची आम्ही खूप डॉक्टरांचे उपचार व औषध केली पण काही फायदा काही मिळत नव्हता.

नंतर मग देवी-देवतांची खूप पूजा केली. लोक जिथे सांगायचे तिथे आम्ही जात होतो. पण अमावस्या पौर्णिमा आली की, तब्येत जशीच्या तशीच व्हायची. काही काळाने २००८ मध्ये माझे दोन नंबरचे दादा हे आर्मी मधे लागले त्यामुळे आमची परिस्थिती ठीक व्हायला लागली.
त्यानंतर माझे मोठे दादा पण आय.टी.आय पास होऊन कंपनी मध्ये नोकरी करायचे आणि माझे शिक्षण सुरू होते मी आय.टी.आय प्रथम वर्षात असतांना मला सेंट्रल रिज़र्व पोलीस फोर्स मधे दिनांक ०३/०४/२०११ ला नोकरी रुजू झालो. तोपर्यंत घरामध्ये सर्व ठीक होते, पण त्यानंतर आमच्यावर खूब दुःख यायला सुरू झाले .

माझ्या वडिलांची प्रकृति तर ठीक होत नव्हती. पण त्या पाठोपाठ माझ्या मोठ्या भावाची सुद्धा प्रकृति अचानक खूप जास्त खराब झाली डॉक्टर उपचार केला पण कुठेही फायदा मिळाला नाही. माझ्या मोठ्या भावाची प्रकृति एवढी खराब की, माझा भाऊ कोणाला ओळखत सुद्धा नव्हता, तो जीवनाच्या शेवटचा टप्प्यात होता, घरच्या लोकांना काही समजत नव्हते की, काय करावे आणि काय नाही.
आमच्या घरचे सर्वजन खूप टेंशन मध्ये होते, काय करावे समजत नव्हते, माझे  मोठे दादा स्वःता बोलले की, मला मार्गात जायचे आहे. आणि मला आताच मार्गदर्शकांच्या घरी घेऊन चला, घरच्या लोकांनी त्वरित गाडी मध्ये घालून श्री. यशवंतजी हटवार मार्गदर्शक मू.सातोना यांचा घरी घेऊन आले आणि सर्व दुःखा बद्दल सविस्तर पणे माहिती सांगितली.

आता बघा भगवंताची कृपा ज्या वेऴेत आम्ही मार्गदर्शकांच्या घरी गेलो त्या वेऴी आम्ही घरातली कोणतीही देवी-देवतांची मूर्ती विसर्जन केलेली नव्हती. त्यामुळे मार्गदर्शकांनी तीर्थ करुण दिलेला नव्हता पण शब्द दिला की, तुमच्या गावचे मार्गदर्शक हे तुम्हाला तीन दिवस स्वता तीर्थ बनवायला घरी येतील. नंतर मग आम्ही घराची सर्व साफसफाई करून सर्व मूर्तीचे विसर्जन करून श्री.महादेवजी भिवगडे मार्गदर्शक मू.पाचगाव यांच्या घरी त्यांना तीर्थ बनवून मागण्यासाठी बोलवून आणले मग त्यांनी तीर्थ बनवून दिला, त्यानी तीन दिवस तीर्थ बनवून दिला ह्या तीन दिवसामध्ये दादाची प्रकृति ठीक व्हायला लागली मग जसजसे दिवस गेले तसतसे घरची परिस्थिती ठीक झाली,आणि घरचे सर्व दुःख दूर झाले.

त्यानंतर माझ्या दादाला चंद्रपूर येथे ऑर्डन्स फॅक्टरी येथे नोकरी लागली. आज आम्ही सर्व सुखी जीवन जगत आहोत. ते 'बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी' यांच्या कृपेमुळे. व आता सर्व सुख समाधानी आहे.

लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागतो.

नमस्कार..!

सेवक:- लोकेश रामलालजी पडोळे (भारतीय सैनिक )
पत्ता:- मू. पाचगाव, पोस्ट-वरठी, ता-मोहाडी, जिल्हा:भंडारा.
मार्गदर्शक:  श्री अनिलजी हटवार

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर  अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.