【"माझा अनुभव"】अनुभव क्रमांक: (१६९) प्रकाशित दिनांक: ०९ नोव्हेंबर २०१६
【"फिरलो दारोदारी तरी नाही झाली दूर माझी बिमारी, आलो एका भगवंताचा दारी, क्षणात दूर झाली बरी न होणारी बीमारी"】
माझे नाव 'सुरेंद्र रहांगडाले' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात माझे आई-वडील, आणि मी असे एकूण ३ सदस्य होते. आम्ही अत्यंत दुःखी होतो. मी २०१० मध्ये नोकरीवर लागलो व कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर रुजू झालो. एक वर्ष माझा चांगला गेला आणि नंतर मला डोळ्यांचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडे गेलो तर तिथेही आराम मिळाला नाही आणि पिलिया (jaundice) झाला, असे निदर्शनात आले. डॉक्टरांकडे औषधोपचार केला, पण आराम मिळत नव्हता. नंतर मी पिलियाचे औषध घेतले व त्याने मला आराम मिळाला. परंतु तीन महिन्यानंतर पुन्हा मला पिलिया झाला. तेव्हा मी वैदांकडे पिलिया झाडायला गेलो. माझे दोन वर्षं असेच निघाले. वर्षातुन चार ते पाच वेळा पिलिया व्हायचा. असेच सतत दोन-तीन वर्ष औषधोपचार करणे आणि पिलिया झाडणे सुरू होते. नंतर मी २०१४ ला दुसऱ्या नोकरीवर लागलो व नागपूरला स्टोअर इंचार्ज या पदावर दोन महिने काम केले.
पुन्हा पिलिया (jaundice) झाला आणि मला नौकरी सोडावी लागली. मला काही कळेनासे झाले की वारंवार असे का घडत आहे. नंतर पुन्हा दुसऱ्या कंपनीत नोकरीला लागलो आणि पुन्हा ३ महिन्यानंतर पिलिया आणि गालाच्या बाजूला गाठ यायची. मी डॉक्टरकडे औषधोपचार केला, पण आराम मिळत नव्हता. कारण डॉक्टरांना त्या गाठीमागचे मुख्य कारण मिळेना. तेव्हा शेजारचे म्हणायचे की, तू ज्या खोलीत राहतोस तिथे यापूर्वी दोन व्यक्ती मृत्युमुखी झालेले आहेत, त्यांना पण गळयाला गाठ यायची. पण या गोष्टींकडे मी लक्ष दिले नाही. माझा त्रास आणखी वाढला, तेव्हा मी गावी परत आलो आणि गोंदियाला डॉक्टरी उपचार केला. परंतु, तिथे पण नैराश्यच हाती आले. मी शेवटी मरण्याच्या स्थितीमध्ये होतो आणि वैदाकडे गेलो. त्यांनी मला सांगितले की, तुला ३ वर्षांपासून पिलियाचा त्रास आहे आणि तू ज्या खोलीत राहतो, त्या खोलीत दोन माणसांना पण गळयात गाठ येऊन ते मृत झालेले आहे. मी घाबरलो आणि त्या वैदाने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर मला १५ मिनिटांत आराम मिळाला. तर मी दर पंधरा दिवसांत त्यांच्याकडे जायचो व पंधरा दिवसांत पुन्हा तोच त्रास व्हायचा. घरी पूजा केली, हवन केले, पण पुन्हा पंधरा दिवसात तोच त्रास. पैसे खर्च झाले परंतु त्या वैद्यांची शक्ती कामी नाही आली.
मी नागपूरला आलो आणि घर बदललं, तरीपण पुन्हा तोच त्रास. त्यावेळी वैदाकडे जाऊन आणि पैसे खर्च करायचो आणि या परिस्थितीने मी बेजार झालो. तेव्हा मी घरी म्हटले की, "मी नोकरी सोडत आहे व घरी बसत आहे. मला सतत येणे-जाणे परवडत नाही".
मग मी घरी आलो, तर एके दिवशी आमच्या घरासमोर राहणारे परमात्मा एक मार्गातील सेवक श्री. अशोकजी बिसेन यांनी मला मार्गाबद्दल माहिती दिली आणि आमची खूप वाईट परिस्थिती असल्यामुळे आम्ही कुटुंबाचे एकमत करून दुसऱ्या दिवशी श्री. अशोकजी बिसेन यांच्यासोबत मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी सर्व परिस्थिती विचारली आणि मार्गाची रूपरेषा सांगितली. आम्हाला फक्त आराम पाहिजे होता म्हणून सर्व करायला तयार होतो. म्हणून आम्ही २०१५ ला दिवाळीच्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गात प्रवेश केला आणि साधे कार्य सुरु केले व मला दोन ते तीन महिन्यांमध्ये आराम मिळाला.
धन्य आहे ही दैवी कृपा व महानत्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांनी मला मरणाच्या पातळीवरून वाचवले आणि आज मी सुखी-जीवन जगतोय.
लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- सुरेंद्र रहांगडाले
पत्ता :- मु. इंदोरा, पो. करटी, ता. तिरोडा, जि. गोंदिया
मार्गदर्शक :- श्री. भोजराजजी पारधी
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7057624579
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
खुप खुप छान अनुभव दादा..
ReplyDeleteनमस्कार...
नमस्कार दादा
Deleteछान अनुभव दादा 🙏
ReplyDeleteखूप छान अनुभव सुरेंद्र दादा
ReplyDeleteखूप छान अनुभव दादा🙏
ReplyDeleteनमस्कार जी सुरेंद्र दादा खुप छान अनुभव सांगीतले आहे. बाहरबाध्य मुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावे लागले. व अनेक नोकरी सोडावे लागले. परंतु या मार्गत येताच सर्व दुःख नष्ट झाले. एवढी मोठी महान कृपा भगवंताची आपल्या बाबा जुमदेवजी यांनी दिली आहे. या क्रूपेला विसरु नका. नेहमीच बाबांच्या नियमानुसार जीवन जगावे लागते तेव्हाच परमेस्वरी कृपा आपल्याला लाभते. नमस्कार जी. धन्यवाद.
ReplyDelete