Followers

Monday, 11 May 2020

【स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला】

                 प्रकाशित दिनांक: ११ नोव्हेंबर २०१९
                      अनुभव क्रमांक:(१७१)

                       【"माझा अनुभव"】

【स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला】

माझे नाव 'आकाश धनराजजी भोंगाडे' आहे. आज मी 'माझा अनुभव' या अनुभव मालिकेत  माझ्या वडिलांना मार्गात आल्यानंतरचा प्रथम अनुभव सादर करीत आहे.

माझे वडील व्यवसायाने शेतकरी आहे. लहानपणापासून ते आतापर्यंत ते शेतीचेच काम करत आहेत. एवढ्या दिवसांचा शेतीचा अनुभव आणि आगळे-वेगळे होणारे पिकावरील रोग यांचा त्यांना पुरेसा अभ्यास आहे. तसेच शेतीतील काही प्रश्नांवर उत्तर द्यायला ते नेहमी तत्पर असतात. आमच्याकड़े शेती असल्याने आमचं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. आमची शेती कोरडवाहू आहे आणि आम्हाला नेहमी सिंचन कालव्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते. पावसाचे पाणी कधी वेळेवर येते किंवा नाही याची काही शाश्वती नाही.

आमच्या कडे धानाची शेती होती. नुकतेच धानाचे रोप शेतात उगवले होते. पाणी उशिरा आल्याने धान उशिरा पेरला त्यामुळे रोप लहान होते. त्यानंतर १५ ते २० दिवसांत रोवणी करणे गरजेचं असते. वास्तविक रोपाची उंची झाल्यावर आपल्याला त्याची शेतात रोवणी करावी लागते आणि लोकांची रोवणीला सुरुवात झाली होती. आमच्या शेतातील रोप लहान असल्यामुळे रोवणी करायला जमत नव्हते. 

माझे काका जे मार्गामध्ये नाही, त्यांनी रोपांच्या वाढीसाठी एका औषधीमध्ये दारू मिसळवून त्याची रोपावर फवारणी केली त्यामुळे रोपाची वाढ झपाट्याने झाली व ते रोवणीसाठी तयार झाले. ही प्रक्रिया त्यांनी माझ्या वडिलांना सांगितली. मात्र दारूला हात लावणे आपल्याला जमत नाही म्हणून वडिलांनी त्यास नकार दिला पण जर दुसऱ्याच्या हाताने दारूची फवारणी केली तर चालेल असं त्यांचं मत होतं. 

ठरल्याप्रमाणे औषधी मध्ये दारू मिसळवून त्याची फवारणी आमच्या शेतातील रोपावर करण्यात आली. मात्र घडले उलटेच, दोन ते तीन दिवसांत संपूर्ण रोप भाजल्यासारखे झाले होते व त्यांचे सडणे सुरु झाले होते, रोपाची वाढ होणे तर दूरंच पण वाढ खुंटलेली होती. हे जे काही घडलेले होते त्याच्या मागची चूक माझ्या वडिलांना आधीच माहित होती. त्यांनी सरळ मार्गदर्शकांचा रस्ता गाठला. चुकीमुळे घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली, त्याची माफी मागितली. मार्गदर्शकांनी आम्हाला सात दिवसांचे माफीचे कार्य दिले. त्या सात दिवसांत सडलेल्या रोपाला अंकुर फुटले, ते मोठे झाले नंतर त्याची रोवणी करण्यात आली. त्या दिवसानंतर असल्या प्रकारचा प्रयोग कधीही करण्यात आला नाही व सर्व बरोबर होत गेले. स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला.

लिहिन्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक:- आकाश धनराजजी भोंगाडे 
पता:- भंडारा
सेवक क्रमांक:- ११८९४
मार्गदर्शक:- श्री. वैरागडे गुरुजी
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर     
आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


3 comments:

  1. छान अनुभव दादा
    नमस्कार जी 🙏

    ReplyDelete
  2. नमस्कार जी सर्वांना. आकाश भोंगाड़े दादा खुप छान अनुभव सांगीतले आहे. आपल्या मार्गात दारू बंद आहे, मग दुसर्‍याच्या हातून जर त्याचा ऊपयोग घेतला तर तो परमेश्वराला मान्य कसे होणार. म्हणून शेतातील रोपटे जळाले. बाबांच्या नियमानुसार जीवन जगावे लागते तेव्हाच परमेस्वरी कृपा आपल्याला लाभते. नमस्कार जी.

    ReplyDelete
  3. नमस्कार जी सर्वांना. परमेश्वराला जे मान्य नाही, या मार्गाच्या नियमात जे बसत नाही. ते सेवकांनी करू नका. आकाश भोंगाड़े दादा यांनी खुप छान अनुभव सांगीतले आहे. नमस्कार जी.

    ReplyDelete