【"माझा अनुभव"】
अनुभव क्रमांक: १७७, प्रकाशित दिनांक: १७ नोव्हेंबर २०१६
【दुःखाचा लाटा येई वारंवार, आलो एक भगवान मार्गी, सुख मिळाले अपरंपार】
माझे नाव 'लोकेश रामलालजी पडोळे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
आमच्या परिवारामध्ये ६ सदस्य आहेत. ताईच्या लग्नानंतर कुटुंबामधे पाच सदस्य राहिलो. आई-बाबा, दोन मोठे दादा आणि मी. माझ्या वडिलांनी लहानपणापासून खूप कष्ट केले, आणि कधी-कधी दारू प्यायचे, त्यामुळे त्यांची प्रकृति कालांतराने बरी राहत नसायची. त्यामुळे माझ्या वडिलांकडून कडून खुप जास्त जळ काम जमत नव्हते. नंतर माझ्या वडिलांनी पानठेला लावला. पण परिस्थिती एवढी खराब झालेली होती की, घरामध्ये खायला अन्न सुद्धा राहत नव्हते. माझ्या वडिलांनी पानठेला तर लावला होता पण वाढत्या महागाईमुळे घर चालणार एवढे उत्पन्न त्यामधुन होत नव्हते.
नंतर पुढे माझ्या वडिलांनी पानठेल्यामध्ये देशी दारूची विक्री सुरु केली. कारण दुसरे कुठले काम बाबा कडून होतच नव्हते. आमचे शिक्षण सुद्धा सुरू होते, माझ्या वडिलांनी दारू तर विकली पण आम्हाला कधीही व्यसन लागलेला नाही , माझे वडील आम्हाला एकच सांगत होते की, तुम्ही शिक्षण शिका, नाहीतर माझ्यासारखे दारू विकावे लागणार, मग आमचे शिक्षण हळूहळू सुरू झाले पण माझ्या वडिलांची प्रकृति जास्तच खराब राहायची आम्ही खूप डॉक्टरांचे उपचार व औषध केली पण काही फायदा काही मिळत नव्हता.
नंतर मग देवी-देवतांची खूप पूजा केली. लोक जिथे सांगायचे तिथे आम्ही जात होतो. पण अमावस्या पौर्णिमा आली की, तब्येत जशीच्या तशीच व्हायची. काही काळाने २००८ मध्ये माझे दोन नंबरचे दादा हे आर्मी मधे लागले त्यामुळे आमची परिस्थिती ठीक व्हायला लागली.
त्यानंतर माझे मोठे दादा पण आय.टी.आय पास होऊन कंपनी मध्ये नोकरी करायचे आणि माझे शिक्षण सुरू होते मी आय.टी.आय प्रथम वर्षात असतांना मला सेंट्रल रिज़र्व पोलीस फोर्स मधे दिनांक ०३/०४/२०११ ला नोकरी रुजू झालो. तोपर्यंत घरामध्ये सर्व ठीक होते, पण त्यानंतर आमच्यावर खूब दुःख यायला सुरू झाले .
माझ्या वडिलांची प्रकृति तर ठीक होत नव्हती. पण त्या पाठोपाठ माझ्या मोठ्या भावाची सुद्धा प्रकृति अचानक खूप जास्त खराब झाली डॉक्टर उपचार केला पण कुठेही फायदा मिळाला नाही. माझ्या मोठ्या भावाची प्रकृति एवढी खराब की, माझा भाऊ कोणाला ओळखत सुद्धा नव्हता, तो जीवनाच्या शेवटचा टप्प्यात होता, घरच्या लोकांना काही समजत नव्हते की, काय करावे आणि काय नाही.
आमच्या घरचे सर्वजन खूप टेंशन मध्ये होते, काय करावे समजत नव्हते, माझे मोठे दादा स्वःता बोलले की, मला मार्गात जायचे आहे. आणि मला आताच मार्गदर्शकांच्या घरी घेऊन चला, घरच्या लोकांनी त्वरित गाडी मध्ये घालून श्री. यशवंतजी हटवार मार्गदर्शक मू.सातोना यांचा घरी घेऊन आले आणि सर्व दुःखा बद्दल सविस्तर पणे माहिती सांगितली.
आता बघा भगवंताची कृपा ज्या वेऴेत आम्ही मार्गदर्शकांच्या घरी गेलो त्या वेऴी आम्ही घरातली कोणतीही देवी-देवतांची मूर्ती विसर्जन केलेली नव्हती. त्यामुळे मार्गदर्शकांनी तीर्थ करुण दिलेला नव्हता पण शब्द दिला की, तुमच्या गावचे मार्गदर्शक हे तुम्हाला तीन दिवस स्वता तीर्थ बनवायला घरी येतील. नंतर मग आम्ही घराची सर्व साफसफाई करून सर्व मूर्तीचे विसर्जन करून श्री.महादेवजी भिवगडे मार्गदर्शक मू.पाचगाव यांच्या घरी त्यांना तीर्थ बनवून मागण्यासाठी बोलवून आणले मग त्यांनी तीर्थ बनवून दिला, त्यानी तीन दिवस तीर्थ बनवून दिला ह्या तीन दिवसामध्ये दादाची प्रकृति ठीक व्हायला लागली मग जसजसे दिवस गेले तसतसे घरची परिस्थिती ठीक झाली,आणि घरचे सर्व दुःख दूर झाले.
त्यानंतर माझ्या दादाला चंद्रपूर येथे ऑर्डन्स फॅक्टरी येथे नोकरी लागली. आज आम्ही सर्व सुखी जीवन जगत आहोत. ते 'बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी' यांच्या कृपेमुळे. व आता सर्व सुख समाधानी आहे.
लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागतो.
नमस्कार..!
सेवक:- लोकेश रामलालजी पडोळे (भारतीय सैनिक )
पत्ता:- मू. पाचगाव, पोस्ट-वरठी, ता-मोहाडी, जिल्हा:भंडारा.
मार्गदर्शक: श्री अनिलजी हटवार
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.
दैवीय शक्ति जागृत आहे आणि सेवकांच्या शब्दावर ऊभी आहे,वरील अनुभव हे उत्तम उदाहरण आहे। नमस्कार जी सर्वाना।
ReplyDeleteखूप सुंदर अनुभव दादा
ReplyDeleteनमस्कार जी दादा व ताई