Followers

Monday, 27 April 2020

[माझा अनुभव] सेविका रोशनी कुंडलिकजी मळामे


【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: ०१ जून २०१६

【"धरा एकच ध्यास, परमेश्वरावर पुर्ण विश्वास"】

माझे नाव 'कु. रोशनी कुंडलिकजी मळामे' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

मार्गात येण्याचे कारण असे आहे की, आम्ही अनेकामध्ये असतांना खुप दु:खी होतो. आमचे घर हे दुःखानी ग्रासलेलं होतं. आमच्या घरी आई-बाबा, ताई, मी, आणि छोटा भाऊ असे पाच सदस्य आहोत. आईची प्रकृती ठिक नसायची, तिला गुप्तरोग होता.  आम्हा बहिन-भावांची पण प्रकृती ठीक राहत नव्हती, अधुन मधुन तिघे पण आजारी राहत होतो. मी लहान असतांना जळली होती. तसेच, बाबांना दारूचे व्यसन होते.

पण सर्वात जास्त आम्ही त्रासलेले होतो ते आईच्या दु:खामुळे. सर्व प्रकारचे उपचार करून झालेत, पण काहिच आराम लागला नाही. डाक्टरी उपचार खुप केला, पण आईचे दुःख काही दुर झाले नाही.
ते म्हणतात ना की, हिंदू धर्मामध्ये ३३ कोटि देवी-देवता आहेत, त्या सर्व देवी-देवतांचे पण उपास-तापास करून झालेत, पण आईला तिळ भर सुद्धा आराम लागला नाही.ज्या ज्या ठिकाणांची माहिती मिळायची, त्या त्या ठिकाणी आई जायची आणि त्या देवी-देवतांची पुजा आणि उपवास करायची, पण फायदा काहिच होत नव्हता. दिवसेंदिवस तिचा त्रास असह्य होत होता.

एकदा माझ्या आईची मोठी आई आमच्याकडे आली आणि तिला सर्व काही माहिती होते आमच्या दु:खाविषयी. तेव्हा तिच म्हणाली की, "परमात्मा एक" या मार्गात जा. आमच्या गावी परमात्मा एक मार्गाचे काही सेवक आले होते, म्हणे त्यांनी भजनाच्या माध्यमातुन चांगले अनुभव सांगितले, म्हणून तु त्याच मार्गात जा म्हणाली.

मग आईने मार्गाविषयी माहीती घेतली आणि घरी बाबांना सांगितले. बाबांनी हो म्हटले, पण गावी मार्गदर्शक कोण आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. एके दिवशी आई अशीच एका सेवकांच्या घरी गेली आणि बाबांच्या फोटो समोर हाथ जोडुन म्हणाली की, "आता मला तुमच्याच मार्गामध्ये यायचं आहे". असे बोलुन ती घरी येत नाही तर तिच्या मागोमाग एक व्यक्ती घरी आले आणि त्यांनी म्हटले की, आपल्याच गावी मार्गदर्शक आहेत आणि त्यांचे नाव श्री. श्रावणजी भोंदे आहे असे सांगितले.

मग आम्ही मार्गदर्शक भोंदे काकाजींकडे गेलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जुन्या देवी-देवतांच्या फोटो व मुर्तींचे विसर्जन करून कार्याला सुरवात केली. ७, ११, २१ या प्रमाणे कार्य केल्यामुळे घरी सर्व सुख-शांती मिळाली आणि घराला घरपण प्राप्त होऊन भगवंत आमच्या घरी २४ तास वास करू लागला.

पण मग म्हणतात, ना सेवक हा कितीही जुना आणि अनुभवी असला तरीपण त्याच्या हातून नकळत का होईना चुका होत असतात आणि त्या चुकांचे अनुभव भगवंत हा सेवकांना घडवुन आणत असतो. फक्त सेवकांनी वेळेवर आपली चुक लक्षात आणुन भगवंताला क्षमा मागावी. भगवंत इतका दयाळु आहे की, आपल्या सेवकांना क्षमा करतो.

असेच एकदा आईच्या बाबतीत घडले. आम्ही मार्गात येऊन २ वर्ष झाले होते. त्यागाचे हवन वगैरे सर्व झाले होते. आई माझ्या आक्काच्या घरी लग्नाला गेली होती आणि एका घरी पिण्यासाठी पाणी मागितले, आधीच त्या ग्लासने कुणीतरी दारू प्यायला असणार आणि त्या घरवाल्या बाईने त्याच ग्लासमध्ये आईला पाणी दिले.

आईला दारूची वास येऊन सुद्धा तिने पाणी पिऊन घेतलं आणि सर्व अनर्थ झालं.

पुन्हा सर्व जसेच्या तसेच सर्व दुःख परत आले. आईची तब्येत पुन्हा तशीच झाली. पुन्हा डाक्टरी उपचार केलं, पण आराम काही लागलं नाही. मग आईची चुक आईच्या लक्षात आली आणि आईने मार्गदर्शक काकाजींना लग्नामध्ये जे झाले, ती सर्व हकीकत सांगितली. मग त्यांनी माफीचे कार्य दिले. कार्य केल्यावर सर्व ठिक झाले. आता सर्वकाही ठीक आहे.

आपल्या मार्गातील सेवकांना रोजच्या जीवनामध्ये अनेक अनुभव येतात आणि सेवकांच्या हातून चुका झाल्या असतील तर वेळेवर चुक शोधुन भगवंताला क्षमा मागावी आणि मानवधर्माच्या शिकवणीनुसार प्रत्येक सेवक वागला तर भगवंत त्याला कोणत्याच बाबतीत कमी पडू देत नाही, त्याचे फळ उशिरा का होईना भगवंत देतोच.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार.....!

सेविका :- कु. रोशनी कुंडलिकजी मळामे
पत्ता :- मु. शहापुर, जि. भंडारा.
सेवक नं :- ११७५०
शाखा :- भंडारा
मार्गदर्शक- श्री. श्रावणजी भोंदे
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर.

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

टीप: अनुभव वाचन झाल्यावर खालील Home बटन च्या खाली VIEW WEB VERSION वर क्लिक करून आपल्या या ब्लॉग ला FOLLOW करा.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw


प्रकरण क्रमांक (२) भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला



  "मानवधर्म परिचय अभ्यासक्रम मोहीम
    (वर्ष २०१७-१८)

         "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (२)

  "भगवत प्राप्ति चा मार्ग सापडला"

१९३३ साली जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्यांशी नेहमी भांडण होत होते. म्हणून तेथे ठुब्रीकर घराणे कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले. रंभाजी रोड, टिमकी येथील रामेश्वर तेलघाणीच्या मागे असलेले झुनके सावकार यांचे घर विकाऊ होते. ते घर ठुब्रीकर बंधूनी घेण्याचे ठरविले आणि घरमालकाशी सौदा केला. त्याअगोदर त्या घराबद्दल अशी हकीकत होती की, ते घर सैतानी आहे. त्या घरात भुताटकी आहे. एक मुसलमान त्या घरात पाय ठेवल्याबरोबर मरण पावला. म्हणून ते घर विकत घेऊ नये. असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबांचे घराणे हिंदु संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते. त्यांचे गुरू श्री. यादवराव महाराज. धापेवाडा हे होते. बाबांच्या वाडवडिलांनी असा विचार केला की, आपण होमहवन, पूजा, अर्चा केल्यावर ती भूताटकी नष्ट होईल आणि आपण सुखात राहु शकू असा विचार पक्का करुन त्यांनी घर विकत घेतले. यावेळेस बाबा बारा वर्षाचे होते. सध्या बाबा ज्या घरात राहतात तेच हे घर होय.

ठरल्याप्रमाणे त्या घरात राहावयास येण्यापूर्वी त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरुमंत्राने होम हवन, पूजा अर्चा केली आणि आनंदाने त्या घरात राहावयास आले. आगीतून निघून फुफाट्यात पडणे या म्हणीप्रमाणे या घरात राहावयास आल्यानंतर कोणालाही सुखशांती लाभत नव्हती. ते वर्षभर सुद्धा सुखी राहू शकले नाहीत. घरातील लोकांना सारखे स्वप्नविकार होत होते. जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता. पायरीवर कुणीतरी सारखा चालतो आहे असा त्यांना भास होत होता. घरासमोर रात्रभर कुत्री ओरडणे वैगरे भुताटकीचे प्रकार सुरू होते. त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असताना कुत्र्यासारखी ओरडून मरत असत.

अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब दुःखी होते. बाबांचे वडिल श्री. विठोबा यांनी बरेच उपचार केलेत. औषधोपचार केला गुरुविद्देद्वारे होमहवन केले. मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केलेत. देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपाय केलेत. कित्येक नवस केले. नानाप्रकारे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती. हजारो रूपये खर्च झाले होते. भूताटकीमुळे कित्येक जीव देवाघरी गेले. यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते. परिवारात शांतता नव्हती. बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पाठ होता. त्यात असा उल्लेख आहे की, जेथे हनुमान चालीसा वाचला जातो तेथे भुत राहु शकत नाही तेव्हा भुताटकीचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज दोन तिन वेळा हनुमान चालीसा वाचित होते परंतु घरात सुख समाधान नव्हते. लहान मुले सारखी आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते. या भूताटकिचा खेळ सारखा बारा वर्षे सुरु होता.

१९४५ सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट बाबांचे रोज दोन तीन वेळा हनुमान चालीसा वाचने सुरु होते. त्याच बरोबर हनुमानजीला ते विनंती करीत होते की, "बाबा हनुमानजी" तुम्ही काहितरी योग द्या आणि हे दुःख दूर करा.

एके दिवशी बाबांचे लहान बंधू मारोतराव हे घरी एकटेच झोपले होते माजघरात कोणीच नव्हते  आणि बाबा छपरीत बसले होते. बाबा छपरीतून माजघरात गेले तेव्हा मारोतराव उठून बसले होते. तेव्हा बाबांनी मारोतरावला विचारले की, तू का बसला आहेस, तेव्हा मारोतरावनी विचारले की, माझे पाय कोणी हालवले, आणि मला कोणी उठवले तेव्हा बाबा पुन्हा मारोतरावला म्हणाले की, मी आताच  घरात आलो आणि घरात तर कोणीही नाही मग तुझे पाय कोणी हालविले हे मला माहिती नाही. इतके बोलून बाबा आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी याचा छडा लावण्याकरिता मांत्रिकाकड़े जाण्याचा विचार केला.

बाबा मांत्रिकाकड़े जाण्याचा तयारीत असताना बाबा हनुमानजीला विनंती केल्या प्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांचाकड़े कधी न येणारी एक साधी व्यक्ति त्यांच्या घरी आली. त्याने बाबांना विचारले की, तू कुठे जात आहेस. तेव्हा बाबांनी वरील घडलेला प्रकार त्या व्यक्तिजवळ कथन केला. ते त्यांना म्हणाले, मी मांत्रिकाकड़े जात आहे. हे ऐकून त्या व्यक्तीला दया आली. ते बाबांना म्हणाले, तुम्ही कशाला जाता, माझ्याजवळ  'परमेश्वरी कृपा' संपादन करण्याचा एक मंत्र आहे. तो एका संन्याशाने दिलेला मंत्र आहे. त्याचा विधि केल्याने 'परमेश्वरी कृपा' संपादन करता येते आणि सर्व दुःखांचे निवारण होते. त्या मंत्राने जर मी कोणालाही तीर्थ करुन दिले तर त्याचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो. असे मला बरेच अनुभव आले आहेत.

तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला विचारले की हा संन्याशाचा मंत्र तुमच्याजवळ  कसा आला. कारण तुम्ही तर संन्यासी दिसत नाही. तेव्हा त्याने उत्तर दिले की, माझे वडील हे एका संन्याशाबरोबर राहत होते. तो संन्याशी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच्याजवळ असलेले सर्व ग्रंथ घरी आणले. वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकांचे दुःख दूर केले. हे करीत असतांना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झालेत. मी स्वतः या मंत्राचा विधी कधी केला नाही. ज्यांनी ज्यांनी हा विधि केला व करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विधी करतांना मरण पावले तर काही पागल झाले. त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकड़े जाण्याचे रद्द केले. थोड़ा वेळ थांबुन तो मंत्र आणि त्याचा पत्ता बाबांनी त्या व्यक्तीकडून लिहून घेतला. ती व्यक्ती मौदा या गावात राहणारी होती. त्या मंत्राने तीर्थ तयार करुन ते मारोतराव यांना पिण्यास दिले. तीर्थ घेतल्यानंतर मारोतरावांना समाधान वाटले. त्यामुळे बाबांच्या मनात आले की, आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या मंत्राचा विधी पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे. अशाप्रकारे बाबांना भगवतप्राप्तीचा मार्ग सापडला. यावेळेस बाबा ऐन तारूण्यात म्हणजे अवघे चोवीस वर्षाचे होते.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन पाटील- 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

©परमात्मा एक मानवधर्म परिवार
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

🌏वरील प्रकरण वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या प्रकारे FOLLOW' करा. अगोदर सर्वात शेवटी जा..
मग,
                   "Home" म्हणून दिसेल 
या खाली 'view web Version' वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये 'follow' बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा ''follow बटन लाल कलर मध्ये" येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे "लाल बटन असलेलं follow" वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला 'Unfollow' दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

◆टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

🙋🏻‍♂ FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

नमस्कार..!!😊

[माझा अनुभव] सेवक श्री. बाळा नंदनकर


  【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: ३१ मे २०१६

["ग्रहण केले तत्व-शब्द-नियमांचे आचार-विचार, सुखी-समाधानी झाला आमचा परिवार"]

माझे नाव 'बाळा निळकंठरावजी नंदनकर' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

या मार्गात येण्याचा अगोदर आमच्या घरी खुप दुःख होते तसेच आमच्या कुटुंबावर जाणत्यांनी करणी केलेली असल्यामुळे आम्ही दुःखाने त्रस्त झालेले होतो. आम्हाला या बाबतीत म्हणजेच मार्गाबाबतीत माहिती होतीच कारण, माझ्या आईच्या घरचे म्हणजेच आईच्या माहेरचे अगोदर पासूनच या मार्गात होते. माझ्या आईच्या भावाचे नाव श्री. गंगाधर यादवरावजी पाटील आहे.

एक घटना अशी घडली की माझी आई आपल्या मुलीला (माझा बहिणीला) घेऊन बाहेर जात होती आणि जाताना ती तिच्या मावशिच्या अंगणातून गेली असता, आईच्या मावशीने त्या लहान मुलीवर काही करणी केली. करणी करण्याकरिता तिने ती मुलगी ज्या जागेवरून गेली. त्या जागेवरची तिच्या पायाची माती घेतली. त्या करणीमुळे ती मुलगी सतत ३ वर्षे आजारी राहिली आणि त्या ३ वर्षात तिच्या डोळ्यामधून बुब्बुळ (डोळ्याचा काळा दिसणारा भाग) पण बाहेर आले काही दिवसानंतर तीला मरण आले.

दूसरी घटना अशी झाली की मुलगा झाला आणि काही दिवसा नंतर तो पण मरन पावला आणि त्याला सुदधा घाटावर नेले आणि माती देत असताना ते बाळ पुनर्जीवित झालं आणि त्याला पुन्हा घरी आणले पण पुनः काही वेळातच त्याचा जीव गेला.

माझे वडील बेला वरून नागपुरला येत होते त्या मुळे माझ्या वडीलांचे सासरे यांनी या मार्गात येन्याकारिता माझ्या वडिलांना सांगितले , वडील घरी आल्यावर यावर चर्चा झाली आणि सर्व सहमत झाल्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या निवासस्थानी जाऊन साधे कार्य सांगितल्याप्रमाणे घेतले. घरी आल्यावर, कार्य सुरु करण्याच्या अगोदर सर्व देवी देवता याचे विसर्जन केले गेले आणि साधे/कच्चे कार्य सुरु केले.

साधे कार्य पूर्ण झाल्यावर, आम्हाला ४१ दिवसांचे त्यागाचे कार्य दिले गेले. कार्य सुरु असताना जवळपास २१ दिवस झाले असतील तर माझा देह हनुमानजी सारखा दिसायला लागला आणि सर्व बाहेरचे माणसे येऊन आमच्या घराला शिव्या द्यायचे, ते म्हणायचे कि आधीच यांच्या घरी मुल,बाळ जगत नाही आहे आणि आता हा मुलगा कस काय हनुमानासारखा दिसतोय.

मग या समस्येसाठी महानत्यागी बाबा जुमदेवाजीला विचारले असता महानत्यागी बाबा जुमदेवजी म्हणाले कि असे होत असते. त्यागाच्या कार्यांत अशा समस्या आल्याने घाबरू नये अशा घटना काही घडत असतात आणि कुटुंब अशा समस्येने मजबूत होत असते. तर मुलाला बंधनात ठेऊ नका आणि पुढले त्यागाचे कार्य पूर्ण करा.

दूसरा प्रसंग असा आला की त्यागाचे कार्य सुरु असताना माझ्या शरीरावर मातामाय ( उष्णता/गर्मी ) आली होती. आणि त्याच काळात माझ्या वडीलांना स्वप्न आले की मातामाय घरी आली आणि पाठोपाठ बाबा हनुमानजीपण आले , तेव्हा दोघामध्ये युद्ध झाले आणि मातामायला घराच्या बाहेर करण्यात आले आणि मी दचकून उठलो आणि मला पाणी वगेरे पाजण्यात आले आणि महत्वाच म्हणजे माझ्या शरीरातुन पूर्ण पने मातामाय गायब झालेली आणि मी पूर्णपणे बरा झालेलो.

त्यागाचे कार्य पूर्ण झाले आणि ४२ व्या दिवशी घरी पहिल्या हवणासाठी बाबा जुमदेवजी आमच्या घरी आले होते. तेव्हा मी ३ वर्षाचा होतो , तेव्हा बाबांनी सांगितले की अगोदर त्या मुलाचे केस कापावे लागेल आणि नंतर हवन करावे.

बाबांच्या सांगितल्याप्रमाणे नाइला बोलविले परंतु तो न्हावी तयार होत नव्हता तेव्हा बाबांनी त्या नाइ ला सांगितले की तुम्ही त्या मुलाचे केस कापा, कारण मी हनुमानजी सारखा दिसत होतो आणि खूप लांब केस झालेले होते.

बाबा जुमदेवजी याचा आदेशा नुसार नाइनी माझे केस कापले त्या नंतर आमच्या घरी हवन झाले आणि तेव्हा पासून आम्ही सर्व सुख समाधानी झालो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...

सेवक :- बाळा निळकंठरावजी नंदनकर
शाखा :- गट नं. ६, नाईकवाडी, लालगंज, संजय आटा चक्की, बाळाभाऊ पेठ, नागपुर 
सेवक नंबर :- ३२७ (जुना), ४२९६९ (नविन)
मार्गदर्शक :- श्री. चुडामनजी मोहाडीकर, गट नं. ६, नागपूर
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये,त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन पाटील- 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

टीप: अनुभव वाचन झाल्यावर खालील Home बटन च्या खाली WEB VIEW VERSION वर क्लिक करून आपल्या या ब्लॉग ला FOLLOW करा.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

Sunday, 26 April 2020

"कर्मकर्ता सेवक, योग देणारा भगवंत" परमात्मा एक सेवक शशिकांत भोयर यांनी लिहिलेली कविता नक्की बघा.


【"कर्मकर्ता सेवक, योग देणारा भगवंत"】

दिवस काढले दुःख्खाचे, ते विसरलो नाही
श्रीमंती येताच जीवनात, खूप पसरलो नाही
हात खेचुणी ओढले भगवंताने, संकटाच्या सागरातून 
पुन्हा सागरात पडायला, तत्व-शब्द-नियम विसरलो नाही !धृ!

जन्म घेतलाय या मातीत, हा भगवंताचा चं योग होता
दुःख्ख सोसले जेवढे, तो कर्माचा चं भोग होता
ठेच लागली मला, कुठेतरी चुकीचे वागतांना
पुन्हा सावरले मला, हा भगवंताचा चं योग होता !१!

तत्व, शब्द, नियमाने वागा, कसलीही चुकी करू नका
बाबा सांगतात पुन्हा-पुन्हा, वाट चुकीची धरू नका 
अरे भान ठेवा जगतांना, तत्व-शब्द-नियमाची
नेहमी-नेहमी चुकीचे वागून, दुःख्खास पात्र बनू नका !२!

आपण कितीही चांगले वागलो तरी, आपण महावंत नाही 
दुसऱ्यांना उपदेश करण्यास, आपण थोर संत नाही
आपल्या कडून चांगलं होत आहे, ही भगवंताची साथ आहे
शेवटी आपण साधारण मानव आहो, जागृत महान भगवंत नाही !३!

रचना: सेवक शशिकांत भोयर, पारशिवणी (नागपूर)
मोबाईल: 7620124480

टीप: ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा. नमस्कार

🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर आवर्जून भेट द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [Blog spot]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube channel]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

प्रकरण क्रमांक (१) "जन्म व जीवन"


 "मानवधर्म परिचय पुस्तक मोहीम (वर्ष २०१७-१८)

 "मानवधर्म परिचय (मराठी) 'सुधारित पाचवी आवृत्ती'

   प्रकरण क्रमांक: (१) "जन्म व जीवन"

         नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सीमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे. हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात गोळीबार चौक नावाचा मागासला समजला जाणारा प्रसिद्ध असा भाग आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू असताना त्यांच्यापासून त्याला स्वतंत्र करण्याकरिता भारतवासीयांनी नानाप्रकारचे सत्याग्रह केले. त्यातलाच एक झेंडा सत्याग्रह १९२१ साली करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरात तो सत्याग्रह झाला. त्यात नागपूरवासियांनी भाग घेतला होता. या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचा नारा दिला होता. तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळो की पळो करण्याकरिता बंदुकीच्या गोळ्या लोकांवर झाडल्या होत्या. या शूरवीरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शाहिद झाले. तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले. आजही या चौकात या शहीदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शहिद स्तंभ उभारण्यात आलेला आहे. 

        हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला. या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील हलबा या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या चौकाच्या बाजूलाच एक उदाराम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. या मठाच्या मागे आदिवासी जमातीतील हलबा जातीतील ठुब्रीकर घराण्यातील चार सख्खे भाऊ राहत असत. त्यांची नावे तानबा, महादेव, विठोबा आणि बालाजी अशी होती. त्यांचा मूळ धंदा विणकरी (पातळ विणणे) हा होता. चारही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एकत्रित राहत होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रोज विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर ते घरगृहस्थी चालवीत असत.

अशा या गरीब कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजी ३ एप्रिल १९२१ रोजी श्री.विठोबा राखडू ठुब्रीकर आणि सरस्वताबाई या दांपत्याच्या पोटी जन्माला आले. या दांपत्याचे बाबा चौथे अपत्य होते. बाबांपेक्षा तिन भावंडे बाळकृष्ण, नारायण आणि जागोबाजी ही मोठी होती. तर एक भाऊ मारोती हा सर्वात लहान होता. अशी पाच अपत्ये या दापंत्याला होती. बाबांचे लहानपणाचे नाव जुम्मन होते.

घरची परिस्थिति हलाखीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण मधेच सोडून घरच्या परिस्थितिला हातभार लावण्याचे ठरवून  त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत असलेल्या विणकरी च्या धंद्याला सुरुवात केली.

लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयष्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा आहे. ते लहानपणापासूनच नीतिमत्ता बाळगतात. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांचा बालपणापसुनच विश्वास आहे. त्यांना लहानपणापासूनच हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. ते रोज सायंकाळी हनुमान चालीसा वाचत असत. प्रायमरी शाळेत शिकत असताना शाळेतून आल्यानंतर स्वयंपाक घराचे दार बंद असल्यास ते दाराच्या फटीतून आत बघत असत. तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरखट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे. तसेच त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असलेला त्यांना नेहमी दिसायचा.

जुन्या काळात देहयष्टीला फार महत्व होते. म्हणून ठीकठिकाणी आखाड़े बांधले गेले होते. या आखाड्यांत लहान मोठी मुले मेहनतीसाठी जात असत. त्याप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरातील पहेलवान नावाने प्रसिद्ध झाले. त्यांना कुश्ती खेडण्याचा शौक होता.

बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९३८ साली में महिन्यात नागपुर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठीतीत निवासी श्री.बापूजी बुरडे यांची सुकन्या आणि तड़फदार व अग्रगण्य विणकार नेते श्री.सोमाजी बुरडे यांची धाकटी बहिन वाराणसीबाई हिच्याबरोबर झाले.

बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी विणकरीचा धंदा सोडून दिला व सेठ केसरीमल यांच्या दुकानात वहीखाते लिहिण्याचे काम मासिक तीस रुपये पगारावर करू लागले. दुकानमालक मारवाडी समाजाचे होते. सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदनसेठ पुगलिया हा त्याचा मामा सेठ सरदारमल यांच्या देखरेखीखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता. बाबांनी तेथे पाच सहा वर्षे नोकरी केली. बाबा जेथे नोकरी करीत होते ते दुकान सोन्याचांदीचे होते.

एक दिवस बाबांना दुकान साफ करताना दहा तोळ्यांचा सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला. तो हार उघड्यावर बघून बाबांना धक्काच बसला. बाबांनी तो हार सेठ सरदारमलकडे नेऊन दिला. त्यांनी डागाजीला बोलाविले. तो त्यांचा भाचा होता. त्यांनी हाराबद्दल डागाजीला विचारले आणि त्याला जोरदार थापड लावली. ते त्याला म्हणाले की, तो (बाबा) इमानदार आहे. म्हणून हार आणून दिला, नाहीतर हा हार चोरीला गेला असता किंवा हरवला असता तर त्याला कोण जिम्मेदार राहिले असते? यावरून बाबांचे सत्य आणि इमानदारी हे गुण दिसून आलेत. तेव्हापासून बाबांकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले. मदनसेठचा लहान भाऊ पैसे उधळतो हे बाबांना माहीत होते म्हणून बाबांनी स्वतः विचार केला की आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच स्थिती राहील हे कशावरून? नोकर माणूस इमानदार असून सुद्धा उद्या प्रसंग आल्यास हेच लोक भाच्याचा पक्ष घेऊन त्याला बदनाम करू शकतात. असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांनी जोर धरल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्ववत ते साडी विणण्याचा उद्योग करू लागले.

बाबा दिवसातून एक रेशमाची नऊवार साडी विणत असत. ती साडी इतकी चांगली असायची की, दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती गिऱ्हाइकाला दाखविण्यासाठी वर ठेवत असत परंतु हातमागच्या धंद्याला मिलमुळे उतरती कळा आली. बाबांचे मेहुणे श्री. सोमाजी बुरडे हे विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते. म्हणून त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नोकरी दिली. बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटीतर्फे गड्डीगोदाम, नागपूर येथे पायांनी चालवावयच्या चादर तयार करण्याच्या मशिनीच्या ट्रेनींगकरिता पाठवले. तेथे बाबांनी ट्रेनींग पूर्ण केले. पिवळी मारबतच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता. त्या कारखान्यात बाबा कामाला लागले. बाबा इतके हुशार होते की, स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपूर्ण मशीन उघडून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तशी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत. याच सुमारास बाबांनी दैवी शक्तिही प्राप्त केली होती.

एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वसुदेव नंदनकर नावाच्या, बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांचा मित्र पण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्यात. तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही. म्हणुन त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्यास अकरा वेळ फूक मारून तीर्थ दिले. त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला. तेव्हापासून बाबांजवळ काहीतरी शक्ती आहे हे लोकांना माहीत झाले. पुढे बाबांनी त्या कारखान्याची नोकरी सोडली आणि ते महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले.

ही घटना १९७६ ची आहे. नागपूर येथील दिघोरी या भागात महानगरपालिकेतर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते. ते काम करताना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला. त्यांना त्या ठिकाणी सुद्धा बेइमानी दिसू लागली. त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेइमानीला कंटाळले. त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते. याच सुमारास बाबांचा मुलगा डॉ. मनो ठुब्रीकर यांना व्हर्जिनिया मेडीकल सेंटर, व्हर्जिनिया (अमेरिका) येथे नोकरी लागली होती. त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनी बाबांना सांगितले की, आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे. बाबांनी विचार करून आणि सध्याच्या घडणाऱ्या बेइमानीच्या व्यवहराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद केला. त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक कार्याकडे आपले संपुर्ण जीवन वळविले.

बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्रांबरोबर राहूनही स्वतःचा आणि त्यांचा खर्च स्वतःचं करीत होते. ते खर्च कोणालाही करू देत नव्हते. बाबा सुरुवाती पासुनच भगवत कार्याकरिता स्वतःचा पैशाने खेडोपाडी ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता पायी, सायकल, बैलगाडी, बस, मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने सतत करीत आहेत. त्यांचे नानातऱ्हेचे दुःख निवारण करीत आहेत. ते गुरुपूजा घेत नाहीत. आत्म्याचा अनादर होऊ नये म्हणून पाया पडू देत नाहीत.

आध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब, कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्याची गृहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवुन सहकारी तत्त्वावर बँक, बहु उद्देशीय ग्राहक भांडार, दूध डेअरी, मानव मंदिर इत्यादींची स्वकष्टाने निर्मिती केली. परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःचा गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच घेतला नाही. त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे. म्हणून त्यांनी आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि "आपल्यासारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तया लगी" ही म्हण सिद्ध केली आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी महानत्यागी ही पदवी दिली आहे.

बाबांनी गृहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे. बाबा आजही वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मानव जागृतीच्या कार्याकरिता सतत दौरे करीत आहेत. बाबा आपले आयुष्य आज एश्वर्यात घालवीत आहेत. 'देई तोच घेई' या म्हणीप्रमाणे बाबांनी सुरुवातीला मेहनत केल्यामुळे त्याचे चांगले फळ भगवंत बाबांना चाखायला देत आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपुर.

🌏 आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
©परमात्मा एक मानवधर्म परिवार [ Facebook page link]
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [ Blog link]
https://parmatmaekmanavdharmparivar.blogspot.com/?m=1

© परमात्मा एक मानवधर्म परिवार [ You tube channel link]
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw

[माझा अनुभव] सेविका रितू वासुदेवजी वाडीभस्मे



【"माझा अनुभव"】प्रकाशित दिनांक: २४ मे २०१६

【"चर्चा बैठकीचा नेहमी लाभताच सहवास, प्रत्येक संकटावर मात करुनी वाढतो परमेश्वरावरील विश्वास"】

माझे नाव कु. रितु वासुदेवजी वाडीभस्मे आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'चर्चा बैठकीचे महत्व' सादर करीत आहे.

आम्हाला मानव धर्मात येऊन २३ वर्ष झाले. माझ्या जन्माच्या अगोदर पासून आमच्याकडे "मानव धर्म" आहे, म्हणजेच माझा जन्म एक सेविका म्हणूनच झाला. त्यामुळे लहानपणापासूनच मी घरच्यांसोबत नेहमी चर्चा बैठक मध्ये जायची. लहान असल्यामुळे मला बैठक मध्ये सांगितलेले कळत नव्हते, पण मनात मात्र भगवंताविषयी खुप विश्वास निर्माण झाला आणि काहीही दुःख आले तर सर्वात अगोदर भगवंताचे स्मरण करते.

एकदा मी माझ्या मावशीकडे स्लॅब वरून उतरताना पडली आणि माझ्या पायाला लागले. मला चालताच येत नव्हते. मग मावशीच्या मुलींनी मला घरात आणले व याबद्दल मावशीला सांगितले, तर मावशी घाबरली. कारण, काही दिवसांपूर्वी माझ्या मावशीची मुलगी पण तिथल्या स्लैप वरून पडली होती व तेव्हा ती बेशुद्ध झाली होती.

तेव्हा तिथेच बेडवर मी विनंती केली व भगवंताला योग मागितला की, "माझ्या पायाचे हाड तुटायला नको" आणि पायाला "बाबा हनुमानजी" म्हणून फुका मारल्या. कारण, या अगोदर शाळेत खेळतांना माझ्या भावाच्या पायाचे हाड तुटले होते व त्याला झालेला असह्य त्रास मी बघितला होता, त्यामुळे जेव्हा पडल्यावर मला चालता येत नव्हते, तेव्हा लगेच मला त्याची आठवण झाली व भीती वाटु लागली.

नंतर मावशीच्या मुलींनी मला सायकलने घरी सोडून दिले. घरी गेल्यावर मी बाहेरच्या बेडवर बसली आणि त्यांनी आईला सांगितले, तर आई रागावली कश्याला स्लाप वर गेली म्हणून आणि आई घरात गेली. आमच्या घरच्या बाहेरच्या हाल मध्ये पुजेच्या खोलीचा एक दार आहे, तर तो दार मी माझ्या मावशीच्या मुलीला खोलायला सांगितले आणि तीर्थ बनविण्यासाठी पाणी आनून मागितले आणि चालता येत नसल्यामुळे मी बसत बसत पुजेच्या पाटाजवळ गेली व विनंती करून तिर्थ बनविला.

नंतर थोड्या वेळाने आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पायाचा X -Ray काढला. त्याची रिपोर्ट दुसर्या दिवशी मिळणार होती. मग सायंकाळी आम्ही आयुर्वेदीक पट्टी वाल्याकडे गेलो. त्यांनी सांगितले की, पायचे जॉइंट घसरले आहे. बघा, मी भगवंताला मागितल्यालेल्या योगाप्रमाणे माझ्या पायाचे हाड तुटले नाह व हे ऐकून मला समाधान वाटले. परंतु ते म्हणाले की, एकदाचे हाड तुटलेले चालते, पण जॉइंटचा प्रॉब्लेम बरा व्हायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. कधी कधी एक वर्ष पण लागतो म्हणाले.

मग आम्ही त्यांची औषध बांधली तर त्याच औषध नी मला एक महिन्यातच पुर्णपणे आराम झाला. दुसरी कुठलीच औषध घेतली नाही. डॉक्टरांची X-Ray Report पण आणली नाही. जो त्रास दुर व्हायला एक वर्ष पण लागु शकतो, असे म्हटले तो त्रास एका महिन्यात दुर झाला. कारण भगवंतावर असलेला विश्वास. ते आयुर्वेद औषध वाले काका पण म्हणाले की, हिला खुपच लवकर आराम झाला. नाहीतर हा त्रास इतक्या लवकर बरा होत नाही व त्यानंतर मी शाळेत पण जायला लागली.

ते म्हणतात ना....

"दवा के साथ दुवा भी जरूरी है"

या अनुभवातून मी हे सांगु इच्छिते की, माझ्या मनात भगवंताविषयी जो विश्वास निर्माण झाला तो चर्चा बैठक मधील शक्तीमुळे. जरी मला बैठक मधील मार्गदर्शन समजत नव्हते, तरी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला. म्हणजेच चर्चा बैठक ही एक भक्ती आहे, शक्ती आहे. 

म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे की, आपल्या घरच्या बाल सेवक-सेविकांना नेहमी चर्चा बैठकमध्ये सोबत घेऊन जावे आणि सगळ्यांनी चर्चा बैठकला नेहमी जाण्याचा प्रयत्न करावा व मी सुद्धा करणार.

लिहिण्यात काही चूक-भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागते.

नमस्कार..!

सेविका :- कु. रितु वासुदेवजी वाडीभस्मे
पत्ता :- मु./पो./ता. साकोली, जि. भंडारा
सेवक नंबर :- ४८९३
मार्गदर्शक :- श्री. वसंतरावजी ठेेंगळी, साकोली
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुपला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 
जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

©परमात्मा एक मानवधर्म परिवार (FACEBOOK PAGE)
https://www.facebook.com/ParmatmaEkManavdharmParivar/

© परमात्मा एक मानवधर्म परिवार (YOU TUBE CHANNEL)
https://m.youtube.com/channel/UCyjd9CTAnIa1KpUnDdmlevw