Followers

Sunday, 7 February 2021

"भगवंत कृपेचा योग" हा लेख आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर आवर्जून वाचन करा .

【"भगवंत कृपेचा योग"】

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्याला जातात, तरी त्या सेवकांना योग मिळण्यात खूप अडचणी येत असतात. या उलट काही सेवक कमी प्रमाणात भगवत कार्याचा लाभ घेतात, तर त्यांना खूप लवकर चांगला योग मिळतो? असे सेवकांसोबत का घडत असेल?

   【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय खूप छान असून सेवकांसाठी खूप महत्वाचा सुद्धा आहे. जेव्हा सेवक चर्चाबैठक मध्ये जातात तेव्हा सेवकांनी  आपले पूर्ण लक्ष परमेश्वराच्या चर्चा बैठक मध्ये असणे आवश्यक आहे. कारण कधी कधी आपल्या हातानी एखादी चुक झाली, तर आपण त्या चुकीची सोडवणूक करु शकताे. कारण बाबाने आपल्याला एक चित्त, एक लक्ष आणि एक भगवान मानायला सांगितले आहे. तेव्हाच आपल्याला योग मिळत असताे. कारण परमेश्वराला माहीत असते की, कुणाला काय पाहिजे आहे.

परमेश्वर आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. आपल्याला पाहिजे ते परमेश्वर देतात म्हणून जेव्हाही आपण हवनकार्यात असलो तेव्हा आपण विनाकारण गप्पा गाेष्टीत वेळ घालविणे चुकीचे आहे. जेव्हा चर्चा बैठक सुरु असते तेव्हा, काही सेवक विनाकारण बाहेर जाणे, विनाकारण बडबड करणे आणि मोबाईल वर गप्पा करणे, चॅटींग करणे हे अतिशय चुकीचे आहे. हे सर्व परमेश्वराला दिसत असते. त्यामुळे परमेश्वर त्यांना याेग देत नाही. सेवक म्हणतात की, "आम्ही चर्चा बैठकीत जाऊन सुध्दा आम्हाला याेग मिळत नाही, दुःख दुर हाेत नाही". त्यामुळे नाराज हाेतात.

आपण जेव्हा आपला वेळ परमेश्वराला देऊ तर, परमेश्वर सुध्दा आपल्या मनाेकामना पूर्ण करतात. म्हणून आपण  परमेश्वराला आपला वेळ देने आवश्यक आहे. जेव्हा इतर सेवक आपले अनुभव सांगतात तर, ते मनापासुन ऐकणे आवश्यक आहे. कारण आपण मनापासून ऐकले तर ते, आपण आपल्या परिवारात सांगून आपल्या चूका दुरुस्त करू शकतो. त्यासाठी भगवत कार्याच्या वेळी एक चित्त, एक लक्ष व एक भगवान असणे आवश्यक आहे. बाबांनी आपल्याला सांगितले आहे की, "हा मार्ग कर्मावर आधारित आहे, जसे आपण कर्म करू त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल." त्यासाठी बाबांनी सेवकांना मार्गदर्शन तर केलेच, त्यासोबत बाबांची शिकवण तत्व, शब्द, नियम हे प्रत्येक सेवकाला दिलेले आहे.

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्यात उपस्थित असतो. त्यावेळी स्वयम् भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात. आपले सदगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित असतात व आपण सर्व सेवकांची आत्मा मिळून एक परमेश्वर त्याठिकाणी निर्गुण निराकार असतात. चैतन्यमय कृपा जागृत शक्ती उपस्थित असते. त्या ठिकाणी आपण अनुभवाचे बोल भगवंताचे गुण कमी ऐकतो व एकमेकांची भेट व गोष्टी जास्त प्रमाणात करतो. कुणी सेवक कंटाळा आला म्हणून कुठे पानटपरीवर, हॉटेलमध्ये बसलेले असतात. जे अनुभव ते ऐकत असतात त्यावर ते टिंगल बाजी करत असतात. हवन कार्यात, भगवत कार्यात, चर्चा बैठकीत फक्त देहाने उपस्थित असतात. त्यांचे मन कुठेतरी भटकत असते; परंतु असे चुकीचे आहे.

ज्याप्रमाणे एक म्हण आहे, "देव देवळात, चित्त खेटरात" त्याप्रमाणे नश्वर देह घेऊन चर्चा बैठकीत बसून अंतरात्मा मध्ये अनेक द्वंद विचार मनात आलेले असतात, ते चुकीचे आहे.  आपल्यावर असलेले दुःख दूर केव्हा होतील, होतील की नाही? परमेश्वराला आपली काळजी लागेल की नाही? हा विचार मनात लागलेला असतो; पण सेवकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळसा हातात धरला तर हात काळा होतो जर, निखारा हातात धरला तर हात जळतो. त्याचप्रमाणे कलुषित विचाराने आत्म्याचे शुद्धता न होता अशुद्ध विचाराची त्या ठिकाणी भावना निर्माण होते.

भावना निर्माण झाली की, शब्द निघतात शब्दावर परमेश्वर उभा आहे म्हणून आपल्याला योग प्राप्त होत नाही. काही सेवक प्रपंच चालवत असताना काही अडचणीमुळे खूप कमी कार्यक्रमात सहभाग घेतात. एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी मनाची एकाग्रता साधून परमेश्वरावर आपला पूर्ण भार सोपवून देतात. म्हणजेच आपले ध्येय मजबूत करून ते त्या चर्चा बैठकीत भगवंत कार्यात बसले असतात. त्यांच्यामध्ये ध्येयपूर्तीसाठी तत्व, शब्द, नियमाची तिजोरी ही फार मोठी देन असते व ती जमवण्यासाठी , अनुभवाचे गाठोडे बांधण्यासाठी, परमेश्वरी गुणाने आत्मशुद्धी करण्यासाठी चर्चा बैठक, भगवत कार्यात ते बसलेले असतात.

आपल्यावर दुःख येते, त्यावेळी परमेश्वराला आपण म्हणतो की, "परमेश्वरा माझे दुःख दूर कर"; पण आपण आपल्या कर्माने चुकलो असतो. ती चूक आपल्याला शोधावी लागते. त्या चुकीची आपल्याला क्षमा मागावी लागते. जेव्हा आपले शब्द परमेश्वराजवळ सुटतात तेव्हाच आपल्याला योग्य तो योग मिळतो. उदाहरणार्थ:- पेपर देताना विद्यार्थी प्रश्न सोडवित असतो. प्रश्नाचे उत्तर लिहित असतो; पण शिक्षक मात्र शांत व कर्तव्यनिष्ठ असतो. त्याचप्रमाणे, आपण जे कर्म करत असतो त्याची तपासणी भगवंत करीत असतो. 

आपल्या कर्माचे शब्द आपण सोडावीत नाही तोपर्यंत आपल्याला योग मिळणार नाही.

असे खूप वेळा होते. प्रत्येक वेळी माणसाच्या गर्दीत शिकायला मिळते असे नाही. आयुष्यातले काही क्षण आवर्जून एकांतात एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी एकाग्रता साधून जर आपण एकांत घालविला तर आवर्जून आयुष्यातले काही क्षण आपला संवाद फक्त स्वतःशिच करणे योग्य आहे. इथूनच आपल्या चूका दुरुस्त करण्याची संधी आपल्यात येते व आपले आत्मबळ वाढते. भूतकाळाकडे शिकण्याची आणि भविष्य निर्माण करण्याची खरी शक्ती म्हणजे आपले कर्म आहे. हे कर्म साध्य करण्यासाठी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाचा वापर आपण आपल्या जीवनात करायलाच पाहिजे. आपण जसे कार्य करू तसे आपल्याला फळ मिळेल आपल्याला जर दुर्धर आजाराविषयी योग साधायचा आहे. त्यासाठी आपल्याला  कठिण कार्य करावे लागते.

 लोभ, अहंकार, राग, द्वेष, मोह या सर्वांचा त्याग करून आपल्याला शुद्ध विचाराने परमेश्वराचे कार्य करावे लागतात. तरच आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतो. असे सेवकांसोबत का घडत असेल? तर ह्या साठी बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियमाचे पालन केले तर, कुठलेही दुःख राहणार नाही. हे बाबांचे शब्द आहेत. जो सेवक तत्व, शब्द, नियमाने वागेल त्याच्या पायाला काटा हि रूतणार नाही आणि हे शब्द मानव धर्मात खरे झालेले आहेत. सत्य, मर्यादा, प्रेमाने घराची आखणी केली, तत्वाचे पालन केले व नियमांचे अनुसरणानुसार वर्तवणुक ठेवली तर आपल्याला परमेश्वर कुठेही कमी पडू देणार नाही.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Wednesday, 3 February 2021

"शेवटी अंत हा निश्चित आहे." वरील लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा.

                         【"शेवटी अंत हा निश्चित आहे"】

▶ "मानवी जीवन कर्मावर आधारित आहे, आणि शेवटी अंत सर्वानाच आहे. जेव्हा अंत निश्चित आहे, हे लक्षात असल्यावर सेवकांनी आपले जीवन, सुखमय करण्यास बाबांची कोणती शिकवण नेहमी अंगीकारावी."?

                                 【लेख स्पष्टीकरण】

वरील विषय सेवकांना सक्षम जीवन जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे. या मार्गामध्ये आम्हाला मरण्याचे वचन बाबांनी मागितले आहे. मरण म्हणजे आमचा शारीरिक मृत्यू नसून आमच्यामधील असलेले जुने विचार, दृष्ट भावना, दुष्कर्म, मोह, माया, अहंकार, स्वार्थ, लालच, कपट या सर्व विचारांचा त्याग करणे होय. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी संघर्षमय जीवनातून एका भगवंताची प्राप्ती केली व एका जागृत शक्तीचा परिचय करून दिला, जी शक्ती चोवीस तास जागृत असून शब्दावर उभी आहे. म्हणून सेवकांच्या मनातून वाईट विचार काढल्याने आमचे मन आणि बुद्धी, आचरण व व्यवहार,  सत्यनिष्ठा व निष्काम सेवा हे भगवंताला प्रिय असणारे शब्द, गुण आमच्या अंतर्मनात साठवलेले आहेत. मार्गात आल्यावर दुःख नष्ट झाले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे होत नाही, तर आयुष्यभर आपल्याला सत्कर्म करायचे आहेत.

"जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर"

"जैसे ज्यांचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर"

या मनीप्रमाणे हा मार्ग कर्मप्रधान आहे. बाबांनी या मार्गात कर्माला खूप महत्व दिले आहे. सेवकांना माहिती आहे तरी सुद्धा सेवक अहंकार, लोभ या गोष्टींच्या आहारी जाऊन चुकी करून घेतो. मग भगवंत आम्हाला साथ कशी देणार? जीवनात जो सेवक सत्याने वागतो तेव्हा सेवकास त्याचा अनुभव येतो. परमेश्वराला प्रिय असणारे कार्य म्हणजे सत्कर्म. सत्कर्माप्रमाने भगवंताला आवडणारे कार्य आम्ही करत असून तर कर्मभोग जाऊन आम्हाला कर्मयोग मिळणारच आहे. आमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन सरतेशेवटी आमचा उद्धार होणार आहे. कारण, जो जसे कर्म करेल तसेच त्याला फळ मिळणार आहे. बाबांनी सांगितले आहे की, 

"परमेश्वर सर्वेसर्वा आहे व मानव कर्मकर्ता आहे."

जो या धर्तीवर जन्माला येतो, त्याला एक ना एक दिवस जाणे आहे. हे प्रत्यक्षात सत्य असूनसुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाने जीवन जगत असतो. मानवी जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू आमच्या हातात नाही, परमेश्वराच्या हाती आहे. परमात्माचा अंश आत्मात आहे. खर पाहता आपण या जगात फक्त काही वेळेकरिता आले आहोत. कारण, आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे. जेव्हा आत्मा शरीर सोडते, तेव्हा शरीर मृत पावतो व आम्हाला भगवंतांच्या चरणी स्थान मिळतो म्हणजेच आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. बाबाही एक परमेश्वराचेच अंश होते म्हणून बाबांनी जे केले ते आम्हाला करायचे नाही; पण बाबांनी जे सांगितले त्याचे पालन सेवकांना करायचे आहे. सेवकांनी मोह, माया व अहंकार दूर करून सत्याचे कार्य करावे. मनात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता, मनात जुने विचार न आणता, एक लक्ष, एक चित्त व एक भगवान असे मानून तत्व, शब्द, नियमाचे पालन करून प्रपंच साधून परमार्थ करावे. नेहमी चांगले कर्म करण्याचे प्रयत्न करावे. आपण मार्गात कश्यासाठी आलो हे पहिले दिवस लक्षात ठेवून आपले कर्म करावे.

"जैसे बीज भोवोगे, वैसे ही फल पाओगे!"

हे माहिती असून सुद्धा आपल्या हातून किती तरी चूका होतात. मन इतरत्र भटकतो आणि दोष परमेश्वराला देतो. हे कितपत योग्य आहे? याला आपण समजून घेतले पाहिजे. आपण म्हणतो की,

 "जिंदगी एक वेळा मिळते." पण माझ्या मते, "जिंदगी वारंवार मिळते, फक्त मरण एक वेळा येतो." 

जीवन सुधारणायची संधी परमेश्वर आपणास वेळोवेळी देते; परंतु याकडे आपले लक्ष नसते. आपण आपल्याच अहंकार मध्ये जीवन जगत असतो. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी 

"मानव यह बेईमान है!" 

असे म्हटले आहे. मानवाची एक इच्छा संपत नाही तर, दुसरी इच्छा लागुनच असते. त्याच्या इच्छा कधीही संपत नाही. एवढी लालस मानवता भरली आहे, म्हणून मानव प्राणी बुद्धिमान असून सुद्धा समाधानी व्हायला वेळ लागतो. आहे त्या परिस्थितीत खुश असेल तरच समाधानी जीवन अनुभवायला मिळतो.

"मरावे परी, कीर्ती रुपी उरावे." 

ही मन महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सिद्ध करून दाखविली आहे. आजही ते या जगात अजरामर होऊन गेले. मग गर्व कशाचा? आपण जेवढे कमावतो, ते सर्व इथेच राहणार आहे. कोणीच सोबत घेऊन जाणार नाही. याचा विचार करून सेवकांनी समाधानी जीवन जगावे आणि बाबांच्या शिकवणीचे पालन करावे. आपण "कर्म घेऊन जन्माला आलो, कर्म घेऊनच मरणार आहोत." त्यामुळे सेवकांनी चांगले कर्म करावे आणि परमेश्वराला आवडणारे कार्य करावे. बाकी घडविणारे परमेश्वर आहे. करता, करविणारे भगवंत आहेत, आपण करणारे आहोत. त्यामुळे आपण नेहमीच चांगले केले तर त्याचा शेवटही चांगलाच होणार आहे.

मानवाची मृत्यू अटळ आहे. म्हणून या मानवी जीवनात भगवंताला प्रिय असणारे कार्य करून, मेल्यानंतर ही आपले नाव अजरामर होईल असे कर्म सेवकांनी करावे. जसे आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी करून दाखविले. आज बाबा आमच्यामध्ये शरीर रुपी नाही पण आत्मरूपी आहेत, त्यांचे नाव आज जगात अजरामर आहे. त्यांनी जे कर्म केले ते आम्हाला करायचे नाही; पण त्यांनी सांगितलेल्या नियमाचे पालन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. यावर एक भजनाची ओळ सांगू इच्छितो,

"कर विचार सेवका म्हणा, कर विचार सेवका म्हणा,..."

"नाही मिळणार मार्ग पुन्हा, पुन्हा.. नाही मिळणार मार्ग पुन्हा पुन्हा...."

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 30 January 2021

"मानव धर्मातील सेविका" या विषयावरील लेख नक्की वाचन करा व शेयर करा.

                   【"मानवधर्मातील सेविका"】

"एक सुशिक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे, एखादी स्त्री किंवा मुलगी शिकली तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब' एक चांगली पिढी घडवू शकते, याला मानव धर्मातील सेविका कशाप्रकारे समजतात त्यामुळे आपली नवीन येणारी पिढी चांगली घडवता येईल?"

                         【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय हा स्त्रींयांवर आधारित असून शिक्षणाचे महत्व पटवून देणारा आहे. आई ही आपल्या मुलांची प्रथम गुरू आहे. मुलगा लहान असतांना ती आपल्या मुलांना हवे तसे वळण देऊ शकते. योग्य ते शिक्षण देऊ शकते. त्यासाठी त्या आईला आधी सुशक्षित असणे जरुरी आहे. "ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा." ही एक मन आहे; पण त्यासाठी त्या व्यक्तीला स्वतः त्या गोष्टीचे ज्ञान असायला पाहिजे. प्रत्येक मुले युगपुरुष होऊ शकत नाही; पण चांगला माणूस म्हणून घडविण्याचे आव्हाहन एका स्त्री पुढे आहे, आई पुढे असते. 

एक सुशक्षित आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. हा आपल्या राष्ट्रपित्याचा संदेश अनमोल आहे. कारण, ज्या घरातील स्त्री शिकलेली आहे तो घर कधीच अशिक्षित राहणार नाही. पण फक्त शिक्षण घेऊन त्याचे ज्ञान स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात करणे म्हणजे "शिक्षित" होय. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हा स्त्रियांना खूप छान जीवन दिला आहे. आज आमच्या बोलण्यात, चालण्यात व वागण्यात ही शैली निर्माण झाली आहे. ती फक्त महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवर्तन विचारांनी. तिसऱ्या नियमात बाबांनी स्त्रियांना एक वळण दिला आहे, त्या वळणावर आमच्यात खूप बदल झाला. मनाने एकेरी शब्द आमच्या तोंडातून निघून गेले. कुठेतरी आम्ही एकेरी शब्दात बोलत होतो; पण आज अहो, जावो, आम्ही, तुम्ही, आपण असे शब्द वापरू लागलो आहोत. स्त्री काय करू शकते? ती सर्व काही करू शकते. म्हणूनच तर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी स्त्रियांना सती सावित्रीचा दर्जा दिला आहे.

शिक्षित स्त्री व मुलीला घरातील व्यावहारिक ज्ञान बरोबर, बाहेरील ज्ञानाची सुद्धा जाणीव असते. त्यामुळे अंधश्रद्धा सारख्या गोष्टीला ती बळी पडू शकत नाही. व याचे ज्ञान ती इतरांना देऊ शकते. म्हणजेच समाजातील कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती तिच्या अंगी असते. 'शिक्षणाचे सहस्त्र जिच्या हाती आहे, ती समाजाच्या अरण्यातून आपली वाट जरूर काढते. मार्गातील स्त्री शिक्षित असो किव्हा नसो; पण परमेश्वरा बद्दल जर अटूट विश्वास असेल, तिची श्रद्धा भगवंतावर असेल तर ती कधीच जगाच्या मागे राहत नाही. म्हणून बाबांनी या मार्गातील सेविकाला सती अनुसया यांच्या पेक्षा मोठा स्थान दिला आहे.

बाबांना माहिती होते की, राष्ट्र चालवण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रपतीची, पंतप्रधानाचे व इतर सदस्यांची निवड होते, त्याचप्रमाणे सेविकाताई ह्या ग्रुहमंत्री आहेत. या मार्गातली स्त्री सक्षम विचारवंत, विनयशील झालेली आहे. अशिक्षित का असेना पण मार्गाच्या रुपरेषे प्रमाणे झाली आहे. एखादी स्त्री किंवा मुलगी शिकली तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब एक चांगली पिढी घडवू शकते. ह्या ठिकाणी एका सुशिक्षित आईचे, मुलीचे आणि बहिणीचा उदाहरण दिला आहे; परंतु आम्ही ज्या भारतात राहतो, त्या ठिकाणी आम्हाला जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, रमाईच्या लेकी तर म्हणतातच; परंतु आमची मातोश्री आई वाराणसी जास्त शिकली नसूनही आमच्यासारख्या सेविका त्यांच्या विचारांनी घडवल्या गेल्या आहोत, तर आम्ही वाराणसी आईच्या लेकी संपूर्ण कुटुंबच नव्हे तर चांगली पिढी घडवून देशाला, समाजाला एक चांगला उच्च विचारी मानव देऊ शकतो.

एवढं धाडस मानव धर्मातील सेविका करू शकते व येणारी पिढी व्यसनमुक्ती, अहंकार मुक्त व साक्षर कुटुंब नक्कीच घडवू शकते. मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. एक शाळकरी मुलगा होता. एके दिवशी तो शाळेत गेला. त्याच्या शाळेतील वर्ग शिक्षिकेने त्याला एक चिठ्ठी दिली व सांगितले की, "ही चिठ्ठी तुझ्या आईला देशील." मुलगा घरी आला आणि आईला वर्ग शिक्षकेनी दिलेली चिठ्ठी दिली. मुलगा तिथेच बसून होता. आईने चिठ्ठी उघडली आणि मुलगा आईकडे पाहू लागला. आईने चिठी उघडली आणि वाचू लागली, त्यातील मजकूर असा होता.

"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार आणि बुद्धिमान आहे. त्याची आकलन शक्ती अमाप आहे; परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे यापुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठवू नका, त्याचा अभ्यास घरीच घ्या!" त्यावेळी आई मनाने विचार करु लागली. तिला आपल्या मुलाबद्दल सर्व समजत होते; परंतु तिचे उद्दिष्ट, ध्येय मजबूत होते. तिला कुठेतरी मुलाला समोर काढायचे होते. म्हणून ती आई आपल्या मुलाला घरी शिकवू लागली. जे नाही कळले त्यासाठी ति दुसऱ्यांची मदत घेऊ लागली; पण मुलाचे शिक्षण तिने सुरू ठेवले.

कालांतराने आईचे निधन झाले. मुलगा पण मोठा झाला होता. लहानपणी असणारे काही अवगुण किंवा शारीरिक दोष भरून निघाले होते व त्यामुळे समाजात सुद्धा याची ओळख होती. एके दिवशी घरातील जुने पेपर चाळत असतांना त्याला एक चिठ्ठी दिसली. त्यावेळी त्याला पटकन आठवले तेव्हा तो थोडा गोंधळला. त्याला पटकन आठवू लागले की, ही चिठ्ठी माझ्या वर्ग शिक्षकेनी मला दिलेली होती व माझ्या आईने लहानपणी मला वाचून दाखवली होती. त्याला जिज्ञासा झाली ती चिट्ठी उघडून तो वाचू लागला.

चिठ्ठी वाचता-वाचताच तो ढसाढसा रडू लागला. कारण, त्यातील मजकूर असा होता की, "प्रिय पालक आपला मुलगा मतिमंद आहे. त्यांची आकलन शक्ती कमी आहे, अशा मुलाला आमची शाळा आणि आमच्या शाळेतील शिक्षक शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठवू नका. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या! चिट्ठी वाचताच त्याला कळून चुकले होते की, आईने खोटे पत्र वाचले होते व मला घडवण्यासाठी खूप मोठी धडपड तिने आपल्या जीवनात केली. हा मुलगा म्हणजे दुसरा, कोणी नसून थोर शास्त्रज्ञ 'थॉमस अल्वा एडिसन' होय. ज्याने विजेचा शोध लावला व अख्ख जग प्रकाशमय करून टाकले. या लखलखत्या प्रकाशात एका मातेने मतिमंद मुलाला शास्त्रज्ञ घडवील. कशी ही किमया असते. ही किमया फक्त आईच करू शकते.

स्त्री कुठलीही असो संसारात रंग भरायचे असले तर इंद्रधनुष्याचे रंग ती निवडते. मुलांना सांभाळायचे असले तर निसर्गातुन आभाळ, नदी, चंद्र, सुर्य, पक्षी, स्मारक, थोर विभूती, विचारवंत, विनयशील यांच्यात कुचल्याचा रंग भरते. प्रेयसीची भूमिका करताना चांदण्या, काजवे, गारवा, नक्षत्र, तारे यात ती सजते व सजवते. एका बहिणीची भूमिका करताना भावाला अधीरपणे हक्क प्रेम, आपलेपणाची जाणीव शिकवते. तर पत्नी बनून अर्धांगिनीचे नाते जन्मभर टिकतवते. विनयशील, नम्र सहनशील तेने भरलेली ही त्यागमय आई आपल्या बाळाला लहानपणापासूनच मार्गाची शिकवण तत्व शब्द नियमाचे पालन व आलेल्या अनुभवातून त्याचे अंतर्मन, त्याचे ध्येय मजबूत करते.

जगात असे एकच न्यायालय आहे. ज्यात आई फक्त जज आणि वकील आहे. ती कधीही मुलांना वाईट शिक्षण देत नाही व मुल वाईट निघाली तर त्याला सुधारण्याकरिता शिक्षाही देते. कितीही मुलगा वाईट असला तरी तो सुधारण्यासाठी एक आई जिवापाड प्रेम करते. त्याला सुधारण्याचा प्रयत्न करते; परंतु जर का सर्व प्रयत्न करूनही मुलगा वात्रट, चोर, दारुड्या निघाला तरी त्याचे सर्व दरवाजे बंद होतात; पण आईच्या घराचे दार नेहमी उघडे असते; परंतु आम्ही सेविका बाबांच्या नियमात बांधलेले आहोत .म्हणून आम्ही आपल्या नियमाला जागून परमेश्वरी कार्य करून आत्म्याचा दरवाजा अगोदर उघडून नंतरच मुलाला जवळ घेत असतो.

म्हणून प्रत्येक सेविका आईने आपल्या मुलांना जन्म घुटी पाजता. त्याचप्रमाणे मानव धर्माच्या शिकवणीचे बाल कडू पाजून येणारी पिढी सशक्त, बलशाली, साक्षरता पूर्वक जगणारी, सीमेवर रक्षण करणारी, 

आजार यांची सेवा करणारी, मुलगा असो वा मुलगी असो तो आदर्श युक्त घडवून आणू शकतो.

"शिकलेली आई कुटुंबाला सामोर नेई." आपल्या परिवारातील सदस्यांना सही रस्ता दाखविते. त्यामुळे मुलाच्या अंगी चांगले संस्कार येतात. त्यासाठी आई आणि वडील हे स्वतः चांगल्या गुणांचे अंगीकार करणारे असतील तर त्यांचे मुले सुद्धा त्यांचे अनुकरण करतात. हे केवळ आपल्या आचरणावर अवलंबून असते.

नुसते शिक्षणाची पदवी घेऊन, पुस्तकी ज्ञान मिळाले म्हणजे झाले, असे होत नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या व्यवहारात काटेकोरपणे करणे महत्वाचे आहे. एक शिक्षित स्त्री मनात आणेल तर संपूर्ण अशिक्षित कुटुंबाला शिक्षित करू शकते. अज्ञानाच्या अंधारातुन बाहेर काढू शकते आणि ज्ञानाचा बाळकडू पाजून त्यांचे जीवन प्रकाशित करू शकते. एवढी मोठी प्रचंड शक्ती तिच्या अंगी असते. पण तसे कार्य करण्याची शक्ती तिच्या अंगी असणे आवश्यक आहे. या मार्गातील सेविका ने मनात जर ठानले तर अशक्य अशी कोणतीच समस्या नाही की, जीचा हक आपल्या हाती नाही. "मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देईल दोन्ही घरी." एक स्त्री हीच चांगली पिढी घडवू शकते.

या मार्गात जास्तकरून अज्ञानी व अडाणी लोक आलेले आहेत; पण त्यांना मार्गात आल्यावर अनुभवाने मार्गाप्रति खूप ज्ञान मिळाले आहे. त्यांचा परमेश्वरावर अतूट विश्वास आहे. या मार्गातील स्त्री या मार्गाच्या तत्व, शब्द, नियमांद्वारे आपल्या मुलांना चांगली शिकवण देऊ शकते, योग्य वळण देऊ शकते. भल्या, बुऱ्या गोष्टींची जाणीव करून अंधश्रद्धेत त्यांना पळू देणार नाही, त्यांना वाईट गोष्टीकळे वळू देणार नाही, ती आपल्या मुलांना नेहमी चांगले संस्कार देईल, निष्काम कर्म, चांगली संगत, तत्व, शब्द, नियमांचे पालन ह्या सर्व गोष्टी ती आपल्या मुलांना समजावून सांगेल, जेणेकरून ते मोठे झाल्यावर आपले बरे-वाईट कशात आहे हे समजू शकतील व मानव धर्माला चांगल्या प्रकारे समजून इतरांना देखील याकडे प्रवृत्त करतील. "आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार." या कडव्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारे एक स्त्री आपल्या मुलांना योग्य वळण देऊ शकते.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Monday, 25 January 2021

"मानवधर्म सेवक मेळावा" हा लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा.

 【"मानवधर्म सेवक मेळावा"】

▶ "मानवधर्म सेवक मेळावा म्हणजे काय? आणि आपण तो कसा साजरा करतो?"

【लेख स्पष्टीकरण】

मेळावा म्हणजेच जास्त प्रमाणात एकत्र येऊन, एकमेकांची ओळख करणे, एकमेकांचा परिचय करणे व जास्त संख्येने उपस्थित होऊन शुभ कार्याची शोभा वाढविणे, इत्यादी. मानवधर्म सेवक मेळावा म्हणजेच  की, मानवा मध्ये फक्त दोनच जाती आहेत ते म्हणजे नर आणि नारी तर, या दोनच जातींना लक्षात घेऊन जो धर्म बनला आहे त्यालाच मानवधर्म म्हणतात व या मानवांचाचं मेळावा म्हणजेच मानवधर्म मेळावा.

आपण या मानवधर्म सेवक मेळाव्याला अगदी आंनदाने साजरा करतो. विविध कलेचा प्रदर्शन करून जसे की, नृत्य कला, चित्रकला, संगीतकला इत्यादी. 

शोभायात्रा काढून मानवधर्माचा प्रसार  करून आपण मानवधर्माची शोभा वाढवितो. छान-छान विचार ऐकून ,आपण मानवधर्माची शोभा वाढवितो व मानवधर्माचा प्रसार करतो. अशा प्रकारे आपण मानवधर्म सेवक मेळावा साजरा करतो.

आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून हा मोलाचा मार्ग आपण सर्वाना मोफत मध्ये वाटून दिला. मार्गाचा प्रसार आणि प्रचार ध्यानात ठेवून प्रत्येक सेवक/सेविकेला स्वावलंबी बनवून प्रपंच साधून परमार्थ करण्यास सांगितले.

दरवर्षी आपल्या मौदा आश्रमात मानवधर्म सेवक मेळाव्याचे आयोजन केले जाते, हे आपण सर्व सेवक जाणतो. हा मेळाव्या मार्फ़त सेवकांची एकदुसऱ्यास भेट होत असून, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन या माध्यमातून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच कालावधी मध्ये हा एक शोभणीय मेळावा, सेवकांना आनंद देऊन जातो.

एक खूप छान म्हण आहे,

              “यशस्वी म्हणून जगायला

                    अंगी मोठी चिकाटी हवी

                        जिथे उभे असू तिथून

                         आभाळ पाह्ण्याची दृष्टी हवी”

आपण सर्व सेवकांना बाबांनी आत्मविश्वासु बनविले आहे, आपल्या आत्म्यात जागृत दैवी शक्ती वास करते याचा अनुभव करून दिला आहे, यामुळे आपले ध्येय एका जागेवर राहून, आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यास बळ प्रदान करते.

या मेळाव्याच्या उद्देशाने लक्षात येते की, आपल्या मार्गाचा प्रचार खुप मोठया प्रमाणात होत आहे, यातून आपल्या मार्गाची पसंती व प्रसिद्धी आपल्याला जाणवते, आणि जेव्हा आपण सर्व एका मंडपात एकत्रित येतो तेव्हा मात्र आपली विशाल एकता पाहून समाजाला मानवधर्माची व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या त्यागाची निस्वार्थ प्रतिमा दिसून येते.

याप्रसंगी, अनेक स्पर्धा, कला कृती, अन्य सांस्कृतिक बाबी दर्शविल्या जातात. मार्गातील जेष्ठ सेवकांचे, मंडळातील अधिकारी गणांच्या सुंदर अश्या मार्गदर्शनाने, परिसर अत्यानंदीत होतो. 

या माध्यमातून सेवक आपल्या सोबत छान असे अनुभव घेऊन जाऊन, पुढल्या वर्षीची तयारी मोठ्या आनंदाने आपल्या हृदयात समाविष्ट करतो, याप्रकारे 

मानवधर्म सेवक मेळावा आपण साजरा करतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 23 January 2021

"कौटुंबिक जबाबदारीची जाणीव" हा लेख नक्की वाचन करा. Like | Share | Comment

                   【"कौटुंबिक जबाबदारीची जाणीव"】

▶"मार्गात येण्याअगोदर काही कुटुंबातील पुरुष आपल्या जबाबदारी मधून पळ काढायचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आपल्या पत्नीकडे ढकलून ,स्वतः मात्र सट्टा जुवा लॉटरी च्या जाळ्यात अडकायचे, अशा पैशाची उधळण करणारे व कर्जबाजारी होऊन कुटुंबात दुःखा ला निमंत्रण देणाऱ्या पुरुषांना "महांनत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक जबाबदारीची जाणीव समजावून, जागृत केले?

                             【लेख स्पष्टीकरण】

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांचे दुःख फक्त दूरच केले नाही तर सेवकांचे कुटुंब कसे प्रगतिशील राहील यासाठी धडपड केली. अनेक संस्थाने काढून सेवकांना जागृत तर केलेच (संस्थाने म्हणजे ग्राहक मंडळ दूध डेरी वगैरे वगैरे) पण समाजात लागलेली वाईट व्यसनाची किड बाजूला करण्याचे ध्येय, धोरण बाबांनी नियमात सांगितलेले आहे.

मार्गात येण्याअगोदर पुरुष आपल्या जबाबदारीतून मोकळा व्हायचा. कारण, मार्गात प्रवेश करण्याआधी पुरुष वेगवेगळ्या व्यसनांनी व्यसनाधीन झालेले असतात. व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या जवाबदाऱ्या विसरलेले असतात. व्यसनाधीन झालेल्या माणसाला कुटुंबाचा हित कमी असते व व्यसन म्हणजे त्याची लत, इच्छा जास्त असते. व्यसनामुळे ते सर्व विसरलेले असतात की, ते कुणाचे सुपुत्र आहेत, कुणाचे पती आहेत किव्हा कुणाचे वडील आहेत.

पुरुष अनेक प्रकारच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या परिवारातील लोकांच्या दुःखाचे कारण राहत होते. सट्टा, लॉटरी, जुवा हा जुगार आहे; पण कुटुंबामध्ये हा जुगार जर घुसला तर त्या कुटुंबाची दिनदैना अतिशय खालच्या पातळीला गेलेली होती. वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांमूळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी उपाशी पोटी राहावे लागत होते. 

मार्गात प्रवेश केल्यानंतर या मार्गातील पुरुषांना एका बंधनामध्ये बांधले जाते. बंधन म्हणजे, तत्व, शब्द आणि नियम. कुटुंबाची एकता सत्य, मर्यादा, प्रेम हे परमेश्वराचे शब्द आणि भगवंताला आवडणारे गुण त्यामुळे कुटुंबात आणि सेवकांच्या विचारात आलेला गोडवा बाबांनी समजावून सांगितला. व्यसनी माणसांवर मुलेच काय? पण राब राब राबली स्त्रीसुद्धा कधी काय बोलेल याचा नेम नव्हता आणि म्हणूनच बाबांनी स्त्रियांनासुद्धा वचनबद्ध केले. 

जीवनात चालण्याकरिता गृहस्ती उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिलेले आहेत. त्यामधी तिसरा नियम, अनेक वाईट व्यसन बंद करणे. दारू, टॉनिक, सट्टा, जुव्वा, लॉटरी, पटाची होळ, कोंबळ्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, बंद करणे, स्त्रियांनी मुलांना व पती देवाला वाईट शब्दात बोलू नये. म्हणजेच सट्टा, जुवा, लॉटरीच्या जाळ्यात अडकलेला माणूस पैसा भेटतो म्हणून अधिकाअधिक पैसा त्या व्यसनांमध्ये गुंतवून स्वतःभोवती कर्जाचा जाळ तर पसरवतो; पण कुटुंबाला सुद्धा समाजात मान हानीने जगायला लावायचे असे व्यसनी पुरुष होते. 

अश्या विविध प्रकारच्या वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना एका परमेश्वराची ओळख करून देऊन त्यांना या वाईट व्यसनाच्या विळख्यामधून बाहेर काढले. वाईट व्यसनामधून बाहेर निघाल्यावर हेच पुरुष जे परिवारांची जवाबदारी स्विकारण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते ते आपल्या परिवाराचा सांभाळ करू लागले. अश्याप्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी तिसऱ्या नियमाने मानवास जागृत केले व आपल्या कुटुंबाची जबाबदारी जाणीव समजावून आज प्रगतीशील कुटुंब सेवकांचे केले.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Wednesday, 20 January 2021

"दैवी शक्तीची दिशा" हा लेख नक्की वाचन करा व शेयर करा. नमस्कार.!

                       【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंबांना सत्य शक्तीचा परिचय नसल्याने ढोंगी व संधी साधू फसवणूक करायचे, स्वर्ग -नरक भीती दाखवून पैसा व संपत्ती लुटायचे अश्या दिशाहीन मानवांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कश्या प्रकारे जागृत दैवी शक्तीची दिशा दाखविली"?

                            【लेख स्पष्टीकरण】

मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंब भूतबाधे मुळे, अंधश्रद्धेमुळे बेजार झालेले असतात. वाईट परिस्थितीमुळे आपल्यावर आलेले दुःख दूर व्हावे म्हणून हे दुःखी कुटुंब वैद, जाणत्याकडे जावून आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतू हे संधी-साधू लोकं अश्या दुःखी लोकांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांचे दुःख दूर करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसा व संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतात. 

अनेकांत असताना मानवाला सत्य शक्तीचा परिचय नसतो, जी दैवीशक्ती आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनी प्राप्त केली. बाबांनी या दैवी शक्तीचा परिचय अशा दुःखी कुटुंबातील लोकांना करुन दिला. तत्व, शब्द, नियमाची शिकवण देऊन दुःखी लोकांचे दुःखं निष्काम व निस्वार्थ भावनेने दूर केले. बाबांनी  समाजातील दुःखी लोकांसाठी आपले जीवन वाहून दिले. बाबांनी शेवटपर्यंत आपल्या सेवकांचा चं विचार केला. दुःखी लोकांचे दुःख दूर करून त्यांना संधी साधू, फसवणूक करणाऱ्या ढोंगी लोकांच्या जाळ्यातून बाहेर काढले. व त्यांना जागृत दैवी शक्तीची दिशा दाखवली. 

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ मंगेश दादा संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य: "परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

"उच्च स्थान प्राप्त" हा लेख नक्की वाचन करा व ही पोस्ट जास्तीतजास्त सेवकांपर्यत अवश्य शेअर करा. नमस्कार

 【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶ "मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंबांना खुप कमी लोकांची मदत किंवा सहानुभूती मिळायची, तर मार्गात आल्यावर सेवकांना समाजात कसे उच्च स्थान  "महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या" शिकवणीने प्राप्त झाले"?

                                【लेख स्पष्टीकरण】

'परमात्मा एक' या मार्गात येण्याअगोदर या मार्गातील सेवक सर्व परिस्थितीने खालावला होता. कोणत्या मानवाचे भूतबाधेमुळे तर कुणाचे वाईट व्यसनांमुळे आचरण बिघडलेले होते. अश्या मानवाला समाज कोणत्याही गोष्टीत सहभागी करत नव्हता. त्यावेळी आपण मार्गात असलेल्या परिवाराच्या संपर्कात नव्हतो. अनेकातील बऱ्याच लोकांना देवाची भीती नसून इतरांच्या दुःखाची जाणीव नसते. दुःखाच्या वेळेस कुणी आपल्याला समजून घेत नाही. आपल्या दुःखावर हसतात म्हणून आधी दुःखी कुटुंबांना खूप कमी लोकांची मदत किंवा सहानुभूती मिळत होती.

मार्गात प्रवेश केल्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अगोदर आपला विश्वास जिंकला. आपल्या मनातील भीती दूर केली. त्यानंतर कुटुंबामध्ये एकतेच वातावरण निर्माण केले व सर्व सेवकांना स्वावलंबी बनवले. 'परमात्मा एक' मार्गाचे नियम बनवून मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण दिली. सर्व सेवक बांधवांना एकत्रित करून सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करायला सांगितले. त्याचबरोबर चोवीस तास जागृत असणारा परमेश्वर आपल्यासारख्या दुःखी कष्टी लोकांना फुकटामध्ये वाटून दिला. 

आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे हे सर्वांना माहिती आहे. आपण थोडीशीही वाट चुकलो तरी पण त्याचा परिणाम आपण स्वतः नाही तर कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणारे परिणाम आपण सर्वांनी सेवकांच्या अनुभवाच्या माध्यमातून ऐकलेले आहेत. मार्गामुळे मानव जागृत झाला, अडाणी असून सुशिक्षित झाला, बोलण्या-चालण्यात त्याचे कुटुंब सुधारले, सेवकांच्या व्यवहारात सत्यता आली, कुटुंबामध्ये असलेले प्रेमाचे आचरण पाहून शेजारी-पाजारी समाजात मानवधर्माचा सेवक ही बाबांनी दिलेली ओळख बहुश्रुत ठरली. आज कुठल्याही ठिकाणी सेवक हा निष्ठावान समजल्या जातो. बोलण्याचा व्यवहार गोड असल्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. धंद्यामध्ये, व्यवहारांमध्ये सत्यता असल्यामुळे सामाजिक बांधिलकी घट्ट होत गेली. मर्यादा असल्यामुळे जिभेला हाड लागले. नाहीतर हाड नसल्यामुळे जिकडे वळेल तिकडे वळत होती.

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी नुसता मानवच तयार केला नाही, तर मानवी गुण त्याच्या अंतर्मनात भरले. म्हणजेच आम्ही जन्म आईच्या पोटी घेतला, आम्हाला संस्कार मिळाले; पण आम्ही त्या संस्काराचा उपयोग न करता दुरुपयोग केला. तर हा दुरूउपयोग झालेला समुह मुळपणे नष्ट आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केला. आज महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने आम्ही मनाने, धनाने, विचाराने आणि प्रगतीने समोर आलोत. आज सेवक परिवार सोबत आहे. नातेवाईका पेक्षाही घट्ट नाते सेवकांचे आहेत. अडीअडचणीच्या वेळी निष्काम भाव आमच्या मनात भरलेला आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमची एकता आहे आणि हे सर्व आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने आम्हाला मिळाले आहे.

मार्गात प्रवेश केल्यानंतर आम्हाला खूप सेवक परिवारांची सत्संगती मिळाली. प्रत्येक कुटुंबातील सेवकांना दुःखाची जाणीव राहते. त्यामुळे त्यांना इतरांच्या दुःखाची जाणीव असते. मनामध्ये भगवंताची भीती असल्यामुळे सेवक इतरांच्या दुःखावर हसत नाही. त्यामुळे दुःखी कुटुंबाला सहानुभूती व मदत मिळते. अश्याप्रकारे आज "महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या" शिकवणीप्रमाणे सेवकांना सामाजात उच्च स्थान प्राप्त झाले आहे.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ मंगेश दादा संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.