Followers

Wednesday, 3 February 2021

"शेवटी अंत हा निश्चित आहे." वरील लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा.


                         【"शेवटी अंत हा निश्चित आहे"】

▶ "मानवी जीवन कर्मावर आधारित आहे, आणि शेवटी अंत सर्वानाच आहे. जेव्हा अंत निश्चित आहे, हे लक्षात असल्यावर सेवकांनी आपले जीवन, सुखमय करण्यास बाबांची कोणती शिकवण नेहमी अंगीकारावी."?

                                 【लेख स्पष्टीकरण】

वरील विषय सेवकांना सक्षम जीवन जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे. या मार्गामध्ये आम्हाला मरण्याचे वचन बाबांनी मागितले आहे. मरण म्हणजे आमचा शारीरिक मृत्यू नसून आमच्यामधील असलेले जुने विचार, दृष्ट भावना, दुष्कर्म, मोह, माया, अहंकार, स्वार्थ, लालच, कपट या सर्व विचारांचा त्याग करणे होय. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी संघर्षमय जीवनातून एका भगवंताची प्राप्ती केली व एका जागृत शक्तीचा परिचय करून दिला, जी शक्ती चोवीस तास जागृत असून शब्दावर उभी आहे. म्हणून सेवकांच्या मनातून वाईट विचार काढल्याने आमचे मन आणि बुद्धी, आचरण व व्यवहार,  सत्यनिष्ठा व निष्काम सेवा हे भगवंताला प्रिय असणारे शब्द, गुण आमच्या अंतर्मनात साठवलेले आहेत. मार्गात आल्यावर दुःख नष्ट झाले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे होत नाही, तर आयुष्यभर आपल्याला सत्कर्म करायचे आहेत.

"जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर"

"जैसे ज्यांचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर"

या मनीप्रमाणे हा मार्ग कर्मप्रधान आहे. बाबांनी या मार्गात कर्माला खूप महत्व दिले आहे. सेवकांना माहिती आहे तरी सुद्धा सेवक अहंकार, लोभ या गोष्टींच्या आहारी जाऊन चुकी करून घेतो. मग भगवंत आम्हाला साथ कशी देणार? जीवनात जो सेवक सत्याने वागतो तेव्हा सेवकास त्याचा अनुभव येतो. परमेश्वराला प्रिय असणारे कार्य म्हणजे सत्कर्म. सत्कर्माप्रमाने भगवंताला आवडणारे कार्य आम्ही करत असून तर कर्मभोग जाऊन आम्हाला कर्मयोग मिळणारच आहे. आमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊन सरतेशेवटी आमचा उद्धार होणार आहे. कारण, जो जसे कर्म करेल तसेच त्याला फळ मिळणार आहे. बाबांनी सांगितले आहे की, 

"परमेश्वर सर्वेसर्वा आहे व मानव कर्मकर्ता आहे."

जो या धर्तीवर जन्माला येतो, त्याला एक ना एक दिवस जाणे आहे. हे प्रत्यक्षात सत्य असूनसुद्धा आपण याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाने जीवन जगत असतो. मानवी जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू आमच्या हातात नाही, परमेश्वराच्या हाती आहे. परमात्माचा अंश आत्मात आहे. खर पाहता आपण या जगात फक्त काही वेळेकरिता आले आहोत. कारण, आत्मा अमर आहे आणि शरीर नश्वर आहे. जेव्हा आत्मा शरीर सोडते, तेव्हा शरीर मृत पावतो व आम्हाला भगवंतांच्या चरणी स्थान मिळतो म्हणजेच आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. बाबाही एक परमेश्वराचेच अंश होते म्हणून बाबांनी जे केले ते आम्हाला करायचे नाही; पण बाबांनी जे सांगितले त्याचे पालन सेवकांना करायचे आहे. सेवकांनी मोह, माया व अहंकार दूर करून सत्याचे कार्य करावे. मनात कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता, मनात जुने विचार न आणता, एक लक्ष, एक चित्त व एक भगवान असे मानून तत्व, शब्द, नियमाचे पालन करून प्रपंच साधून परमार्थ करावे. नेहमी चांगले कर्म करण्याचे प्रयत्न करावे. आपण मार्गात कश्यासाठी आलो हे पहिले दिवस लक्षात ठेवून आपले कर्म करावे.

"जैसे बीज भोवोगे, वैसे ही फल पाओगे!"

हे माहिती असून सुद्धा आपल्या हातून किती तरी चूका होतात. मन इतरत्र भटकतो आणि दोष परमेश्वराला देतो. हे कितपत योग्य आहे? याला आपण समजून घेतले पाहिजे. आपण म्हणतो की,

 "जिंदगी एक वेळा मिळते." पण माझ्या मते, "जिंदगी वारंवार मिळते, फक्त मरण एक वेळा येतो." 

जीवन सुधारणायची संधी परमेश्वर आपणास वेळोवेळी देते; परंतु याकडे आपले लक्ष नसते. आपण आपल्याच अहंकार मध्ये जीवन जगत असतो. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी 

"मानव यह बेईमान है!" 

असे म्हटले आहे. मानवाची एक इच्छा संपत नाही तर, दुसरी इच्छा लागुनच असते. त्याच्या इच्छा कधीही संपत नाही. एवढी लालस मानवता भरली आहे, म्हणून मानव प्राणी बुद्धिमान असून सुद्धा समाधानी व्हायला वेळ लागतो. आहे त्या परिस्थितीत खुश असेल तरच समाधानी जीवन अनुभवायला मिळतो.

"मरावे परी, कीर्ती रुपी उरावे." 

ही मन महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सिद्ध करून दाखविली आहे. आजही ते या जगात अजरामर होऊन गेले. मग गर्व कशाचा? आपण जेवढे कमावतो, ते सर्व इथेच राहणार आहे. कोणीच सोबत घेऊन जाणार नाही. याचा विचार करून सेवकांनी समाधानी जीवन जगावे आणि बाबांच्या शिकवणीचे पालन करावे. आपण "कर्म घेऊन जन्माला आलो, कर्म घेऊनच मरणार आहोत." त्यामुळे सेवकांनी चांगले कर्म करावे आणि परमेश्वराला आवडणारे कार्य करावे. बाकी घडविणारे परमेश्वर आहे. करता, करविणारे भगवंत आहेत, आपण करणारे आहोत. त्यामुळे आपण नेहमीच चांगले केले तर त्याचा शेवटही चांगलाच होणार आहे.

मानवाची मृत्यू अटळ आहे. म्हणून या मानवी जीवनात भगवंताला प्रिय असणारे कार्य करून, मेल्यानंतर ही आपले नाव अजरामर होईल असे कर्म सेवकांनी करावे. जसे आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी करून दाखविले. आज बाबा आमच्यामध्ये शरीर रुपी नाही पण आत्मरूपी आहेत, त्यांचे नाव आज जगात अजरामर आहे. त्यांनी जे कर्म केले ते आम्हाला करायचे नाही; पण त्यांनी सांगितलेल्या नियमाचे पालन करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. यावर एक भजनाची ओळ सांगू इच्छितो,

"कर विचार सेवका म्हणा, कर विचार सेवका म्हणा,..."

"नाही मिळणार मार्ग पुन्हा, पुन्हा.. नाही मिळणार मार्ग पुन्हा पुन्हा...."

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

2 comments:

  1. खूपच छान माहिती.सर्वाना नमस्कारजी.

    ReplyDelete
  2. 🙏 नमस्कार जी 🌹
    👌👌👌

    ReplyDelete