Followers

Monday, 25 January 2021

"मानवधर्म सेवक मेळावा" हा लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा.

 【"मानवधर्म सेवक मेळावा"】

▶ "मानवधर्म सेवक मेळावा म्हणजे काय? आणि आपण तो कसा साजरा करतो?"

【लेख स्पष्टीकरण】

मेळावा म्हणजेच जास्त प्रमाणात एकत्र येऊन, एकमेकांची ओळख करणे, एकमेकांचा परिचय करणे व जास्त संख्येने उपस्थित होऊन शुभ कार्याची शोभा वाढविणे, इत्यादी. मानवधर्म सेवक मेळावा म्हणजेच  की, मानवा मध्ये फक्त दोनच जाती आहेत ते म्हणजे नर आणि नारी तर, या दोनच जातींना लक्षात घेऊन जो धर्म बनला आहे त्यालाच मानवधर्म म्हणतात व या मानवांचाचं मेळावा म्हणजेच मानवधर्म मेळावा.

आपण या मानवधर्म सेवक मेळाव्याला अगदी आंनदाने साजरा करतो. विविध कलेचा प्रदर्शन करून जसे की, नृत्य कला, चित्रकला, संगीतकला इत्यादी. 

शोभायात्रा काढून मानवधर्माचा प्रसार  करून आपण मानवधर्माची शोभा वाढवितो. छान-छान विचार ऐकून ,आपण मानवधर्माची शोभा वाढवितो व मानवधर्माचा प्रसार करतो. अशा प्रकारे आपण मानवधर्म सेवक मेळावा साजरा करतो.

आपल्या महानत्यागी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून हा मोलाचा मार्ग आपण सर्वाना मोफत मध्ये वाटून दिला. मार्गाचा प्रसार आणि प्रचार ध्यानात ठेवून प्रत्येक सेवक/सेविकेला स्वावलंबी बनवून प्रपंच साधून परमार्थ करण्यास सांगितले.

दरवर्षी आपल्या मौदा आश्रमात मानवधर्म सेवक मेळाव्याचे आयोजन केले जाते, हे आपण सर्व सेवक जाणतो. हा मेळाव्या मार्फ़त सेवकांची एकदुसऱ्यास भेट होत असून, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन या माध्यमातून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच कालावधी मध्ये हा एक शोभणीय मेळावा, सेवकांना आनंद देऊन जातो.

एक खूप छान म्हण आहे,

              “यशस्वी म्हणून जगायला

                    अंगी मोठी चिकाटी हवी

                        जिथे उभे असू तिथून

                         आभाळ पाह्ण्याची दृष्टी हवी”

आपण सर्व सेवकांना बाबांनी आत्मविश्वासु बनविले आहे, आपल्या आत्म्यात जागृत दैवी शक्ती वास करते याचा अनुभव करून दिला आहे, यामुळे आपले ध्येय एका जागेवर राहून, आपल्या कुटुंबाचा उद्धार करण्यास बळ प्रदान करते.

या मेळाव्याच्या उद्देशाने लक्षात येते की, आपल्या मार्गाचा प्रचार खुप मोठया प्रमाणात होत आहे, यातून आपल्या मार्गाची पसंती व प्रसिद्धी आपल्याला जाणवते, आणि जेव्हा आपण सर्व एका मंडपात एकत्रित येतो तेव्हा मात्र आपली विशाल एकता पाहून समाजाला मानवधर्माची व महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या त्यागाची निस्वार्थ प्रतिमा दिसून येते.

याप्रसंगी, अनेक स्पर्धा, कला कृती, अन्य सांस्कृतिक बाबी दर्शविल्या जातात. मार्गातील जेष्ठ सेवकांचे, मंडळातील अधिकारी गणांच्या सुंदर अश्या मार्गदर्शनाने, परिसर अत्यानंदीत होतो. 

या माध्यमातून सेवक आपल्या सोबत छान असे अनुभव घेऊन जाऊन, पुढल्या वर्षीची तयारी मोठ्या आनंदाने आपल्या हृदयात समाविष्ट करतो, याप्रकारे 

मानवधर्म सेवक मेळावा आपण साजरा करतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 23 January 2021

"कौटुंबिक जबाबदारीची जाणीव" हा लेख नक्की वाचन करा. Like | Share | Comment

                   【"कौटुंबिक जबाबदारीची जाणीव"】

▶"मार्गात येण्याअगोदर काही कुटुंबातील पुरुष आपल्या जबाबदारी मधून पळ काढायचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आपल्या पत्नीकडे ढकलून ,स्वतः मात्र सट्टा जुवा लॉटरी च्या जाळ्यात अडकायचे, अशा पैशाची उधळण करणारे व कर्जबाजारी होऊन कुटुंबात दुःखा ला निमंत्रण देणाऱ्या पुरुषांना "महांनत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक जबाबदारीची जाणीव समजावून, जागृत केले?

                             【लेख स्पष्टीकरण】

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकांचे दुःख फक्त दूरच केले नाही तर सेवकांचे कुटुंब कसे प्रगतिशील राहील यासाठी धडपड केली. अनेक संस्थाने काढून सेवकांना जागृत तर केलेच (संस्थाने म्हणजे ग्राहक मंडळ दूध डेरी वगैरे वगैरे) पण समाजात लागलेली वाईट व्यसनाची किड बाजूला करण्याचे ध्येय, धोरण बाबांनी नियमात सांगितलेले आहे.

मार्गात येण्याअगोदर पुरुष आपल्या जबाबदारीतून मोकळा व्हायचा. कारण, मार्गात प्रवेश करण्याआधी पुरुष वेगवेगळ्या व्यसनांनी व्यसनाधीन झालेले असतात. व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या जवाबदाऱ्या विसरलेले असतात. व्यसनाधीन झालेल्या माणसाला कुटुंबाचा हित कमी असते व व्यसन म्हणजे त्याची लत, इच्छा जास्त असते. व्यसनामुळे ते सर्व विसरलेले असतात की, ते कुणाचे सुपुत्र आहेत, कुणाचे पती आहेत किव्हा कुणाचे वडील आहेत.

पुरुष अनेक प्रकारच्या वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या परिवारातील लोकांच्या दुःखाचे कारण राहत होते. सट्टा, लॉटरी, जुवा हा जुगार आहे; पण कुटुंबामध्ये हा जुगार जर घुसला तर त्या कुटुंबाची दिनदैना अतिशय खालच्या पातळीला गेलेली होती. वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या पुरुषांमूळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी उपाशी पोटी राहावे लागत होते. 

मार्गात प्रवेश केल्यानंतर या मार्गातील पुरुषांना एका बंधनामध्ये बांधले जाते. बंधन म्हणजे, तत्व, शब्द आणि नियम. कुटुंबाची एकता सत्य, मर्यादा, प्रेम हे परमेश्वराचे शब्द आणि भगवंताला आवडणारे गुण त्यामुळे कुटुंबात आणि सेवकांच्या विचारात आलेला गोडवा बाबांनी समजावून सांगितला. व्यसनी माणसांवर मुलेच काय? पण राब राब राबली स्त्रीसुद्धा कधी काय बोलेल याचा नेम नव्हता आणि म्हणूनच बाबांनी स्त्रियांनासुद्धा वचनबद्ध केले. 

जीवनात चालण्याकरिता गृहस्ती उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिलेले आहेत. त्यामधी तिसरा नियम, अनेक वाईट व्यसन बंद करणे. दारू, टॉनिक, सट्टा, जुव्वा, लॉटरी, पटाची होळ, कोंबळ्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, बंद करणे, स्त्रियांनी मुलांना व पती देवाला वाईट शब्दात बोलू नये. म्हणजेच सट्टा, जुवा, लॉटरीच्या जाळ्यात अडकलेला माणूस पैसा भेटतो म्हणून अधिकाअधिक पैसा त्या व्यसनांमध्ये गुंतवून स्वतःभोवती कर्जाचा जाळ तर पसरवतो; पण कुटुंबाला सुद्धा समाजात मान हानीने जगायला लावायचे असे व्यसनी पुरुष होते. 

अश्या विविध प्रकारच्या वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना एका परमेश्वराची ओळख करून देऊन त्यांना या वाईट व्यसनाच्या विळख्यामधून बाहेर काढले. वाईट व्यसनामधून बाहेर निघाल्यावर हेच पुरुष जे परिवारांची जवाबदारी स्विकारण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते ते आपल्या परिवाराचा सांभाळ करू लागले. अश्याप्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी तिसऱ्या नियमाने मानवास जागृत केले व आपल्या कुटुंबाची जबाबदारी जाणीव समजावून आज प्रगतीशील कुटुंब सेवकांचे केले.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Wednesday, 20 January 2021

"दैवी शक्तीची दिशा" हा लेख नक्की वाचन करा व शेयर करा. नमस्कार.!

                       【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंबांना सत्य शक्तीचा परिचय नसल्याने ढोंगी व संधी साधू फसवणूक करायचे, स्वर्ग -नरक भीती दाखवून पैसा व संपत्ती लुटायचे अश्या दिशाहीन मानवांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कश्या प्रकारे जागृत दैवी शक्तीची दिशा दाखविली"?

                            【लेख स्पष्टीकरण】

मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंब भूतबाधे मुळे, अंधश्रद्धेमुळे बेजार झालेले असतात. वाईट परिस्थितीमुळे आपल्यावर आलेले दुःख दूर व्हावे म्हणून हे दुःखी कुटुंब वैद, जाणत्याकडे जावून आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतू हे संधी-साधू लोकं अश्या दुःखी लोकांच्या कमजोरीचा फायदा घेऊन त्यांचे दुःख दूर करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पैसा व संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतात. 

अनेकांत असताना मानवाला सत्य शक्तीचा परिचय नसतो, जी दैवीशक्ती आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनी प्राप्त केली. बाबांनी या दैवी शक्तीचा परिचय अशा दुःखी कुटुंबातील लोकांना करुन दिला. तत्व, शब्द, नियमाची शिकवण देऊन दुःखी लोकांचे दुःखं निष्काम व निस्वार्थ भावनेने दूर केले. बाबांनी  समाजातील दुःखी लोकांसाठी आपले जीवन वाहून दिले. बाबांनी शेवटपर्यंत आपल्या सेवकांचा चं विचार केला. दुःखी लोकांचे दुःख दूर करून त्यांना संधी साधू, फसवणूक करणाऱ्या ढोंगी लोकांच्या जाळ्यातून बाहेर काढले. व त्यांना जागृत दैवी शक्तीची दिशा दाखवली. 

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ मंगेश दादा संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य: "परमात्मा एक मानवधर्म परिवार [युवा सेवकांचा ग्रुप]

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

"उच्च स्थान प्राप्त" हा लेख नक्की वाचन करा व ही पोस्ट जास्तीतजास्त सेवकांपर्यत अवश्य शेअर करा. नमस्कार

 【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶ "मार्गात येण्याअगोदर दुःखी कुटुंबांना खुप कमी लोकांची मदत किंवा सहानुभूती मिळायची, तर मार्गात आल्यावर सेवकांना समाजात कसे उच्च स्थान  "महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या" शिकवणीने प्राप्त झाले"?

                                【लेख स्पष्टीकरण】

'परमात्मा एक' या मार्गात येण्याअगोदर या मार्गातील सेवक सर्व परिस्थितीने खालावला होता. कोणत्या मानवाचे भूतबाधेमुळे तर कुणाचे वाईट व्यसनांमुळे आचरण बिघडलेले होते. अश्या मानवाला समाज कोणत्याही गोष्टीत सहभागी करत नव्हता. त्यावेळी आपण मार्गात असलेल्या परिवाराच्या संपर्कात नव्हतो. अनेकातील बऱ्याच लोकांना देवाची भीती नसून इतरांच्या दुःखाची जाणीव नसते. दुःखाच्या वेळेस कुणी आपल्याला समजून घेत नाही. आपल्या दुःखावर हसतात म्हणून आधी दुःखी कुटुंबांना खूप कमी लोकांची मदत किंवा सहानुभूती मिळत होती.

मार्गात प्रवेश केल्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी अगोदर आपला विश्वास जिंकला. आपल्या मनातील भीती दूर केली. त्यानंतर कुटुंबामध्ये एकतेच वातावरण निर्माण केले व सर्व सेवकांना स्वावलंबी बनवले. 'परमात्मा एक' मार्गाचे नियम बनवून मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण दिली. सर्व सेवक बांधवांना एकत्रित करून सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करायला सांगितले. त्याचबरोबर चोवीस तास जागृत असणारा परमेश्वर आपल्यासारख्या दुःखी कष्टी लोकांना फुकटामध्ये वाटून दिला. 

आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे हे सर्वांना माहिती आहे. आपण थोडीशीही वाट चुकलो तरी पण त्याचा परिणाम आपण स्वतः नाही तर कुटुंबाला सुद्धा भोगावे लागणारे परिणाम आपण सर्वांनी सेवकांच्या अनुभवाच्या माध्यमातून ऐकलेले आहेत. मार्गामुळे मानव जागृत झाला, अडाणी असून सुशिक्षित झाला, बोलण्या-चालण्यात त्याचे कुटुंब सुधारले, सेवकांच्या व्यवहारात सत्यता आली, कुटुंबामध्ये असलेले प्रेमाचे आचरण पाहून शेजारी-पाजारी समाजात मानवधर्माचा सेवक ही बाबांनी दिलेली ओळख बहुश्रुत ठरली. आज कुठल्याही ठिकाणी सेवक हा निष्ठावान समजल्या जातो. बोलण्याचा व्यवहार गोड असल्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. धंद्यामध्ये, व्यवहारांमध्ये सत्यता असल्यामुळे सामाजिक बांधिलकी घट्ट होत गेली. मर्यादा असल्यामुळे जिभेला हाड लागले. नाहीतर हाड नसल्यामुळे जिकडे वळेल तिकडे वळत होती.

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी नुसता मानवच तयार केला नाही, तर मानवी गुण त्याच्या अंतर्मनात भरले. म्हणजेच आम्ही जन्म आईच्या पोटी घेतला, आम्हाला संस्कार मिळाले; पण आम्ही त्या संस्काराचा उपयोग न करता दुरुपयोग केला. तर हा दुरूउपयोग झालेला समुह मुळपणे नष्ट आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केला. आज महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने आम्ही मनाने, धनाने, विचाराने आणि प्रगतीने समोर आलोत. आज सेवक परिवार सोबत आहे. नातेवाईका पेक्षाही घट्ट नाते सेवकांचे आहेत. अडीअडचणीच्या वेळी निष्काम भाव आमच्या मनात भरलेला आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमची एकता आहे आणि हे सर्व आमच्या महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने आम्हाला मिळाले आहे.

मार्गात प्रवेश केल्यानंतर आम्हाला खूप सेवक परिवारांची सत्संगती मिळाली. प्रत्येक कुटुंबातील सेवकांना दुःखाची जाणीव राहते. त्यामुळे त्यांना इतरांच्या दुःखाची जाणीव असते. मनामध्ये भगवंताची भीती असल्यामुळे सेवक इतरांच्या दुःखावर हसत नाही. त्यामुळे दुःखी कुटुंबाला सहानुभूती व मदत मिळते. अश्याप्रकारे आज "महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या" शिकवणीप्रमाणे सेवकांना सामाजात उच्च स्थान प्राप्त झाले आहे.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ मंगेश दादा संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Tuesday, 12 January 2021

"मर्यादित कुटुंब" हम दो हमारे दो ! हा नारा अमलात आनुया! कुटुंबाचा उद्धार करूया!

                         【"चर्चा बैठकीचा विषय"】
▶"कुटुंबाचे कल्याण हीच खरी सुखी जीवनाची गाथा आहे, हे म्हण लक्षात घेता "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे कुटुंब मर्यादित बाबत सेवकात जनजागृती केली"?

                             【लेख स्पष्टीकरण】
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी नेहमी सेवकांच्या हिताचे कार्य केले बाबांच्या ज्या वेळेस लक्षात आले की, सेवक व्यसनमुक्त झाला तरीपण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती/अवस्था का पलटत नाही! पूर्वी बाबांनी जीवनात चालण्याकरता घर गृहस्थी उंच आणण्याकरिता अनेक उद्देश सफल करण्याकरिता पाच नियम दिले होते, यात पाचवा नियम "मानव मंदिर सजाना" हा होता बाबांना ज्यावेळी सेवकांच्या परिस्थितीचा विचार आला त्यावेळी त्यांनी आपले "कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम सेवकांना बंधनकारक केला.

"देव मुल जन्माला घालतो, जेवढे होतील तेवढे होऊ द्या! या विचाराला बाबांनी नष्ट केले आहे." 

आपल्या बाबानी फार मोठे मोलाचे कार्य केले आहे.
सेवकांनी आपले कुटुंब लहान ठेवुन आपल्या परिवाराची निगा कशी राखता येईल याकडे लक्ष देण्यासाठी बाबांनी भाग पाडले. मर्यादित कुटुंब जर राहिले तर घर गृहस्थी उंचावली जावू शकते, तसेच परिवाराला संपूर्ण जीवन मिळू शकते.

भारत सरकारने "कुटुंब मर्यादित" यावर अनेक प्रकारे उपक्रम राबविले आहेत. परंतु ते यशस्वी झाले नाही. पण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या मानव धर्माची स्थापना करून, गरिबीत जीवन जगणाऱ्या मानवाला सुखी जीवन मिळण्याचा मार्ग दाखविला आहे. आज या मार्गातील कित्येक तरी परिवाराला "मर्यादित कुटुंब" पद्धति मुळे सुखी जीवन मिळाले आहे. पहिले कित्येक तरी परिवारात सदस्य जास्त दिसून येते होते. जसे - एकाच आई - वडील यांच्या पोटी ७-८ मुले जन्माला यायची. आणि त्यांचा गरजा पूर्ण करण्यासाठी आई - वडील अहोरात्र परिश्रम करून सुद्धा पूर्ण होत नव्हती.

कित्येक परिवारात खायला अन्न मिळत नव्हते, शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. अंगावर धड कपडे मिळत नव्हते. अशी परिस्थिती या समाजात निर्माण झाली होती. त्यामुळे परिवारात दुःख, दारिद्रय़, गरिबीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच अनेक वाईट व्यसन मानवाला लागले होते. या सर्व गोष्टी चा विचार विनिमय करून या मार्गाद्वारे सेवकांच्या परिवाराचे कल्याण व्हावे यासाठी "मर्यादित कुटुंब" पद्धतीचा अवलंब केला आहे. यामुळे कित्येक तरी परिवार आज सुखी जीवन जगत आहेत. लोकसंख्येच्या बाबतित आपला देश दुसरा क्रमांकावर आहे. आणि क्षेत्र फळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकावर आहे. यामुळे विचार करण्याची गरज निर्माण झाली होती, आणि या मार्गद्वारे ती संपुष्टात यायच्या मार्गावर आहे. 

राष्ट्रीय कार्यात भारत सरकार पूर्वी "हम दो, हमारे तीन" त्यानंतर "हम दो, हमारे दो" हा नारा देत होती. बाबांनी कुटुंबामध्ये म्हणजेच सेवकांना "आपले कुटुंब मर्यादित ठेवणे" हा नियम अमलात आणल्यानंतर कुणाकडे एक अपत्य तर कुणाकडे दोन अपत्य असे आज सेवक परिवार दिसताहेत.

आजची महागाई पाहता शिक्षण, आर्थिक नियोजन व राहणीमान म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा हे तर आवश्यक असून, शिक्षण हे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचे कल्याण म्हणजे सर्व परिवार सुखी समृद्ध असायला पाहिजे, केव्हा होईल तर आपल्या कुटुंबातील संख्या कमी राहील तर आपले कुटुंब सुखासमाधानाने व शिक्षण क्षेत्रात प्रगती करू शकेल आणि साक्षर भारत हा पाया मानव धर्मातून निर्माण होईल व झालेला आहे.

मोठे कुटुंब असले म्हणजे वयोवृद्ध लोकांची हय गय होते, प्रकृतीविषयी आपण जागृत राहत नाही म्हणून बाबांनी सर्व सेवकांमध्ये कुटुंब मर्यादित असण्याचे अनेक फायदे सेवक कुटुंबात करून दिले. मानव हा समाजशील प्राणी आहे म्हणून त्याला आपल्या कुटुंबाचे संरक्षण व पालनपोषणाची जबाबदारी  स्विकारावीच लागेल. यासाठी बाबांनी सेवकांना कर्म प्रधान सांगुन मानव सेवा हीच ईश्वर सेवा सांगितली. कुटुंबात एकता ठेवायला सांगितली. म्हणून आज आपण बाबांनी दिलेल्या मर्यादित कुटुंबाविषयी जी जनजागृती केली त्याविषयी आपण सुखी झालो.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
★ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 10 January 2021

"व्यसनाधीन" हा लेख नक्की वाचा व जास्तीतजास्त सेवकांपर्यत नक्की शेयर करा. नमस्कार

                         【"चर्चा बैठकीचा विषय"】

"देगा हरी पलंगावरी', अशे विचार पशुपक्षी पण करत नाही, मग मानव असूनही आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण, न करणाऱ्या वाईट व्यसनाधीन मानवांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कश्या प्रकारे समजूत देऊन, त्यांचा कुटुंबाचा उद्धार करण्यास प्रेरित केले."

                          【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय खुप सुंदर आहे, कारण मार्गात यायच्या आधी मानव हा अंधविश्वासु होता. आपण देवाची पूजा केली, भक्ती केली, उपवास केला, दान-दक्षिणा दिली तर आपल्याला हरित म्हणजे परमेश्वर हा आपल्या स्वप्नांची किंवा कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारतो व आपले सर्व पाप नष्ट होऊन आपण स्वर्गलोकात जातो म्हणूनच भारत हा सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे ह्या ठिकाणी अनेक देवी-देवतांचे तीर्थस्थान देवळे आजही उभारलेली आहेत. दानधर्म हा सर्वश्रेष्ठ मानला जात आहेत परंतु मानव धर्मामध्ये 'महानत्यागी बाबा जुमदेवजींनी', ही म्हण खोटी केली आहे, कारण कर्म हे प्रधान आहे तुम्ही आपले कर्म चांगले कराल, तुम्ही आपली कमाई चांगल्या यशस्वी रीतीने पार पाडाल तुम्ही; व्यसन मुक्त व्हाल; अंधश्रद्धेतून मुक्त व्हाल तेव्हा तुम्ही मानव व्हाल. हे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला शिकविले. वाईट व्यसनाधीन माणसाला पैसा कमावता येतो परंतु आपल्या कुटुंबाची, पालनपोषणाची जबाबदारी समजत नाही. कारण त्यांच्या समोर एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे, व्यसन!

मग या व्यसनासाठी मानव आपल्या कुटुंबाचे कोणत्याही प्रकारे हनन करू शकतो, मग झगडे असोत; घरातली चोरी असो; मुलांना मारझोड असो; यातील कुठली गोष्ट पशु वृत्ती आल्यामुळे त्या व्यसनी माणसाला कळत नव्हती.

पशुपक्षी जरी बुद्धीने कमी असले तरीपण सकाळी आपल्या पिलांसाठी चारा जमा करण्याकरीता आपले घरटे सोडतात. चिऊताई तर आपल्या चोचीतून दाणे आपल्या पिल्लांना भरवताना, आपण कितीतरी वेळा पाहिले आहे. पावसाळा लागताचं प्रत्येक पक्षी राहण्यासाठी आपले घरटे तयार करतात, पण व्यसनाधीन माणूस हे कधीही करत नाही. पशुपक्षी मुलांना फक्त मोठे करतात व त्यांना आपली जबाबदारी न देता त्यांचे वेगळेपण होते.

मानव हा समाजशील प्राणी आहे त्याला समाजात राहण्यासाठी आर्थिक-सामाजिक मानसिक, अन्न-वस्त्र-निवारा याची गरज असते परंतु हे सर्व तो विसरलेला असतो. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवाला एकता शिकवली, अंधश्रद्धेतून मुक्त केले व्यसनातून बाहेर काढले. 

आपला उद्धार करण्यासाठी साधुसंतांनी जप-तप मंत्र विधि सांगितली, परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजींनी प्रपंचात राहून आपल्या जीवनाचा उद्धार करायला सांगितलेला आहे. त्यासाठी तत्व, शब्द, नियम आपल्या सेवकांना दिले आहेत. त्यागी जीवनासाठी, शट विकार दूर करण्यासाठी प्रत्येकाला त्यांनी आत्मविश्वासी, स्वावलंबी बनवले आहे. कुटुंबासाठी भाकरी कमवणे, खूप मोठी गोष्ट नाही, परंतु कुटुंबा सोबत बसून ती भाकरी खाण्यात जो आनंद आहे तो एकतेचा आहे. एवढा मोठा आनंदाचा क्षण दर दिवशी आम्हाला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समजूत देऊन सेवकाचा व सेवकाला उद्धार करण्यास प्रेरित केले आहे.

"लाख कोटी होती या जगात पण उध्दार नाही, केला कुणी मानवाचा, एकच सूर्य उगवला भूवरी क्रांतिवीर, तेजोमय पुरुषार्थ करण्या आम्हा दुःखी सेवकांचा"

"अनेक पुरस्कार प्राप्त करूनही क्रांती झाली का हो समाजाची, पण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी उद्धार केला महारोगी, कोडी, दुर्धर आजार असणाऱ्यांची"

परिवर्तनाची ही नांदी तेजोमय ज्योत प्रज्वलित करून दाखवली.

"कलियुगात रोप लाविला सत्याचा, 

म्हणूनच आज वटवृक्ष झाला मानवधर्माचा 

उद्धार किती केले मानवांचे

विसरू नका हो बाबांच्या कृपेला

तत्व, शब्द, नियमाची दिले शिदोरी

आत्म्याच्या तिजोरीत जपा हो तिला".

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो. नमस्कार..!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ श्री. विनायक रोकडे: 9372330929

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Monday, 4 January 2021

【"नवजीवनदान"】हा लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त सेवकांपर्यत शेयर करा. नमस्कार

 【"चर्चा बैठकीचा विषय"】

▶"मार्गात येण्याअगोदर सेवक, अज्ञानी जीवन जगत होते. कुणाला विद्येचे ज्ञान नव्हते, तर कुणाला समाजाचे भान नव्हते! कुणी माणूस असूनही पशु प्रमाणे वागायचे, तर कुणी बुद्धीमान असूनही अंधश्रद्धा मध्ये वाहून जायचे! तर अश्या या भोळ्याभाबड्या लोकांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कशाप्रकारे नवजीवनदान दिले ?"

                             【लेख स्पष्टीकरण】

मार्गात येण्याअगोदर सेवक शिकलेला होता शिकून असल्यानंतरही तो अज्ञानी होता विद्येचे ज्ञान होतं पण त्या ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या जीवनात नव्हता. मानव हा समाजशील प्राणी आहे तो समाजात राहतो, वावरतो परंतु वाईट व्यसनामुळे व शट विकारामुळे मोहमाया, अहंकार, द्वेष, राग, अंधश्रद्धा यामध्ये ते गुरफटून होते. ते भोळेभाबडे नव्हते तर आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करणारे दानव वृत्तीचे मानव होते. एकदाच माणसाला दानव बनवणे सोपे आहे, परंतु दानवाला मानव बनवणे सोपी गोष्ट नाही. यासाठी महानत्यागी बाबा जुमदेवजींनी हाडाची काडी केली, खूप कठोर परिश्रम घेतले, स्वतः अगोदर ज्ञानी झाले व हा ज्ञानाचा दीपक त्यांनी आजन्म सेवकांच्या घरोघरी लावला.

भोळेभाबडे म्हणजे अंधश्रद्धा त्यांच्यात भरली होती, खरा रस्ता कोणी दाखवणारे नव्हते देव आहे तो दगडाच्या मूर्तीत अंगात येणाऱ्या देवी-देवतांच्या अवस्थेत, लटा लटा पायावर लोळण घेत बाबा बाबा म्हणत हा माणूस परावलंबी होता. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सर्वप्रथम आमचा विश्वास जिंकला म्हणजे आमचं मन सत्य परिस्थिती कडे वळविण्याचं काम केलं, पहिल्याच दिवशी एकता म्हणजे काय असते हे आम्हाला बाबांनी शिकवलं. नाहीतर तुझ्या घरच्या लोकांनी करणी केली ठोका केला, अशी भूलथापांना माणूस घाबरत, व्यसनाधीन झाला.

घरातली अंधश्रद्धा निघून व्यसनमुक्ती करून सर्व कुटुंबाची एकता दाखवून बाबांनी मानवाला मानव केलं माणुसकी शिकवली. आज जो माणूस गटारात पडला राहायचा त्याच्या अंगावर माशा भनभन करायच्या त्या व्यक्तीला मानव बनून सेवक ही पदवी दिली.

नुसती पदवी दिली नाही तर स्वावलंबी बनवलं जागृत केलं. दुर्जर असाध्य रोगी महारोगी कोडी वंशपरंपरेने चालत आलेले काही विकार बाबांनी दिलेल्या जागृत कृपेने नष्ट झाले. ज्या ठिकाणी पातळाला गाठी बांधून स्त्री स्वतःच शिव झाकत होती, बाहेरबाधे मुळे अनेकांनी कचकुन केस पकडले होते, नाना तर्हेच्या वेदना जीवाला होत होत्या, परंतु या मार्गात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेविका ताईंना अबला नाही सबला बनवलं. सती अनुसया असा दर्जा दिला.

आमच्यामधून कित्येक सेवक दादा व सेविका ताई यांनी कधीच स्टेज पाहिला नव्हता पण आज परमेश्वर कृपेने प्रत्येक सेवक-सेविका परमेश्वरी गुणाचे अनुभव,  हजारो लोकांच्या समोर माइक मध्ये सांगतात आजही माइक म्हटलं तर मोठे मोठे घाबरतात पण मानव धर्मात मार्गात आलेला सेवक कधीही घाबरत नाही. कारण जागृत परमेश्‍वरी कृपा ही २४ तास चैतन्यमय आत्म्यात वास करत असते. 

जर सेवकाची वागणूक असत्य असेल तर खरोखरच आपल्याला कष्ट होतीलचं, दुःख येईलचं म्हणून सेवकांनी बाबांची शिकवण, बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियम कधीही विसरू नये. मार्गात येण्याचा पहिला दिवस मी कसा होतो आणि आज मी कुठे आहो हे विसरता कामा नये. बाबांनी आम्हाला नवजीवनदान सोबत सफल समृद्ध जीवन आम्हाला दिलेलं आहे. फरक फक्त एवढा आहे ज्ञानाची तिजोरी सर्वांकडे आहे, एकच कुलूप लागलेला आहे, पण किल्ली कोणती लावायची हे सेवकांनी ठरवायचं आहे. कारण मनमंदिरात आपण कुणाला पाहतो, हे आपल्याला विश्वास, निश्चय, त्याग व समर्पण ही भावना ठेवून कार्य करणे आहे. हे कार्य जर आपण केले तर बाबांनी दिलेलं नवजीवन खरंच सफल, समृद्ध होईल. नमस्कार.!!

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ जीवन एस. पाटील: 7020000823